अग/वाग मध्ये हे छोटा प्रतिसाद लिहायला म्हणून घेतले होते. लिहिता लिहिता अजून बरेच सुचत गेले. म्हणून पाडला वेगळा लेख. अर्थातच केवळ विरंगुळा म्हणून केलेले लिखाण आहे हे त्यामुळे घ्या
---
• I think there is background noise from your end.
(मागं इतका गाड्यांचा आवाज कसा रे? कुठं रस्त्याकडेला उभारून काम करतोयस का?)
• So what is the update on that please?
(अजून तेच करायला लागलायस होय रे? अरे तीन दिवस झाले कि राव)
• Yes I am on it.
(काय इंग्लिश भाषा राव. कोंबडी अंडी उबवते तसं काम उबवयत बसलोय असं वाटतंय)
• I am doing it. It is in progress.
(सगळा वेळ तुमच्या मिटिंगमध्येच जातोय. आताची मिटिंग नसती तर काम पूर्ण झालं असतं)
• There is blocker, I am badly stuck. I dont know how to do that.
(त्या फेसबुक आणि गुगलची मारामारी. ते एक टेक्नोलॉजी काढतंय तोवर हे वेगळीच टेक्नोलॉजी घेऊन येतंय. मधल्यामध्ये डेवलपरचं मरण)
• That's older technology, it has upgraded now.
(सकाळीच अपग्रेड केलंय. आता संध्याकाळपर्यत राहील कि आउटडेटेड होणार माहित नाही)
• But you said it was working yesterday?
(म्हणजे कालसुद्धा तयार नव्हतं हे. पण तू मला झालंय म्हणून थाप मारलास काल)
• I think there is advance technology now.
(च्यायला आता कुठे सगळे माहित झाले असे वाटले तोवर ह्यांनी नवीन टेक्नोलॉजी आणली)
• They have release new version of it and we need to upgrade.
(कंटाळा आला राव. मला वाटतंय आता दहाएक वर्षे तरी अपग्रेड करण्यावर कायद्याने बंदी आणा. आम्ही काम करावं का तुमचं सोफ्टवेअर अपग्रेड करण्यातच आयुष्य घालवावं?)
• We already had discussed this yesterday's. But it's ok I will explain it again now.
(कालच सांगितलं होतं कि रे. झोपला होतास काय?)
• Is my voice breaking? Ok wait a moment please...... how is it now?
(काहीही न करता थोड्या वेळानी फक्त "हाऊ इज इट नाऊ?" विचारायचं)
• Your voice is breaking. I can not hear anything.
(स्वस्तातला प्लान आहे का? चांगलं शंभर एमबीपीएस घे कि राव)
मस्त मस्त. अगदी. आमच्याकडे
मस्त मस्त. अगदी. आमच्याकडे पण शनिवारी बोलावुन किचकट काम द्यायची खोड आहे. परत पुढील वीक मध्ये ते काम परत करावेच लागते कारन शनिवारी डेटा अपूर्ण असतो.
मी: अरे ते रिपोर्ट कुठे आहेत?
मी: अरे ते रिपोर्ट कुठे आहेत?
तो (पलीकडून): अपलोड केलेत ना, रिपॉजीटरीच्या पोर्टलवर आहेत बघा.
मी: बघितले तिथे. बाकीचे बरेच फोल्डर आहेत. पण रिपोर्टचा एकही नाही.
तो (पलीकडून): असे कसे शक्य आहे? सकाळीच मी फोल्डर बनवून त्यात रिपोर्ट टाकलेत.
मी: मला का दिसत नाहीत? मी सगळे फोल्डर बघितले. रिपोर्टचा एकही नाही. बघून जरा मला सांगशील का?
मग थोडा वेळ शांतता. मग...
तो (पलीकडून): सर BOREPORTS म्हणून फोल्डर आहे बघा.
मी: ओह्ह्ह... मी अनेकदा पाहिला तो फोल्डर, BORE PORTS आहे असे वाटत होते. म्हटले असेल काहीतरी Bore! म्हणून आत पाहिले नाही.
तो (पलीकडून): नाही. BO REPORTS असे आहे ते. हा हा हा हा
मी: ह्या ह्या ह्या ह्या
मी (मनातल्या मनात): नीट नावं नाही का देता येत फोल्डर्स ना? किती वेळ वाया गेला यामुळे
Our favorite.. 'lets wind up
Our favorite.. 'lets wind up for the day'..
मी मनात.. लय झालं आजच्या ला.. गुंडाळा बोरा बिस्तारा
म्हटले असेल काहीतरी Bore!
म्हटले असेल काहीतरी Bore! म्हणून आत पाहिले नाही.>>>
बोर
function at() { [native code]
function at() { [native code] }उल सगळा संवाद अगदी डोळ्यासमोर आला
function at ची समस्या
प्रकाटाआ.
हा तो गप्पांचा धागा (वाडा) आहे समजून लिहिले होते,
It is a low hanging fruit
It is a low hanging fruit
हे स्वतः ठरवतात task analysis करण्या आधीच
मला तर खाली लटकणार सफरचंद दिसायला लागतं किंवा कैऱ्या आहेत आणि मी पाडतेय असं काहीतरी imagjne होतं
>>>>>>हे स्वतः ठरवतात task
>>>>>>हे स्वतः ठरवतात task analysis करण्या आधीच
मला ते मुक्ताफळ वाटतं.
मला ते मुक्ताफळ वाटतं.
मला तर खाली लटकणार सफरचंद
मला तर खाली लटकणार सफरचंद दिसायला लागतं किंवा कैऱ्या आहेत आणि मी पाडतेय असं काहीतरी imagjne होतं >>> हो मलाही.
मी माझ्या बॉसलाच म्हंटलो होतो. तो नेहमी ही टर्म वापरायचा. आमच्या ऑफिस मधे दर शुक्रवारी फळे वगैरे असत सकाळी. एक दिवस तो ब्रेक रूम मधून सफरचंद का काहीतरी घेउन ते हातातून लटकेल असा येत होता. तेव्हा त्यालाच म्हंटलो - Oh this is what you were talking about!
अर्थात तो ही गमत्या असल्याने चालून गेले. बॉस बघून विनोद करावेत
अगदी अगदी
अगदी अगदी
ते लो हँगिंग फ्रुट म्हणजे मस्त आंब्याने लगडलेलं शेतातलं झाड डोळ्यासमोर येतं.
(No subject)
होय. लो हँगिंग फ्रुट आजकाल
होय. लो हँगिंग फ्रुट आजकाल प्रचलित आहे. कोण लोक काढतात असले शब्दप्रयोग कळत नाही.
फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहा असे आम्ही ऐकत होतो. तर इथे थेट कर्मालाच फळाची उपमा. हाय रे माझ्या कर्मा.
पहिल्यांदा ऐकले "लो हँगिंग फ्रुट" तेंव्हा अतिशय बकवास वाटले होते. आपण ऑफिसात काम करायला सोडलेली माकडं आहोत कि काय? जास्तीत जास्त उंच उड्या मारून अधिकाधिक फळं मिळवून खाणारी. वगैरे वगैरे विचार मनात येऊन गेले. नाहीतरी आपल्याकडे खेडेगावात मुलगा कमवू लागला कि "मोठा झाला आता. त्याचा तो मिळवून खातोय" असा शब्दप्रयोग आहेच अजूनही मुलगा सुद्धा घरी येऊन सांगणार आज लो हँगिंग फ्रुट मिळवून खाल्ली
फा, लो हँगिंग फ्रूट जोक भारी
फा, लो हँगिंग फ्रूट जोक भारी आहे. मॅनेजर वर करायच्या लिस्टीत टाकून ठेवला आहे. लुकिंग फॉरवर्ड कधी एकदा तो फ्रूट खाताना दिसतोय!
मी नावं ठेवलीत. बटाट्या- जो
मी नावं ठेवलीत. बटाट्या- जो अगदी ठोकळा आहे नाॅलेजबाबतीत.
कारलं- नेहमी दुसर्यांच्या चुका काढणं
शकुनी- फक्त कट रचायते, कामं कमी
ह्या सर्वांबरोबर मिंटींग संपायला आली कि मी मनात नेहमीचे वाक्य , ईथे भेटलात, वर नकोच.
नाहीतर , अडाण** लेकाचे, गेलात उडत.
Are you with me?
Are you with me?
मी : almost आता डोळे उघडे ठेवून झोपू का ह्या विचारात असताना ( yes, certainly!l)
Sure
Certainly
Absolutely
Alright
Right
True
Agree
Ohhhh
हे सगळे शब्द आलटून पालटून वापरते
मी 'आय गेस!' असा थंड
मी 'आय गेस!' असा थंड रिस्पॉन्स देतो बहुतेक. किंवा अगदीच अध्यात ना मध्यात चालू असेल तर 'यू बेट'!
मर मेल्या!
हे शब्दप्रयोग आयटी क्षेत्रात
हे शब्दप्रयोग आयटी क्षेत्रात आहेत का माहीत नाही, पण आम्हा आयटीआय वाल्यांच्या क्षेत्रात आहेत - हँड्स ऑन वर्क आणि गेटिंग युवर हँडस डर्टी. मी अगदी जेवायला जातानाही त्यांना म्हणतो - आय एम गोईंग टू गेट माय हँडस डर्टी.
low hanging fruit : D
low hanging fruit : D
ते लो हँगिंग फ्रुट म्हणजे मस्त आंब्याने लगडलेलं शेतातलं झाड डोळ्यासमोर येतं. >> माझ्यापणा
अतुल : किती चित्र दर्शी वर्ण न करता हो तुम्ही. हसू आवरलेच नाही ऑफिसमधे.
आणि मला एकदम ऑफिसने प्रत्येकाच्या डेस्कवर वेली सोडल्यात, त्याला फळॅ लटकलीत आणि सगळे वर बघून तोडायचा प्रयत्न करतायत असे वाटले. अशक्य हसले
हपा : अहो हात काय, मला वाटते काही दिवसांनी आय टी वाल्यांना पायांनी पण काम करायला शिकवतील आणि डबल एस एल ए लावून देतील.
am doing it. It is in
am doing it. It is in progress<<<< अजून सुरू पण नाही केलय, आता तुम्ही विचारल्यावर सुरू करेन नाही जोर लावून पटापट संपविन.
low hanging fruit सारखे "buy
low hanging fruit सारखे "buy in" हा अजून एक शब्दप्रयोग मागची काही वर्षे प्रचलित आहे मिटिंग मधून. म्हणजे एखाद्याची संमती किंवा पाठिंबा असेल तर त्याचे/तिचे "buy in" आहे म्हणायचे. त्यावरूनच मग पुढे "buy in" चे वाक्यातले उपयोग. जसे कि...
"त्याचे buy in घेतलेस का?" म्हणजे त्याला विचारलेस का कि तो याबाबत सहमत आहे कि नाही
"I am not going to buy in that" म्हणजे मी सहमत नाही
इत्यादी.
हे पहिल्यांदा ऐकले तेंव्हा काहीतरी खरेदी विक्री चा व्यवहार असल्यासारखे वाटायचे. आपले मत/आयडिया/विचार बुट्टीत टाकायचे आणि फिरायचे ऑफिसभर "आलेSSSS नवीन मत आले माझे. माझ्याकडे आयडिया आहे. कोण घेता का?"
कोणत्या फडतूस शब्दप्रयोगाची स्टाईल होईल आजकाल सांगता येत नाही.
>>"आलेSSSS नवीन मत आले माझे.
>>"आलेSSSS नवीन मत आले माझे. माझ्याकडे आयडिया आहे. कोण घेता का?"
अतुल
विविध उपक्रमांसाठी व
विविध उपक्रमांसाठी व खेळांसाठी या दुव्यावर टिचकी मारा.
अजून एक वाक्य सध्या बऱ्याचदा
अजून एक वाक्य सध्या बऱ्याचदा ऐकतो - ' आय am क्वाइट ओल्ड स्कूल दॅट वे, ...' असं म्हणून लोक जुने विचार नवीन जनतेवर लादतात.
पलीकडून: I have a question
पलीकडून: I have a question
आपण: Yes please ask. Go ahead.
(मनातल्या मनात): आता आणि कसला प्रश्न बाबा? एव्हढं सगळं मघापासून विस्कटून सांगितलं तरी प्रश्न आहेच का अजून? बर विचार विचार. अमृतांजन घेऊनच बसलोय
I have a doubt - हे जास्त
I have a doubt - हे जास्त भयानक आहे
>> I have a doubt - हे जास्त
>> I have a doubt - हे जास्त भयानक आहे
होय. अनेकजण मीटिंगमध्ये question/doubt/query यातला कोणताही शब्द वापरतात. पण अर्थातच ते तसे नाही ब्रिटिश/अमेरिकन क्लाएंट असेल तर ते याबाबत फार सेन्सिटिव्ह असतात.
(No subject)
मागचा काही दिवसांत गाजलेली
मागचा काही दिवसांत गाजलेली (व्हायरल झालेली) ऑनलाइन मिटिंग:
https://www.youtube.com/watch?v=_SL8-kW7-5A
या लोकांच्या मनात काय काय विचार येत असतील फक्त कल्पनाच केलेली बरी
(No subject)
Pages