नवरा की प्रियकर

Submitted by बेताब दिल on 4 January, 2023 - 13:01

आज त्याला ऑफिसला जायचं होतं एरवी तो घरूनच काम करायचा.अजून हि mostly work from home च चालू होतं त्याच्या टीम च. संध्याकाळी तिनेच फोन केलेला चहा करताना,धडधड स्वतःचं सांगून मोकळा झालेला मी मित्रासोबत आहे,नंतर बहिणीकडे जाणारे.उशीर होईल यायला.काही काम होतं का?
ऐकून बीचारी च मन खट्टू झालं.अरे बोलूच नाही शकत का आपण असं इतर काही.एखादे वाक्य जरा गोडीत बोलल तर काय जातंय?
रात्री ८:३० ला घरी आला,मुलांना घेऊन ती जेवायला बसलेली.येऊन बोलला छान, काय मस्त भाजी केलेली आज,एकदम टेस्टी.खूप आवडली मला! मुलानी पण दुजोरा दिला.
ती खुश झाली.जेवण झालं तरी तसाच हात घेऊन बसून राहीली ताटावर.हा आपला भूक नाहीय म्हणून मोबाईल मध्ये गुंग.आजच्या शेअर मार्केट मधल्या प्रॉफिट साठी कौतुक केलं तिचे.म्हणे lady luck ahe तुझं!
मुलगी सांगायला आली ,बाबा माझ्या school मध्ये उद्या
Assembly आहे आमची.तिच्याशी २/३ वाक्य बोलला.तो पर्यंत मुलगा झोपी गेलेला.
ती त्याला निरखून बघू लागली,मोबाईल वर chatting आणि चेहऱ्यावर smile. माझ्याशी बोलताना मात्र अठ्याच येतात कपाळावर.
अशीच बसून राहिली त्याला बघत,पुढचा प्लॅन करत.आज निवांत बोलू या दोघे ही झोपताना. तो पर्यंत याने पुढचा प्लॅन केलेला, श्रमपरिहार चा.
ती आश्चर्याने बघतच राहिली,खरंच का काहीच राहिलं नाहीय शिल्लक आपल्या विषयी? कस याल अजिबात वाटत नाही अपल्या सोबत छान वेळ घालवावा म्हणून?
२ दिवस झाले खूप hectic ahe माझं schedule.
आजचा दिवस पण खूप काम होतं." त्याची पुस्ती.
"पण आज तर तुम्ही बाहेर गेलात ना संध्याकाळी.?"
न राहवून तिने विचारलेच शेवटी रागात.हे थोडी ना त्याला सहन होणार होत!
"अरे सकाळी ९ ते २ meeting चाललीय माझी.तुम्हाला काय मी मशीन वाटतो की काय? करून बघ बर माझ्या जागी तू काम?"
बिचारी विचार करत राहिली.बाहेर मित्राकडे जाताना तू थकला नाहीस.नंतर नाही इकडे ही छान गप्पा मारल्या असतील ना? तेव्हा काही नाही झालं आणि आता घरी आला की लगेच थकायला झालं का? ९-२ meeting मुळे थकला होता तर मित्राला नव्हते भेटायचं.बहिणीकडे
नंतर गेला असता पण नाही.घरी आला की पिण्याच मात्र कारणच हवं. खुप दुखावली परत ती आज पण.
ताट उचलून ठेवू लागली की लगेच याने चालू केल,काय हे,लगेच काय जाते निघून मी हा विषय काढला की. बोल ना काही तरी".
ती ही चिडली " अरे मी इतका वेळ बसून होते तुझ्या समोर ताटावर,तुझ्याशी बोलावं म्हणून.तुला स्वतः हून काही बोलायला गेले की तुझी धूडकावनारी बरीच कारण असतात,आता कशाला हा विषय,नंतर बोलू,आता मी थकलो आहे, डोकं दुखत माझं, समजत नाही का तुला शांत बस ना जरा वगेरे वगेरे.म्हणून तुझ्या समोर मुद्दाम शांत बसले मी अशीच.तर तुझ लक्ष मोबाईल मध्येच! "
" मग जरा इंटरेस्टिंग टॉपिक वर बोलत जा ना जरा,काय ते आपले सारखं सारखं !"
झालं मग काय होणार होत अजून वेगळ?तो बसला हॉल मध्ये आपली बैठक मारून ,ती गेली रूम मध्ये . काढल वाचायला न्यू एपिसोड.त्या मध्ये नवरा बायकोचे असलेले रोमँटिक talks वाचून तिला अगदी घरून आल!समजले की काय कमी पडतंय.हे असं दोघांमधलं गोड बोलण होतच नव्हतं मुळात आजकाल.किती किती हवा असतो तिला तो संध्याकाळी.काही बोलायला नसल तरी चालेल पण तू सोबत हवास निवांत रात्री च्या वेळी असे तिला नेहमी वाटायचं.तिला कळायचं ही तिची मानसिक गरज आहे जी त्याच्या कडूनच पूर्ण होऊ शकते.पण तो ? त्याला माहिती ही नसेल हे कदाचित.तिने बऱ्याचदा सांगितलेलं त्याला पण आजकाल त्याची प्यायची स्वे जरा जास्तच वाढलेली.दर दिवसागणिक आजकाल प्यायचा.खूप खूप चीडचीड व्हायची तिची.किती ही समजाऊन सांगितलं तरी त्याचे तेच." अग किती टेन्शन असतं मला ऑफिस च. करून बघ माझ्या जागी काम"
नंतर नंतर तर तिने या वर बोलणेच सोडून दिलेलं.कितीही संगीतलं तरी तेच परत! आधी आधी ती बसायची त्याच्या सोबत गप्पा मारायच्या म्हणून.पण १-२ पेग चढले की मात्र तीच्यावर चिडायचा.तिला घालून पाडून बोलायचा.सारख्या तिच्या चुका काढायचा.आता सहन होत नव्हत तिला ही.पण मुलासमोर उगी गोंधळ नको म्हणून काही बोलायची नाही.तिथल्या तिथे विषय बंद केलेला बरा असे वाटायचे तिला.पण किती दिवस ना?
खरंच संपते ना सहनशक्ती ही कधी कधी.
अस नाही की प्रेम नव्हत दोघात,फिरायला जायचे दोघे.ट्रेक करायचे बरेच मुलांना घेऊन.छान छान ट्रीप arrange करायचे .physical relations madhe पण काही प्रॉब्लेम नव्हता.उलट मुलं मोठी झालीय तर त्यांच्या रूम मध्ये झोपायची कधी कधी.तेव्हा यांच्या रात्री ना बहर यायचा.इतका आनंद तिला कधीच नव्हता येत आधी . मुलं लहान होती तेव्हा हे पण एक कामच वाटायचं तिला.खूप दमून जात होती तेव्हा,शरीर आणि मन दोन्ही नी. पण तिला एक गोष्ट जाणवायची आजकाल ली physical रेलेशन्स सगळं काही नसत पण यामुळे वैवाहिक जीवन खूप strong बनत. ती
खुप गुंतून जायची मग त्याचात मेंटली.आपल्या नवर्याविषयी एवढं वाटण ते ही चाळिशी च्या उंबरठ्यावर असताना! Means a lot!!

पण दोघांमध्ये एक गॅप येत होता.आजकाल तिला मनातून खूप राग यायचा त्याचा.तिच्या मते त्याला काही महत्त्वच नाहीय तिचं.सतत available असण त्याने granted घेतलय वाटायचं तिला. त्याच खुप मूडी असण आजकाल नकोस व्हायचं तिला. त्याचा मूड,त्याचा जॉब, त्याच काम, त्याचे प्लॅन्स हीच सगळी प्रायोरिटी.
तीच दुय्यम स्थान ! मुलांसाठी जॉब सोडल म्हणून काय झाल? घरात काम करून पण माणूस थकतो ना?त्याच्या कमाला, मूडला द्या ना जरा महत्त्व.हेच कारण होतं तिच्या दुःखाचं.
अजून एक गोष्ट तिला खूप लागायची मनाला!हा हिरो पिऊन आपल्या मैत्रिणीशी गुलुगुलु बोलायचा,आणि हिला मात्र ओरडायचा . गोड गोड बोलायला सगळं जग आहे याच्या समोर पण कूचकट पना मात्र माझ्यासोबत च. इतका क राग येतो त्याला माझा आजकाल की सतत चीडतच राहतो काही बोलल की .२ मिनिटाच्या वर तर नीट बोलणंच होत नाही आजकाल.बिचारी खूप खूप frustrate व्हायची.रात्र रात्र भर रडत राहायची पण त्याला त्याची काही भनक ही नसायची.सांगून ही तो ignore करायचा,मग काय करणार.अशीच कुढत बसायची मनात .खूप एकटी पडायची. आपलं कोणीच नाही का या जगात अस वाटायचं सतत तीला .पण तीच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायची.नवऱ्यातून आपण मन काढल पाहिजे.emotionally independent राहायला हवं आपण. आपल्या आनंदासाठी आपण त्याच्यावर कशाल डिपेंड राहायचं? कदाचित प्रत्येकाच्या लग्नानंतरच्या १२-१५ वर्षानंतर हेच होत असेल.

पण वेड्या मनाला थोडी ना समजत इतकं लगेच.नवरा जरी असला तरी तो आपला प्रियकर ही असतोच की!पण प्रियकरावर एवढा राग येऊ शकतो? तिलाच समजायचं नाही आपलं वागणं चूक की बरोबर .या अशा भरकटलेल्या अवस्थेत अजून च घालमेल व्हायची तिची.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दारू मेंदूचा ताबा घेते. दारू पिल्यानंतरचा माणूस तोच राहत नाही.
म्हणून सर्वात पहिले कथानायकाची दारू सुटायला हवी. बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. किमान जे ईतर सोल्युशन काढू त्याला अर्थ राहील.

कथेत लिहिलेल्या भावना आणि मनाची घालमेल यांच्याशी सहमत आहे, पण...
Men Marry Women with the Hope They Will Never Change. Women Marry Men with the Hope They Will Change.

अर्रे ! कहानीत प्रियकर आलाच नाही. शीर्षकावरून माबोवर हिट होण्याची आडदांड क्षमता असलेली कथा आपण वाचायला घेतली आहे असा दांडगा आत्मविश्वास आला होता. पण हाय रे कर्मा ! आख्खा प्रियकरच गायब केला. विबासंव्रताची शप्पथ घालतो, पुढच्या भागात प्रियकर दाखवा आणि दोन्हींमधे कात्री झालेली अबला नारी ! माबोकरांच्या डोळ्यातून धारा वाहतील कुठल्या न कुठल्या !

तिने नवऱ्याला ड्रिंक्स घेताना कंपनी द्यावी. म्हणजे स्वतः:ही त्याच्यासोबत ड्रिंक्स घ्यावेत. त्यावेळी स्वतः:घ्या मनातलं सगळं बोलून टाकावं.

नायिकेला शारीरिक सुख मिळत आहे मात्र मानसिक नाही....
तिने बाहेर प्रियकर शोधावा... मानसिक आधारा साठी... त्याला झुलवत ठेवावे... मैत्रीच्या थोड्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे... तुम मेरे अच्छे दोस्त हो....

म्हणजे स्वतः:ही त्याच्यासोबत ड्रिंक्स घ्यावेत. त्यावेळी स्वतः:घ्या मनातलं सगळं बोलून टाकावं.
>>>

चुकीचा सल्ला.
सत्य बोलण्यासाठी मद्य प्यावे लागते का?
तसे असते तर सत्याची शिकवण देणाऱ्या बापूंच्या जयंतीला ड्राय डे नसता...

तिने बाहेर प्रियकर शोधावा... मानसिक आधारा साठी... त्याला झुलवत ठेवावे... मैत्रीच्या थोड्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे...

>>>>हा पण

सत्य बोलण्यासाठी मद्य प्यावे लागते का?
तसे असते तर सत्याची शिकवण देणाऱ्या बापूंच्या जयंतीला ड्राय डे नसता...>> सर कृपा करून हा धागा दारुबंदी कडे वळवू नका. नायिकेचा पती तिच्याशी चांगले वागत नाही यावर उपाय सांगा पाहिजे तर ..
किमान नायिकेने ड्रिंक्स ची चर्चा करावी. तुझा ब्रँड कोणता? तिने कोणता ट्राय करावा इ.इ. ...

सहमत, एखादा पेग घ्यावा, मस्त गप्पा होतील, श्रमपरिहार होईल
चिडचिड होणे कमी होईल

प्रियकर हवा होता पण कथेत, भारी ट्विस्ट आला असता. मला ती प्रोफेसर, सर आणि बाबा कथा
आठवली. तुफान हिट झाली होती. Happy

हिने त्या नवर्‍याला घटस्फोट देउन एलिमनी घेउन चाइल्ड सपोअर्ट घेउन बाहेर पडावे. नवा फ्लॅट भाड्याने घ्यावा. नोकरी व्यवस्था करावी. नवा प्रियकर शोधावा. ही गाडी आता बंदपडली आहे. ती डंपस्टर मध्ये फेकून द्या. कुढायचे काही काम नाही. घरी छान कॉकटेल बार ठेवावा. मस्त वनपीस कपडे घ्यावे. मेक ओव्हर करावा. तिला माणूस म्हणून जगायची गरज आहे पहिले. हे बाय्को पणाचॅ जोखड फेकून द्या वहिनी. और भी मछली है पानी मे.

रघू भावोजी काय हे.( पदराआडुन खुदखुदणारी बाहुली)

पुरुषी वर्चस्व झुगारून द्यायला....
आपण स्त्रियाही काही पुरुषांपेक्षा कमी नाही आहोत हे दाखवून द्यायला....
आपण एक मॉडर्न ईंडिपेंडंट स्त्री आहोत हे जगाला सांगायला....
दारू पिणे वा कुठलेही व्यसन करणे ईतके गरजेचे आहे का?

बाकी कॉकटेल बार हा हवाच, घराला कसं घरपण आल्यासारखं वाटतं

काहीजण घरी फ्रिजवर माठ ठेवतात काही बार सजवतात
आपली आपली चॉईस Happy

<हिने त्या नवर्‍याला घटस्फोट देउन >
कदाचित त्यालाही तेच हवे असेल. माझ्यात आणि पोरांत इंटरेस्ट राहिला नाही का, आपण वेगळे व्हायचे का यावर बोलणे सुरू करावे. आणि interpersonal relationship चे counseling घ्यावे. रोजच पीत असेल, ते थांबवणे त्याला जमत नसेल तर त्याचे ही counseling व उपचार घ्यावे.
त्यातुनही काही सुधारणा होत नसेल तर घटस्फोटाचा गांभीर्याने विचार करावा.

कथा आहे हो कोतबो नाही.
@ लेखक. शीर्षक एक आणि कथा दुसरीच ही घोर फसवणूक आहे. याविरुद्ध ग्राहक पेठेत तक्रार करीत आहे.
माबोकरांना काय गोडशौकीन समजलात काय?

तिची आता सुगृहिणी आणि माता झाली आहे. नवर्‍याला तिच्यात प्रेयसी दिसत नाही. अरुंधती आणि राधिका यांचंही असंच झालं होतं. तिने नवर्‍याला तू सुद्धा बाबा आहेस. सुगृहस्थही हो , मग आपल्याला प्रियकर प्रेयसी व्हायला वेळ मिळेल. दोघे एकत्र बसून छान एकेका पेगचा आस्वाद घेऊ, असं सांगावं. किंवा सरळ काही कामं आउटसोर्स करून स्वतःसाठी प्रियकर शोधावा.

@ वीरू आणिक आशूचॅंप

ट्विंकल ट्विंकल लिटील करेक्शन!
फ्रिजवर माठ नव्हता तर माठाचे झाकण होते. ते देखील नो पार्किंग झोनमध्ये.

अधिक माहितीसाठी हा धागा वाचा Happy
आमची GST फ्रिज खरेदी - पार्टी टाईम :-
https://www.maayboli.com/node/62997

एरवी तो घरूनच काम करायचा.अजून हि mostly work from home च चालू होतं >>>>> म्हणजे हा नवरा कुरकुरणाऱ्या आणि दुर्मुखलेल्या बायकोच्या तावडीत दिवसच्या दिवस असतोच. मग एक दिवस ऑफिसला गेला तर लगेच सहज गप्पा मारायला फोन कशाला करायला हवा? सोड की बाई त्याला मित्रांबरोबर एक दिवस मोकळा.

माझा एक ठाम मत आहे की ' जसं काही देशात सैन्यात ठराविक वर्ष काम करणं अनिवार्य असतं, त्याप्रमाणे भारतीय बायकांना कॉर्पोरेट मधे compulsory 2-3 वर्ष काम करायला लावायला हवं ' म्हणजे नवऱ्याची टेन्शनस, त्याचं व्यग्र असणं, उशीर होणं किंवा घरी आला तर थकलेला असणं हे ती समजुन घेऊ शकेल. romantic पुस्तकं वाचून आणि सिनेमा पाहुन यांची मनं हळवी होतात, पण त्यासाठी ऑफिसला जाणारा नवरा मात्र थकता कामा नये, त्याने घरी आल्यावर उत्साही असायला हवं, बाहेर फिरायला जायला हवं. (Generalize करत नाही, कथानायिकेच्या अनुषंगाने म्हणते आहे)

मी corporate मधे प्रचंड स्ट्रेस खाली काम करते, त्यामुळे माझ्या नवर्याकडून माझ्या आणि माझ्याकडून त्याच्या अशा अवाजवी अपेक्षा नसतात. विकडेज ना आम्ही एकमेकांकडे कुरकुर न करता भरपूर काम करतो त्यामुळें आमचे विकेंड्स समाधानी आणि रोमँटिक असतात.

डिस्क्लेमरः खालील पोस्ट मध्ये अपमान करायचा उद्देश नाही. परिस्थिती लिहिली आहे.

घरी राह णार्‍या होम मेकर्स च्या अवास्तव अवाजवी अपेक्षा व हळवी मने, काहीच सहन न होणे ह्यावर एक बाफ काढला पाहिजे. ह्यात मी अपमानास्पद म्हणत नाही. पण एक किंवा दोन मूल. दोन मेड सर्वंट घरी सर्व साधने ह्यामुळे, मुले शाळकरी ह्यामुळे खूपच रिकामा वेळ हाताशी असतो व संवेदना फार टोकदार असतात. म्हणजे मी जैन शाकाहारी आहे. तर मला तुमच्या कचर्‍यातला चिकनचा वासही सहन होणार नाही. कारण कधीच वाइट वास घेतलेले नसतात. कायम उदबत्त्या हे ते. माझा व्यायाम मी फोन वर बोलत कर णार. ... कुठे पण इतकेसे पण काँप्रमाइज करायची सवय नसते. अशी एक प्रिवीलेज्ड कॅटेगरी आहे अस्तित्वात. ह्या सगळ्यालाच नाके मुरडतात व आपल्याला डिक्लटरिन्ग वर लेक्चर देतात. शेवै पण सध्या त्याच मोड मध्ये आहेत.

हे डिस्क्रिमिनेशन मी कायम वर्क टिल यु ड्रॉप डेड युअर अंकल इज नॉट गोइन्ग टु पे द बिल्ल्स. मनी डोंट ग्रो ऑन दोज ट्रीज मोड मध्ये असल्याने अनुभवले आहे.

@ वीरू आणिक आशूचॅंप

ट्विंकल ट्विंकल लिटील करेक्शन!
फ्रिजवर माठ नव्हता तर माठाचे झाकण होते. ते देखील नो पार्किंग झोनमध्ये. > कदाचित आशूचँप दुसऱ्या कोणाबद्दल सांगत असावेत, आपण नेहमीप्रमाणे..
नक्की काय ते तेच सांगू शकतील .

ऋन्मेष सर, तुम्ही बहुतेक अनुल्लेख केला आहे. पण भले चिंतणाऱ्यांना त्याचे काय वावडे? ( संथ लयीत वाचा. नंतर अनर्थ होऊन शेपन्नास प्रतिसाद होऊन माझाच आयडी जायचा. प्रेतात बसलेला आदमखान नेहमी राजा विक्रमादित्याच्याच डोक्याची शकलं करतो).

एका ड्युआयडी द्वारे " इथे लोकांना विबासं हवंय आणि तुमचे काय दारूबंदी लावलेय" असा खरमरीत प्रतिसाद द्या.
यावर तुम्ही उसळा ( ध्वनीविना). आपलाच ड्युआयडी असला म्हणून काय काहीही विचारणार का?
मग तुम्ही "दारूबंदीसाठी मी प्राण पणाला लावायला तयार आहे" असा प्रतिसाद द्या.
मग अजून एका आयडीला तुमच्या बाजूने उतरवा. तो साधारण असा रिप्लाय देईल.
ऋ दादा. खरंच तू प्रत्यक्षात आहेस तसाच भोळा आहेस. तुला आंंबट चिंबट शौक असलेल्या कथेचं काहीच वाटत नाही. खरंच दारूबंदीसाठी तुझी कमिटमेंट पाहून पोटात हुंदके येत आहेत."
मग समर्थक आणि विरोधक यांची जुंपली कि ५०० कमेंटसची व्यवस्था झालीच समजा. मग एक शिवराळ आयडी घुसवा. आणि बळी भलताच आयडी द्या. त्यामुळे खापर फोडायची सोय पण होईल. आणि जेन्युईन आयडी पण यात उडी घेतील. पाठोपाठ वात आला महिला मंडळ पण येईल.
या सल्ल्याचा फायदा तुम्हालाच. तुम्ही रिप्लाय म्हणून खालील पैकी एक पर्याय निवडू शकता.
१. अनुल्लेख
२. यातले महत्वपूर्ण नसलेले वाक्य उचलून त्यावर प्रश्न विचारणे
३. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे कि हे सगळं मी करतो?
४. ड्युआयडी चा वापर करून हल्ला करणे.

रघू आचार्य,
छे हो. अनुल्लेख वगैरे नाही करत मी तुमचा. हल्ली तुम्ही जिथे तिथे हे लिहिता. मी वाचतो. नोंद करतो. प्रत्येकवेळी प्रत्येकाला रिप्लाय देणे शक्य होत नाही ईतकेच.
लाईफ आहे. क्षणाक्षणाला प्रायोरीटी बदलत राहतात. सध्या असे काही मजेशीर घडतेय आयुष्यात की बाकी कश्यात मन गुंतत नाहीये ईतकेच.

Pages