आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud भारीच भरत.
तिकडे अनुपमा अनुजचं अति होतंय आणि इकडे शून्याच्या वर काटा सरकतच नाहीये.

आजच्या भागात आशु कोइ मिल गया मधल्या ह्रितिक सारखे वेडसर भाव चेहर्यावर घेऊन बघत होता अरुकडे. आणि अरु गिल्टि भाव.

अरुंधती किती कन्फ्युज्ड दाखवली आहे. काल उगाचच अनुष्काला आणून एक एपिसोड ताणला.
अरुंधतीला वाटतंय ती घटस्फोटित, जास्त वयाची, तीन मुलांची आई आणि आता आजी, अजूनही त्यांची जबाबदारी उचलणारी असल्याने आशुतोषशी लग्न करायला नालायक आहे. दोन माणसं एकमेकांना आवडतात, एकमेकांबद्दल प्रेम वाटतं हे लग्न करण्यासाठी पुरेसं आणि नेमकं कारण आहे हे अजूनही तिला उमगलेलं नाही.
आशुतोषने अनुष्काला नकार दिलाय हे तिला व्यवस्थित माहीत आहे. तरीसुद्धा तो आता अनुष्कासाठी तिला नाही म्हणेल असं तिला वाटतंय.
ती आशुतोषला हो म्हणताना तिचे एक्स्प्रेशन्स ती जड अंतःकरणाने नाही म्हणतेय असे होते. ती अजिबातच एक्साइटेड नाहीए. सगळे सांगताहेत म्हणून ती आशुतोषशी लग्नाला हो म्हणतेय असं वाटतंय. आणि बाकीचे लोक लिटरली फुकटच्या उड्या मारताहेत. ईशाने अनिशला सांगितल्यावर त्याने सुद्धा त उड्या मारल्या होत्या. ते फारच ओव्हर होतं आणि त्याला शोभतही नव्हतं. यांच्या कल्पनेतला अनिश २३-२३ चा आहे. हा दिसतोय बराच मोठा आणि पोक्त वाटतोय.

स्टार प्रवाहच्या फेसबुक पेजवर अरुंधतीच्या लग्नावरून प्रेक्षकांत वादावादी सुरू आहे.

Lol
पण समहाऊ..मला अरुंधती चे अपराधी भाव चेहर्‍यावर घेऊन वावरणे बरोबर वाटतेय... तिचे आत्ता पर्यंत चे upbringing आणि मानसिकता पाहता....
आणि थोडे खरेच आहे ना तिचे..आशुतोष च्या मागे कुठले व्याप नाहीत...त्या मानाने ही फारच गुंतलेली आहे...

<<<<आजच्या भागात आशु कोइ मिल गया मधल्या ह्रितिक सारखे वेडसर भाव चेहर्यावर घेऊन बघत होता अरुकडे. आणि अरु गिल्टि भाव.>>>

पर्फेक्ट!!! आशुतोष च्या चेहेर्यावरचे भाव एवढेच काय ते मनोरंजन.

<<<<आशुतोषने अनुष्काला नकार दिलाय हे तिला व्यवस्थित माहीत आहे. तरीसुद्धा तो आता अनुष्कासाठी तिला नाही म्हणेल असं तिला वाटतंय.>>>>>
खरंय. अरुंधती ला आशुतोष ने लग्नाबद्दल दोन वेळा विचारले, तिने वर्षभर विचार करून त्याला हो म्हणायचा निर्णय घेतला. ते त्याला सांगण्याआधीच अनुष्का आली. त्यामुळे अरुंधती च्या मनात आशुतोष च्या निर्णयाबद्दल काही शंका आल्या ज्या आशुतोष ने दुर केल्या. आशुतोष च्या मनात अरुंधती च्या निर्णयाबद्दल जी शंका होती ती अनुष्का ने दुर केली अजाणतेपणी. मग हा सगळा कन्फ्युजन चार रिपिट सिक्वेंस कशासाठी?

आधी मला फक्त अनिरुद्ध बद्दल असं वाटायचं पण आता वाटतंय की ह्यांच सगळ्यांचच आता टाॅम ऍंड जेरी सारखं होतय. सतत त्याच लुप मध्ये तिचं मारामारी आणि पळापळी.

रविवारी एक तासाचा पीळ आहे. त्यात अरुंधती आशुतोषला मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे हे शक्य तितक्या कडू चेहर्‍याने सांगते आहे.
तिला प्रपोझ करण्यासाठी आशुतोष पुष्पगुच्छ घेऊन आणि डबल तेल लावून आला आहे. पुष्पगुच्छ गुंडाळायला जे काही वापरलंय ते पारदर्शक नाही आणि त्यातून फुलं दिसतच नाहीत.

हे एकदम सही लिहीलं आहे, भरत.. Lol

आणि अरुंधती ला कसली बोअर साडी दिलेली पोपटी कलर आणि काठ पदराची! छान झुळझुळीत, फ्रेश फुलाफुलांची नेसायची ना.... !!
आणि आशु अरु भेटले ते कॅफे आणि त्या आधी अरुंधती अनुष्का ला भेटली ते कॅफे... हे सेमच होते बहुतेक!!
वेगळ्या अँगल ने दाखविले की झाले... सगळ्या युनिट ला एकाच बस मधून न्यायचे आणि आणायचे !!

यश फारच समजूतदार दाखविला आहे आणि अभि फारच आततायी! असे ब्लॅक अँड व्हाईट कुणी नसते प्रत्यक्ष आयुष्यात!

आशुतोष म्हणाला की इतकी वर्षे तो अरुंधतीचा विचार करत होता आणि ती त्याला मिळेल याची त्याला आशा होती किंवा असंच काही.
हे अंजामच्या शाहरुखसारखं झालं की!

आणि त्याने इतक्या वर्षांत लग्न का केलं नाही हे यांचं अजून बोलायचं राहिलं होतं?
अरुंधती काहीही विचार करते. म्हणे मधल्या काळात म्हणजे (तिला लग्नाचं विचारल्यअसेल)) त्याचा विचार बदलला असेल. आता त्याने 'नाही' म्हणायला बोलावलं इ.
ती त्याच्या उपकारांच्या ओझ्याखाली आहे असं वाटत राहतं. लग्नही त्यासाठीच करतेय. तिलाही तशी लग्नाची गरज नाही आणि या लग्नातून तिला काही मिळण्यासारखं नाही. जे हवं ते लग्नाशिवायही मिळतंय.
या दोघांचा रोमान्स झाला तर फार विचित्र होईल.
आता लग्न करतोय हे सांगायला पुन्हा मनाची तयारी , मुहूर्त मग त्यावर कांचनचा थयथयाट आणि अनिरुद्धचा जळफळाट. यात एक वर्ष घालवू शकतील.

यश अगदी आताआतापर्यंत आततायीच होता की !

आणि अरुंधती ला कसली बोअर साडी दिलेली पोपटी कलर आणि काठ पदराची! छान झुळझुळीत, फ्रेश फुलाफुलांची नेसायची ना.... !! >>> लिम्बू कलरची आणि मॅचिन्ग लिपस्टीक Biggrin

रविवारचा एपिसोड महाप्रचन्ड बोअर होता, अरु साध हसतही नव्हती लग्न करायला हो म्हणताना, लाजण्या वैगरेची अपेक्षाच नाही.
तिचा आणी चिन्गीचा सवान्द तर अफलातुन होता अरु तेव्हाही त्याग मुर्ती बनुन आशु-चिन्गीच लग्न लावुन द्यायच्या तयारितच वाटत होती पण चिन्गीनेच नाही म्हटल्यावर नाइलाज झाल्यासारखी आली.
मधुराणीच्या रियल लाइफ खळी कम इन्फेक्शन एपिसोड मुळे ती जरा अभिनयात गन्डली आहे अस वाटत किवा लेखिकाच गन्डली आहे.

स्वस्ति... लिंबू कलर? मला तरी ती पिस्ता- पोपटी वाटली. आणि ऑड निळे काठ!
पण अरुंधती च्या चेहेर्‍यावरचे भाव खरेच महाभयानक, कंटाळलेले, रडके, काँस्टिपेटेड , नाईलाजास्तव हो म्हणतेय असे...होते! Biggrin

सिरीयल मध्ये लॉजिकली आता काहीच उरले नाही.
स्टार च्या इभ्रतीला जागून जंगी दागदागिने व भारी कपडेलत्ते नेसून, हळद, बांगड्या भरणे , संगीत , मेहेंदी असे ३/४ दिवसांचे प्रोग्राम करून मस्तपैकी हारु व तेलकट्याचे राजेशाही थाटामाटात लग्नसमारंभ आयोजित करा व सिरीयल संपवा .

हे लोक प्रत्येक सणा च्या निमित्ताने त्याची माहिती ओततात. मालिका सुरू होऊन एका वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. आधी माहिती ओतली नाही का? घरातली सगळ्यात लहान व्यक्ती ईशा २२ वर्षांची आहे. तरीही तिला आजवर या सणांबद्दल, सोहळ्यांबद्दल काही माहिती नाही असं दाखवतात.
अप्पांनी तो मोठा श्लोक फार विचित्र पद्धतीने म्हटला. बहुतेक समोर लिहिलेलं वाचून दाखवत होते.

पतंग उडवताहेत म्हटल्यावर मला वाटलं मांजामुळे जखमी झालेले पक्षी, गळा चिरून मेलेले दु चाकीस्वार यांच्याबद्दलही बोलतील. पण विसरले.

आधीच्या भागात ही कांचन बारशाचं ( की हळदी कुंकवाचं?) आमंत्रण देत फिरत होती आणि काल ठरलं की उद्या घरच्या लोकांतच करूया. बाकी कोणालाही आ धीचं काही आठवलं नाही. अप्पांचा डिमेन्शिया सगळ्यांमध्ये विभागला गेला.

अनिरुद्धचं अनिशवर चिडणं आणि त्याचं तोंड पाडणं पण नेहमीचं झालंय . अनिशला सुद्धा अरुंधतीसारखा अपमान करून घ्यायला आवडतं.
बळेबळेच तिळगूळ भरवले. हमारे यहाँ म्हणून काहीही खपवतात.

भरत.. Biggrin
हो ना..

तिळगूळ कोण भरवतं..?
आणि अनीश का येतो सारखा अपमान करुन घ्यायला..? आणि आलाच..तर निदान अन्या चिडेल हे तरी अझ्युम करुन घ्यावं ना?
खरंच फार ग्यान देतात बुआ.......प्रत्येक सण.. त्याची परंपरा..असं नी तसं.... संजना का इतकी मिळून मिसळून वागतेय.. प्रति अरुंधती सारखी? इट इज अगेंस्ट हर पर्सोना! तिला तेच शोभते..... आई- आई करुन म्हातारीच्या गळ्यात पडणे नाही शोभत!

Happy आणि मला तर अरु-तेलकटाच्या लग्नाच्या कल्पनेनेही हसू येते! काय माहित कसे दाखवतील ..आणि ते कसे कॅरी करतील ! खूपच विसंगत आहेत दोघं.
सरळ रजिस्टर लग्न करावे!..... अगदी सिरीयल मधले असले तरीही मला असे वाटते! ....
अजिबात थाट माट शोभणार नाही त्यांना!

सणांची माहीती बहुतेक इशाला दर वर्षी द्यावी लागत असेल. पतंग उडवताना तर कपडे वाळत घालण्याची दोरी ओढावी तसा मांजा ओढत होते सग्ळे. इशा अतिशय तरबेज असल्याने फिरकी आणि मांजा लीलया सांभाळत होती २ हातात.

अनिश , अरु हेच नाही तर मित्र मैत्रीणीही अपमान करुन घ्यायला येतात जणू.

मला नेहमी प्रश्न पडतो की प्रत्येक सणाला पुरुषांना कुडता देतात, दर वेळी नवीन आणत असतील का रिपिट करत असतील. इतके पुरुष आहेत ह्या मालिकेत. साड्यांच पण तेच. साडीला माप तरी नसतं. कुडता फिटिंगला चांगला हवा, नवीनही दिसला पाहीजे.

इशा अतिशय तरबेज असल्याने फिरकी आणि मांजा लीलया सांभाळत होती २ हातात.>> हो. तिने तर रागात येऊन पटकन साधा दोरा तोडतात तसा यशचा मांजा पण तोडून टाकलेला दाखवला आहे.

स्वस्ति... लिंबू कलर? मला तरी ती पिस्ता- पोपटी वाटली. आणि >>>> नाही गं नाही. तु फुलाफुलांची म्हणालीस ना म्हणून बोलले लिंबू कलरची. (संदर्भ : धनंजय माने)

<<<सणांची माहीती बहुतेक इशाला दर वर्षी द्यावी लागत असेल. >>>>

फार हसले हे वाचून प्राजक्ता. लेखिकेचा अतर्क्य पणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. ती सणांची माहीती एवढ्या मोठ्या मुलीच्या थ्रु देत बसण्यापेक्षा भरत म्हणतात तसं मांजा आणि त्यामुळे होणारे अपघात ह्याबद्दल तरी प्रबोधन करायचे ना. निदान काही उपयोग होण्याची शक्यता होती.
<<<<अनिश , अरु हेच नाही तर मित्र मैत्रीणीही अपमान करुन घ्यायला येतात जणू.>>>
लोकांच्या बाबतीत वयाबरोबर समजही वाढत जाते, कांचन च्या बाबतीत उलट होतंय. जाणार्या दिवसागणिक ती जास्तीत जास्त पोरकट होत चाललीय.
बाकी कांचन हे पात्र दिवसेंदिवस असह्य होत चाललंय. पोरकटपणा ही एक गोष्ट पण तिच्या वागण्यात किमान सुसंगती तरी दाखवायला नको का? मागे अनिरुद्ध आणि संजना बद्दल समजल्यावर काही दिवस का होईना तिला अनिरुद्धवर चिडलेली दाखवली होती. ह्या दोघांना इतक्या सहज सोडु नको असे सल्ला तिने अरुला दिला होता. आता तीच कांचन अनघा अभिषेक वर चिडलीय म्हणून उठता बसता तिच्यावर तोंडसुख घेत असते.
अनिरुद्ध ला धडा शिकविण्यापुर्वी अरुंधती, संजना आणि अनघा ह्यांनी युती करुन आधी कांचन ला वठणीवर आणायला हवं. त्या कामात मदत म्हणून कांचन ची ती बहिण पनवेल का कुठे तरी दुर रहाणारी तिला बोलवता येइल. त्या बहिणीच पात्र छान लिहिलंय ती वेळप्रसंगी कांचन ला‌ चांगली झापते.

ही सिरीयल अगदी माझ्य नवर्‍याची बायकोच्याच वळणावर चाललीये.
सेम स्टोरी लाईन.
कॉलेज च्या काळापासून थांबलेला अव्यक्त पण यशस्वी, श्रीमंत, सर्व गुणसंपन्न प्रियकर, नालायक नवरा आणि सोशीक, सदगुणांची पुतळीच जणू अशी नायिका..!!
पण..
ही सिरीयल म्हणजे.. दगडापेक्षा वीट मऊ..असे म्हणण्याची वेळ आली..जेव्हा काल हॉट स्टार वर ही सीरीज संपल्यावर लगेच..ती कुठली तरी "रंग माझा वेगळा" की कायतरी लागली तेव्हा!
हॉरीबल....!! अनंत काळा पासून सुरु आहे ती! आणि पुढे ही अनंत काळ चालेल..!!!
ना शेंडा ना बुडखा!

अरु ने खरेतर आता सलवार कमीज /सूट्स/लेगिन कुर्ता घालायला हरकत नाही. केसही कधी कधी धुवुन मोकळे सोडावेत. व शावर ग घ्यावा कधी कधी. प्रियाराधनाचे दिवस आहेत.
एक मेजर मिस्टेक म्हणजे मी गूळ पोळीचे व्हिडीओ बघितलेले ही नेहमी गार करुन खायला देतात. नाईतर गरम गूळ चिकटून भाजण्याची शक्यता असते. पण आशुच्या आईने दोघांना गरमा गरम तव्यवरची गूळ पोळी वाढली. पुरण पोळी स्टाइल!! आता घरी स्वयंपाकी ण लावा काकु. नवे नातवंड येणार आहे.

आज पूर्ण वेळ इशा अनीश लफडे सुरू झालेले दाखवले. अरुची गाडी सुरू व्हायला फारच वेळ घेते. अजुन अप्पाचे ओके कांचनचे ओके चालू होते. यश चा नेहमी प्रमाणे इशाला सपोर्ट आहे.

वरच्या मजल्यावर मुलगी प्रेमात पडलेली

खालच्या मजल्यावर आई दुसृया लग्नाच्या प्रतीक्षेत.

संवाद लेखिकेला सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला आहे -

अभि बारशात असं भाषणं ठोकत होता जणू प्री मॅचुअर डिलिव्हरि झाली त्यात त्याच्या विबासं ची काही पार्श्वभूमी नव्हती. अंघा आई पण सगळं विसरून डोलत होती.

बारशाला पूजा कसली आणि तीही अप्पा का करतील ?

अभिने नाव ठेवताना अंघाला कंसल्ट तरी करायला हवं होतं.

अन्या असं बोलत होता प्रोमोमधे जणू काही अरु विबासं करते आहे.

प्राजक्ता, प्रत्येक वाक्याशी सहमत.

अशक्य पीळ भाग होता आजचा. कुणी पाहिला नसेल अजुन तर अजीबात वेळ वाया घालवू नका. सुरवातीला कांचन आणि अप्पांनी पुजा सांगायला आलेल्या गुरुजींना बोलण्याचा चान्स न देता बारश्याच प्रयोजन आणि १६ संस्कारातील स्थान ह्यावर अतर्क्य असं प्रवचन दिले.
मग अरु आणि अजुन एक आलेल्या बाई असे दोघिंचे पाळणे म्हणणे झाले (त्या बाई अरु पेक्षा जास्त चांगल्या आणि सुरात गात होत्या). थोडावेळ ईशाच्या डोक्यात जाईल असा बालिशपणा आणि मग अभिच एक लांबलचक भाषण. त्यातुन बाळाचं नाव "जानकी" ठेवण्याचं ओढुन ताणुन आणलेलं आणि तरीही अजीबात न समेजलस लाॅजिक. आपल्या जावयाने केलेले प्रताप ऐकुन अनघाच्या बाबांनी त्याला चांगला खडसावला होता पण आई ला मात्र त्याबाबत काही प्राॅब्लेम आहे असं दिसलं नाही. धन्य ती अन्घाई.

अरु संकट सगळे हल्ली अभिने काय केले आहे ते विसरून गेले आहेत आणि अनघाने अभिला उठसूठ बोलु नये म्हणून धडपडत असतात. हा अतर्क्य प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय.
आता पुढील भागापासून कांचनचा आकांडतांडव सुरू होईल. तिला संजना ने कॅनडाला जाऊ नये, अरु ने दुसरं लग्न करु नये आणि अभिने केलेल्या व्याभिचाराबद्दल अनघाने आक्षेप घेऊ नये असं वाटत तरीही सगळी मंडळी उठता बसता तिच्या कौतुकात मग्न असतात. धन्य आहेत हे देशमुख.

Happy मी नाही बघितला अजून...!!
कांचन चे फार कौतुक करतात बुआ सर्वजण.
अगदी कृतक कोपाने तिच्याकडे पहात बसतात ...

आशुतोष अरुंधती लग्नाचा विषय निघतो आणि अप्पा कांचनला अडवत असताना चक्कर येऊन पडतात असा प्रोमो दाखवलाय. हा १ फेब्रुवारीचा भाग आहे असं सांगितलं. म्हणजे आणखी तीन एपिसोड बारसं + हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे.

जानकी नावामागचं लॉजिक पटलं नाही +१.
जानकी म्हटल्यावर मला तिचा डबल वनवास, अग्निपरीक्षा इ.इ. आणि यांच्याकडच्या कोणाचेही संसार धड चालत नाहीत हेच आठवलं.

हा प्रोमो हॉट्स्टार वर नाही दाखवला. नुसता विषय निघालेला दाखवला.

नकटीच्या लग्नाला .......

किंवा मग अप्पा इमोशनल ब्लॅकमेल करून लग्न लावून देतील जुन्या खुबसूरत सारखं.

मला हॉटस्टारवर मालिकेत मध्ये दक्षिणी भाषेतील जाहिराती दिसतात. असे अचानक का व्हावे. म्हणजे जाहिराती आपल्या नेहमीच्या पण भाषा दक्षिणची. बहुतेक कन्नड भाषा आहे.

<<<<किंवा मग अप्पा इमोशनल ब्लॅकमेल करून लग्न लावून देतील जुन्या खुबसूरत सारखं.>>>>>
मला पण हेच वाटलं कारण अप्पांनी कांचनचा विरोध असेल तर मी सांभाळून घेईन आणि तुझे कन्यादान मीच करीन अशा अर्थाचे डायलॉग मारले होते एक दोन दिवसांपुर्वी.

बाकी अप्पांनी अरु च्या लग्नाबद्दल ची भुमिका अशी डेवलप होत गेली: सुरवातीला त्यांनी आशुतोष ला अरु शी लग्न कर असं सांगून टाकले. मग अरु ला दुसर्या लग्नाचा आणि आशुतोष चार विचार कर असा सल्ला दिला. सगळं झाल्यावर जेव्हा अरु ने त्यांना आशुतोष शी लग्न करण्याचा निर्णय सांगितला तेव्हा तिच्या कडे आशुतोष केळकर हा चांगला माणूस आहे ना? तुला सुखात ठेवेल ना इ. चवकशी केली! आणि हे देशमुख कुटुंबातील सगळ्यात समंजस व्यक्ती आहेत:).

Pages