बॉलीवूडचा बाप येतोय.. गदर २.० ! सन्नी देओल इज बॅक.

Submitted by ढंपस टंपू on 10 February, 2023 - 04:18

गदर २.०
सन्नी पाजींच्या फिल्मचं शूटींग संपत आलेलं आहे. आता ही फिल्म रिलीज व्हायच्या वाटेवर आहे.
गदरने भारतात सर्वाधिक पाहिली गेलेली फिल्म हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. लगान पेक्षा अर्ध्या बजेट मधे बनलेल्या (३० करोड) या फिल्मने लगान पेक्षा जास्त बिझनेस केला. लगान सुद्धा चालली. पण तितका बिझनेस करायला लगानला दीड वर्षे लागलं. त्या वेळच्या ३० करोड मधे म्हणजे आजच्या दीडशे करोडच्या बजेट मधे बनलेल्या या फिल्मचा त्या वेळचा बिझनेस आजच्या जमान्यात पाचशे कोटी (फक्त तिकीट बारीवर) आहे.
Gadar_2_film_poster.jpg
गदर २.० ला घेऊन जबरदस्त उत्सुकता आहे. सनीची जादू आजही कायम आहे हे चुप च्या यशावरून समजलेच आहे.
आजही " ये ढाई किलो का हाथ जब पडता है ना " सारखे असंख्य डायलॉग्ज लोकांच्या स्मरणात आहेत. गदर मधले डायलॉगज तर सनीपाजी पडद्यावर असल्यानेच खरे वाटू शकतात.

त्या वेळी गदरने वेड लावलं होतं.
तुम्हारा पाकिस्तान जिंदाबाद, लेकीन हमारा हिंदुस्तान जिंदाबार था, है और रहेगा सारखे ढांसू लायलॉग्ज, सनी पाजीचं हँडपंप उखाडून आग ओकणार्‍या नजरेनं पाहणं हे सगळंच लोकांना पुन्हा पहायचंय.

अमिताभ बच्चनची जादू ओसरत असताना जर बॉलीवूड कुणी सावरलं असेल तर ते सनीपाजीच. अँगी यंग मॅनचा उग्र अँगी मॅन झाला. सुरूवातीचा हळवा सनी आग ओकणारा युवक झाला. अर्जुन, यतीम, डकैत, घायल, जीत, घातक सारखे असंख्य पिक्चर्स सनीच्या या इमेजने तारून नेले. सनीच्या या इमेजचा फायदा घ्यायला निर्मात्यांची रांग लागायची. पण सगळेच पिक्चर्स चांगले बनत नसत. मग सनीला फटका बसू लागला.

ज्या अनिल शर्मांनी गदर बनवली त्यांचाच सनीला घेऊन बनवलेल्या स्पाय मूव्ही "हिरो" ने सनीच्या इमेजला उतरती कळा लागली. मग सनी पाजी पण भरकटले. दिल्लगी सारखे सिनेमे बनवू लागले. भावासाठी भगतसिंग बनवला. त्यात नुकसान झाले. सनी पाजी दिग्दर्शक म्हणून कधीच चांगले नव्हते. पण त्यांना ते समजले नाही. नुकसान होत असतानाही दिल्लगी बनवला, यमला पगला दिवाना बनवला आणि अजूनच खोलात गेले. त्यातून सावरता न आल्याने मग ते बॉलीवूडपासून दूर झाले.

पण अशा मॅनली हिरोंना वय, काळाचं बंधन नसतं. धर्मेंद्र पाजी तर सत्तरीतही फौलादसिंग साकारत होते. हुकूमत सारखे सुपरहीट पिक्चर देत होते. अशा बिनडोक पिक्चरचं एकमेव अ‍ॅसेट असायचं. धरम पाजी. तीच गोष्ट सनी पाजीला सुद्धा लागू आहे.

नुकताच घायल २.० येऊन गेला. सनी पाजीचं दिग्दर्शन जरासं सुधारलेलं दिसलं. पण सफाईदार नाही. पण प्रेक्षकांचं सनीवर अजून प्रेम आहे हे घायल फिरसे ने दाखवलं. मग चुपने पण ते सिद्ध केलं.

या पार्श्वभूमीवर गदर २.० अनिल शर्माच डायरेक्ट करत असल्याने जबरदस्त उत्सुकता ताणली गेली आहे. ११ ऑगस्ट रोजी पिक्चर रिलीज होत आहे . आताच ओटीटी प्लॅटफॉर्म्स कडून चढत्या क्रमाच्या ऑफर्स गदर २.० साठी येत आहेत. या फिलमचा ओटीटी राईट बॉलीवूडमधले रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे.

रिलीज आधीच ब्लॉकबस्टर हिट होण्यात वर्ल्ड टीव्ही राईटस आणि ओटीटी राईट्ससाठी चाललेली स्पर्धा मोठी भूमिका बजावणार आहे. तिकीट बारीवर होणारे कलेक्शन हे फक्त पुढे मोजायचे.

आपल्यापैकी बर्‍याच जणांचे पहिले प्रेम बॉलीवूड आहे. त्यावर आक्षेप नाही. पण मराठी पिक्चर्स नक्की बघा. वर्षातून दोन पिक्चर्स जास्तीत जास्त संख्येने पहा. बॉलीवूडचे प्रेम जपत जपत मराठीही पहा.

गदरची रिलीज डेट निश्चित असल्याने त्या काळात धंदा करू शकणार्‍या मराठी पिक्चर्सनी एखादा आठवडा संयम पाळावा. मेन शोज मिळत असतील तरीही या मोठ्या सिनेमापुढे रिलीज करण्याचा धोका पत्करू नये. कारण आपले मराठी पब्लीक साऊथ सारखे कट्टर नाही. एकदा गदर पाहिल्यावर दोन तीन आठवडे थेटरकडे फिरकणे होत नाही. या गोष्टींचा विचार करावा. मराठी पिक्चरने पण आता ट्रिकी व्हावं.

अर्थात सन्नी पाजी सारख्या मॅनली हिरोजची अ‍ॅक्शन पहायला मराठी सहीत सगळेच आतुर असणार यात शंकाच नाही.
त्या वेळी हँडपंप , आता काय उखडतात सनी पाजी ही उत्सुकता आहे.

पोस्टर्सवरून बैलगाडीचं चाक उचलून सनीपाजी फेकताहेत असं दिसतंय.
तोच गुस्सा, तेच आग ओकणारे डोळे, तेच ढांसू डायलॉग्ज, तीच ती अ‍ॅक्शन आणि तीच जादू अनुभवयाला उत्सुक आहे.
तुम्ही ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याय!! मजा येईल.
बहुतेक तो जोश अनुभवायला थिएटरमध्ये पाहू.

सनी देवल नी एक काळ गाजवला असला तरी आत्ताच्या चित्रपट बघणाऱ्या पिढीला त्याच्या बद्दल आणि गदर बद्दल अजिबात ममत्व नाही, त्यामुळे गदर 2 ला फारसा प्रतिसाद मिळेल असे वाटत नाही

त्यामुळे गदर 2 ला फारसा प्रतिसाद मिळेल असे वाटत नाही >> काय लका, नेहमीच्या आयडीने पठाणवर तीन तीन धागे काढता अन दुसर्‍यांच्या आवडीच्या हिरोला नाट लावायला राखीव आयडी काडता, हे वागणं काय बरूबर न्हाई !

सन्नीच्या गदर १ ने जादू केली होती .
सारुख ने भगव्या रंगावरून controversy क्रियेट करून सिनेमा हिट करून हिरव्या प्रेमी कडून गल्ला भरून घेतला !
तसे गदर बद्दल होण्याची सुतराम शक्यता नाही .
एक तर भगवी लोकांना कितीही पेटवायचा प्रयत्न केला तरी पेटत नाहीत , मग श्टोरी आणि डायरेक्षन च ठरवील गदर हिट होईल का नाही ........

अर्रर्र ! रूमाल टाकून चार तास निघून गेले.
सनी म्हटलं कि एक अप्रिय आठवण खपल्या काढून दुखते. सध्या पोस्ट ऑफीस उघडे आहे मालिका बघतोय. त्यात अगदी माझीच स्टोरी आहे.
२००३ च्या दरम्यान नोकरीत असताना अ‍ॅडमिन मधल्या एका सुंदर मुलीशी छान मैत्री झाली. खूप दिवस तिच्यासोबत कुठेतरी भटकायचं मन होत होतं. तिच्यासाठी थांबू लागलो. पण ती मला हसून टाटा करत बसने भुर्रकन निघून जायची. खूप मेहनत केल्यावर एक दिवस ती प्रसन्न झाली. प्रचंड आढेवेढे घेत गाडीवर मागच्या सीटवर बसली. त्या दिवशी मागच्या सीटवर पोरगी बसणे म्हणजे काय अनुभव असतो हे समजलं.
पण आमची गाडी मनपा बस स्टँडपर्यंतच जाई. तिथून ती घराकडची बस घेऊन जायची.
हळू हळू मग ही बस पण टळली आणि तिच्या घराच्या एक स्टॉप मागे सोडण्यापर्यंत प्रगती झाली. खरं तर इतक्यावर समाधान मानायला पाहीजे कि नाही ? जी गोष्ट कधी होईल याची कल्पना पण केली नव्हती ती झाली. मागे बसून यायला लागली. घरापर्यंत मजल मारली. पण आता हिच्यासोबत कुठेतरी फिरायला, सिनेमाला, हॉटेलमधे (जेवायला) जायची स्वप्नं पडू लागली. ये दिल मांगे मोर !

मी कितीही चतुराईने विषय काढला तरी ती चतुराईने टाळत असे. मग एक दिवस असेच प्रचंड आढेवेढे घेत जरा महागड्या हॉटेल मधे मंद प्रकाशात जेवायला गेलो. मस्त हळुवार संगीत लावलेलं होतं. एअर इंडीयाच्या महाराजाच्या वेषातले वेटर अदबीने फिरत होते. बोलावलेला स्ट्युअर्ट ऑर्डर घ्यायला आला. तिला इंप्रेस करायला जे जे कधी ऐकलेले नाहीत ते पदार्थ मागवले. आख्खा पगार गेला तर गेला ही मनाची तयारीच केली होती.

आख्खं ऑफीस जिच्या मागे ती आपल्यासोबत इथपर्यंत आली याचं कोण अप्रूप !
मग गप्पांना विषय पाहीजे ना ? म्हणून सिनेमे, हिरो, हिरॉईन सुरू झालं. तिला विचारलं कोणता हिरो आवडतो.
तर म्हणाली "सनी देओल"
आता सनीचा बाजार उठलेला होता. सनीचे अ‍ॅक्शन मूवीज आवडायचे. पण एकदम गळ्यातला ताईत बिईत नव्हता. पण तिचं मन राखायला मी पण म्हणालो "सेम हिअर ! मलाही सनीच आवडतो"
आणि मग रेस्तराँ मधून बाहेर पडेपर्यंत ती फक्त सनी देऑल बद्दलच बोलत होती.

असेच एक दोनदा पगाराला आणखी दोन तीन ठिकाणी गेलो. तिथेही सनीपुराण सुरूच.
तिला खूष करायला मी चार चाकी पण घेतली होती. तिलाही खूप आवडली.
मग ती माझ्या बाजूला बसून गप्पा मारत येऊ लागली.

पण विषय दोनच
१. माझा भाऊ
२. सनी देओल

पहिल्याबद्दल वेडं वाकडं बोलणं शक्यच नव्हतं. उद्या मेहुणा झाला तर ?
दुसरं म्हणजे बोलून फसलेलो.

एक दिवस म्हणाली " मी त्याच्याशीच लग्न करीन ज्याची बॉडी सनी देओल सारखी असेल"
माझी बॉडी फार तर बातो बातो मे मधल्या टीना मुनीमच्या गिटारिस्ट भावासारखी.

मग एकदा मनापासून विचार केला.
तिला सोडायला १८ किमी जायचं. तिथून पुन्हा १८ किमी माघारी यायचं.
संध्याकाळची रात्र व्हायची. काही कामाचा उरलो नव्हतो.
म्हटलं अजून एक दोनदा बघू काही फरक पडला तर.

बागेत जायची तीव्र इच्छा होती. सारसबागेच्या कॉर्नरला आइसक्रीम घ्यायला थांबलो. आता मनातली इच्छा कि हिरवळीवर तिच्यासोबत बसावं. मस्त रोमँटीक गप्पा कराव्यात...

अर्रर्र पण माझा भाऊ आणि सनी शिवाय गाडी ट्रॅकवर येईचना.
मग मनावर दगड ठेवला. ती सोडून कुठलीही मुलगी आवडेनाशी झालेली होती. अगदी ऐश्वर्या राय जरी लग्न करतो का म्हणून विचारायला आली असती तरी तिला सॉरी म्हणालो असतो अशी अवस्था होती.
आख्ख्या ऑफीसमधे यांचं काहीतरी अफेअर आहे अशी चर्चा चालू होती. लोक पाठलाग करून कुठे गेले हे बघायचे. काही जण ढोपर मारून मग कधी लाडू असं विचारायचे. हे तोंदाबुमा असायचं. नेमकी परिस्थिती फक्त मलाच ठाऊक होती. सांगताही येत नव्हतं आणी सहनही होत नव्हतं.

पण मग मनाचा निग्रह केला. तिच्या सौंदर्याचा मोह सोडला. तिच्या अंमलातून पराकाष्ठा करून बाहेर पडलो. हळू हळी इतर मुलीही असतात याची जाणिव होऊ लागली. मग असंच एकदा हिय्या करून लग्न करून मोकळा झालो. मस्त सुखी आहे.
तिची खबर बात येत होतीच. तिला नंतर सलमान खान आवडू लागला होता. बरं झालं वेळेत वाचलो असं वाटलं.
माझ्या जीवनात सनी देओलचं हे असं स्थान आहे.

का सुंदर पोरींना आवडायचा सनी देओल ?

Submitted by Sadha manus on 11 February, 2023 - 07:51 >>> सर, तुम्ही साधे कधीपासून झालेत ? साधा च्या जागी चालू, विक्षिप्त, सणकी असे काहीही विशेषण वापरले तर कुणीच काही बोलणार नाही. Happy
सनी देओल बद्दलचा द्वेष उफाळून आलाय हे कळू न देण्यासाठी तुम्ही नेहमीचा आयडी वापरत नाहीत यावरूनच तुम्ही साधे नाहीत हे कळतंय. Lol

सनी देओल बद्दल मला अजिबात द्वेष नाही, उलट मला सनी- राहुल rawail, सनी - संतोषी कॉम्बिनेशन चे चित्रपट अतिशय आवडतात. पण आता सनी, amisha, अनिल शर्मा कोणीच relevant राहिले नाहीत, त्यामुळे गदर 2 ला फारसा प्रतिसाद मिळेल असे मला वाटत नाही.

मी अनु, फुरोगामी, मृणाली, अस्मिता .... मंडळ आभारी आहे.

सामा - कोई शक ? जळालेल्या डोंगराची शपथ ! किस्सा सत्य आहे. सरांप्रमाणे रचून सांगण्यासारखी कला नाही अंगात. Wink

गदर २.० एक हजार करोड़ी पिक्चर आहे अशी आतापासूनच चर्चा आहे. जेव्हढी हवा आहे तेव्हढाच भारी निघावा हे सनीप्रेमी म्हणून टेंशन आले आहे.

सन्नीचा घायल वन्स अगेन देखील थरारक आणि इंटरेस्टिंग वाटला होता
भले नाचता येईना का !
पण अभिनय आणि ऍक्शन च्या जोरावर अख्खा सिनेमा ओढून न्यायची ताकत सन्नी मध्ये आहे .
भाऊ ची पर्सण्यालिटीच तशी आहे .
त्याच्याकडे बघून वाटते तरी पठ्ठ्या सात आठ जणांना लोळवू शकतो .
नाही तर तोतल्या सारूख कड बघा , शिग्रेटी पिवून पीवून छातीच्या झाल्यात पिपाण्या .......

माझी बॉडी फार तर बातो बातो मे मधल्या टीना मुनीमच्या गिटारिस्ट भावासारखी. >>>>> आ रा रा खुप भारी ....
रघु आचार्य. .. हसून हसून पुरेवाट झाली.

@रघू आचार्य
किस्सा मस्त आहे. Lol
या धाग्यावर येणे, सार्थक झाले.

गदर पुन्हा रिलीज झाला आहे. २२ वर्षांनी रिलीज होऊनही हाऊसफुल्ल चालू आहे. अर्थात पैसे कमावणे हा उद्देश नसून गदर २ ची वातावरणनिर्मिती असल्याने फक्त ३०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. त्यामागे जास्तीत जास्त दिवस गदर थेटरात रहावा आणि वातावरण बनावे हा हेतू असेल.
भरवशाच्या म्हशीला टोणगा होऊ नये म्हणजे मिळवलं. घायल चा सिक्वेल एकदमच बिनडोक निघाला. अर्थात सनीने स्वतःच दिग्दर्शन केलं होतं. आचारी सुट्टीवर गेला म्हणून मॅनेजरने स्वयंपाक केला असं चालतं होय ?

दिल्लगी सारखे सिनेमे बनवू लागले. >>>>>मला पुष्कळ आवडते हि मुवि. अजून एक फ़रदीन चा हम हो गाये आपके....या दोन्ही मुवि बघताना लॉजिक बाजूला ठेवायचे आणि फक्त डोळ्यात प्रेम प्रेम प्रेम .

11 ऑगस्ट. जवळ आली तारीख.
जवान सहित सर्व बड्या चित्रपटांनी त्यांच्या रिलीज ची तारीख पुढे ढकलली आहे. फक्त दोन चित्रपट त्या दिवशी रिलीज होणार आहेत.
गदर १ च्या वेळी त्याची एव्हढी जबरदस्त क्रेझ होती कि लग्नाला पहिले दोन आठवडे प्रेक्षक नव्हते. लगान चालायला लागला तो चार आठवड्यानंतर. तसंच वातावरण या वेळी आहे.

बऱ्याच दिवसांनी सहकुटुंब सहपरिवार मोठ्या ग्रुपने थिएटरलाच सिनेमा बघायचा मूड आहे.

सनी अजूनही ही मॅन वाटतो.

Pages