४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खरे आहे. पर्यावरण प्रेमी लोकांनी तिथे जाऊन माश्यांना सीपीआर द्यायला हवा होता. ढोंगी कुठले.

शेंडेनक्षत्र, जरा भावनेच्या भरात काही शब्द सार्वननिक वेबसाइट वर जहाल झाले. जाहीर माफी.

मी असा एक स्टुडंट गन व्होयलंसने शाळेत मेला त्याच्या पालकांना जवळुन ओळखतो. त्यांच्यावर काय प्रसंग आला हे मी स्वतः पाहीले आहे.

पण तुम्हाला पॅलेस्टाइन गावामधे त्या ट्रेन अ‍ॅक्सीडंटमुळे तिथली कुत्री मांजरी मरत आहेत याची काळजी बघुन तुमचा दांभिकपणा जरुर जाणवला व खटकला म्हणुन तसे शब्द माझ्या पोस्टींगमधे आले.

तुम्ही त्या अपघाताचे खापर सरळ प्रेसिडँटवर ठेवता आणी तिथली कुत्री मांजरी मरत आहेत त्याची तुम्हाला कोण काळजी पण रिपब्लिकन्सच्या आड्मुठ्या गन कंट्रोल धोरणामुळे रोज अमेरिकेतल्या शाळा कॉलेजात इनोसंट मुले मुली गन व्हॉयलंसने मरत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही? याला काय म्हणायचे ते मग तुम्हीच तुमच्या सभ्य भाषेत आम्हा पामरांना समजवुन सांगाच!

आणी अ‍ॅरिझोनात तुमची “नग” केरी तिथल्या मतदारांनी केराच्या टोपलीत फेकुन दिली त्यानंतर मला वाटते त्या मुर्ख बाइने सगळ्या न्यायालयांचे दरवाजे ठोठवले पण त्या उन्मत्त बाइला सगळ्याच न्यायालयानी व न्यायाधिशांनी हाकलुन दिले. ते सगळे न्यायाधिश रिपब्लिकनच होते! तरी तुम्ही अजुनही तिथे मतदानात गैरप्रकार झाले अशी धुळफेक फेकायचा केविलवाणा प्रयत्न करत आहात. तुमचा “ नग“ उमेदवार निवडुन आला नाही तिथेच रिपब्लिकन पार्टीचे इतर उमेदवार त्याच मतदारांनी निवडुन दिले. आँ? ते कसे काय बुवा? काही उत्तर आहे का तुमच्याकडे?

आणी एकाच पार्टीला देशाचे हित बघायचे आहे व दुसरी पार्टी देश बुडवायलाच बसला आहे हा तुमच्या पोस्टींग्समधे वारंवार( नेहमीच म्हणा ना!) येणारा सुर मला जरुर खटकतो.तुमच्या मते अर्धा देश हा देश बुडवायला बसला आहे. दॅट पर्सिस्टंट व्ह्यु ऑफ युअर्स इज सो रिडिक्युलस!

पण परत एकदा हार्श शब्दांबद्दल जाहीर माफी.

इथे मला धर्म घुसडावयाचा नाही पण तुमचे राजकारणतल्या विरोधी पक्षाबद्दलचे जहाल विचार नेहमी नेहमी वाचुन तुम्ही जहाल ख्रिस्ती लोकांसारखे वाटता! तश्या जहाल ख्रिस्ती लोकांनुसार जे जिझसला देव मानत नाहीत ते सगळे सरसकट नरकात जाणार, फक्त त्यांनाच स्वर्गाचा दरवाजा व रस्ता उघडा आहे व माहीत आहे! तसे तुमचे आहे! फक्त रिपब्लिकन्सना अमेरिकेच्या उत्कर्षाचा रस्ता माहीत आहे व फक्त तेच अमेरिकेचा स्वर्ग करणार उलट डेमॉक्रॅट्स मात्र अमेरिकेला विकुन खाणार व नरकाच्या खाइत नेणार!

व्वा! काय लॉजिक आहे!

अहो शेंडेनक्षत्र, ओहायोचे गवर्नर रिपब्लिकन आहेत.
बहुधा खोटे बोलणे नि इतरांना शिव्या देणे या व्यतिरिक्त रिपब्लिकन लोकांना काहीहि करता येतच नाही मुळी. ते कसले लक्ष देतात?
आणि हो, तसे या देशात प्रचंड मूर्ख असलेले लोक अनेक आहेत, त्यातले काही मेले तरी रिपब्लिकन लोकांच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणारे अनेक आहेत. तेंव्हा घाबरू नका.
नुसत्या शिव्या देण्यापेक्षा, काय करायला हवे होते व कसे याबद्दल तुमची काय मते आहेत?
अर्थात् तसले काही रिपब्लिकन लोकांना कळतच नाही, तुम्ही तरी काय करणार?
तुम्ही असे करा, इथले लोक काही तुमचे म्हणणे ऐकत नाहीत, तुम्ही टकर कार्ल्सन किंवा लेविन किंवा हॅनिटी कडे जा. ते तुमचे ऐकतील व तुम्हाला योग्य तो सन्मान देतील.

रिपब्लिकन्स चा dystopian world view अधोरेखित करणार्‍या दोन बातम्या.
१ गेले काही महिने 'सहा वर्षाच्या मुलाने शाळेत बंदूक आणली' अशा बातम्या येत अहेत. अर्थात ही १०० % घरातील प्रौढांचीच चूक आहे. लहान मुलांना बंदुकीचे गांभीर्य कळत नसते. मिसुरी राज्यात डेमोक्रॅट्स नी एक नवा बदल सुचवला. लहान मुलांना रस्त्यावर बंदूक घेऊन फिरायला बंदी. ( ती सुद्ध एकटे असताना). अत्यंत सेन्सिबल सूचना. डोके ठिकाणावर असलेले कुणीही पाठिंबा देइल. पण वी आर टॉकिंग अबाउट रिपब्लिकन्स. त्यांनी ही सूचना हाणून पाडलीं

२ फ्लोरिडा राज्यात एका गरोदर महिलेच्या पोटातील बाळाला Potters Syndrome हा गंभीर आजार झालेला आहे. ते बाळ जन्मल्यावर जिवंत रहाणार नाही. तिचे अ‍ॅबोर्शन करायला डोक्टर्स नी नकार दिला कारण राज्य सरकार चे नियम. आता त्या महिलेला बाळाला जन्म द्यावा लागणार. जगणार नाही हे १०० % माहित असताना.

त्या फ्लॉरिडाच्या गव्हर्नरने Martha's vineyard कांड केलं तसं श्रीमंत डेम्सच्या वस्तीत जाऊन कोणा रिपब्लिकनने याच सेम केमिकल्सचा स्फोट करून टाकला तर लगेच कुईकुई सुरू करतील ते. मग स्फोट करणाऱ्याला फाशी द्या, केमिकल कंपनी बंद पाडा, झालंच तर चिमुरड्या ग्रेटाचं एखादं बालनाट्य वगैरे.

बाकी त्या निक्की halley ची मज्जा आली. तिने अगदी ठासून सांगितलं 'अमेरिकेत रेसिझम नाही'. त्यावर घोड्यासारखं तोंड असलेल्या रिपब्लिकन ann coulter ने तिला 'go back to your own country' असं सुनावलं. दोन्ही बाजूंना असे अँटी इंडियन नग भरलेले आहेत. त्यांच्याकडे पावर आली तर मोदी जयशंकरना सीएएसारखा नवा कायदा करावा लागेल- अमेरिकेतून हाकललेल्या निर्वासितांना आसरा द्यायला.

अहो व्हाइटहॅट, तसा कायदा आला तर फक्त मुळच्या भारतियांचच काय घेउन बसलायत? सगळी अमेरिकाच( थोडेसे प्युअर अमेरिकन अ‍ॅपेची/ होपि/ अ‍ॅनसाझि/ चेरकी/ ब्लॅक फुट/ ओगलाला/सु/प्युब्लो/शॉनी/ नावाहो/शायान्/नेझपर्स/ चिपवावा/ सेमिनोल/ डेलवेअर वगैरे जमातीतले लोक सोडुन.. तेही अजुन प्युअर रेसचेच राहीले असतील तर!) निर्वासित होउन जाइल हो Proud

त्या फ्लॉरिडाच्या गव्हर्नरने Martha's vineyard कांड केलं तसं श्रीमंत डेम्सच्या वस्तीत जाऊन कोणा रिपब्लिकनने याच सेम केमिकल्सचा स्फोट करून टाकला तर लगेच कुईकुई सुरू करतील ते.

>>ओ, अपघात झाल्यावर वेगळी प्रतिक्रिया आणि जाणुन बुजून स्फोट केल्यावर वेगळी प्रतिक्रिया देतात होय दुटप्पी कुठले...

बाकी ही निकी हेली स्वतः कन्फेडरसी समर्थक संस्थांशी मिळून मिसळून असायची. जुना व्हिडिओ फिरतोय नेटवर.

“त्यावर घोड्यासारखं तोंड असलेल्या रिपब्लिकन ann coulter”

Biggrin

अहो तिच्यासाठी ट्रंपसारख्या राइट विंग हेवी वेट्सनी ( ती स्वतः राइट विंग नट असुनही!)अजुनही बरीच काही शेलकी विशेषण वापरली आहेत. Proud

If Ann Coulter is here, who is scaring the crows away from our crops ?

Last year we had Martha Stewart as a guest who makes bed sheets, now we have Anne Coulter who cuts eye holes in them.

- पिट डेव्हिडसन

The Best Ann Coulter Insults at the Rob Lowe Roast
https://www.youtube.com/watch?v=zwoGrDa5g2c

मार्जोरी टेलर ग्रीन देशाचे तुकडे व्हावेत अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त करते आहे.
ब्ल्यू स्टेट मधुन रेड स्टेट मध्ये जाणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसावा असे ती म्हणते आहे.
https://twitter.com/JasonSCampbell/status/1628105247968067587?t=uGouaGlV...

करू देत.
लाल राज्ये भिकारी आहेत नि निळ्या राज्यातल्या लोकांच्या करावर जगताहेत.
एकदाची त्यांची कटकट गेली की आपण सुखी होऊ.

डोमिनिअन विरुद्ध फॉक्स न्युज खटल्यात काय एक एक मौलिक भांडी फुटत आहेत! त्या खटल्याच्या जजने फॉक्सचे सगळे इंटर्नल कम्युनिकेशनचे इ मेल्स जगजाहीर करुन सबंध फॉक्स न्युजचे पितळ त्याने उघडे पडले आहे.

जे सारासार बुद्धीचे आहेत त्यांना हे सगळे माहीतच होते .शॉन हॅनॉटी , टकर कार्ल्सन यांचे व फॉक्स चॅनलचे इलेक्शन फ्रॉडबद्दलचे खरे विचार बघुन तिच “ फ्रॉड“ थिअरी इथे उगाळत बसणारे व फॉक्स न्युजने ब्रेन वॉश झालेले ( कोण ते चाणाक्ष मायबोलिकरांच्या लक्षात आले असेलच!)आतातरी होपफुली शुद्धीवर येतील.

ट्रंप आता या निवडणुक सायकलमधे सेल्फ प्रोक्लेम्ड “ आय एम युअर सेव्हिअर, आय अ‍ॅम युअर जस्टिस अँड आय अ‍ॅम युअर रेट्रिब्युशन“ मोड मधे अवतारला आहे. त्यामुळे टकर कार्ल्सन त्याच्या बद्दल ( बिहाईंड क्लोज डोअर!) काय बोलला आहे हे बघुन ट्रंप सर्वप्रथम त्यालाच बहुतेक ठार मारेल! दॅट विल बी सच अ‍ॅन आर्यनी! Proud

टकर कार्ल्सन ऑन ट्रंप( बिहाईंड क्लोज डोअर)

१: “I hate him passionately."

२: Carlson said that "we are very, very close to being able to ignore Trump most nights" and that "I truly can't wait."

३: Addressing Trump's four years as president, Carlson said, "We're all pretending we've got a lot to show for it, because admitting what a disaster it's been is too tough to digest. But come on. There really isn't an upside to Trump."
Proud

आणी शॉन हॅनीटी अंडर ओथ इन कोर्ट!

Hannity was responding to a question in the deposition on whether he believed the false claims made by former President Trump’s attorney Sidney Powell in November 2020.

Powell told Hannity then that there was widespread fraud in the 2020 election and that voting machines manufactured by Dominion Voting Systems helped steal the election by switching votes.

“I did not believe it for one second,” Hannity said in the released deposition.

Proud

पाहतेय. महान आहे सर्वच. मर्डोक म्हटला होता म्हणे की आपण निकाल मान्य करायला पाहिजे (?) . तरी फॉक्स च्या एक्जेक्यूटिवज नी त्यांच्या व्ह्यूअर्स ना जे हवे तेच दाखवायचे ठरवले?! अनबिलिवेबल.
बाकी ते बायडन बोलताना अडखळला वगैरे की मग इथे ३ पोस्टींचे भाषण घेऊन अवतरणारे धूमकेतू आता थोडे दिवस अज्ञातवसात जाणार बहुधा Happy

फार मजेदार कव्हरेज आहे फॉक्स वि डॉमिनियन चे. सगळे मिळून मागाक्राउड ला उल्लू बनवत होते.

आणि तो टकर अजूनही त्याच बबल मधे आहे. ६ जानेवारी च्या काही सिलेक्टिव क्लिप्स दाखवून अहो तेथे काही झालेच नाही ही नवीन पुंगळी सोडली आहे. त्यावर तात्या म्हणतोय केस डिसमिस्ड - सर्वांना सोडून द्या. अर्थात हे सगळे "हेट ट्रम्प पॅशनेटली" बाहेर यायच्या आधीचे आहे. पण त्या ११ की १६ प्रयत्नांनंतर मॅकार्थी शेवटी निवडून आला, त्याकरता त्याला काय काय तडजोडी कराव्या लागल्या त्यात टकर कार्ल्सन सारख्याला ६ जाने. चे रेकॉर्डिंग देणे ही एक होती.

टकर चे लॉजिक म्हणजे खुनाच्या काही वेळ आधी खुनी नुसता रस्त्यावर चाललेला दाखवायचा आणि त्या "पुराव्या" वरून खून झालाच नाही असे क्लेम करायचे - असले आहे.

यात सगळ्यात अडकले आहे ते मागा पब्लिक. रेड स्टेट्स मधले सर्वसाधारण अमेरिकन्स. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, शिक्षा भोगत आहेत. आणि या चिथावणार्‍यांवर आताही फक्त सिव्हिल केस आहे - हा मानहानीचा दावा. क्रिमिनल नाही.

पाहतेय. महान आहे सर्वच. मर्डोक म्हटला होता म्हणे की आपण निकाल मान्य करायला पाहिजे (?) . तरी फॉक्स च्या एक्जेक्यूटिवज नी त्यांच्या व्ह्यूअर्स ना जे हवे तेच दाखवायचे ठरवले?! अनबिलिवेबल. >> पण हे फॉक्स किंवा ओटीएन वर दाखवले जाते आहे का हा कळीचा प्रश्न आहे. फॉक्स नि टकर आधीच जान ६ कसा पीसफूल मार्च होता ह्यावर सरकले आहेत.

बाकी ते बायडन बोलताना अडखळला वगैरे की >> हा प्रकार तर मला कधी झेपलाच नाही .

आजच्या ट्रंप निर्णयाशी असहमत! लुक्स पॉलिटिकली मोटीव्हेटेड.

उलट जॉर्जिया मधे त्याने काय केले( २०२० निवडणुकीनंतर) दॅट हॅज अ मोर क्रिमिनल मेरीट दॅन धिस केस.

जॉर्जिया मधे त्याने काय केले( २०२० निवडणुकीनंतर) दॅट हॅज अ मोर क्रिमिनल मेरीट दॅन धिस केस.

+१.
पण, जर trump साठी काम करणारे लोक जर त्याच गुन्ह्यासाठी जेलमध्ये जात असतील, तर ट्रम्प स्कॉट फ्री का रहावा ? एकूण, ही indictment केली त्यात काही वाईट वाटले नाही, पण सिरियस indictment आधी यायला हवी होती, strategically अतिशय easy call आहे हा.

पण ह्याचाच अर्थ DNC हे सगळे म्यानेज करत आहे हे इतकेसे स्पष्ट नाही, असा मी काढला आहे.

सिरियस indictment आधी यायला हवी होती >>>> +१!
ही indictment फालतू आहे एकदम, गंभीर गुन्ह्यांचे काय ? की ते डिसिजन एक्झिक्यूट करणे अवघड आहेत म्हणून एक किरकोळ निर्णय घेतल्याचे दाखवून बाकीची घोंगडी भिजत राहणार.

>>> ही indictment फालतू आहे एकदम, गंभीर गुन्ह्यांचे काय ? की ते डिसिजन एक्झिक्यूट करणे अवघड आहेत म्हणून एक किरकोळ निर्णय घेतल्याचे दाखवून बाकीची घोंगडी भिजत राहणार.
अनुमोदन, तसंच वाटतंय मलाही.

अरे पण हे वेगवेगळे खटले आहेत, त्यातील फिर्यादी पार्ट्या, ज्या न्यायालयांमधे तो खटला दाखल केला आहे ती न्यायालये, खटल्याचे प्रकार (सिव्हिल, क्रिमिनल) वेगवेगळे आहेत ना? एखाद्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर प्रमाणे हा पॉज करू व तो पुढे काढू असे बायडेन करतोय असे तर नाही?

हा खटला न्यूयॉर्क डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नीचा, न्यूयॉर्क स्टेट अ‍ॅटर्नीचा त्याच्या फॅमिली व ट्रम्प ऑर्गनायझेशन विरूद्धचा, जॉर्जिया मधला फुल्टन काउण्टी डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नीचा इलेक्शन संबंधात राज्य लेव्हलचा, २०२० च्या निवडणुकी बद्दलचा फेडरल खटला - जस्टिस डिपार्टमेण्टचा, मार-ला-गो चा तसाच, ६ जाने बद्दलचा कॅपिटॉल पोलिस डिपा. ने दाखल केलेला. प्रत्येकाची कोर्ट्स वेगळी, खटल्याचे स्वरूप वेगळे. सिव्हिल आहे की क्रिमिनल याप्रमाणे पुराव्यांची गरज वेगळी, त्यात थोर्थोर रिपब्लिकन्सची साक्ष लागत असेल तर ती मिळवण्याची कसरत वेगळी - कारण एकजात सगळे लोक एक्झिक्युटिव्ह प्रिविलेज ई. बाता मारत लांबवत होते साक्ष द्यायचे. एक दोन वेळा न्यायालयाने त्याचा काही संबंध नाही सांगत साक्ष द्यावीच लागेल असे सांगितले. पण अजून बरेच लोंबकळत असावेत. काल का परवा माइक पेन्सला ६ जाने संदर्भात माहिती द्यावी लागेल अशी बातमी वाचली. ते मिळवण्याची प्रोसेस फार क्लिष्ट आहे.

फा +१.
हा लहान खटला आहे म्हणून रडीचा डाव आणि ह्याच्या ऐवजी तो का नाही घेतला या आर्ग्युमेंटला काही अर्थ नाही. एअरट्रॅफिक कंट्रोल अगदीच चपखल उपमा आहे.

>>> एखाद्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर प्रमाणे हा पॉज करू व तो पुढे काढू असे बायडेन करतोय असे तर नाही?
लोल नाही नाही.
बरोबर आहे तू म्हणतोस ते. Happy

आत्ता फॉक्सवरच्या काही क्लिप्स बघितल्या तर मेल्टडाऊन म्हणजे कोणी वारलं बिरलं की काय वाटेल असं बोलताहेत. गॅहम तर डोळ्यात पाणी आणून बोलत होता असा भास झाला. Rofl कोणी मगशॉट टीशर्टवर आणि डॉर्मरुम मध्ये लागतील म्हणतोय. कोणी आता तो खरा बॅडअ‍ॅस झाला म्हणतोय. मांदियाळी आहे सगळी. Biggrin

>>लुक्स पॉलिटिकली मोटीव्हेटेड.<<
मुकुंद - ते सगळं ठिक आहे.. विल दीज बराज ऑफ केसेस होल्ड कँडल टु डिक्लायनिंग इकानमि, रायझिंग इन्फ्लेशन, डॉलर लूझिंग इन्फ्ल्युंस एट्सेट्रा, इन '२४ इलेक्शन्स? व्हाड्या थिंक...

Pages