नवरा की प्रियकर

Submitted by बेताब दिल on 4 January, 2023 - 13:01

आज त्याला ऑफिसला जायचं होतं एरवी तो घरूनच काम करायचा.अजून हि mostly work from home च चालू होतं त्याच्या टीम च. संध्याकाळी तिनेच फोन केलेला चहा करताना,धडधड स्वतःचं सांगून मोकळा झालेला मी मित्रासोबत आहे,नंतर बहिणीकडे जाणारे.उशीर होईल यायला.काही काम होतं का?
ऐकून बीचारी च मन खट्टू झालं.अरे बोलूच नाही शकत का आपण असं इतर काही.एखादे वाक्य जरा गोडीत बोलल तर काय जातंय?
रात्री ८:३० ला घरी आला,मुलांना घेऊन ती जेवायला बसलेली.येऊन बोलला छान, काय मस्त भाजी केलेली आज,एकदम टेस्टी.खूप आवडली मला! मुलानी पण दुजोरा दिला.
ती खुश झाली.जेवण झालं तरी तसाच हात घेऊन बसून राहीली ताटावर.हा आपला भूक नाहीय म्हणून मोबाईल मध्ये गुंग.आजच्या शेअर मार्केट मधल्या प्रॉफिट साठी कौतुक केलं तिचे.म्हणे lady luck ahe तुझं!
मुलगी सांगायला आली ,बाबा माझ्या school मध्ये उद्या
Assembly आहे आमची.तिच्याशी २/३ वाक्य बोलला.तो पर्यंत मुलगा झोपी गेलेला.
ती त्याला निरखून बघू लागली,मोबाईल वर chatting आणि चेहऱ्यावर smile. माझ्याशी बोलताना मात्र अठ्याच येतात कपाळावर.
अशीच बसून राहिली त्याला बघत,पुढचा प्लॅन करत.आज निवांत बोलू या दोघे ही झोपताना. तो पर्यंत याने पुढचा प्लॅन केलेला, श्रमपरिहार चा.
ती आश्चर्याने बघतच राहिली,खरंच का काहीच राहिलं नाहीय शिल्लक आपल्या विषयी? कस याल अजिबात वाटत नाही अपल्या सोबत छान वेळ घालवावा म्हणून?
२ दिवस झाले खूप hectic ahe माझं schedule.
आजचा दिवस पण खूप काम होतं." त्याची पुस्ती.
"पण आज तर तुम्ही बाहेर गेलात ना संध्याकाळी.?"
न राहवून तिने विचारलेच शेवटी रागात.हे थोडी ना त्याला सहन होणार होत!
"अरे सकाळी ९ ते २ meeting चाललीय माझी.तुम्हाला काय मी मशीन वाटतो की काय? करून बघ बर माझ्या जागी तू काम?"
बिचारी विचार करत राहिली.बाहेर मित्राकडे जाताना तू थकला नाहीस.नंतर नाही इकडे ही छान गप्पा मारल्या असतील ना? तेव्हा काही नाही झालं आणि आता घरी आला की लगेच थकायला झालं का? ९-२ meeting मुळे थकला होता तर मित्राला नव्हते भेटायचं.बहिणीकडे
नंतर गेला असता पण नाही.घरी आला की पिण्याच मात्र कारणच हवं. खुप दुखावली परत ती आज पण.
ताट उचलून ठेवू लागली की लगेच याने चालू केल,काय हे,लगेच काय जाते निघून मी हा विषय काढला की. बोल ना काही तरी".
ती ही चिडली " अरे मी इतका वेळ बसून होते तुझ्या समोर ताटावर,तुझ्याशी बोलावं म्हणून.तुला स्वतः हून काही बोलायला गेले की तुझी धूडकावनारी बरीच कारण असतात,आता कशाला हा विषय,नंतर बोलू,आता मी थकलो आहे, डोकं दुखत माझं, समजत नाही का तुला शांत बस ना जरा वगेरे वगेरे.म्हणून तुझ्या समोर मुद्दाम शांत बसले मी अशीच.तर तुझ लक्ष मोबाईल मध्येच! "
" मग जरा इंटरेस्टिंग टॉपिक वर बोलत जा ना जरा,काय ते आपले सारखं सारखं !"
झालं मग काय होणार होत अजून वेगळ?तो बसला हॉल मध्ये आपली बैठक मारून ,ती गेली रूम मध्ये . काढल वाचायला न्यू एपिसोड.त्या मध्ये नवरा बायकोचे असलेले रोमँटिक talks वाचून तिला अगदी घरून आल!समजले की काय कमी पडतंय.हे असं दोघांमधलं गोड बोलण होतच नव्हतं मुळात आजकाल.किती किती हवा असतो तिला तो संध्याकाळी.काही बोलायला नसल तरी चालेल पण तू सोबत हवास निवांत रात्री च्या वेळी असे तिला नेहमी वाटायचं.तिला कळायचं ही तिची मानसिक गरज आहे जी त्याच्या कडूनच पूर्ण होऊ शकते.पण तो ? त्याला माहिती ही नसेल हे कदाचित.तिने बऱ्याचदा सांगितलेलं त्याला पण आजकाल त्याची प्यायची स्वे जरा जास्तच वाढलेली.दर दिवसागणिक आजकाल प्यायचा.खूप खूप चीडचीड व्हायची तिची.किती ही समजाऊन सांगितलं तरी त्याचे तेच." अग किती टेन्शन असतं मला ऑफिस च. करून बघ माझ्या जागी काम"
नंतर नंतर तर तिने या वर बोलणेच सोडून दिलेलं.कितीही संगीतलं तरी तेच परत! आधी आधी ती बसायची त्याच्या सोबत गप्पा मारायच्या म्हणून.पण १-२ पेग चढले की मात्र तीच्यावर चिडायचा.तिला घालून पाडून बोलायचा.सारख्या तिच्या चुका काढायचा.आता सहन होत नव्हत तिला ही.पण मुलासमोर उगी गोंधळ नको म्हणून काही बोलायची नाही.तिथल्या तिथे विषय बंद केलेला बरा असे वाटायचे तिला.पण किती दिवस ना?
खरंच संपते ना सहनशक्ती ही कधी कधी.
अस नाही की प्रेम नव्हत दोघात,फिरायला जायचे दोघे.ट्रेक करायचे बरेच मुलांना घेऊन.छान छान ट्रीप arrange करायचे .physical relations madhe पण काही प्रॉब्लेम नव्हता.उलट मुलं मोठी झालीय तर त्यांच्या रूम मध्ये झोपायची कधी कधी.तेव्हा यांच्या रात्री ना बहर यायचा.इतका आनंद तिला कधीच नव्हता येत आधी . मुलं लहान होती तेव्हा हे पण एक कामच वाटायचं तिला.खूप दमून जात होती तेव्हा,शरीर आणि मन दोन्ही नी. पण तिला एक गोष्ट जाणवायची आजकाल ली physical रेलेशन्स सगळं काही नसत पण यामुळे वैवाहिक जीवन खूप strong बनत. ती
खुप गुंतून जायची मग त्याचात मेंटली.आपल्या नवर्याविषयी एवढं वाटण ते ही चाळिशी च्या उंबरठ्यावर असताना! Means a lot!!

पण दोघांमध्ये एक गॅप येत होता.आजकाल तिला मनातून खूप राग यायचा त्याचा.तिच्या मते त्याला काही महत्त्वच नाहीय तिचं.सतत available असण त्याने granted घेतलय वाटायचं तिला. त्याच खुप मूडी असण आजकाल नकोस व्हायचं तिला. त्याचा मूड,त्याचा जॉब, त्याच काम, त्याचे प्लॅन्स हीच सगळी प्रायोरिटी.
तीच दुय्यम स्थान ! मुलांसाठी जॉब सोडल म्हणून काय झाल? घरात काम करून पण माणूस थकतो ना?त्याच्या कमाला, मूडला द्या ना जरा महत्त्व.हेच कारण होतं तिच्या दुःखाचं.
अजून एक गोष्ट तिला खूप लागायची मनाला!हा हिरो पिऊन आपल्या मैत्रिणीशी गुलुगुलु बोलायचा,आणि हिला मात्र ओरडायचा . गोड गोड बोलायला सगळं जग आहे याच्या समोर पण कूचकट पना मात्र माझ्यासोबत च. इतका क राग येतो त्याला माझा आजकाल की सतत चीडतच राहतो काही बोलल की .२ मिनिटाच्या वर तर नीट बोलणंच होत नाही आजकाल.बिचारी खूप खूप frustrate व्हायची.रात्र रात्र भर रडत राहायची पण त्याला त्याची काही भनक ही नसायची.सांगून ही तो ignore करायचा,मग काय करणार.अशीच कुढत बसायची मनात .खूप एकटी पडायची. आपलं कोणीच नाही का या जगात अस वाटायचं सतत तीला .पण तीच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायची.नवऱ्यातून आपण मन काढल पाहिजे.emotionally independent राहायला हवं आपण. आपल्या आनंदासाठी आपण त्याच्यावर कशाल डिपेंड राहायचं? कदाचित प्रत्येकाच्या लग्नानंतरच्या १२-१५ वर्षानंतर हेच होत असेल.

पण वेड्या मनाला थोडी ना समजत इतकं लगेच.नवरा जरी असला तरी तो आपला प्रियकर ही असतोच की!पण प्रियकरावर एवढा राग येऊ शकतो? तिलाच समजायचं नाही आपलं वागणं चूक की बरोबर .या अशा भरकटलेल्या अवस्थेत अजून च घालमेल व्हायची तिची.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की जे हवे ते म्हणा कारण ते महत्वाचे नाही
तर तुम्ही जे वर्णन केलेय ते मला चपखल/चपलख बसते हे महत्वाचे आहे.
तुम्हाला माझ्याशीच मिळतेजुळते वर्णन स्फुरणे यातही बिलकुल नवल नाही. टिका करण्याच्या निमित्ताने का असेना तुमच्या डोक्यात माझा विचार येत असणार. तेच लिखाणात उतरणे स्वाभाविक आहे Happy

सर शिसारी येईल असे लिहिण्यात तुमचा हातखंडा आहे
मी मागेही लिहिलं तस दीड कोटी लोकांना लागू होणारी वाक्ये लावून घेऊन हे हे मीच तो मीच तो असे वेडगळपणे रस्त्यात ओरडत फिरणाऱ्या व्यक्तीचे वर्णन तुम्हाला नक्की चपखलपणे लागू पडेल

सर मी खरोखरच विचारतो मानसोपचार तज्ञांचा नंबर देऊ का? तुमची केस अगदीच हाताबाहेर गेलीये

पुढेच्या कथेला मी पण थोडासा हातभार लावते...

उदासवाणं होत ती तिच्या स्वप्नाला हसली.>>> समाप्त..

पुढे....

ती उठून गॅलरीत आली. समोरच्या गॅलरीत पारेखांची सून नटून तयार होती. नवर्‍यासोबत सिनेमाला निघाली असेल नटवी..! तिच्या मनात विचार आला.

तिने डोळे बंद करत एक दिर्घ श्वास घेतला. अचानक एक चेहरा डोळ्यांसमोर तरळला. 'पक्या..!" हो 'पक्या पाचपुते..!! "

कॉलेजला असताना कित्ती मागे लागला होता आपल्या..!!

ते आठवून तिच्या चेहर्‍याची खळी खुलली.

कॉलेजच्या सहलीला गेलो होतो.. तेव्हा आपण घसरून पडत असता आपल्याला आधार द्यायला म्हणून हाताने कमरेला विळखा घातला होता त्याने.. ते आठवून तिचं सारं शरीर हुळहुळलं. फाजिल होता नुसता ..!!

आपले ते सारे विभ्रम तिला आठवले. आपण वेणीत पिवळा चाफा माळला की , पक्या वेडावल्यासारखा आपल्या मागे - मागे फिरायचा... तिला वाटलं पुन्हा एकदा केसांत पिवळा चाफा खोवून कॉलेजच्या कॉरिडॉरमधून चालत जावं... मग तिथेच थट्टा-मस्करी करत उभ्या राहिलेल्या सगळ्या तरुणांच्या माना आपल्या दिशेने फिरतील.. मग त्यातलाच एखादा टवाळखोर म्हणेल, आज पक्या दिसत नाही कुठे...? मग आपण लाजून गालातल्या गालात हसू ... अचानक त्याचवेळी पक्या समोरून आला तर...? आणि म्हणाला चल .. माझ्याबरोबर ...कॉफी घेऊया... तर...??

तर काय करायचं आपण..??

एकदा जगून झालेलं आयुष्य पुन्हा जगता येत नाही याची तिला चीड आली आणि मग तिच्या मनात असा विचार आला की, अजून काही उशीर झालेला नाही. समजा, अजून संधी आली तर.??

समजा आता आपण फिरायला बाहेर पडलो आणि आपल्याला पाहून मोटार थांबवून पक्या म्हणाला, " चल, माझ्याबरोबर.."

तर जायचं त्याच्याबरोबर..??

काय हरकत आहे...??

या नीरस जीवनावर लाथ मारायला काय हरकत आहे..!!

तिने उत्साहाने फोन हातात घेतला आणि फेसबुक ओपन केले..

तेवढ्यात दाराची घंटी कर्कश वाजली....

मज्जा चालुये ईथे Happy
बट पक्या नेम इस सो पकाऊ..पण असो.

मी मी मी वाल्या कडे दुर्लक्ष करून कथेवर फोकस करुया लोक्स! Wink

बट पक्या नेम इस सो पकाऊ..
>>>>

नावात काय आहे? असे खुद्द पक्याच म्हणून गेला आहे ना..
बाकी लिखाण महत्वाचे आणि त्यांनी लिहिले तर छान आहे..

बाई दवे,
एका पक्याकथेला मायबोली कथास्पर्धेत बक्षीस मिळालेले त्याची आणि एका पक्याची आठवण झाली!

विषय क्रमांक २ - कट्ट्यावरचा एक मित्र खास असतो....
https://www.maayboli.com/node/49577

तेवढ्यात दाराची घंटी कर्कश वाजली....>>>

या भलत्या वेळी कोण आलं असेल? तिच्या मनात काहूर दाटले
पक्या आला असेल का? पण त्याला आपलं घर माहिती तरी आहे का? का अचानक एक धक्का असेल आपल्याला?

असा विचार करतच तिने केस सावरले, कपडे ठीक ठाक केले आणि जर पक्या असला तर त्याला कसे समोरे जायचे याची मनाशी रंगीत तालीम करत तिने दार उघडले

"मेमसाब, कल पानी नाही आयेगा, सोसायटी के सेक्रेटरी संबं ने सबको बोलने को बोला है,"

सिक्युरिटी वाल्याचे कर्कश बोल तिच्या कानात शिरले आणि तिचा संताप संताप झाला

ये क्या रे, खाली पिली पाणी जाता रेहता है, हम को कितना प्रॉब्लेम होता है, कल के कपडे मै क्या अभिच धोके रखु क्या और बरतन कोण मांजेगा??

तिच्या अफाट हिंदीची आणि घरोघरी होणाऱ्या तडफड चिडचिड या प्रकाराला सिक्युरिटी वाला निर्ढावला होता त्यामुळे त्याने काहीही मनावर घेतले नाही

"वो अप सेक्रेटरी से बात करो, मेरा काम है बोलना, वो मै बोल्या'

आणि निर्विकारपणे तो चालता झाला. तिने रागाने दार आपटून बंद केले आणि हताश मनाने परत गॅलरीत आली

कुणीही येणार नहीये आपल्या आयुष्यात
आपल्या नशिबी हा असला कळकट नवरा आणि तो कर्कश्य बोलताना सिक्युरिटीवाला एवढेच उरलेत, असे काहीबाही तिच्या मनात येऊ लागले.

आणि इतक्यात फोन वाजला.
पलिकडचा आवाज म्हणाला
"आहेत माझी मुंबैत तीन तीन घरे
एका तरी घरी तू येशील का बरे?
डोंगर जाळायला सोबतीने जाऊ
लोकांना वाटू देत जरा खोटे जरा खरे"
आणि ती आनंदाने चित्कारलीच.
"अय्या S S S S S S S
,
,
,
,
,
,
रणछोडदास तू?"

हताश मनाने परत गॅलरीत आली

कुणीही येणार नहीये आपल्या आयुष्यात
आपल्या नशिबी हा असला कळकट नवरा आणि तो कर्कश्य बोलताना सिक्युरिटीवाला एवढेच उरलेत, असे काहीबाही तिच्या मनात येऊ लागले.>>. सहजच तिचे लक्ष समोरच्या गॅलरीकडे गेले. तर तिथे साफसफाई सुरू होती. अरे हे काय!! काल तर तिथे तो व्यायाम करत होता. ती विचारात पडली.
"एवढा कसला विचार करता हो ताई." कपडे वाळत टाकायला गॅलरीत आलेल्या सखूने तिला दचकावलंच.
"अगं समोरच्या घरातले कुठे गेले?" तिचा व्याकूळ प्रश्न.
"कायतरी काय बोलता ओ ताई. सहा महिने झाले ते घर बंद आहे. मलाच विचारत होते सफाई करून देशील का म्हणुन. लय घाण झालंय ते घर म्हणुन म्या नाय बोलले.."
पुढे सखू काय सांगत होती तिला काहीच समजत नव्हते. म्हणजे इतके दिवस आपण एकमेकांना बघत होतो तो भास होता!! काय होते आहे आपल्याला. ती मटकन डोके धरून खाली बसली...

पुढे सखू काय सांगत होती तिला काहीच समजत नव्हते. म्हणजे इतके दिवस आपण एकमेकांना बघत होतो तो भास होता!! काय होते आहे आपल्याला. ती मटकन डोके धरून खाली बसली...>>>

बराच वेळ ती तशीच बसून होती.
"ताई, मी चालले" सखुचा आवाज आला तशी ती भानावर आली. भासच असणार तो असे स्वत:ला बजावत पुढचे दार बंद केले आणि स्वत:साठी तिने चहा केला. चहाचा कप घेउन ती सोफ्यावर बसली. एका हाताने कप धरुन चहा पिता पिता टीपॉय वरील मोबाईल उचलला आणि बोटाने अनलॉक केला. सवयीने तिने माायबोली उघडली आणि सगळयात वरच्याा धाग्याचे शिर्षक पाहुन चमकली. तिने लगेच तो धागा उघडला. सहा महिने जुना धागा वर आला होता. हा धागा आधी कसा आपल्या नजरेतुन सुटला असे मनाशी म्हणत ती वाचु लागली आणि तिला धक्काच बसला.
तिने परत एकदा शीर्षक वाचले: आपल्या बाल्कनी/टेरेसमध्ये कमी कपड्यात वावरणे कायद्याने गुन्हा होऊ शकतो का?
हा तोच नक्की. का सोडुन गेला याचे कारण तिला कळले. आणि तो जिच्या बद्दल बोलतोय ती कोण याचाही तिला अंदाज आला. दोन बिल्डींग सोडुन ती रहात होती. त्या नेत्याची त्या बाईची ओळख होती खरी पण लोक उगाच काहीपण कुजबुज करतात याची तिला खात्री होती.

मग आपल्या रटाळ जिवनात काहीतरी थ्रिलींग करावे असे तिने ठरवले. तिने कपडे बदलले आणि त्या बाईला भेटायला निघाली.

तिने परत एकदा शीर्षक वाचले: आपल्या बाल्कनी/टेरेसमध्ये कमी कपड्यात वावरणे कायद्याने गुन्हा होऊ शकतो का?
हा तोच नक्की.>> Lol
आता काहीजण 'मीच तो, मीच तो' करत येतील.

सतसंग आठवले

एका महिलेने स्वामींना विचारले,
स्वामी, प्रभू का गुणगान कैसे गाओगे?
हे स्वामी तुम्ही देवाचे वर्णन कसे कराल?

त्यावर स्वामींनी फार सुंदर उत्तर दिले
अगर मन मे ईश्वर है तो उसका जो वर्णन आप करोगी उसमे वो समा जायेगा..
जो ईश्वर तुमच्या विचारात आहे त्याला शब्दात उतरवा. ते वर्णन त्याला लागू पडेल.
देवाचे वर्णन होऊ शकत नाही पण भक्तीभावाने केलेले प्रत्येक वर्णन देवाचे असते Happy

जो ईश्वर तुमच्या विचारात आहे त्याला शब्दात उतरवा. ते वर्णन त्याला लागू पडेल.
देवाचे वर्णन होऊ शकत नाही पण भक्तीभावाने केलेले प्रत्येक वर्णन देवाचे असते Happy>> पण तुमचा तर देवावर विश्वास नाही. दुसर्‍याची शाल ओढून घेउ नका. भक्ती व्यक्ती ची होत नाही त्याला व्यक्तिपूजा म्हणतात.

जय श्रीराम.

पण तुमचा तर देवावर विश्वास नाही.
>>>>>

माझा त्या देवावर विश्वास नाही जो देव तुम्ही मानता..
तुम्ही देव दगडात शोधता, मी माणसात शोधतो..
आणि मग दगडाची पूजा करणारे तुम्ही मग त्याला व्यक्तीपूजा म्हणता Happy

भक्ती व्यक्ती ची होत नाही त्याला व्यक्तिपूजा म्हणतात.>>> वाहवा, काय बोललात, मस्त

रहने दो बेटा तुमसे ना हो पायेगा.>>>> सर पालथा घडा सोबत अखिल भारतीय कोलांट्याउड्या, गिरे तो भी टांग उपर असोसिएशनचे आजीवन सदस्य आहेत.
आणि मी मी करून अटेंशन घेऊन परत माझ्याबद्दल बोलू नका असे म्हणण्याचा निर्लज्ज कोडगेपणाही आहे, त्यांच्या क्षमतेबद्दल शंका घेऊ नये नाहीतर देवबाप्पा तुम्हाला शिक्षा करेल Happy

मानव सिक्सर च मारलात>>> हो ती लिंक धमाल आहे
ते सर कुठं गायब झालेत? या सरांना तुल्यबळ लढत होती त्यांची Happy

ते सर मास्टर ब्लास्टर होते. त्यांचे धागे एकाच दिवसात सेंचुरी मारायचे.>>>>
खरंय, या सरांना त्यासाठी स्वतःच्याच 50 पोस्ट टाकाव्या लागतात, मग वेगळ्या आयडीने येऊन अजून थोड्या, मग थोडं भजनी मंडळ Happy

या धाग्याचे कर्ताधर्ता तेच तर नाहीत ना?>>>>
तुम्ही असं बोलता आणि मग सरांचा गैरसमज होतो,
ते मग थेट ठरवून टाकतात, बाई ग, तुम्ही इतका विचार करताय माझ्या बद्दल म्हणजे तुमच्या मनात मीच असणार गडे
(लाजून खाली बघत, अंगठ्याने जमीन टोकरत, बोटांशी चाळा करत)

आशूचॅंप ओके
तुम्ही नाही करत माझ्याबद्दल फार विचार
मान्य आणि शुभरात्री Happy

मग आपल्या रटाळ जिवनात काहीतरी थ्रिलींग करावे असे तिने ठरवले. तिने कपडे बदलले आणि त्या बाईला भेटायला निघाली.>> घराबाहेर पाऊल टाकणार तोच मोबाईल किणकिणला. चित्रुचा फोन.. किती दिवसांनी फोन करते आहे ही. किती बोलू अन् किती नको असंच झालं तिला. ती कोणत्या कामासाठी चालली होती तेही विसरली.
चित्रु तिच्याच वर्गात होती. रहायला पक्याच्या घराशेजारी. पक्याबद्दल तिच्याकडूनच तर समजायचे हिला.. अन् तिच्याबद्दल पक्याला. प्रत्यक्ष भेटून बोलायची हिंमत होती कुठे तेव्हा, वर्गात समजलं असतं तर दोघांना चिडवून हैराण केलं असतं सगळ्यांनी. तेव्हा चित्रुच समजून न समजल्यासारखे करत शक्य होईल ती मदत करायची दोघांना.
बोलतांना हिने पक्याचा विषय काढलाच.
" पक्या काय करतो गं? कधी भेटतो का तुला?"
"कोण पक्या?" चित्रुचा गोंधळलेला प्रश्न..
असं काय करते ही. चाळीशीतच म्हातारी झाली की काय! हिला खुदकन हसायला आलं.
"अगं हसतेस काय? कोण पक्या ते तर सांग."
" बाईसाहेब तुमच्या घरा शेजारी रहायचा तोच पक्या, आपल्या वर्गातला.. ज्याच्या बद्दल तुम्ही वेळोवेळी माहिती सांगून माझ्या ज्ञानात भर टाकायच्या."
" माफ करा मॅडम. माझ्या घरा शेजारी पक्याच काय पण वर्गातला तुक्या, सक्या, मिक्या असं कोणीही रहात नव्हतं आणि आपल्या वर्गातही असं कोणी नव्हतं."-चित्रु.
काय बोलतेय ही. तिला काहीच सुचेना.

Pages