Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2023 - 04:19
तर मित्र मैत्रीणींनो ,
नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. मायबोलीकर टी आय ह्यांच्या मुंबई हेरिटेज वॉक धाग्यावर मुंबई प्रेमींची चर्चा झालेली आहे. त्या अनुसार
गटग चा धागा काढत आहे. या वर्शीचे काळा घोडा फेस्टिवल चार ते १२ फेब्रुवारी दरम्यान आहे. तर कोणा कोणाला यायला आव्डेल? लॉक डाउन नंतरचे पहिलेच मोठे गटग प्लॅन होते आहे. मला शनिवार रविवार चालेल. पण त्यादिवशी फार गर्दी असेल हे नक्की आहे. तारीख नक्की झाल्यावर मला एक दिवस काम सोडून येणे पण सहज शक्य आहे. ब बरोबर शॉपिन्ग साठी रिकाम्या पिशव्या व खाउ घरी नेण्यासाठी डबे पण घेउन या.
त्या दिवसात कोविड परिस्थिती कशी असेल त्या अनुसार मास्क व इतर घेउन येणे.
कोण कुठुन येणार कधी जमेल चर्चे साठी धागा. चला भेटु या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Wahh thanks ya initiative
Wahh thanks ya initiative baddal! Mala hi weekend chalel, me out of mumbai ahe so mala tarikh tharli tr booking karta yeil!
पाच तारखेला रविवार आहे.
पाच तारखेला रविवार आहे. नाहीतर दहा अकरा बारा. शुक्रवार शनिवार रविवार.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/add/event
हितगुज गावानुसार - मुंबई - सभासद व्हा - त्यांचं ग्रुपमध्ये खाली ( फोनवरून) किंवा बाजूला ( डेस्कटॉपवरून) कार्यक्रम टॅब निवडा.
मलाही आवडेल. पाच, अकरा किंवा
मलाही सर्वांना आवर्जून भेटायचे आहे. पण पाच, अकरा किंवा बारा फेब्रुवारीला गटग ठेवावे ही विनंती. नवी मुंबईहून यायचे आहे, त्यामुळे शुक्रवारी जमणार नाही.
माझीही बरीच ईच्छा आहे या
माझीही बरीच ईच्छा आहे या काळात घोडाला जायची. माबो गटग सोबत नाही जमणार. कारण मुलांनाही सोबत न्यायचे आहे. पण ईथली माहिती उपयुक्त ठरेल. लवकर जाऊन या. म्हणजे वृत्तांतही कामात येईल तुमचा
एन्जॉय करा. बरं झालं अमा
एन्जॉय करा. बरं झालं अमा तुम्ही पुढाकार घेतला ते. होउन जाउ द्या धमाल. मात्र फोटो टाकाच्च.
भरत व मंदार डी ह्यांना पण
भरत व मंदार डी ह्यांना पण यायचे आहे.
अकरा तारीख जमते आहे का सर्वांना. अजून एक महिना आहे.
११ फेब चालेल
११ फेब चालेल
5, 11 वा 12 फेब्रुवारीपैकी
5, 11 वा 12 फेब्रुवारीपैकी कोणतीही तारीख चालेल.
१४ फेब्रुवारी छान दिवस आहे.
१४ फेब्रुवारी छान दिवस आहे.
११ चा मुहुर्त निघतोय.
११ चा मुहुर्त निघतोय. दोन्ही बाजुंना पसंत पडत आहे. रघू आम्हाला भेटून मग १४ वेगळा साजरा करा.
मायबोलीकरांनी एकमेकांवर प्रेम
मायबोलीकरांनी एकमेकांवर प्रेम केले पाहीजे या ध्येयापोटीच तारीख धरली होती.
संत रघ्वांटीन
अरे वा! मस्तच अमा! धाग्यासाठी
अरे वा! मस्तच अमा! धाग्यासाठी धन्यवाद!
मलाही कुठलाही शनि / रवि चालेल आणि माबो करांना भेटायलाही आवडेल!
११ तारखेचे जमते य का बघा निकू
११ तारखेचे जमते य का बघा निकू. मेजोरिटी ला जमते आहे.
निकू
भरत
मंदारडी
अश्विनीमामी
टी आय
राहुल बावन कुळे.
पुढे चला पुढे चला बशीत बसुन घ्या.
11 ला जमले तर मी ही सामील
11 ला जमले तर मी ही सामील होईन म्हणतो
हो अमा. सध्यातरी जमतेय!
हो अमा. सध्यातरी जमतेय!
११ तारीख ठरत असेल तर मला वाटते भरत यांनी दिलेल्या लिंकचा वापर करावा. म्हणजे तिथे लोक्स नक्की करु शकतात.
Hi that thread is also there.
Hi that thread is also there.
मी ही प्रयत्न करेन ११ तारखेला
मी ही प्रयत्न करेन ११ तारखेला यायचा...
मायबोलीकरांनी एकमेकांवर प्रेम
मायबोलीकरांनी एकमेकांवर प्रेम केले पाहीजे या ध्येयापोटीच तारीख धरली होती. >>>>
गटगसाठी सगळ्यांना शुभेच्छा, मजा करा. न आलेल्यांच्या चहाड्या करा , खा-प्या गप्पा मारा. आम्हाला वृत्तांत द्यायला विसरू नका. आठवण ठेवा.
गटग करता शुभेच्छा!
गटग करता शुभेच्छा!
११-१२ फेब्रुवारीला आमच्या शाळकरी मित्रांचे पेंच येथे गटग आहे. तेव्हा या गटगला येणे शक्य नाही.
गटग करता शुभेच्छा!
गटग करता शुभेच्छा!
माझा विचार पहिल्या दिवशी (४फे
माझा विचार पहिल्या दिवशी (४फे,बारा वाजता) जाण्याचा आहे. किंवा भायखळा झाडे फुले प्रदर्शन त्या दरम्यान असल्यास त्या दिवशी.
भायखळा झाडे फुले प्रदर्शन
भायखळा झाडे फुले प्रदर्शन त्या दरम्यान असल्यास त्या दिवशी.>>> he 16th to 26 th jan ahe bahuda
भायखळा झाडे फुले प्रदर्शन
भायखळा झाडे फुले प्रदर्शन त्या दरम्यान असल्यास त्या दिवशी.>>> he 16th to 26 th jan ahe bahuda
>>>
मी गेलोय ईथे दोनेक वेळा. मित्रांसोबत. त्यांना जास्त आवड होती. तरी मलाही आवडलेच. पण सध्या मुंबईचे घर मार्चनंतरच ताब्यात येईल. त्यामुळे हे दोन्ही जरा अवघड वाटत आहे.
मी येईन! अमांना भेटून बरीच
मी येईन! अमांना भेटून बरीच वर्ष झालीत
सर्वांना भेटायला आवडले असते.
सर्वांना भेटायला आवडले असते.
अमा, भरत, ऋन्मेष, शरदजी , ......... यांचे व्यक्तीमत्व वाचून काही अंदाज आहे स्वभावाचा.
मिसिंग द गटग.
Heart heart to all. Maayboli
Heart heart to all. Maayboli doesn't have heart emoji.
काळा घोडा फेस्टीव्हलला मी
काळा घोडा फेस्टीव्हलला मी एकदाही गेलेलो नाही. या वर्षी चार किंवा पाच तारखेला मुलांना वेळ असेल तर जायचा विचार आहे.
मी पण येईन, मला ११ ला जमलं तर
मी पण येईन, मला ११ ला जमलं तर
(No subject)
Pages