कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Zero COVID policy मुळेच चीन धोक्यात आला.
Delta हा जीव घेना होता.omicron नीच मृत्यू कमी केले.
जवळ जवळ सर्व लोकांना omicron नी बाधित केले. 100%, लोकांना बाधित केले असे मत व्यक्त केले तरी ते चुकीचे असणार नाही.(भारतात ,
चीन मध्ये झीरो COVID policy होती.
एक जरी बाधित सापडला तरी पूर्ण शहर घरात)

हे माझे मत नाही.
अनेक अतिशय हुशार जाणकार लोकांचे मत आहे.
उडवून लावण्या इतके फालतू मत नक्कीच नाही.

बरोबर तीन वर्षांपूर्वी (31/ 12/ 2019) covid-19 या आजाराचे जागतिक पातळीवर नामकरण झाले. आज अखेरीस चीन वगळता अन्य बर्‍याच देशांमधील परिस्थिती नियंत्रणात आहे.

पुन्हा एकदा थोडीफार प्रवास बंधने, चाचण्या इत्यादी गोष्टी लागू झाल्यात.
2023 च्या उत्तरार्धापर्यंत तरी ही महासाथ पूर्णपणे संपावी अशी सदिच्छा व्यक्त करतो.

चीन मधील covid स्थिती विषयी मीडिया रिपोर्ट खरे असतील तर ..

असे का घडले ह्याचा शोध संबंधित जागतिक यंत्रणेने घेतला पाहिजे .
.झीरो COVID policy तर जबाबदार नाही ना?
विषाणू ची लागण होणे आणि
प्रतिबंधक लस घेणे.
ह्याचे परिणाम एक सारखे असतात का?
कारण अनेक जाणकार tv वर हेच सांगतात .भारतात covid ची लागण खूप लोकांना होवून गेली आहे आणि लसी करणं पण झाले आहे.
दुहेरी संरक्षण भारतीय लोकात आहे.
त्या मुळे भारताने घाबरून जाण्याचे कारण नाही.

बूस्टर डोस घ्यावा असे बरेच लोक आता सांगत आहेत.
मी संभ्रमात आहे.
आमचा कोव्हीशिल्डचा दुसरा डोस मे २०२१ साली झाला.

एक मत मी आधी वाचलेले असे : सगळ्याच लसी या घाईघाईने बनवलेल्या आहेत त्या इतर अनेक वर्षे संशोधन व चाचण्या करून तयार केलेल्या लसीं इतक्या पूर्ण परिणामकारक नाही. अशी लस जर वारंवार घेतली तर विषाणु त्या लसी मात करायला लौकर शिकेल, जसे जीवाणू प्रतीजैविक प्रतिरोधक होतात.

तेव्हा बूस्टर डोस घेण्याबद्दल आपले सध्याचे मत काय आहे हे सांगाल का?

माझ्या मते आता बूस्टर डोस घेत बसण्याऐवजी निसर्गावर सोडून द्यावे हे उत्तम.
तसेही या विषाणू सोबतच राहायला शिकायचे आहे.

अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे

तसेही या विषाणू सोबतच राहायला शिकायचे आहे.>>>>> असेच मत डॉ.पी.एस.रामाणी यांनी २०२१साली एबीपी माझा या चॅनेलवर मांडले होते.

>>माझ्या मते आता बूस्टर डोस घेत बसण्याऐवजी निसर्गावर सोडून द्यावे हे उत्तम.<<
हा अ‍ॅप्रोच रिस्कि ठरु शकतो. बुस्टर डोसचा उद्देश त्यावेळेस अ‍ॅक्टिव असणार्‍या विषाणु (वेरियंट) वर कवच देणे हा आहे. कोविडचा विषाणु, फ्लु प्रमाणेच दरवर्षी नविन रुपात येण्याची शक्यता असल्याने फ्लु शॉटसारखाच, बुस्टर डोस घेणे हितकारक आहे. बाकि ज्याची-त्याची मर्जी...

<<त्यावेळेस अ‍ॅक्टिव असणार्‍या विषाणु (वेरियंट) वर कवच देणे हा आहे. >>

"त्यावेळेस अ‍ॅक्टिव असणार्‍या विषाणु (वेरियंट) "
नुसार बूस्टर डोस मध्ये मूळ लसीपेक्षा बदल केले आहेत का?
की पूर्वीच्याच लसीचा डोस नव्या व्हेरियंटवर सुद्धा काम करेल अशा आशेने बूस्टर घ्यायचा?

फ्लूशॉटमध्येतरी बदल करतात, करोनाचे माहीत नाही. पण माझ्या अंदाजाने त्यात पण करत असतील. वैज्ञानिक आणि डॉक्टर माझ्यापेक्षा हुशार आहेत, असा माझातरी समज आहे.

जीवघेणे इन्फेक्शन नसेल तर उगाचच इन्फेक्शन कृत्रिम पणे रोखण्यात काही अर्थ नाही.
निसर्गाला त्याचे काम करू द्यावे.
.बूस्टर मुळे व्हायरस आक्रमक होण्याची शक्यता अजून तरी सार्वमत नी कोणी नाकारली नाही.

>"त्यावेळेस अ‍ॅक्टिव असणार्‍या विषाणु (वेरियंट) "
नुसार बूस्टर डोस मध्ये मूळ लसीपेक्षा बदल केले आहेत का?
की पूर्वीच्याच लसीचा डोस नव्या व्हेरियंटवर सुद्धा काम करेल अशा आशेने बूस्टर घ्यायचा?<<
काय बोलणार याच्यावर; आयॅम स्पिचलेस विथ अ‍ॅस्टाँडमेंट...

या आजारामुळे ज्या रुग्णांची वास संवेदना दीर्घकाळासाठी गेलेली आहे त्यांच्यासाठी काही प्रयोग केले जात आहेत. त्यासाठी काही प्रकारच्या सुगंधी तेलांचा वापर केला जातो. रुग्णास ज्या प्रकारचा वास नेहमी आवडतो तसा वास असलेले तेल हुंगण्यास वारंवार दिले जाते. या प्रकारच्या उपचारातून नाकातील चेतातंतूंचे हळूहळू 'प्रशिक्षण' होऊ लागते आणि कालांतराने या संवेदनेत सुधारणा होऊ शकेल.

निलगिरी किंवा लवंगेचे तेल ही पारंपरिक तेले यासाठी चांगली आहेत.

सहव्याधी असणाऱ्या ज्या लोकांना कोविड झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला अशा रुग्णांचे विश्लेषण आता समोर आले आहे. विशिष्ट प्रकारच्या सहव्याधी असताना कोविड झाला असता त्याचे गंभीर स्वरूप व मृत्यूची शक्यता काही टक्क्यांनी अधिक वाढते.

त्यातील महत्त्वाच्या व्याधी आणि वाढीव % अशी :

दृष्टीपटलाच्या अतिसंवेदनक्षम भागाची (macula) झीज : 25%
मधुमेह( प्रकार दोन) : 21%
लठ्ठपणा : 13%

November ending ला चीन विषयी अंतरांजित ( खरे रक्त्र रक्तरंजित ) बातम्या भारतीय गुलाम मीडिया नी द्यायला सुरुवात केली .
आणि वातावरण निर्मिती केली आता दहा बारा दिवसात भारत पूर्ण covid ग्रस्त च होणार अशा रीती नी न्यूज वाले ओरडुन सांगत होते.(पँट च नाडा घट्ट बांधत नसतील नाही तर तुटायची)
मीडिया नी वातावरण निर्मिती केली की इथली जनता सैर भैर झाली .(ती नेहमीच होते)
स्वतः सत्य शोधून घेण्याची वृत्ती चा अभाव हे खरे कारण.
मग नेते 'सरकारी अधिकारी, काही पत्रकार स्वतःची अक्कल पाजलू लागले.
आज ६ जानेवारी भारतात उत्तम स्थिती आहे.
सर्व फाजील दावे खोटे ठरले आहेत.
एक dr गोडसे आहेत न्यूज २४ वर असतात.
त्यांनी तेव्हाच स्पष्ट सांगितले होते covid ची लाट भारतात येवू च शकत नाही.
काही बूस्टर वैगेरे ची गरज नाही आणि भीती वाटून घेण्याची पण काही गरज नाही.

असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले होते.
ते खरे ठरले.
आता चीन मध्ये काय स्थिती आहे हे पण गुलाम भारतीय मीडिया दाखवत नाही.
राजकीय नेते,स्वयं घोषित पत्रकार ,स्वयं घोषित तज्ञ पण गायब आहेत

अवांतर होईल पण ते सगळं भारत जोडो यात्रेसाठी होतं. आधी आरोग्य मंत्र्यांनी भारत जोडो यात्रेबद्दल पत्र लिहिलं. आणि मग मीडियाने पडत्या फळाची आज्ञा समजून हा विषय घेतला. यात्रेत सामील होणार्‍या लोकांना नंतर विलगीकरणात ठेवा इ. नियम सांगितले होते. गंमत म्हणजे विमानतळांवर परदेशातून येणार्‍या प्रवाशांची चाचणीही करायचे निर्देश दिले नव्हते.
मुंबई मनपा आता रोजचे कोव्हिड रुग्णांचे आकडे पुन्हा प्रसिद्ध करू लागली आहे आणि लसीकरण केंद्रांची माहितीही रोज देऊ लागली आहे. त्यानिमित्ताने कोणी बूस्टर डोस घेतला तर घेतला. संघसरकारचे आरोग्य मंत्रालय रोजचे लसीकरणाचे आकडे देत असे. अजून देतात का पाहायला हवे.

काही ताज्या घडामोडी

१. सध्या जगभरात असलेल्या या आजारात Omicron (XBB.1.5) हा प्रकार सर्वाधिक आढळतो. त्याची संसर्गक्षमता आतापर्यंतच्या सर्व प्रकारांपेक्षा अधिक आहे.
२. मात्र त्याने बाधित रुग्णांमध्ये चव आणि वास याच्यावर सहसा परिणाम होत नाही.

३. या प्रकारामुळे अमेरिकेत एकदम रुग्णवाढ झालेली दिसते
४. लांब पडल्याच्या विमान प्रवासांमध्ये प्रवाशांनी मुखपट्टी वापरावीच असा जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला

५. 27 जानेवारीला संघटनेची महत्त्वाची बैठक. त्यात कोविड-19 ‘आणीबाणी’च्या समाप्तीची घोषणा करायची की नाही, यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल.

अवांतर.

विमान प्रवासात लोक दारु पिऊन सह प्रवाशाच्या अंगावर मुतात काय,.
आणि काय काय करतात .
त्या वर कंट्रोल नाही.
मास्क च नियम काय ते अमलात आणणार.
जेवण,दारू, नाश्ता सर्व विमानात देतात.
ते मास्क लावून कसे खाणार आणि पिणार.

Who पण गंमत च करत असते.

व्हॉट्स अप फॉरवर्ड आठवले.
पेट्रोल पंपावर लिहलेले असते मोबाईल वापरू नये.
आणि त्याच्या बाजूला च मोठ्या अक्षरात लिहलेल. असते .
Paytm वापरा.

वर उल्लेख केलेल्या .27 जानेवारीच्या डब्ल्यूएचओच्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत इथे आहे

https://www.who.int/news/item/30-01-2023-statement-on-the-fourteenth-mee...(2005)-emergency-committee-regarding-the-coronavirus-disease-(covid-19)-pandemic

Covid-19 ची महासाथ संध्या संक्रमण अवस्थेत आहे. अजूनही आरोग्य आणीबाणीची परिस्थिती चालू ठेवावी असे त्यात म्हटले आहे.

Pages