Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2023 - 04:19
तर मित्र मैत्रीणींनो ,
नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. मायबोलीकर टी आय ह्यांच्या मुंबई हेरिटेज वॉक धाग्यावर मुंबई प्रेमींची चर्चा झालेली आहे. त्या अनुसार
गटग चा धागा काढत आहे. या वर्शीचे काळा घोडा फेस्टिवल चार ते १२ फेब्रुवारी दरम्यान आहे. तर कोणा कोणाला यायला आव्डेल? लॉक डाउन नंतरचे पहिलेच मोठे गटग प्लॅन होते आहे. मला शनिवार रविवार चालेल. पण त्यादिवशी फार गर्दी असेल हे नक्की आहे. तारीख नक्की झाल्यावर मला एक दिवस काम सोडून येणे पण सहज शक्य आहे. ब बरोबर शॉपिन्ग साठी रिकाम्या पिशव्या व खाउ घरी नेण्यासाठी डबे पण घेउन या.
त्या दिवसात कोविड परिस्थिती कशी असेल त्या अनुसार मास्क व इतर घेउन येणे.
कोण कुठुन येणार कधी जमेल चर्चे साठी धागा. चला भेटु या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्या व्हाट्सऍप ग्रुपवर खालील
सध्या व्हाट्सऍप ग्रुपवर खालील मंडळी जॉईन झाली आहेत:
राहुल बावणकुळे (अस्मादिक)
अश्विनीमामी (ज्यांनी गटगची संकल्पना मांडली आणि अन्य काही कामानिमित्त त्या भागाची नुकतीच पाहणीही करून आल्या)
भरत
अश्विनी९९९
चंपा
TI (ज्यांच्या धाग्यामुळे गटगची संकल्पना सुचली)
अश्विनी ११
इंद्रा
rockstar1981
svalekar
निकु
मी काल जॉईन केला ग्रुप. पण
मी काल जॉईन केला ग्रुप. पण काहीच पोस्ट्स दिसल्या नाहीत म्हणून मग मी पण काही टाकले नाही
Good Morning Good Night च्या
Good Morning Good Night च्या पोस्ट सुरु करा मग
आबा
आबा
अय्या आबा आले. मोस्ट वेलकम .
अय्या आबा आले. मोस्ट वेलकम . आबा तुम्ही खाउ गल्ली का वाडा कुठेतरी खाराच्या मिरचीची पोस्ट टाकलेली ना? ती वाचुन मी पण करुन बघितली थोडीशीच. अर्धी वाटी. लहान पणी ताक भात खाराची मिरची हे जेवण असायचे रात्री बरेच वेळा. ती मेमरी रिक्रिएट करुन झाली. धन्यवाद. केप्रचा मसाला व त्या पाकिटा वरची कृती एकदम सोप्पी आहे. आता एक फ्रेश बॅच बनवायची आहे. पन लिंबे महाग व जायला वेळच होत नाही आहे मार्केटात.
देवा अश्विनी नावा वर किती तो
देवा अश्विनी नावा वर किती तो उहापोह ..

मी पण अश्विनी च आहे
@राहुल बावणकुळे,
@राहुल बावणकुळे,
मी Telegram groupची घरातल्याच आमच्या फोनांमध्ये ट्रायल घेतली.
टेलिग्राम यूजरने फोन नंबर लपवायचा कसा ते
https://privacyinternational.org/guide-step/3952/telegram-account-settin....
इथे सापडले.
तसे केल्यावर त्या यूजरने दिलेले नाव दिसते पण फोन नंबर दिसत नाही. ही युक्ती चांगली आहे. याप्रमाणे बरेच जण जॉईन होऊ शकतात.
***
टेलिग्राममवर यूजर नेम घेताना एक अडचण आली ती म्हणजे मराठी- देवनागरी नाव घेत नाही. आणि बरीच नावे घेतली आहे सांगतात. पण नाव इंग्रजीत लिहून maayboli चिकटवल्यास मिळते. उदाहरणार्थ Srd Maayboli
Handle @Srdmaayboli
_____________________
आता तुमचा वाटसप ग्रूप बदला सांगत नाही. पण ही ट्रायल करून पाहता येईल.
ते टेलिग्राम जाऊ दे, srd
ते टेलिग्राम जाऊ दे, srd तुम्ही गटग ला येणार आहात का?
होय.
होय.
मी चार तारखेलाही पहिल्या दिवशीही जाणार आहे. भायखळा राणीबागेतल्या फुले भाजीपाला प्रदर्शनाची तारीख रविवारी कळली. ३-४-५ फेब्रुवारी.
https://www.freepressjournal.in/mumbai/in-pics-flowers-exhibition-at-mum...
त्यामुळे शनिवारी तिकडून भायखळ्याला.
पुढे अकरा तारखेला गटग झाल्यावर माटुंगा पश्चिम रेल्वे,रुपारेल कॉलेज ग्राऊंडवर friends of trees यांचे फुले प्रदर्शन
११-१२ फेब्रुवारीला रुपारेल कॉलेजमध्ये फळे,फुले प्रदर्शनही आहे
https://facebook.com/100069857588222/
तिकडून माटुंग्याला आणि एका नातेवाईकांकडे जाणार.
बागकामाची आवड असणाऱ्यांसाठी दोन्ही प्रदर्शने उपयोगाची.
मुंबई अर्बन आर्ट फेस्टिवलला
मुंबई अर्बन आर्ट फेस्टिवलला देखील भेट द्या लोक्स. खूप छान आहे. ससून डॉक येथे आहे. ऑनलाइन रजिस्टर करून गेल्यास प्रवेश सोयीचा पडेल.
अय्या आबा आले. मोस्ट वेलकम .
अय्या आबा आले. मोस्ट वेलकम .
>>>>>
आबा तुम्ही खाउ गल्ली का वाडा कुठेतरी खाराच्या मिरचीची पोस्ट टाकलेली ना?
>>>> नाही ओ. मला नाही आठवतं.
या गटग ला येणाऱ्या बऱ्याच लोकांना भेटायची इच्छा आहे खर तर ...
गटगला खूप खूप शुभेच्छा ! धमाल
गटगला खूप खूप शुभेच्छा ! धमाल करा.
अकरा तारखेला बघा यातले काही
अकरा तारखेला बघा यातले काही आहे का आवडीचे
https://www.cntraveller.in/story/10-unmissable-events-at-the-kala-ghoda-...
आमचे मुंबईचे घर कालच ताब्यात आल्याने आता मी सुद्धा तिथे जायचा विचार करू शकतो. बघूया कसे जमतेय ते.
तुम्ही लोक्स पहिल्या दुसर्या दिवशीच जाऊन आला असता तर माहितीचा फायदा झाला असता... काय असते नेमके ते बघायला जायचे जायचे म्हणत नेहमी राहून जाते.
पहिल्या दिवशीच मी जाणार आहे.
पहिल्या दिवशीच मी जाणार आहे.
पहिल्या दिवशीच मी जाणार आहे >
पहिल्या दिवशीच मी जाणार आहे >>> आमच्याही सोबत या की
लिंक मस्तय ऋ. ११ला देवदत्त
लिंक मस्तय ऋ. ११ला देवदत्त पटनाईकचा आहे कार्यक्रम! पण सगळॅ छान छान कार्यक्रम संध्याकाळी आहेत राव!
तुमच्यासोबत ही आहे मी अकराला.
तुमच्यासोबत ही आहे मी अकराला. तसं लिहिलं आहे अगोदर.
सगळॅ छान छान कार्यक्रम
सगळॅ छान छान कार्यक्रम संध्याकाळी आहेत राव!
>>>
मुंबईत संध्याकाळीच फिरायचे असते. पाचचे उतरते उन्ह. उजेड, सुटलेला वारा आणि मग अंधार होताच रोषणाई.. त्यात एक बदललेला लूक..
स्वतःच्या किंवा
स्वतःच्या किंवा कुटुंबियांपैकी कुणाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकेक मेंबर गळावया लागल्याने उद्याचे गटग तूर्तास रहित केले आहे. मार्चमध्ये भेटायचा विचार आहे.
तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी काळा घोडा फेस्टिव्हलला जा. तिथले बहुतेक पर्फॉर्मन्सेस , वॉक इ. सकाळी किंवा संध्याकाळी असतात. प्रदर्शन दिवसभर असते. फार्मर्स मार्केट छान आहे असे कळले.
(रिपीट)
(रिपीट)
मी पहिल्या दिवशी गेलो तरीही उद्या जाणारच आहे कारण त्याला जोडून माटुंगा येथे प्रदर्शन आणि नातेवाईक भेट आहे. मी तिथे थोडा वेळ (१२:३०-१३:००) असेन. गटग पुण्याच्या लोकांना फारच वेळखाऊ होते मान्य. ( मुंबईतील आणि पुण्यातील लोकांना मध्यवर्ती ठिकाण लोणावळाच आहे. मुंबईहून रेल्वेने गेल्यास दहा ते पाच एवढा वेळ तिथे सहज काढता येतो.)) पावसाळ्यात खंडाळा लोणावळा येथे दरवर्षी एक दिवसीय जातोच.
फॅशन स्ट्रीट इथे बरीच कपडे खरेदी होत असते. विशेषतः परदेशी स्थायिक लोक परत जाताना इथूनच कपडे नेतात. (यूट्यूबवर विडिओ पाहा.)
गटग जरी रद्द झाले तरी बाकी
गटग जरी रद्द झाले तरी बाकी कोणी फेस्टिव्हल अटेंड करणार आहेत का..?
काळाघोडा फेस्टिवल दरम्यान
काळाघोडा फेस्टिवल दरम्यान होणारे पूर्वनियोजित गटग, इच्छुक सदस्यांच्या विविध अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. तथापि आम्ही मंडळी व्हाट्सऍपच्या माध्यमातून अजूनही संपर्कात आहोत त्यामुळे सर्वांच्या तारखांची जुळवाजुळव झाल्यावर नवीन तारीख कळवू. बहुधा मार्चच्या सुरुवातीला किंवा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात गटग करण्याचा मानस आहे. त्यामुळे अजून कुणी मायबोलीकर मंडळी गटग साठी इच्छुक आहेत, त्यांनी व्हॉट्सऍप ग्रुप जॉईन करावा ही नम्र विनंती.
ह्यादरम्यान जी जी मायबोलीकर मंडळी काळाघोडा फेस्टिवलला गेली/जाणार आहेत, त्यांनी इकडे किंवा नवीन धागा काढून फोटो पोस्ट करावे. म्हणजे आम्हालाही तिकडे गेल्याचा आभास होईल.
मी चार तारखेला जाऊन फोटो
मी चार तारखेला जाऊन फोटो काढले आहेत. पण नंतरच पोस्ट करेन.
जरूर लिहा एस आर्डी.
जरूर लिहा एस आर्डी.
Next गटगत वचपा काढीन. परत भेटुया रे सर्व. शुभ रात्री.
तेल गेले तूप गेले
तेल गेले तूप गेले
WhatsApp ग्रूप इतके होतात की
WhatsApp ग्रूप इतके होतात की वेळेचे तेल,तूप फार वाया जाते.
Kala Ghoda festval today 12
Kala Ghoda festval today ( Saturday) 12 noon to 2-15.
The Sound Man Mangesh Desai
By Subash Sahoo.
( English, Hindi documentary)
एका मराठी माणसाचे कर्तृत्व.
जमल्यास जरूर जाऊन पाहा.
गूगलवर यशवंतराव चव्हाण auditorium, Nariman point
असा पत्ता दिसतोय. हे ठिकाण चर्च गेट स्टेशन पासून पश्चिमेला एक किलो.मी. अंतरावर आहे. अगदी काळया घोड्याला असे नाही.
Kala Ghoda festval today 12
प्र.दोनदा झाला. का टा.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/kalaghodaartsfestival
https://twitter.com/kgafest
इथे व्यवस्थित माहिती दिसते आहे. हवे ते नेमके शोधता येते.त्यांच्या संकेतस्थळावरच्या कार्यक्रमपत्रिकेत त्रोटक माहिती होती. फेसबुक ट्विटरवरची माहिती अद्यावतही असते
जाउन या की भरत. फटु तरी बघू
जाउन या की भरत. फटु तरी बघू.
Pages