मराठी भाषा गौरव दिन - पाउले चालती... - वर्णिता
Submitted by वर्णिता on 25 February, 2023 - 21:42
साधारण 3 ,साडे तीन महिन्यांपूर्वी तळबीड ला काही कामासाठी गेलो होतो. संध्याकाळ होत आली होती. तिथे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची समाधी होती. तिथं दर्शन घेतलं. जरा वेळ बसलो तेव्हा एक ग्रामस्थांने चौकशी केली कुठून आला वगैरे आणि सांगितलं मागे वसंतगड आहे तो पण फिरून या. संध्याकाळचे पाच वाजत आलेले तरी जाऊन बघू म्हणून गावातल्या छोट्या अरुंद रस्त्याने पायथ्याशी पोचलो. वरून 5-6 जण उतरत येत होते , त्याना विचारलं अंदाजे किती वेळ लागेल सगळं फिरून बघायला तर दोन तास तरी लागतील म्हणले. परत केव्हातरी बघू म्हणून बेत कॅन्सल करून परतीच्या प्रवासाला लागलो होतो तो परत यायचा मुहूर्त शिवजयंती च्या दिवशी आला.