****** स्पॉयलर अलर्ट ************
एक मासा स्वतःच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या परिवाराला मारलेलं पाहतो. म्हणून तो बदला घेण्याचा निर्धार करतो. आणि तशातच त्याला समजतं की त्याच्या परिवारातल्या अजून एका सदस्याचा जीव धोक्यात आहे आणि हे नीच काम करणारी माणसं तीच आहेत ज्यांनी त्याच्या मासे परिवाराला मारलं होतं, तो हल्लाबोल करतो आणि चुनचुनके बदला घेतो.
ही स्टोरी 'तेरी मेहेरबानीयाँ' ची वाटतेय? पण ही स्टोरी आहे आपल्या लाडक्या कॅमरूनभाऊंच्या नव्या 'अवतार - द वे ऑफ वॉटर' मधली एक.
अवतार २ ची स्टोरी काय आहे हे मलाही पूर्णपणे समजलंय असं मला वाटत नाही. मधूनमधून 'अरे भाई कहना क्या चाहते हो' मोमेंट्स येत राहतात. जेम्स कॅमरूनने १९८०ज मधले बॉलिवूड चित्रपट पाहून, सगळ्याची सरमिसळ करत हा पिक्चर बनवला आहे असं वाटत राहतं.
सुरूवातीला पँडोरावरचे काही निळे पारिवारीक क्षण येतात. यात नावी हिरो जेक सली, त्याची बायको आणि त्याची ५ मुलं दिसतात. यात एक दत्तक घेतलेली मुलगी आहे तसंच एक स्पायडर नावाचा माणसाचा मुलगा आहे. त्यांच्यातल्या काही छोट्या-मोठ्या घटना, त्यांचं आयुष्य, मुलांचं मोठं होत जाणं असं काहीबाही आपण पाहतो. तशातच जेकला समजतं की 'स्काय पीपल' म्हणजेच माणसं त्यांच्यावर हल्ला करणार आहेत. मग त्याची पूर्ण फॅमिली लढ्यासाठी सज्ज होते आणि माणसांच्या विमानांना जायबंदी करत त्यांच्यावर हल्ले करते. यादरम्यान वडिलांनी परत जायला सांगितलेलं असूनही जेकच्या दोन मुलांपैकी धाकटा मोठ्याला तिथेच थांबून हत्यारं लुटायची गळ घालतो आणि या भानगडीत जखमी होतो. इथे चाणाक्ष प्रेक्षकाला समजतं की असाच एखादा प्रसंग पुढेही येणार आहे.
पुढे मग आधीच्या पिक्चरमधल्या कर्नल माइल्सची मेमरी घेऊन एक अवतार कॅप्टन माइल्स आणि त्याची टीम जेकचे हल्ले रोखायला आणि जेकचा बदला घेण्यासाठी त्याला मारायला पँडोरावर येतो. आणि आपल्याला ऐंशीच्या दशकातले वेगवेगळे पिक्चर आठवायला सुरूवात होते. पँडोरावर आल्याआल्याच ते 'जेक के बच्चोंको अपने कब्जेमें कर लो, वो खुदबखुद उन्हें बचाने आ जायेगा' वाला सीन करून दाखवतात. आपल्याला माइल्सच्या जागी अमरीश पुरी वगैरे दिसायला लागतो. मग शिस्तीत मारामारी करून , मुलांना सोडवून सली पती-पत्नी घरी जातात. या भानगडीत स्पायडर माइल्सच्या हाती लागतो. पण आता त्यांना भीती वाटते की त्यांच्यामुळे त्यांच्या सगळ्या कबिल्याची जान खतरेमे आ जायेगी. म्हणून ते त्यांचा कबिला सोडून खूप दूर जायचा निर्णय घेतात. आपल्याला वाटतं की आता ते अज्ञातवासात जातील. पण नाही! खूप खूप दूर जाऊन ते एका समुद्री नावींच्या कबिल्याकडे आश्रय घेतात. म्हणजे या समुद्री कबिल्याला काही झालं तरी चालेल, पण आपला कबिला सुरक्षित हवा असं झालं. निदान जेकला तरी तसंच वाटत असावं.
आता स्पायडर माइल्सच्या तावडीत असतो. तशातच माइल्सला कळतं की तो खर्या माइल्सचा मुलगा आहे. तर त्याच्याकडून जेकचा ठावठिकाणा माहिती करून घेण्यासाठी त्याचा आधी छळ करणे आणि मग त्याच्याशी जरा गोडीत वागून त्याच्याकडून नावींच्या गोष्टी अवगत करून घेणे असे अवतार माइल्सचे बॉलिवूडी उद्योग चालू असतात. तो स्पायडरला घेऊन परत पँडोरावर जातो. इकडे काही वेळ जेक आणि त्याच्या परिवाराचं समुद्री गोष्टींशी जुळवून घेणे, मधेच जेकच्या मुलांचं नव्या कबिल्याच्या सरदाराच्या मुलांनी बुलिंग करणे, जेकच्या मधल्या मुलाची यादरम्यान एका डेंजर आणि वाळीत टाकलेल्या टुकुन जातीच्या माशाशी मैत्री होणे वगैरे प्रकार होतात. सिनेमाचा हा भाग बर्यापैकी रमणीय आणि फँटसीवाला आहे.
इथे आपल्या माशाची इंट्रो होते. जेकचा मधला मुलगा माशाला आपल्या भावासारखा मानत असतो. इतका की तो नंतर एकदा स्वतःच्या सख्ख्या मोठ्या भावाला म्हणतो की तो मासाच माझा खरा भाऊ आहे, तू नाही! तिथे आपल्याला दुसरा क्लू मिळतो की मोठा मुलगा मरणार! त्याच सुमारास एका घटनेमुळे माइल्सला कळतं की जेक कुठेतरी दूर बेटांमधे दडून बसलाय. आणि मग माइल्सचा गब्बर बनतो. वेगवेगळ्या बेटांवर जाणे, जेक कुठे आहे विचारणे आणि उत्तर दिलं नाही की गोळीबार करणे आणि झोपड्यांना आगी लावणे असले उद्योग तो करत राहतो.
माइल्सला जोड मिळते ती टुकुन्सची शिकार करणार्या टोळीची आणि त्यांना हाताशी धरून माइल्स पुन्हा जेकच्या मधल्या मुलाला, छोट्या मुलीला आणि समुद्री कबिल्याच्याच्या सरदाराच्या मुलीला पळवून नेतो. पुन्हा पुन्हा आपण ते ८०ज वाले वगैरे पिक्चर पाहतोय की काय असा आपल्याला भास होत राहतो. व्हिलन आणि त्याच्या माणसांचे अनन्वित छळ, हिरोचं समुद्री कबिल्यासोबत त्यांना सोडवायला जाणं, 'तुझ्यामुळेच आमच्यावर ही वेळ आली' असं स.क. च्या सरदाराच्या बायकोने जेकला सुनावणं वगैरे गमती सुरू होतात. मग पुन्हा 'अपने आपको हमारे हवाले कर दो जेक, और अपने बच्चोंको छुडवालो' टाइपचे संवाद.
पुढची मारामारी काय वर्णावी! कारण जेक अपने आपको हवाले करणार तेवढ्यात मासा स्ट्राइक्स! मग जेक आणि मासा मिळून मारामारी करतात. माशाचं त्याच्या फॅमिलीच्या मारेकर्यांना (लिटरली) खिंडीत गाठून मारणं तर केवळ तेरी मेहेरबानियाँ! त्यातही प्रमुख मारेकऱ्याचा हात तोडताना मासा 'ये वही हाथ है ना जिससे तूने मेरी माँ को मारा था' असा मिथून छापाचा डायलॉग मारेल अशी भीती वाटून गेली. यादरम्यान जेकचा मधला मुलगा स्पायडरला वाचवायला मोठ्या भावाला गळ घालून शिपवर घेऊन जातो. यात जेकच्या मोठ्या मुलाला गोळी लागून तो मरतो आणि आपल्याला आपण परफेक्ट क्लू उचलला होता याचा छुपा आनंद होतो. या घमासान लढाईत कधीतरी ते शिप फुटतं आणि बुडायला लागतं. आता आपल्याला हुबेहुब टायटॅनिकसारखे सीन्स दिसायला लागतात. तरीही बॉलिवूड इन्स्पायर्ड असल्याने मधेमधे 'बेटे के बदले बेटा' टाइप सीन, स्पायडरला 'अरे ये मेरा बाप है' वाटून त्याने माइल्सला वाचवणे अशी वळणं ही कथा घेते. होताहोता शिप बुडायच्या आधी सली परिवार एकत्र येतो आणि एकत्र वाचतो.
शेवटी जेक म्हणतो की आता आम्ही इथलेच झालो. पण का बाबा? मुळात तू स्वतःची जागा, कबिला सोडून गेलासच कशाला? जी मारामारी इथे केलीस ती तुझ्या मुहल्ल्यात बेटर जमली असती ना? हा ३ तासांचा छळ का केलास?
नाही म्हणायला समुद्रातले सीन्स फार सुंदर घेतले आहेत. थरारकही. पण जेम्स कॅमरून कडून ती आपली बेसिक अपेक्षा असते. स्टोरी (असलीच तर) उगाच खेचल्यागत वाटली.
या चित्रपटाचा सीक्वल येईल असं वाटतंय. आलाच तर तो 'टायटॅनिक - द वे ऑफ वॉटर' असा असेल बहुधा. यात टायटॅनिक बुडते तेव्हा जॅकला आपला हिरो मासा वाचवतो आणि कबिल्यात नेऊन सोडतो. जेक आणि जॅक एकमेकांना भाऊ मानतात. आणि माइल्स पुन्हा हल्ला करायला आल्यावर एकत्रच लढत देतात असं काहीतरी दिसेल अशी अपेक्षा आहे. स.क च्या सरदाराची राणी केट विन्स्लेट्ने साकारली आहे. स्टोरीत लिओनार्दोपण आला की ती (म्हणजे स्टोरी) सुफळ संपूर्ण होईल.
नाव मोठे लक्षण खोटे असा मामला
नाव मोठे लक्षण खोटे असा मामला आहे. ह्यास पैसे कोण देते असले पिक्चर काढावयास. पहिला अवतार पण ओव्हर हाइपड होता.
अगं, मला वाटलं मलाच नीट कळला
अगं, मला वाटलं मलाच नीट कळला नाही. धमाल लिहिले आहेस. स्पायडरने नंबर तीनची सोय केली आहे, गब्बरला वाचवून. मला मुलांचा फार राग आला, एकेका मुलाला दोनदोनदा वाचवावे लागले. लेकरं खंडीभर असल्याने, साडेतीन तास लागले. व्हेलचा पिवळा रस काढल्यानंतर, त्याचं काय झालं कळालं नाही. मी लांबीमुळे चिकवावर याला 'पाण्यातला लगान' म्हटलयं. शेवटचं विकेंडचं गाणं छान आहे.
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
तरी मला लेखातले काही संदर्भ कळले नाहीत कारण मी अवतार १ पाहिला नाही.
तसे नेटाने बघायचा प्रयत्न केला होता दोनेक वेळा.. पण लोकांना काय आवडले या चित्रपटात ईतके असाच प्रश्न पडून नाद सोडला दोन्ही वेळेला. त्यामुळे अमांच्या ओवरहाईप पोस्टला +७८६
मी बुधवारची तिकिटे बूक केली
मी बुधवारची तिकिटे बूक केली कालच.
कॅन्सल करतो लगेच.
खंडीभर असल्याने, साडेतीन तास
खंडीभर असल्याने, साडेतीन तास लागले >>>
म्हणूनच म्हणतात 'छोटं कुटुंब सुखी कुटुंब '
काहीतरी खतरनाक बॉलीवूडी
ते 'जेक के बच्चोंको अपने कब्जेमें कर लो, वो खुदबखुद उन्हें बचाने आ जायेगा' वाला सीन करून दाखवतात. >>>
'तुझ्यामुळेच आमच्यावर ही वेळ आली' असं स.क. च्या सरदाराच्या बायकोने जेकला सुनावणं >>> हे धमाल आहे. म्हणजे त्या शोले मधल्या सीन सारखेच ना? गावकरी जय आणि वीरूला गब्बरच्या ताब्यात द्यायची मागणी करतात तो?
जेक आणि जॅक भाऊ भाऊ चा संदर्भ जबरी झेपायला थोडा वेळ लागला. कॅमेरून युनिव्हर्स सारखे काहीतरी?
लेखातील अनेक इतर संदर्भ बहुधा पिक्चर पाहिल्यावर समजतील. इथे मासा म्हणजे शब्दशः मासा की तेथीलच वेगळ्या प्रकारचे माणसारखे जीव? बाय द वे माशाला वाळीत टाकतात म्हणजे नेमके काय करतात?
तरी मला लेखातले काही संदर्भ
तरी मला लेखातले काही संदर्भ कळले नाहीत कारण मी अवतार १ पाहिला नाही >>> अवतार १ मी ही नाही पाहिलेला पण त्याने काही फरक पडत नाही. डायरेक्ट अवतार २ पाहिलास तरी कळेल.
शोले मधल्या सीन सारखेच ना >>>
शोले मधल्या सीन सारखेच ना >>> हो हो
कॅमेरून युनिव्हर्स सारखे काहीतरी >>> करेक्ट. शिप टायटॅनिकसारखंच उभं पाण्याखाली जातं. आता ओरिजिनल टायटॅनिक पण आणायला हरकत नाही
मासा म्हणजे शब्दशः मासाच. व्हेल वगैरे सारखा मोठ्ठा. वाळीत टाकतात म्हणजे हम कबिलेवाले उससे कोई ताल्लुक नही रखते टाइप त्याच जातीचे बाकीचे मासे त्यांचे जीवाभावाचे सगेसोयरे वगैरे असतात.
मी पहिला बघूनही मला दुसरा
मी पहिला बघूनही मला दुसरा कळला नाही, त्यामुळे बिनधास्तपणे जा, फा
पण पाण्यातले पिक्चर नेहमीच
पण पाण्यातले पिक्चर नेहमीच बोअर असतात. स्पीड २ टाय टानिक, कारण तिथे काही फारशी अॅक्षन दाखवता येत नाही. सर्व बुडतेच. ह्या पिक्चरला सर्वांनी धरुन आपटले आहे. निळी हिरवीण इंडीड.
ते शीर्षकात तेरी मेहरबानियां मुळे काही कुत्रा संबंधित आहे कि कॉय असे वाटून उघडले.
अवांतरः
विमानात नाहीतर जमिनि वर जास्त सीन्स खेचता येतात. मी काल घरबसल्या कॉन एअर नावाचा लै भारी सिनेमा बघितला जुना आहे पण माझा फेअरिट पैकी एक. एक पण देशी चेहरा दिसत नाही. हिरवीण अक्षी गोरी पिट्ट ब्लाँडी. हिरो पन बहुतेक टेक्सास वाले गाव्ड वाला आहे पण निकलस केज आहे त्यामुळे चालून जाते. स्टंट सेट पीसेस भारी आहेत. हॉट स्टार वर आहे. रुणम्या तुला आव्डेल. स्टोरी साधी आहे एकदम.
अमा ध्स्न्यवाद. चेक करतो तो
अमा ध्स्न्यवाद. चेक करतो तो पिक्चर..
पण पाण्यातले पिक्चर नेहमीच बोअर असतात >>> याच्याशी काही अंशी सहमत. थोडावेळ छान वाटते. पुर्ण चित्रपट तिथेच असेल तर कंटाळवाणे होऊ शकते.
थोडेसे अवांतर यावरून आठवले. मी फर्स्ट जॉबला लागलो तेव्हा मला पहिला पगार साडेबारा हजार रुपये हातात आला. दोन महिन्यांनी माझा मित्र एका जॉबला लागला त्याला पहिलाच पगार थेट ३५ ते ४० हजार रुपये हातात आला. आधी मी मत्सराने पेटून ऊठलो. पण चौकशी करता समजले की त्याला सहा सहा महिने समुद्राच्या पोटातच राहायचे होते. मग म्हटले बरोबर आहे. हि निळ्या पाण्याची शिक्षा झेपावी म्हणूनच हा पगार आहे.
पण एक समजलेय की अवतार २ असो वा अवतार १ हे विज्युअल ट्रीट कॅटेगरीत असल्याने थिएटरमध्ये थ्रीडीतच बघण्यात मजा आहे. घरी बघण्यात नाही. फक्त पैसे खर्च करून थिएटरला गेले आणि तरीही आवडला नाही तर पंचाईत आहे.
अवतार 1 - इंटरेस्टिंग होता
अवतार 1 - इंटरेस्टिंग होता कारण नवी कन्सेप्ट होती
पांगळा हिरो भावाच्या अवतार घेऊन भेदी बनायला जातो आणि तिथलाच होतो हेही हिंदी सिनेमाच्या स्टोरी सारखं वाटलं तरी ट्रीटमेंट थोडी वेगळी असल्याने धमाल आलेली
ती जंगले, ते प्राणी, ड्रॅगन सदृश्य पक्षी त्यांच्याशी बॉंडिंग सगळंच मस्त होतं
मला इतका आवडलेला पहिला आणि खरतर स्टोरी तिथेच सम्पली होती की हिरो हिरोईन सुखाने नांदू लागतात
या हॉलीवूड वाल्याना एक सिनेमा काढुन स्वस्थ बसवतच नाही
कशाला प्रत्येक गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल काढतात
नशीब आपल्याकडे हे असलं अजून तरी फारसं नाहीये
नैतर शोले 2, मुघल इ आझम 2 असले निघाले असते
अनारकली ला मुलं होतात, ती मोठी झाल्यावर सलीम ला शोधून त्याच्या प्रेमाची आठवण करून देऊन एकत्र आणतात वगैरे
अनारकली ला मुलं होतात, ती
अनारकली ला मुलं होतात, ती मोठी झाल्यावर सलीम ला शोधून त्याच्या प्रेमाची आठवण करून देऊन एकत्र आणतात वगैरे Happy
>>
कुच्छ कुच्च होता है अनारकली... तुम नही समझोगी
सलीम ला शोधून त्याच्या
सलीम ला शोधून त्याच्या प्रेमाची आठवण करून देऊन एकत्र आणतात वगैरे>> हॉरर पण करता येइल अनारकलीला भिंतीत चिणले. मग ती भूत होउन सलीमास आयत्यावेळी त्रास देत राहते. सारखी ये जिंद गी उसी की है. वो किसी( और ) का हो गया. असे गाणे म्हणते. पण दोन भुताळी मुले तिला मात्र होतात. एक वेअर वुल्फ व एक व्हँपायर. ते सलीमास जाउन भेटतात. शेवटी सलीम तेरी मेहरबानिया गाणे म्हणतो व पाण्यातले मासे
त्याला अनार कलीची ओढणी आणून देतात.( बाफ वर राहण्यासाठी हा ट्विस्ट घातला आहे.) इकडे वीरु व बसंतीची मुले पण मोठी झालेली आहेत.
चौघे मिळून गब्बरचा धाकटा भाउ बब्बर शोधून काढतात व त्याला गुदगुल्या करून हसवतात. क्लायमॅक्स ला एक बीटीएस चे गाणे.
किंवा दोन्ही मुले हरवतात एक
किंवा दोन्ही मुले हरवतात एक कोळ्याला सापडतो
तो माशांच्या मदतीने तस्करी करायला शिकतो
दुसरा चर्च च्या फादर ला मिळतो आणि तो बरोबर ओळखलं
पोलीस बनतो
कोळ्याला मिळालेला एकदा एका लहान माश्याचा जीव वाचवतो
आणि नंतर पोलीसभाऊ त्याच्या मागे लागलेला असताना पाण्यात उडी मारतो
तोवर तो मासा त्याच्या कबिल्याचा प्रमुख झालेला असतो
तो आपल्या बाकी मासेलोकांसोबत जाऊन कोळ्याला सुरक्षित जागी नेतो
तिकडे अजून एक तरुणी असते, जी माशाच्या संवर्धनासाठी काम करत असते, ती कोळ्याच्या मुलाची कानउघडणी करते
मग त्याला तस्करी केल्याबद्दल वाईट वाटते आणि तो सुधारण्याचे ठरवतो
पण भावाला हे माहिती नसतं आणि तो त्याच्या जीवावर उठलेला असतो
आणि मग एक भिकारी येऊन गाणे म्हणतो
कहा अनार कहा कली
ये दुनिया नही रही भली
व्हेलचा पिवळा रस काढल्यानंतर,
व्हेलचा पिवळा रस काढल्यानंतर, त्याचं काय झालं कळालं नाही
>>>> मानवाचे वय वाढवणे थांबायची लस/ औषधं बनवतात त्यापासून. त्याने किंमत पण सांगितलेली ८० बिलियन.
अवतार १ खुप आवडलेला... अवतार २ थोडासा लांबवला आहे पण मला तरी आवडला
माईल्स मेलेला बघितल्यावर मी
माईल्स मेलेला बघितल्यावर मी तिसर्या भागापासून वाचलो असा सुटकेचा निश्वास टाकणार इतक्यात स्पायडर त्याला वाचवतो त्यामुळे तिसर्या भागापासून आपल्याला कुणीही वाचवू शकत नाही.
मला तर अॅनिमेशन आणि फ्युचर टेक्नॉलॉजीच आवडली ह्यात. पुढचा भाग आकाशी मारामारी असणार बहुतेक.
गा ला गु ची चव नसते हेच खरे..
गा ला गु ची चव नसते हेच खरे..
Yellow whale vomit is called
Yellow whale vomit is called ambergris solid. Very precious substance used in perfumery. But use of natural ambergris is now prohibited. Synthetic options are used.
Have they shown real fish or cgi. Japan does very cruel whale hunting in the guise of research.
Sorry about English. Posting from phone.
TABAC original EDT has
TABAC original EDT has ambergris. Great perfume for men . Gift Idea.
Have they shown real fish or
Have they shown real fish or cgi.
>>>>CGI. एकेका बाजूला प्रत्येकी दोन डोळे आहेत. ते संगीतात, बुद्धिमत्तेत, अध्यात्मात अतिप्रगत जीव आहेत म्हणे.
perfumery >>>ही नवीन माहिती आहे. मला फक्त ओमेगा तेल माहिती.
हो आबा, ते कळलं. पण 'ये हात मुझे दे दे ठाकूर' नंतर शेवटच्या उत्पातात ते लिक्वीड कुठं गेलं ते कळलं नाही.
अवतार १ मी ही नाही पाहिलेला
अवतार १ मी ही नाही पाहिलेला पण त्याने काही फरक पडत नाही. डायरेक्ट अवतार २ पाहिलास तरी कळेल. >> २ मधे शाहरुख येतो रे मधेच, नीट लक्ष देऊन पाहिलास तर कळेल
व्हेलचा पिवळा रस काढल्यानंतर, त्याचं काय झालं कळालं नाही. >> व्हेलचा पिवळा रस काढल्यावर व्हेल मरतो तो वेडा सांगतो ना कि हि सर्वात महागडी वस्तू आहे जगातली कारण ह्याने माणसाचे आयुष्य वाढवता येते. बोट बुडली तेंव्हा गेले ते पाण्यात ?
मला तर अॅनिमेशन आणि फ्युचर टेक्नॉलॉजीच आवडली ह्यात. >> टीनू आनंद ने लिहिलेली कथा वगळता सिनेमा "बघायला" खरच मस्त वाटते. एकंदर सगळी इमॅजिनेशन नि व्हीएफ्क्स पूर्णपणे वेगळ्या लेव्हलचे आहे. नेत्रसुखद आहे सिनेमा नि मोठ्या पडद्यावरच बघायच्या लायकीचा आहे.
व्हीएफ्क्स पूर्णपणे वेगळ्या
व्हीएफ्क्स पूर्णपणे वेगळ्या लेव्हलचे आहे. नेत्रसुखद आहे >>> यात शंकाच नाही. आणि पाहायचा असेल तर हा पिक्चर थेटरात आणि ३डी मध्ये पहावा. निदान ते नेत्रसुख पुरेपूर एन्जॉय करता येतं. पण मग पैसे फार जातात.
पण मग पैसे फार जातात. >> मग
पण मग पैसे फार जातात. >> मग एक व्हेल मारायला जायचे
मग एक व्हेल मारायला जायचे >>>
मग एक व्हेल मारायला जायचे >>> माझी टीम म्हणून तू पण ये बरोबर. ती एवढी मशिनरी घेऊन तो पिवळा द्राव काढायला. एकट्या मान्साचं काम न्हवं ते दादा तेवढेच तुझेही तिकीटाचे पैसे सुटतील
जबरीच परिक्षण !
जबरीच परिक्षण !
शेवटच्या मारामारीत ते लहानगं म्हणतं 'मला परत बांधलं' फिस्सकन हसूच आलं. सारखं सारखं त्याच झाडावर टाईप्स.
टायटॅनिक अगदीच कॉपी सीन्स.
बॅड लँग्वेज पण आहेच अधेमधे. अगदी काय पीजी-१३ कॅटेगरी वाटला नाही.
धमाल झालंय परीक्षण
धमाल झालंय परीक्षण
मला ९९% खात्री आहे की जेम्स कॅमेरूनने अगणित मिथुनपट बघितले आहेत. संपूर्ण पटकथा मिथुनपटांतून उचललेल्या प्लॉट पॉईंट्सचे लांबलचक कोलाज आहे. वानगीदाखल
व्हिलनच्या अपत्याचा हिरोने सांभाळ करणे - गुंडा
एका शरीराच्या मेमरीज दुसर्या शरीरात प्रत्यारोपित करणे - दिया और तूफान
व्हिलनने हिरोवर्गाची भाषा तीन वर्षांच्या मुलाप्रमाणे बोलणे - युगांधर
तसेच जर अवतार भाग १ शी जोडून पटकथा वाचली तर बर्यापैकी इन्स्पिरेशन धरम कांटामधूनही आल्याचे स्पष्ट होऊ शकते - हिरो (राजकुमार) डाकू ज्याचा चेहरा कोणीही बघितलेला नाही त्यामुळे त्याला सर्व भला माणूस समजतात. पण त्याचे खरे रुप स्पष्ट होताच सर्व त्याच्या विरोधात. मग तो पापांचे प्रायश्चित्त करतो आणि त्या नादात त्याच्या बाजूचा टेरर अमजद खान कै. होणे. उत्तरार्धात टेरर माणूस निराळ्या स्वरुपात परतणे (अवतार - रिकाँबिटंट, धरम कांटा - मुलगा अमजद खान). हिरोला तीन मुले - दोन मुलगे एक मुलगी - असणे. शोषित वर्गातील पात्रांचा (सत्येन कप्पूचा मुलगा वि. नावी लोकं) हिरोकडून मृत्यु झालेला असणे. दोन मुलांपैकी थोरले कारटे बोरिंग (राजेश खन्ना) आणि धाकटा कारटे इद्रे (जितेंद्र) असणे. इ. इ.
याव्यतिरिक्त सिनेमात "ब्रो" संबोधनाचा अतिरेक आहे. ब्रो आणि मिथुनपटांचे रेफरेन्सेस असे दोन बिंगो गेम्स तसेच उत्कृष्ट व्हिज्युअल्स या जमेच्या बाजू म्हणाव्या लागतील. थोडं भाषिक अंगाने बघण्यात रस असेल तर जेक मधूनच साऊथ ऑस्ट्रेलियन अॅक्सेंट मारतो ते शोधण्याचा खेळ खेळण्याची देखील संधी आपल्याला या चित्रपटाने दिलेली आहे.
जबरी ॲडिशन्स, पायस
जबरी ॲडिशन्स, पायस
सारखं सारखं त्याच झाडावर टाईप्स >>>
पायस मॅन वेलकम ब्याक. अजुन
पायस मॅन वेलकम ब्याक. अजुन एक्स्टेंडेड परीक्षण लिहा ही लापि.
पायस
पायस
Pages