Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नशा हाच मूळ हेतू असतो आणि हौस
नशा हाच मूळ हेतू असतो आणि हौस म्हणून चव.
>>>>
सत्यवचन
या सगळ्या विविध मिश्रणातून अल्कोहोल वा नशा काढून टाकले तर कोण आवडीच्या चवीसाठी ते रोज घेईल का?
त्यामुळे मूळ उद्देश नशा चढणे, किक बसणे हाच असतो. ती नशा चढायच्या प्रकारात विविधता हवी म्हणून प्रयोग असतात.
बीअर आणि व्हिस्की मी सुद्धा आयुष्यात एकेकदा ट्राय केली आहे. त्यांची चव पहिल्या फटक्यात कोणाला आवडेल हे शक्यच नसते. पण मग लोकांना लागते त्या नशेचे व्यसन. आणि त्यासाठी मग पोटात ढकलली जाते.
पण हेमंत तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी हे एकाही मद्यप्राशन करणाऱ्याला पटवून देऊ शकणार नाही. किंबहुना तो हे मान्य करणार नाही असे म्हणूया. कारण दारू पिण्यात काही गैर नाही हे स्वत:ला पटवून देणे ही पिणाऱ्यांची गरज असते. म्हणून येनकेन प्रकारे विनोद, शेरोशायरी वा शास्त्राचा आधार घेत दारूचे उदात्तीकरण केले जाते.
क्या बात है, दोन्ही सर एकदम
क्या बात है, दोन्ही सर एकदम
हा तर डबल बोन्नाझा
मला तर उदय चोप्राचा डबल रोल असलेला सिनेमा बघतोय असाच फील आला
अश्या प्रतिसादांनी सत्य बदलत
अश्या प्रतिसादांनी सत्य बदलत नाही. किंबहुना बळकट होते.
शुभरात्री
सर तुम्ही प्रवचनाचे वर्ग सुरू
सर तुम्ही प्रवचनाचे वर्ग सुरू का नाही करत
थोडी लावायची आत्तासारखी आणि सुरू व्हायचं
धो धो पैसे मिळतील
इथं फुकट प्रतिभा वाया घालवण्यापेक्षा जर काही प्रोडकटिव्ह करू शकला तर बरंय
पण चव हा हेतू कोणाचाच नसतो
पण चव हा हेतू कोणाचाच नसतो
>>> चव हेतू नसता तर इतके प्रकार आलेच नसते... चव महत्वाची आहे...
पण हेमंत तुम्ही कितीही
पण हेमंत तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी हे एकाही मद्यप्राशन करणाऱ्याला पटवून देऊ शकणार नाही. किंबहुना तो हे मान्य करणार नाही असे म्हणूया. कारण दारू पिण्यात काही गैर नाही हे स्वत:ला पटवून देणे ही पिणाऱ्यांची गरज असते. म्हणून येनकेन प्रकारे विनोद, शेरोशायरी वा शास्त्राचा आधार घेत दारूचे उदात्तीकरण केले जाते.
>>> मग तुम्ही का करत आहात ?
इथे सर्वजण समजदार आहेत , तुमच्या या कंमेंट्स नी पूर्ण निरस होतो चर्चा वाचताना
तुमच्या मताचा आदर आहे , तसेच तुम्ही पण वागा ना
२०१८ ला हा धागा सुरु झाला आहे , तेंव्हापासून याच कंमेंट्स आहेत
आणि जर हा आक्षेप चालूच ठेवायचा असेल तर ऍडमिन ला सांगून धागा बंद करा
वीट आला आहे कंमेंट्स चा आणि त्यापेक्षा जास्त साळसूद पणाचा
ना या धाग्यावर येऊन कोणी दारू प्यायला सुरुवात करणार आहे आणि ना कि तुमच्या कंमेंट्स ने कोणी सोडणार आहे मग हा अट्टाहास कशाला ?
जर एवढीच तळमळ असेल तर ऍडमिन ला सांगून टाका मायबोली वर हि चर्चा करू नये
पाच वर्षे हीच चर्चा सुरु
पाच वर्षे हीच चर्चा सुरु आहे। खूप झाली चर्चा। बंद करा आतातरी हा धागा आणि एखाद्या चांगल्या विषयावर चर्चा करा। धन्यवाद
उदय चोप्राचा डबल रोल असलेला
उदय चोप्राचा डबल रोल असलेला सिनेमा बघतोय असाच फील आला>>>
पाणी पुरी विथ व्हिस्की वा कधीच ऐकले नव्ह्ते..
ट्राय करणार!
नुकतेच सोजू हे पेय चाखले. कोरियन आहे. नीट च प्यायले जाते. पण याकुल्ट्/स्प्राईट बरोबर ही चालते.
भन्नाट चव आहे.
थोडी लावायची आत्तासारखी आणि
थोडी लावायची आत्तासारखी आणि सुरू व्हायचं
>>>>
एखादी व्यक्ती काहीतरी बरळतेय असे आपल्याला वाटते तेव्हा आपण तो पिऊन आला आहे असे का म्हणतो?
थोडक्यात मद्यपानाचे दुष्परीणाम माहीत आहेत हे ही नसे थोडके
....
ना या धाग्यावर येऊन कोणी दारू प्यायला सुरुवात करणार आहे आणि ना कि तुमच्या कंमेंट्स ने कोणी सोडणार आहे मग हा अट्टाहास कशाला ?
>>>>
दुसरे होण्याची शक्यता कमी. मात्र पहिले होण्याची शक्यता जास्त. सर्वांना दारू पिण्याचा मोह याचमुळे होतो की त्याचे उगाच ग्लोरीफिकेशन केले जाते. त्याचमुळे जिथे जिथे ते मला आढळते तिथे तिथे मी हस्तक्षेप करतो आणि करत राहणार. कित्येक मित्र गमावलेत मी या नादात हे माझे वागणे, हा माझा स्टॅंड न आवडल्याने. पण मी ते माझे खास मित्र कधी नव्हतेच असे समजतो. तत्वांसमोर फार छोटी किंमत आहे ही.
धागाकर्ते दिसत नाही आजकाल.
धागाकर्ते दिसत नाही आजकाल. पासवर्ड हरवलेला दिसतो.
तत्वांसमोर फार छोटी किंमत आहे
तत्वांसमोर फार छोटी किंमत आहे ही.>>
अत्यंत अपेक्षित प्रतिसाद
सर तुमचेच उलट आभार, तुम्ही पो स्ट टाकत राहता म्हणून धागा वरती राहतो, आणि नव्या लोकांना पण टिप्स मिळतात
तयामुळे तुमचा उद्देश सफल होतोय
मी आता कॉकटेल स्पेशल धागा काढतोय लवकरच
त्यावरही अशीच कृपादृष्टी ठेवावी
मी आता कॉकटेल स्पेशल धागा
मी आता कॉकटेल स्पेशल धागा काढतोय लवकरच
>>>
काय बोलू
काय बोलू>>>> जे तुम्ही एरवी
काय बोलू>>>> जे तुम्ही एरवी बोलता तेच
वेगळं काही नको
धागा वरती राहील सतत एवढी काळजी घ्या म्हणजे झालं
मला वाटतं ज्याला जे आवडतं ते
मला वाटतं ज्याला जे आवडतं ते करू द्यावं, आम्हला आवडतं प्यायला उलट तुमचे प्रवचनपर लेख पाहून नको प्यायला अस कधी नाही वाटत.तुम्ही दारूला विरोध नाही करत आहात फक्त इथे विरोधाला म्हणून विरोध करत आहात तुमचे म्हणणे तुम्हाला अजिबात प्रभावीपणे मांडता येत नाही त्यामुळे तुमचे मित्र तुम्हाला दारुसाठी सोडून गेले. खर तर तुम्हाला इग्नोर करणं हाच उपाय आहे पण राहवलं नाही. तुमच्या विरोधाने आम्हाला काहीही फरक पडणार नाही. मला रिप्लाय देऊन उगाच आमच्या टी आर पी मधे भर घालू नका
बादवे मला जरा व्होडका मध्ये गोड काय काय मिक्स करू शकते सांगा, मला गोड खायला खूप आवडतं इव्हान 31स्त ल मी चाखणा म्हणून गुलाबजाम पण ट्राय केले..
व्होडका मध्ये गोड काय काय
व्होडका मध्ये गोड काय काय मिक्स करू शकते सांगा>>>
Cranberry ज्यूस अप्रतिम लागतो
चॉकलेट किंवा कॉफी लिक्यूर सोबत सुद्धा मस्त लागते
तसेच लिंबू रस आणि मध
साखर टाकून उकळून घ्या
लिम्का, लेमन
व्होडका प्लेन घेऊ का?
व्होडका प्लेन घेऊ का?
पुण्यातली कोण कोण मंडळी आहे इथे दर्दी?
व्होडका - क्रॅनबेरी/ऑरेंज
व्होडका - क्रॅनबेरी/ऑरेंज/पायनॅपल ज्यूस, जिंजरेल, स्प्राईट अश्या अनेक काँबिनेशन्समधे गोड करता येईल. व्होडका मार्टिनी मधे थोडंसं रोझ सिरप घालून वेगळा फ्लेवर तयार होतो आणि तो मस्त लागतो. भरवश्याचं मॉस्को म्यूल तर आहेच.
प्लेन म्हणजे? ऑन द रॉक्स??
प्लेन म्हणजे? ऑन द रॉक्स??
व्होडका मी तरी कधी घेतली नाही अशी
त्यातल्या त्यात मग ग्रीन अँपल चांगली लागेल तशी
व्होडका कायम थोडी गोडसर जोडीसोबत जास्त खुलते
सप्राइत, लेमोनेड इ
“ व्होडका मी तरी कधी घेतली
“ व्होडका मी तरी कधी घेतली नाही अशी” - व्होडकाला स्वतःची अशी फार चव नसते, त्यामुळे त्यात काही मजा येत नाही. व्होडका+क्लब सोडा पण पितात, पण त्यालाही काही चव (सोड्याचा झिणझिण्या सोडून) नाहीये.
हो ना, व्हिस्की किंवा रम ला
हो ना, व्हिस्की किंवा रम ला एक अंगभूत स्वाद असतो
तसा व्होडका ला कधी जाणवला नाही
“ तसा व्होडका ला कधी जाणवला
“ तसा व्होडका ला कधी जाणवला नाही” - बरोबर आहे. कदाचित म्हणूनच व्होडका कॉकटेल्स साठी जास्त सुटेबल आहे. कॉकटेल्समधे व्होडका फक्त ‘किक’ चं काम करते आणि फ्लेवर्सची जवाबदारी इतर घटकांवर टाकते.
ग्रीन ऍपल व्होडका आणि सोडा
ग्रीन ऍपल व्होडका आणि सोडा आवडते आहे.
ग्रीन अँपल सोबत ब्रिझर पण
ग्रीन अँपल सोबत ब्रिझर पण मस्त लागते
पण बेताने प्यावी लागते नैतर भुर्रकन विमान उडते
Vodka .
Vodka .
म्हणजे रंगहीन,चव हिन दारू.
एकदम शुद्ध
प्लेन म्हणजे? ऑन द रॉक्स??
प्लेन म्हणजे? ऑन द रॉक्स??
>>> प्लेन म्हणजे नॉथिंग ऍडेड .. रॉक्ससुद्धा... नुसता शॉट सारखा...
टकीला
टकीला
ग्रीन अँपल काय आहे?
ग्रीन अँपल काय आहे?
व्होडकाला स्वतःची अशी फार चव
व्होडकाला स्वतःची अशी फार चव नसते
<<
अस्ते की
मस्त रॉकेल सारखी चव असते.
प्लेन म्हंजे नो फ्लेवर वली,
प्लेन म्हंजे नो फ्लेवर वली, ग्रीन ऍपल फ्लेवर आहे सध्या तोच फेव आहे, लेमंन ग्रास पण बेस्ट आहे..romnov मध्ये प्लेन येते त्यात sprite घालून छान लागते पण नवरा आणि सगळ्याच म्हणे आहे की दरुबरोबर कोल्ड्रिंक्स नको हानिकारक आहे..
Pages