Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंजूताईला मम.
मंजूताईला मम.
खूप उत्सुकतेने हदग्याची फुले
खूप उत्सुकतेने हदग्याची फुले आणली आहेत तर त्याची भाजी कशी करावी सांगा प्लिज
पीठ (बेसन) पेरून त्यापेक्षा
पीठ (बेसन) पेरून त्यापेक्षा भजीच कर ना
मला अगदी कमी मसाले घातलेली
मला अगदी कमी मसाले घातलेली चिकन करी रेसिपी हवी आहे. (कांदे , आले, लसूण, तेल खोब्रे ई. चालेल फक्त खडे मसाले, पावडर मसाले जास्त नकोत)
चिकनचे प्रमाण मुला च्या जेवणात वाढवायचे आहे, पण सतत लाल करी नकोय.
मेजवानी कार्यक्रमातली चिकन अळणी बरेचदा करून झाली आहे, ती मस्त होते. तसे अजून काही पर्याय हवे.
आले लसुण पेस्ट, पुदिना
आले लसुण पेस्ट, पुदिना कोथिम्बीर मिर्ची वाटुन, लिम्बु, दही(पाणी काढून) मीठ , हळद हे सगळे लावून, चिकन marinate करायचे ३/४ तास. तव्यावार थोडेसे तेल लावून shallow fry करायचे. छान लागते. (चिकन हरियाली
)
आशु२९, इथे माबोवर ची रेसिपी
आशु२९, इथे माबोवर लेमन चिकन ची रेसिपी आहे अल्पना ची. (https://www.maayboli.com/node/21147
चिकन चे बाईट साइज पिसेस वापरुन ती रेसिपी मी नेहेमी करते आणि मुलीला खुप आवडते.
आलं लसून हिरवी मिरची( कमी वापरुन ) करुन बघा तुम्ही.
थंक्यु किती पटकन रीप्लाय
थंक्यु
किती पटकन रीप्लाय दिलात.
आमच्या गावची रेसिपी आहे. जरूर
आमच्या गावची रेसिपी आहे. जरूर करून बघा. चिकनला किंचीत जास्त मीठ , हळद व धणे पावडर ( अर्धा कि. चिकनला अर्धी वाटी धणे पावडर) लावून अर्धा तास ठेवणे. नंतर तेलावर फोडणीला टाकून झाकणावर पाणी ठेवून शिजवणे. अगदी वाटल्यास चमचा चमचाभर पाणी घालणे. चिकन शिजल्यावर खरपूस होईपर्यंत परतणे. वेगळ्या चवीचे पण छान लागते. धणे पावडर घरची ताजी असेल तर जास्तच छान.
अनघा नी सांगितल्याप्रमाणेच
अनघा नी सांगितल्याप्रमाणेच फक्त त्यात कसुरी मेथी,मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला (साधे तिखट चालेल)हे लावून चिकनचे तुकडे तव्यावर नुसतेच ठेऊन शिजवते.ते बरे लागतात असे घरच्यांचे मत आहे.मी खात नसल्याने बोलू शकत नाही.
VB- ती आधी नीट निवडून घ्या,
.
Aashu29, चिकनच्या
Aashu29, चिकनच्या तुकड्यांमध्ये धणे+ जिरे पावडर घालावी.
Aashu29, चिकनच्या
Aashu29, चिकनच्या तुकड्यांमध्ये धणे+ जिरे पावडर घालावी.
Aashu29, चिकनच्या
Aashu29, चिकनच्या तुकड्यांमध्ये धणे+ जिरे पावडर घालावी.
https://cooking.nytimes.com
कमी मसाल्याचे चिकनचे पदार्थ : https://cooking.nytimes.com/recipes/1020776-chicken-and-rice-soup-with-g... या रेसिपीने सूप करते मी बरेच वेळा. आर्बोरिओ च्या ऐवजी कुठलाही छोटा दाणा असलेला जाडसर तांदूळ चालेल. बॉक चॉयच्या ऐवजी पालक मस्त लागतो. मी धणे पूड आणि हळद दोन्ही रेसिपीत दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी घालते .
Aashu29 >> ही एक थोडी भाजी +
Aashu29 >> ही एक थोडी भाजी + थोडे चिकन असलेली पाकृ आहे https://www.maayboli.com/node/82905
आमचीच रिक्षा
चिकन नेहमीप्रमाणे मॅरीनेट
चिकन नेहमीप्रमाणे मॅरीनेट करून घ्या. मॅरीनेट करताना थोडं तेल पण घाला. तासाभरानंतर फॉईल लावून ओव्हनमध्ये बेक करा.
छान ज्यूसी चिकन तयार होतं. ह्याला जो रस सुटतोतो सुद्धा अप्रतिम लागतो. मी बरेचदा पुर्ण चिकन असं शिजवते, तुकडे न करता. वेळ लागतो पण टेस्ट 1 नंबर.
https://cooking.nytimes.com
https://cooking.nytimes.com/recipes/1017161-oven-roasted-chicken-shawarm... ही पण आमच्याकडे सर्वांना आवडणारी रेसिपी आहे
सर्वांना थँक्स
सर्वांना थँक्स

धनि, तुझी रेसिपी कधीच टिकमार्क केलीये, पण केल मिळत नाहिये.
aashu29 >> पालक घालून करून
aashu29 >> पालक घालून करून बघा की
ग्रेट आयडिया. उग्र नाही ना
ग्रेट आयडिया. उग्र नाही ना लागणार?
पालक घालून मी ग्रीन चिकन करते
पालक घालून मी ग्रीन चिकन करते . उग्र लागत नाही
चिकन ब्रेस्ट चे बाइट साइझ
चिकन ब्रेस्ट चे बाइट साइझ पिसेस लाल तिखट, जिरे पूड, मीठ, मिरी आणि ओरेगॅनो लावून स्टर फ्राय करा. वरून लिंबू आणि चाट मसाला. सोबत आइस कोल्ड बियर. (हे शेवटचं Aashu29 यांच्या मुलासाठी नाही)
2000 झाले. कोणाला नवीन धागा काढण्याचा मान नको आहे का
सामी, मोरोबा धन्यवाद
सामी, मोरोबा धन्यवाद
मी हल्ली बऱ्याचदा बोनलेस चिकन
मी हल्ली बऱ्याचदा बोनलेस चिकन ला थोडी लसूण पेस्ट किंवा ठेचलेला लसूण आणि मीठ लिंबू लावून मॅरीनेट करते १५-२० मिनिट. लोण्यावर चिरलेला लसूण, मशरूम चे तुकडे आणि चिकन परतून घेते. मग त्यात पालक ( साधारण पाव किलो चिकन असेल तर त्यात किमान दोन मुठी पालकाची पाने हाताने तोडून) घालते. वरून मिऱ्याची पूड आणि मीठ. हवे तर कधी मिक्स हर्ब्ज, कधी पिझ्झा सिझनिंग, कधी ताजा बेसिल तर कधी थोडा ताजा शेपू घालते. झाकून पाच - दहा मिनिट शिजू देते. थोडे पाणी सुटते चिकन चे. आणि वरून थोडे अजून बटर घालते. नुसते खायला छान लागते किंवा ब्रेड बरोबर, कधी त्यातच पास्ता किंवा भात घालते.
या हिवाळ्यात खूपदा केला हा प्रकार. जास्त वेळ लागत नाही.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/80900 पुढचे प्रश्न या धाग्यावर विचारा मंडळी
अरे भाग ५ आहे की काढलेला. हा
अरे भाग ५ आहे की काढलेला. हा/आधीचे धागे प्रतिसादासाठी बंद नाही का करता येणार?
हमखास यशस्वी शाकाहारी चायनीज
हमखास यशस्वी शाकाहारी चायनीज सूप व चिलीपनीरची पाककृती हवी आहे. माझी चांगली होत नाही.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/80900 या धाग्यावर प्रश्न विचारा
अरेच्चा असं झालं होय? विचारते
अरेच्चा असं झालं होय? विचारते.
Pages