****** स्पॉयलर अलर्ट ************
एक मासा स्वतःच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या परिवाराला मारलेलं पाहतो. म्हणून तो बदला घेण्याचा निर्धार करतो. आणि तशातच त्याला समजतं की त्याच्या परिवारातल्या अजून एका सदस्याचा जीव धोक्यात आहे आणि हे नीच काम करणारी माणसं तीच आहेत ज्यांनी त्याच्या मासे परिवाराला मारलं होतं, तो हल्लाबोल करतो आणि चुनचुनके बदला घेतो.
ही स्टोरी 'तेरी मेहेरबानीयाँ' ची वाटतेय? पण ही स्टोरी आहे आपल्या लाडक्या कॅमरूनभाऊंच्या नव्या 'अवतार - द वे ऑफ वॉटर' मधली एक.
अवतार २ ची स्टोरी काय आहे हे मलाही पूर्णपणे समजलंय असं मला वाटत नाही. मधूनमधून 'अरे भाई कहना क्या चाहते हो' मोमेंट्स येत राहतात. जेम्स कॅमरूनने १९८०ज मधले बॉलिवूड चित्रपट पाहून, सगळ्याची सरमिसळ करत हा पिक्चर बनवला आहे असं वाटत राहतं.
सुरूवातीला पँडोरावरचे काही निळे पारिवारीक क्षण येतात. यात नावी हिरो जेक सली, त्याची बायको आणि त्याची ५ मुलं दिसतात. यात एक दत्तक घेतलेली मुलगी आहे तसंच एक स्पायडर नावाचा माणसाचा मुलगा आहे. त्यांच्यातल्या काही छोट्या-मोठ्या घटना, त्यांचं आयुष्य, मुलांचं मोठं होत जाणं असं काहीबाही आपण पाहतो. तशातच जेकला समजतं की 'स्काय पीपल' म्हणजेच माणसं त्यांच्यावर हल्ला करणार आहेत. मग त्याची पूर्ण फॅमिली लढ्यासाठी सज्ज होते आणि माणसांच्या विमानांना जायबंदी करत त्यांच्यावर हल्ले करते. यादरम्यान वडिलांनी परत जायला सांगितलेलं असूनही जेकच्या दोन मुलांपैकी धाकटा मोठ्याला तिथेच थांबून हत्यारं लुटायची गळ घालतो आणि या भानगडीत जखमी होतो. इथे चाणाक्ष प्रेक्षकाला समजतं की असाच एखादा प्रसंग पुढेही येणार आहे.
पुढे मग आधीच्या पिक्चरमधल्या कर्नल माइल्सची मेमरी घेऊन एक अवतार कॅप्टन माइल्स आणि त्याची टीम जेकचे हल्ले रोखायला आणि जेकचा बदला घेण्यासाठी त्याला मारायला पँडोरावर येतो. आणि आपल्याला ऐंशीच्या दशकातले वेगवेगळे पिक्चर आठवायला सुरूवात होते. पँडोरावर आल्याआल्याच ते 'जेक के बच्चोंको अपने कब्जेमें कर लो, वो खुदबखुद उन्हें बचाने आ जायेगा' वाला सीन करून दाखवतात. आपल्याला माइल्सच्या जागी अमरीश पुरी वगैरे दिसायला लागतो. मग शिस्तीत मारामारी करून , मुलांना सोडवून सली पती-पत्नी घरी जातात. या भानगडीत स्पायडर माइल्सच्या हाती लागतो. पण आता त्यांना भीती वाटते की त्यांच्यामुळे त्यांच्या सगळ्या कबिल्याची जान खतरेमे आ जायेगी. म्हणून ते त्यांचा कबिला सोडून खूप दूर जायचा निर्णय घेतात. आपल्याला वाटतं की आता ते अज्ञातवासात जातील. पण नाही! खूप खूप दूर जाऊन ते एका समुद्री नावींच्या कबिल्याकडे आश्रय घेतात. म्हणजे या समुद्री कबिल्याला काही झालं तरी चालेल, पण आपला कबिला सुरक्षित हवा असं झालं. निदान जेकला तरी तसंच वाटत असावं.
आता स्पायडर माइल्सच्या तावडीत असतो. तशातच माइल्सला कळतं की तो खर्या माइल्सचा मुलगा आहे. तर त्याच्याकडून जेकचा ठावठिकाणा माहिती करून घेण्यासाठी त्याचा आधी छळ करणे आणि मग त्याच्याशी जरा गोडीत वागून त्याच्याकडून नावींच्या गोष्टी अवगत करून घेणे असे अवतार माइल्सचे बॉलिवूडी उद्योग चालू असतात. तो स्पायडरला घेऊन परत पँडोरावर जातो. इकडे काही वेळ जेक आणि त्याच्या परिवाराचं समुद्री गोष्टींशी जुळवून घेणे, मधेच जेकच्या मुलांचं नव्या कबिल्याच्या सरदाराच्या मुलांनी बुलिंग करणे, जेकच्या मधल्या मुलाची यादरम्यान एका डेंजर आणि वाळीत टाकलेल्या टुकुन जातीच्या माशाशी मैत्री होणे वगैरे प्रकार होतात. सिनेमाचा हा भाग बर्यापैकी रमणीय आणि फँटसीवाला आहे.
इथे आपल्या माशाची इंट्रो होते. जेकचा मधला मुलगा माशाला आपल्या भावासारखा मानत असतो. इतका की तो नंतर एकदा स्वतःच्या सख्ख्या मोठ्या भावाला म्हणतो की तो मासाच माझा खरा भाऊ आहे, तू नाही! तिथे आपल्याला दुसरा क्लू मिळतो की मोठा मुलगा मरणार! त्याच सुमारास एका घटनेमुळे माइल्सला कळतं की जेक कुठेतरी दूर बेटांमधे दडून बसलाय. आणि मग माइल्सचा गब्बर बनतो. वेगवेगळ्या बेटांवर जाणे, जेक कुठे आहे विचारणे आणि उत्तर दिलं नाही की गोळीबार करणे आणि झोपड्यांना आगी लावणे असले उद्योग तो करत राहतो.
माइल्सला जोड मिळते ती टुकुन्सची शिकार करणार्या टोळीची आणि त्यांना हाताशी धरून माइल्स पुन्हा जेकच्या मधल्या मुलाला, छोट्या मुलीला आणि समुद्री कबिल्याच्याच्या सरदाराच्या मुलीला पळवून नेतो. पुन्हा पुन्हा आपण ते ८०ज वाले वगैरे पिक्चर पाहतोय की काय असा आपल्याला भास होत राहतो. व्हिलन आणि त्याच्या माणसांचे अनन्वित छळ, हिरोचं समुद्री कबिल्यासोबत त्यांना सोडवायला जाणं, 'तुझ्यामुळेच आमच्यावर ही वेळ आली' असं स.क. च्या सरदाराच्या बायकोने जेकला सुनावणं वगैरे गमती सुरू होतात. मग पुन्हा 'अपने आपको हमारे हवाले कर दो जेक, और अपने बच्चोंको छुडवालो' टाइपचे संवाद.
पुढची मारामारी काय वर्णावी! कारण जेक अपने आपको हवाले करणार तेवढ्यात मासा स्ट्राइक्स! मग जेक आणि मासा मिळून मारामारी करतात. माशाचं त्याच्या फॅमिलीच्या मारेकर्यांना (लिटरली) खिंडीत गाठून मारणं तर केवळ तेरी मेहेरबानियाँ! त्यातही प्रमुख मारेकऱ्याचा हात तोडताना मासा 'ये वही हाथ है ना जिससे तूने मेरी माँ को मारा था' असा मिथून छापाचा डायलॉग मारेल अशी भीती वाटून गेली. यादरम्यान जेकचा मधला मुलगा स्पायडरला वाचवायला मोठ्या भावाला गळ घालून शिपवर घेऊन जातो. यात जेकच्या मोठ्या मुलाला गोळी लागून तो मरतो आणि आपल्याला आपण परफेक्ट क्लू उचलला होता याचा छुपा आनंद होतो. या घमासान लढाईत कधीतरी ते शिप फुटतं आणि बुडायला लागतं. आता आपल्याला हुबेहुब टायटॅनिकसारखे सीन्स दिसायला लागतात. तरीही बॉलिवूड इन्स्पायर्ड असल्याने मधेमधे 'बेटे के बदले बेटा' टाइप सीन, स्पायडरला 'अरे ये मेरा बाप है' वाटून त्याने माइल्सला वाचवणे अशी वळणं ही कथा घेते. होताहोता शिप बुडायच्या आधी सली परिवार एकत्र येतो आणि एकत्र वाचतो.
शेवटी जेक म्हणतो की आता आम्ही इथलेच झालो. पण का बाबा? मुळात तू स्वतःची जागा, कबिला सोडून गेलासच कशाला? जी मारामारी इथे केलीस ती तुझ्या मुहल्ल्यात बेटर जमली असती ना? हा ३ तासांचा छळ का केलास?
नाही म्हणायला समुद्रातले सीन्स फार सुंदर घेतले आहेत. थरारकही. पण जेम्स कॅमरून कडून ती आपली बेसिक अपेक्षा असते. स्टोरी (असलीच तर) उगाच खेचल्यागत वाटली.
या चित्रपटाचा सीक्वल येईल असं वाटतंय. आलाच तर तो 'टायटॅनिक - द वे ऑफ वॉटर' असा असेल बहुधा. यात टायटॅनिक बुडते तेव्हा जॅकला आपला हिरो मासा वाचवतो आणि कबिल्यात नेऊन सोडतो. जेक आणि जॅक एकमेकांना भाऊ मानतात. आणि माइल्स पुन्हा हल्ला करायला आल्यावर एकत्रच लढत देतात असं काहीतरी दिसेल अशी अपेक्षा आहे. स.क च्या सरदाराची राणी केट विन्स्लेट्ने साकारली आहे. स्टोरीत लिओनार्दोपण आला की ती (म्हणजे स्टोरी) सुफळ संपूर्ण होईल.
अवतार-२ बघितला. जाताना यात
अवतार-२ बघितला. जाताना यात काय दाखवतील विचार केला तर स्काय पीप्स परत एकदा पँंडोरावर येणार, मग जॅकसली आणि स्काय पीप्स धुमशान मारामारी करणार आणि तिसरा भाग करता येईल इतपत दोन्ही साईडची हानी होणार आणि वादळा पूर्वीच्या शांततेत कुठल्या तरी भारी गाण्याने पिक्चर संपणार. असा ढोबळ विचार केलेला तेच आणि तितकंच झालं.
बरं त्या मारामारीत स्काय पीप्सची जास्त हानी होणार कारण माणसं/ आर्मी/ वॉलस्ट्रीट कंपन्या/ भांडवलशाही वाईट असते आणि इंडिजिनस पीप्स निसर्गाच्या जवळ असल्याने भारी असतात ह्या मेन प्लॉट पासून दूर गेलं तर शेण खायला लागेल. ते ही तसंच झालं. आता सव्वा तीन तासांची निश्चिंती करायला त्यात पहिला दीड तास लुटुपुटू काय वाटेल ते होतं. बाकी तो जॅकसली आपल्या सगळ्या प्रजेला अगदीच वार्यावर सोडून जातो. माईल्सचा अवताराला हा सली भाऊ सापडला नाही तर त्या प्रजेला तो बाईज्जत बरीच करणार आहे.
आणि तो स्पायडर माईल्सचा मुलगा कसा झाला? मला तरी पहिल्या भागात किंचितशी ही हिंट आठवत नाही. बळंच कोणाच्या पोटी जन्मला कोण जाणे.
आणि अवतार कार्य करायचं तर पेटीत मानवी देह लागतो ना? मानव मेल्यावर अवतार कार्य ही संपुष्टात येतं ना? मग माईल्स जिवंत आहे का? आणि जॅक सलीला मारायचं तर त्याची पेटी शोधून लाल बटण दाबणं बरं नसतं का पडलं... ही वणवण करण्यापेक्षा?
बाकी अॅनिमेशन, थ्रीडी, स्पेशल इफेक्ट्स इ. अवतार-१ मध्ये होतं तेच आता १३ वर्षांनी जितकं प्रगत होईल तितकंच आहे. त्याची ही आता सवय झालेली आहे. त्यामुळे ऑ वगैरे अजिबातच काही वाटलं नाही.
फोमो यायला नको म्हणून बघुन आलो. आता त्या भांडवलावर चार जोक मारता येतील. बाकी स्टोरी अगदीच यथातथा आहे.
हं. मी तिकटं कँसल केली ते
हं. मी तिकटं कँसल केली ते बरंच झालं म्हणजे.
अवतार कार्य करायचं तर पेटीत
अवतार कार्य करायचं तर पेटीत मानवी देह लागतो ना? मानव मेल्यावर अवतार कार्य ही संपुष्टात येतं ना? मग माईल्स जिवंत आहे का?
>>>माईल्स अवतार नाही, क्लोन आहे. त्याच्या मेमरी घेऊन लॅब मध्ये बनवलेल्या नावी शरीरात बसवल्या आहेत. खरा माइल्स मेलेला आहे.
जॅक सली सुध्दा आता पूर्ण नावी आहे. त्याचे मानवी शरीर पहिल्या भागात शेवटी विसर्जित करून त्याचा कन्सिअसनेस नावी शरीरात बसवलेला दाखवलेला शेवटी.
बाकी सिनेमा कमजोर आहेच. कथा पहिल्या भागाचीच थोडीफार पुनरावृत्ती आहे. चित्रपटाची लांबी आणि कथेतला प्राण ह्यांची तुलना करता ' बाराण्याचा मसाला...' झाले आहे.
राईट! क्लोन आणि मेमरी
राईट! क्लोन आणि मेमरी सुरुवातीला आलेलं.
बाकी ते पँडोरावर मागे राहिलेलं लोकं लॅब मध्ये कशाला इकडुन तिकडे जोराजोरात धावपळ करत फिरत असतात? काही काम असतं का त्यांना?
आणि स्पायडरच्या गुलदस्तातील आईच्या मृत्यू बद्दल वाईट वाटलं. कॉमिक प्रमाणे ती कॉप्टर पायलट असते म्हणे. मै तुम्हारी बच्चे की मॉ बननेवाली हुँ कर्नल सांगुनही नवव्या महिन्या पर्यंत ती कॉप्टर का चालवत असते हा एक बारिक प्रश्न पडला.
माणसं/ आर्मी/ वॉलस्ट्रीट
माणसं/ आर्मी/ वॉलस्ट्रीट कंपन्या/ भांडवलशाही वाईट असते आणि इंडिजिनस पीप्स निसर्गाच्या जवळ असल्याने भारी असतात >>> असल्या थीम वाले पिक्चर्स, पुस्तके व राजकीय अजेंडे मला महा-नाइव्ह वाटतात. पण तो राजकीय बाफचा विषय आहे. पण अशा थीमवरचे पिक्चर बघायचा आता कंटाळा आल आहे
पिक्चर तरीही बघेन बहुधा. व्हिज्युअल्स वगैरे करता.
बाकी थिएटर मधे बघितलात तरच भारीपणा तुमच्यापर्यंत पोहोचेल. एरव्ही काही खास वाटणार नाही - हे कलाकृती म्हणून ठीक आहे, आणि तितका भारी असेल तर बघूही. पण फायनान्शियल कॅल्क्युलेशन म्हणून सध्याच्या काळात हे डम्ब आहे आणि पब्लिक कंपन्यांसारखे स्टुडिओज चालवणार्या हॉलीवूड मधून असा "प्रॉडक्ट" यावा हे ही एक आश्चर्य आहे.
एरव्ही काही खास वाटणार नाही
एरव्ही काही खास वाटणार नाही >> हे नॅरेटिव्ह पुढचा महिना दीड महिन्यासाठीचं आहे. मग डिस्नेवर आला की साईनअपला ७ दिवस का महिना फ्री वालं डील गायब करायचं नॅरेटिव्ह पुढचा महिना असणार आहे.
Fa, I think studios make lot
Fa, I think studios make lot more money from IMAX screenings than streaming. For a family of 4 IMAX tickets will be around $80-$100 that's comparable to nearly 10-12 months of streaming.
पब्लिक कंपन्यांसारखे स्टुडिओज
शेवटी किंवा पहिल्यापासून बिझनेस हाच कणा आहे हॉलीवुड किंवा बॉलीवुड दोन्हीचाही. इथे अमेरिकन पाय किंवा फॉरेस्ट गंप दोन्हीचाही वेगवेगळा किंवा समान प्रेक्षकवर्ग असू शकतो. आपल्याकडेही गगन सदन तेजोमय ते शीला की जवानी यांचेही श्रोते असतात तसं. दोन्ही आवडीने बघणारे माझ्यासारखेही
! आतातर ओटीटीमुळे किती खुलेपणा आला आहे. कलाकृती तर बायप्रॉडक्ट आहे, मनोरंजन हेच प्रॉडक्ट आहे. आजकालचा प्रेक्षक काही लॉयल वगैरे नसतो आणि असायची काही गरजही नाही. 'पैसा फेक तमाशा देख' हेच खरं आहे. नाहीतर सिक्वल काढायची गरजच काय होती. जमले नाही तर किंचीततरी मूळ कलाकृतीचा अनादरच होतो, याची त्यांना कल्पना असतेच .
थिएटरमधेच छान वाटणारा सिनेमा असेल तर कथेपेक्षा इतर गोष्टी ज्यांनी ती कथा फुलवली आहे, त्या ओव्हरपावर करतायत हे त्याचं कारण असतं. दोन्ही समसमान पावरफुल असतील तर घरी बघूनही आवडेलचं . थिएटरचा अनुभव अर्थात चांगला असतो पण त्याशिवाय जर आवडतच नसेल तर सिनेमातच गडबड आहे असं मला वाटतं. कलाकृती + बिझनेस + ओटीटी मिळून तर सिनेमाच्या यशाला किंवा अपयशाला स्काय ईज द लिमिट !!
वेल सेड, अस्मिता!
वेल सेड, अस्मिता!
अस्मिताची पोस्ट समजली नाही.
अस्मिताची पोस्ट समजली नाही. म्हणजे पटली पण कोट केलेल्या पोस्ट संदर्भात समजली नाही.
बिझनेस हाच कणा असला पाहिजे हे अगदीच खरं आहे. नुसतं कला (विथ के) झूट आहे बद्दल वादच नाही.
फा म्हणतोय की 'अवतार फक्त थिएटर मध्येच चांगला दिसणार' असं त्यांनी जर नॅरेटिव्ह केलं (जे केलंय असं मी म्हणत नाहीये) तर ते निम्म्या पैशांवर पाणी सोडण्यासारखं आहे आणि स्टुडिओ जो प्रॉफिट मेकिंग बिझनेस आहे तो तसं का करेल?
थिएटर मध्ये फॅमिलीने ८०$ खर्च केले तरी स्टुडिओला त्यातले निम्मे ही मिळत नाहीत. परत त्यात लॉयल्टी असलीच तर मूव्हीशी असण्याची पुसटशी शक्यता असते. वि. SVOD मध्ये ८०% मिळतात. परत तो रिकरिंग बिझनेस असतो. एकदा मासा गळाला लागला की आपले इतर मूव्ही घशात उतरवता येतात. आणि लाँगरन मध्ये लॉयल्टी कशी वाढेल यावर भर देता येतो. एसव्हॉड चा एव्हॉड करायचा विचार असेल तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी ही बनू शकते.
मी जनरली लिहिले आहे आणि
मी जनरली लिहिले आहे आणि 'अवतार'बद्दलच किंवा फारएन्डलाच म्हणून असं नाही लिहिलेयं. मलाही तुझ्या वरच्या पोस्टीतल्यासारखेच म्हणायचे होते, बहुतेक
. मिसलिडिंग वाक्य तेवढं काढलं.
रमड
मलाही तीच शंका आली, की मोठ्या
मलाही तीच शंका आली, की मोठ्या स्क्रीनवर मिळणारे उत्पन्न हे इतके असू शकेल का, की ज्यामुळे इतर चॅनेल्स मधून फारसे मिळाले नाहीत तरी चालू शकेल? जेम्स कॅमेरून च्या नावामुळे ओटीटीवरही विकला जाईल पण कितपत बघितला जाईल ही शंका आहे.
माझ्या कल्पनेप्रमाणे स्क्रीन
माझ्या कल्पनेप्रमाणे स्क्रीन वर येणारे उत्पन्न हे फल्त सिनेमाचे नसून त्याबरोबर घेतल्या जाणार्या इतर प्रकार्तांमधून पण बघितले जाते. ओटीटी वर हे होत नाही - एक ठोक रक्कम देऊन कॉपीराईट्स काही कालावधीसाठी दिले जातात त्यामूळे सिनेमा/दिग्दर्शक्/अॅक्टर ह्यांच्यामधे काही वजन असल्यापेक्षा ही किम्मत फार असणे जरुरी नाही.
Deadline: ‘Avatar 3’ And
Deadline: ‘Avatar 3’ And ‘Avatar 4’ Scenes Already Shot, Director James Cameron Reveals.
https://deadline.com/2022/12/avatar-3-avatar-4-scenes-already-shot-direc...
नव्या प्रजाती आणि नव्या भागांसाठी तयार रहा.
या पिक्चरमध्ये समजली नवी आणि
या पिक्चरमध्ये समजली नवी आणि भारी टेक्नॉलॉजी म्हणजे माशाला लाईफ जॅकेट घातलं तर मासा तरंगतो.
बाकी ह्या शार्क्फिनला लायटनिंग पोर्ट का बरं नाही? बाकी टुच्च्या माशांना आणि पाण्यातल्या वाळवीला पण लायटनिंग पोर्ट कनेक्ट होतं शार्क्फिन मात्र तीन डोळ्यातुन (एकावेळी १.५ ) बोलतो. येन्यानैअन्यायहै!
आहे ना. ते पोर्ट माशाच्या आत
आहे ना. ते पोर्ट माशाच्या आत आहे. घसा किंवा त्या टाइप्स भागापाशी. जेकचं व्रात्य कार्ट पायकनच्या आत जातं तेव्हाचा शीन आठवा. हे लोक "दिसलं पोर्ट की लावा शेंडी" असले धोरण ठेवत असतील तर intelligent प्राण्याचं पोर्ट शरीराच्या आतच असेल.
या पोर्टवाल्यांना व्हायरसची
या पोर्टवाल्यांना व्हायरसची भीती वाटत नाही की काय?
ते पोर्टच होतं का? मला वाटलं
ते पोर्टच होतं का? मला वाटलं विश्वरूप दर्शन, हेलिकल डीएनए रिअल टाईम रिडींग आणि दिव्यदृष्टी अशी काही भेळ होती. याच्यापेक्षा मेमरी वाएल मध्ये घेऊन पेन्सिव्ह मध्ये टाकणे बरं हो आमचं.
दिसलं पोर्ट की लावा शेंडी"
दिसलं पोर्ट की लावा शेंडी"
आणि
माशाला लाईफ जॅकेट घातलं तर मासा तरंगतो.
>>>>>
कितीही टेक्नॉलॉजी का येईना काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. सारांश: लेकुरे उदंड जाहली बापुडी रीफेस लागली!ही शेंडी प्रेक्षकांना लावलेली आहे.
intelligent प्राण्याचं पोर्ट
intelligent प्राण्याचं पोर्ट शरीराच्या आतच असेल. >> सिक्युरिटी बाय ऑब्स्क्युरीटी! बिग नो!
पोर्ट ऑथेंटिकेशन आणि हँडशेक फक्त डीएनए वरुन होतो समजल्यावर डीएनए किती मागास आणि अशक्त (फारच इंग्रजी शब्द झाल्याने मरठीचा अनुशेष भरायला वीक ला अशक्त म्हणू) तंत्रज्ञान आहे यावर शिक्का मोर्तब झाले. सर्टीफिकेट बेस्ड पब्लिक की इन्फ्रास्ट्र्क्चरला मरण नाही आणि किती नव्या प्रजाती आल्या तरी बेसिक ऑथेंटिकेशन/ एन्क्रिप्शन टेक मध्ये जॉब गॅरेंटी असेल बघुन जरा बरं वाटलं.
झॉम्बी जॉनरा मधला Dawn of the
चिकवा ऐवजी चुकून इथे लिहीले होते, उडवले
Pages