काळा घोडा फेस्टिव्हल २०२३ दरम्यान मायबोली गटग

Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2023 - 04:19

तर मित्र मैत्रीणींनो ,

नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. मायबोलीकर टी आय ह्यांच्या मुंबई हेरिटेज वॉक धाग्यावर मुंबई प्रेमींची चर्चा झालेली आहे. त्या अनुसार
गटग चा धागा काढत आहे. या वर्शीचे काळा घोडा फेस्टिवल चार ते १२ फेब्रुवारी दरम्यान आहे. तर कोणा कोणाला यायला आव्डेल? लॉक डाउन नंतरचे पहिलेच मोठे गटग प्लॅन होते आहे. मला शनिवार रविवार चालेल. पण त्यादिवशी फार गर्दी असेल हे नक्की आहे. तारीख नक्की झाल्यावर मला एक दिवस काम सोडून येणे पण सहज शक्य आहे. ब बरोबर शॉपिन्ग साठी रिकाम्या पिशव्या व खाउ घरी नेण्यासाठी डबे पण घेउन या.

त्या दिवसात कोविड परिस्थिती कशी असेल त्या अनुसार मास्क व इतर घेउन येणे.

कोण कुठुन येणार कधी जमेल चर्चे साठी धागा. चला भेटु या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

11 फेब्रुवारीला कन्फर्म आहे का गटग? कारण मग सुट्टीच बघायला..कारण मला आयत्या वेळी शनिवारी leave नाही मिळणार...
मी १००% प्रयत्न करणार आहे यायचा...

प्लिज ११ फेब्रुवारीलाच ठेवा. मी माझ्या आणखी दोन - तीन बिगर मायबोलीकर मित्र-मैत्रिणीना सांगितलंय.

११ लाच कन्फर्म करा तरुणाई. कधी भेटाय चे व कुठे.

मला लायन्स गेट बस स्टोप माहीत आहे. तिथे चौकात एक चर्च आहे. नाहीतर फेस्टिवलचे काय गेट असेल तिथे.

अरे वा अमा, बस! लैच मेंबर जमा झालेले दिसतायत. मी पण १००% प्रयत्न करेन यायचा! अजून तरी कुणालाच भेटले नाहीये त्यामुळे उत्सुकता Happy

वेळ तर सांगा/ठरवा.
साडे बारानंतर ची ठीक. सकाळची रेल्वे गर्दी गेल्यावरची.

दिवसः ११ फेब्रुवारी २०२३
भेटायची वेळ : साडेबारा ते एक मीट अँड ग्रीट.
आता ठिकाण ठरवा:

फेब सुरू झाला की व्होट्सॅप गृप बनवू.

दिवसः ११ फेब्रुवारी २०२३
भेटायची वेळ : साडेबारा ते एक मीट अँड ग्रीट.
आता ठिकाण ठरवा:

फेब सुरू झाला की व्होट्सॅप गृप बनवू. >>> डन डना डन

@अश्विनी_९९९ तुम्ही ट्रेन ने आलात तर एकदमच उत्तम. थेट cst स्टेशन ला उतराल आणि शिवशाही ने आलात तर दादर ला उतरून पुढे टॅक्सी, कारण मग लोकल ट्रेन ने येणं तुम्हाला थोडं अवघड पडेल. पण पुण्याहून ट्रेन ने आलात तर सगळ्यात सोप्पं पडेल अस मला वाटतं. आणि डेक्कन क्वीन वगरे ११ पर्यंत CST ला पोचते. म्हणजे तुम्ही सहज १२.३० पर्यंत भेटू शकता Happy

Jahangir दालनाच्या पायऱ्या? >>> चालेल

एकदा यशस्वी झाले तर दरवर्षीची जागा नक्की झाली. काही आयोजन करायला नको, कोण येणार/नाही याची विवंचना नको आणि फोटो काढण्यासाठी भरपूर जागा .
#काळाघोडावारी२०२३.

@TI. Thanx for information.
अजून एक मायबोलीकर आहेत अश्विनी म्हणून, त्यांनाही यायचं आहे...सो त्या येणार असतील तर आम्ही एकत्र येऊ...whatsapp ग्रुप बनला की अजून सोप्प जाईल ....

मी पुण्याहून येणार आहे . Ashwini_९९९ , बरोबर जाऊ आपण . रेल्वे ने सोयीचे पडेल असे वाटतेय . मुंबई लोकल ची फारशी माहिती नाही त्यामुळे सोपे पडेल असे ठरवू.

मला यायचे आहे . पुण्य हुन येईन. जहांगीर म्हनाजे दादर ला उतरावे लागेल शिवशाही ने. पण बहुटेक शिवनेरी जाते पुणे ते मुंबई. koni yennar asel tar whatsapp नंबर dya, संपर्क 9820299864

Pages