साधारण 3 ,साडे तीन महिन्यांपूर्वी तळबीड ला काही कामासाठी गेलो होतो. संध्याकाळ होत आली होती. तिथे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची समाधी होती. तिथं दर्शन घेतलं. जरा वेळ बसलो तेव्हा एक ग्रामस्थांने चौकशी केली कुठून आला वगैरे आणि सांगितलं मागे वसंतगड आहे तो पण फिरून या. संध्याकाळचे पाच वाजत आलेले तरी जाऊन बघू म्हणून गावातल्या छोट्या अरुंद रस्त्याने पायथ्याशी पोचलो. वरून 5-6 जण उतरत येत होते , त्याना विचारलं अंदाजे किती वेळ लागेल सगळं फिरून बघायला तर दोन तास तरी लागतील म्हणले. परत केव्हातरी बघू म्हणून बेत कॅन्सल करून परतीच्या प्रवासाला लागलो होतो तो परत यायचा मुहूर्त शिवजयंती च्या दिवशी आला. तरी अचानक ठरल्याने सकाळी 9 वाजलेले निघायला. तिथं खाली खेडेगाव असल्याने वडापाव, चहा सोडून काही मिळत नाही माहीत होतं म्हणून वाटेत कऱ्हाडला मटकी उसळ आणि पोळ्या पार्सल घेतल्या. जोडीला गार ताक आणि काकड्या.
कऱ्हाडवरून पुढे साताऱ्याला जाताना वाटेत कऱ्हाड आणि उंब्रज याच्या दरम्यान एक फाटा तळबीड ला जातो.
मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या महाराणी ताराबाई या तळबीड गावचे होते.
गडाच्या पायथ्याशी शाळेजवळ तुरळक गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. तिथंच बाईक लावून भर दुपारच्या चांदण्यात चढायला सुरुवात केली. ऊन असलं तरी वारं ही तेवढंच भर्रर्र होतं. सुरवातीला साधारण दीड दोनशे ओबडधोबड पायऱ्या आहेत. नन्तर डोंगरातील पायवाटच आहे.नवख्या माणसाला वाट नीट कळावी म्हणून कदाचित वाटेत ग्रीट भरलेली पोती मध्येमध्ये होती. किंवा ती वर ही नेणार असतील माहीत नाही.
गड चढताना च्या वाटा .. पाऊले चालती वसंतगडची वाट ...
--
--
--
--
--
तासाभरात गड चढून होतो. गडावर पोचल्या पोचल्या एक गणपतीचं पत्र्याच्या शेडमध्ये छोटं मंदिर आहे. गार वारं खात तिथं पाच मिनिटं आपण टेकतोच.
मोरया _/\_
जेव्हा आम्ही इथं पोचलो तेव्हा काही मंडळी उतरत होती.
वसंतगडावर प्रवेश करतानाच्या पायऱ्या.
गडावर प्रवेश करायला दोन प्रवेशद्वार आहेत. एक हे आणि दुसरं पश्चिम दरवाजा. जे दुसऱ्या बाजूने आहे.
प्रवेश केल्या केल्या गडावर काय काय आहे ते लिहिलेल्या बोर्डाचा एक फोटो काढून घेतला.
वर चढून गेल्या गेल्या हे असं अंधारं पण आत गार पत्र्याचे शेड असलेले 'हॉटेल' दिसलं. येता येता ताक पीत आलो होतो तरी आत डोकावलोच. तिथं कळलं की आधी फोन करून संगीतलं तर झुणका भाकरी मिळते . म्हटलं पुढच्या वेळी. चुलीवर चहा उकळत होता त्यामुळं तो चहा प्यायची तीव्र इच्छा झाली. स्मोकी फ्लेवर चा चहा अप्रतिम लागला. हे हॉटेल 1997 पासून आहे म्हणे. मूळ मालक काही काळापूर्वी स्वर्गवासी झाले. आता त्यांचा मुलगा तिथं हे हॉटेल चालवतो. आठवड्यातले 4 दिवस तिथंच राहतो. पुजारी रोज खाली गावात जाऊन येऊन असतो तो दूध वगरे आणतो. हॉटेल ला दरवाजा अजिबात नाही. क्वचित रात्री तिथं बिबट्या , कोल्हा येतो म्हणे. खरं तर दिवसा मनुष्यप्राणी कमी तर रात्री तिथं कोण येणार चोरी मारी करायला . 4 - 4 दिवस तिथं एकटं कशाला राहायचं असे प्रश्न मला पडले. जाऊदे म्हणलं आणि गडविषयी थोडी माहिती घेतली आणि पुढं निघालो.
गडाचा इतिहास गडावर राहत असलेल्या हॉटेलमालकाने सांगितलेला :
इ.स. 1659 साली शिवरायांनी वसंतगड मुघलांच्या ताब्यातून स्वराज्यात सामील करून घेतला. 1697 साली तो औरंगजेबाने परत ताब्यात घेतला. आणि गडाचे नाव किल्ले - दिफदे असं ठेवलं. किल्ले दिफदे म्हणजे यशाची किल्ली. 1696 ते 1707 पर्यंत तो औरंगजेबाकडे होता. 1707 मध्ये मराठ्यांनी ताब्यात घेतला. संताजी ,धनाजी देखभाल करत होते. मंदिर 12 व्या शतकापासून आहे. 1710 मध्ये जीर्णोद्धार झाला.राजाराम महाराजांचे ही काही काळ गडावर वास्तव्य होते.
गडाचा इतिहास (विकिपीडियावरून साभार ) :
वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली.
इ.स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. मसूरचे पूर्वापार जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला होता. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणे त्यांना भागच पडले. महादजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात घेतला . याच महादजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेने या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला .
येथून सरळ पायवाटेने गेल्यानंतर चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते.
मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. बाहेर दोन नंदी आहेत. हा चंद्रसेन म्हणजे रावणाचा भाचा. शूर्पणखेचा मुलगा. रामायण काळात इथं वनात तपश्चर्या करताना त्याच्या भोवती कळकेचे बेट उभे राहिले. लक्ष्मणाचा बाण लागून त्याचे दोन्ही हात तुटले. देवळतली मूर्ती ही दोन्ही हात नसलेली आहे. इथल्या आसपासच्या गावातल्या लोकांचे हे कुलदैवत. त्यामुळे रविवारी तुरळक माणसे देवदर्शनला येताना दिसत होती.
या मंदिराबाहेरचे दोन नंदी
गडाच्या कडेने तटबंदी आहे. अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. ४ बुरुज आहेत.
--
--
बुरूजावर जायला दगडी पायऱ्या ही आहेत. वर गेल्यावर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा . जोडीला भन्नाट वारा .
--
छोटी छोटी मंदिरं ही छान आहेत. गडावर 3-4 तळी, एक विहीर आहे. एक तळ्यात पांढरी कमळं उमललेली होती, त्या तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. एका तळ्यातील पाणी कमी झालेलं .
हा चुन्याचा घाणा
वाटेतल्या एका मंदिरात आणलेली पार्सलची शिदोरी खाल्ली. आणि 4 वाजत आले तसे पुन्हा चहाची फेरी केली. जेवणाची ऑर्डर द्यायला कुणाला उपयोगी पडेल म्हणून हॉटेलमालकाचा नंबर घेतला. रविवार असल्यानें त्यांची दहावीतली दोन जुळी मुले वडिलांना मदत करायला म्हणून आलेली त्याना येत्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि उतरायला सुरुवात केली.
खाली गावात उतरल्याबर एक मंदिर दिसलं. मला अशी आडगावतली मंदिरं बघायला फार आवडतात. एकदम शांत , स्वच्छ असं मंदिर होतं.
तिथंच एक ध्यानमंदिर होतं. मी पहिल्यांदाच एखादं ध्यानमंदिर पाहिलं.
मोठा हॉल, पूर्ण अंधार आणि गार, टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता. हॉलच्या एक बाजूला उजेडात कृष्णाची मूर्ती
मी आपसूकच थोडा वेळ मूर्तीकडे बघत शांत बसले. छान वाटलं. संध्याकाळ होत आलेली. हंबीरराव मोहित्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पाऊले चालती घराची वाट...
छान लिहिले आहे. मस्त झाली
छान लिहिले आहे. मस्त झाली तुमची सहल. फोटो आवडले.खास करून उतरणाऱ्या मंडळींचा छान आलाय.
पहिल्या धाग्याबद्दल अभिनंदन.
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.
फोटो सुंदर...
चांगले लिहिले आहेस..
चांगले लिहिले आहेस..
फोटो मस्त आहेत.
फोटो खूपच छान आलेत. छान वर्णन
फोटो खूपच छान आलेत. छान वर्णन केलत!
छान लिहिले आहे. फोटो सारे हा
छान लिहिले आहे. फोटो सारे हा लेख लिहायलाच काढले असावेत असे आहेत.
वर्णिता, छान वर्णन
वर्णिता, छान वर्णन
धन्यवाद अस्मिता, डॉ कुमार,
धन्यवाद अस्मिता, डॉ कुमार, मृणाली, छन्दीफ़ंदी, ऋन्मेष.
पहिल्या धाग्याबद्दल अभिनंदन. Happy>> हो गं. पहिल्यांदाच लिहितेय धागा काढून भटकंती वर्णन.
ऋन्मेष, हा हा. खरं तर सुरवातीचे फोटो मुलाला पाठवायला काढलेले. नेहमी असे फोटो, अगदी वाटेतली रानफुलझाडं, त्यावरचे किडेमकोडे ही शोधून तो फोटो काढत असतो. यावेळी तो बरोबर आला नव्हता. व्हिडीओ कॉल चा घोळ होत होता. नंतर वर चढून मी बघत होते ते फोटो तेव्हा लक्षात आलं माबोवर टाकायला येतील असे आहेत की हे मग आणखीन 4 काढत गेले. पण ते अँगल , प्रकाश वगरे बघून प्रो असे नाहीत . पण माबोकर समजून घेतील म्हणून पोस्ट केले.
छान लिहिले आहे. फोटो सुरेख
छान लिहिले आहे. फोटो सुरेख आले अहेत.
गडाचा इतिहास थोडक्यात हवा होता.
फोटो व वर्णन आवडले.
फोटो व वर्णन आवडले.
छान लिहिले आहे. फोटो आवडले.
छान लिहिले आहे. फोटो आवडले.
धन्यवाद वावे, रघू आचार्य,
धन्यवाद वावे, रघू आचार्य, मंजूताई, शर्मिला
गडाचा इतिहास थोडक्यात हवा होता. >> अरे हो . ते विसरलेच . अपडेट करते.
छान लिहले आहे
छान लिहले आहे
सगळे फोटो मस्त ..
फोटॉ फार आवडले.
फोटो फार आवडले. प्रवासवर्णनही सुंदर. ते ठिकाण पहावेसे वाटते. बाकी शूर्पणखेचा मुलगा - कुलदैवत हे जरा मजेशीर वाटले.
सुरेख लिहिलेस. वर्णन खूप
सुरेख लिहिलेस. वर्णन खूप चांगले केलेस.फोटो पण सुरेख आहेत.
छान फोटो आणि लेख.
छान फोटो आणि लेख.
खूप आधी कधीतरी श्रीमान योगी, राजा शिवछत्रपती आणि छावा वाचल्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहित्याविषयी फार आदर वाटत होता. ह्यात त्यांच्या गावाचा उल्लेख होताच. पुणे ते कोपु जाताना तळबीड गावाचा बोर्ड वाचून connecting the dots झालेले. तेव्हा सरसेनापती हंबीरराव समाधी असा बोर्ड नव्हता तेव्हापासून माहीत असलेले पण अजूनही जाण्याचा योग न आलेले ठिकाण. मागचा किल्ला तर हायवे वरून देखील पटकन नजरेत येतोच.
किल्याचा इतिहास आणि चंद्रसेन दैवत ह्याविषयीची माहिती प्रथमच कळाली.
हे इथे शेअर केले हे फार छान केले.
एक अतिअवांतर गोष्ट पण तळबीड गावासोबत जोडलेली म्हणून लिहितोय.
ह्याच तळबीड गावातील काही तरुण मुलांनी तळबीडकर वडेवाले हा ब्रॅण्ड स्थापन केलाय. फक्त वडापाव विकतात, छोट्याशा गाळ्यात चालवतात. मी जिथे राहतो त्या पिंची भागात ह्यांची एक शाखा आहे, तिथे उत्तम वडापाव मिळतो. बाकी कोणत्या शाखेत अजूनतरी जाण्याचा योग आलेला नाही, पण रेसिपी सेमच आणि एकाच गावातले सगळेजण शाखा चालवत असल्याने चव सगळीकडे सेम असावी.
धन्यवाद अमुपरी, सामो, देवकी,
धन्यवाद अमुपरी, सामो, देवकी, झकासराव.
सामो, मलाही राक्षसकुळातला चंद्रसेन कुलदैवत म्हणल्यावर जरा वेगळंच वाटलं.
झकासराव, समाधीसमोर च वडापाव विकला जातो. एवढा फेमस ब्रँड केला आहे माहीत नव्हतं. गावातलं दुकान म्हणून तसं नाव असेल असं वाटलेलं. हा चव मात्र अप्रतिम होती. आणि किंमत ही कमी. एका वेळी दोन वडापाव खाऊन ही समाधान होत नाही.
भटकंती वर्णन, छायाचित्रे खूपच
भटकंती वर्णन, छायाचित्रे खूपच छान.गड फिरवून आणल्याबद्दल हार्दिक आभार.
मस्त वर्णिता. असं वाटलं ,गड
मस्त वर्णिता. असं वाटलं ,गड फिरूनी आले तू वर्णिता. ( काय आलं की नाही मला सुद्धा.) छान चव लिहीलंय आणि फोटो सुद्धा छान आहेत.
छान सचित्र वर्णन आणि रोचक
छान सचित्र वर्णन आणि रोचक आख्यायिका.
नंदींच्या जोडीची मजा वाटली - दोन एकत्र असण्याचं काय कारण कोण जाणे.
आहाहा वर्णीता जियो, सुरेख
आहाहा वर्णीता जियो, सुरेख वर्णन, अप्रतिम फोटो.
फार माहिती नव्हती या जागेबद्दल. फिरले तुझ्याबरोबर. महाराणी ताराराणी सिरियल मध्ये काही भाग बघितलयाने त्रोटक माहिती होती.
धन्यवाद किशोर, धनुडी, स्वाती,
धन्यवाद किशोर, धनुडी, स्वाती, अंजू.
तपश्चर्या केल्यावर दोघांनी आशीर्वाद दिले म्हणून दोन नंदी असं सांगितलेलं आठवतंय तिथल्या पुजार्यांनी.
छान माहितीपूर्ण लेख ..!
छान माहितीपूर्ण लेख ..!
फोटो ही सुंदरच...
पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा तुला..!!