Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सूचक शब्दांत बोल्ड विषयावरची
सूचक शब्दांत बोल्ड विषयावरची चर्चा.
कांचनला भीती वाटतेय. संजनाचा आधार घेऊ पाहतेय. वंशाच्या एका दिव्याला एक्स्पोज केल्याबद्दल अरुंधतीला डच्चू? अन्घाला , अगं मग काय झालं त्यात असं कधी म्हणतेय ते पाहायचं. अभिषेक बापाच्या एक पाऊल पुढे. याची दोन लग्नं झालीत + एक अफेअर.
मग प्रोमोजमध्ये सगळे अरुंधतीला जबाबदार धरताहेत आणि अन्घा व तिचे बाळ दोघांनाही वाचवू शकलो नाही असं डॉक्टर सांगतात हे नक्कीच स्वप्न असणार.
भरत तुम्हाला वाटतंय ना की
भरत तुम्हाला वाटतंय ना की त्यांच्या टीम मधल कुणीतरी इथे येऊन आपण काय म्हणतोय ते वाचत, ते जर खरे असेल तर आता हे लोक आपले बाण कुठल्या दिशेने असतील ते ओळखु लागलेत. म्हणून काल संजना ने अरुंधती च म्हणणं बरोबर होते पण वेळ चुकली ही कमेंट टाकली आणि त्यावर अप्पांनी अरुच्या बाजूने फिल्डिंग केली. थोडक्यात हे लोक वाचतात पण बदल करत नाहीत पात्र तशीच काळ्याकुट्ट किंवा पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवतात आणि आजकाल त्यामागची लंगडी कारण देतात.
स्वप्न च आहे कारण दस्तुरखुद्द अप्पा अरु च्या विरोधात गेलेत जे अशक्य आहे. पण स्वप्नात ह्या लोकांनी जवळपास अर्धा एपिसोड घालवला हे किती इरिटेटिंग आहे. गडद काळा रंग सध्या अभि आणि कांचन साठी राखीव आहे. काळ्या टीम मध्ये अनिरुद्ध पण असेल असं मला वाटलं होतं पण संजना बरोबर तोही तळ्यात मळ्यात खेळतोय. आज चक्क अरुंधती ला मी पण चुका केल्या त्यामुळे तुला बोलण्याचा अधिकार मला नाही असे म्हणाला. खरंतर त्यावर अरु ने, "एंड ऑफ स्टोरी, केस क्लोज्ड, गुड नाईट ऍन्ड गुड लक ' म्हणायचे पण मग ती अरुंधती कसली. ती हाॅस्पिटल मध्ये अभिच्या शिव्या खाऊन, कांचनच्या खायला घरी गेली.
आई कुठे काय करते? ह्या प्रश्नाचे खरे उत्तर आई सतत कुणाची ना कुणाची बोलणी खाते हे आहे.
आई कुठे काय करते? ह्या
आई कुठे काय करते? ह्या प्रश्नाचे खरे उत्तर आई सतत कुणाची ना कुणाची बोलणी खाते हे आहे.>>> ते ही हौसेने. तिलाही चैन पडत नसावी त्याशिवाय. नाहीतर कांचन ची एवढी कटकट ऐकूनही पुन्हा पुन्हा नवीन कान घेऊन तिथे गेली नसती.
आता प्रेक्षक शहाणे झालेत याची कल्पना सिरियल वाल्यांना नसावी. नाहीतर असे फसवे स्वप्नरंजित एपिसोड त्यांनी खवले नसते.
<आई कुठे काय करते? ह्या
<आई कुठे काय करते? ह्या प्रश्नाचे खरे उत्तर आई सतत कुणाची ना कुणाची बोलणी खाते हे आहे.>
स्टोरीलाइन, पात्रांचं वर्तन बदलायचं स्वातंत्र्य यांना नाही. बांग्ला मालिका जशी गेली तसंच यांनी जायचं आणि त्याच खड्ड्यांत पडायचं.
आई कुठे काय करते? ह्या
आई कुठे काय करते? ह्या प्रश्नाचे खरे उत्तर आई सतत कुणाची ना कुणाची बोलणी खाते हे आहे.
नवीन Submitted by पर्णीका on 15 December, 2022 - 23:29 >>>> स ह म त
नवीन प्रोमो मधे अनघा आली की
नवीन प्रोमो मधे अनघा आली की घरी बाळाला घेऊन. सगळे खूश आहेत आणि अभी पण आहे अरुला टोमणे मारत. म्हणजे त्याचा भांडाफोड झालाच नाही का?
बाळ छान आहे. अगदी ४-५ महिन्यांचं दिसतंय.
७ व्या महिन्यात डिलिव्हरी
७ व्या महिन्यात डिलिव्हरी म्हणजे बाळ प्रिमी असणार ना? लगेच घरी पण, नक्की हे खुर्चीक्विनच स्वप्न असणार.
बाकी अरुचा आत्ताच्या आत्ताच सोक्षमोक्षचा हट्ट कळला नव्हताच त्यामुळे पुढे स्वत;साठी बोलणी खायची सोय ती आधिच करुन ठेवते.
नाट्यमय नको का होयला मालिका ?
नाट्यमय नको का होयला मालिका ? केळकर कुटुंब म्हणेल सारख्या अरुच्या भानगडी निस्तराव्या लागत आहेत. माहीती काढा, प्रत्यक्ष मदत करा, शोधत फिरा एक ना अनेक.
अनिरुद्ध अरुंधतीला ब्लेम न
अनिरुद्ध अरुंधतीला ब्लेम न करता समजूतदारपणे बोलतोय हेच स्वप्न दृश्य वाटतं होतं.
मधला एक किंवा अनेक एपिसोड
मधला एक किंवा अनेक एपिसोड दाखवायचे राहिले की काय? सी सेक्शनच्या वेळी ओ टी च्या बाहेर सगळ्यांचे घाबरलेले चेहरे नाहीत. बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवणं नाही. सरळ बाळ बाळंतीण घरी आणि मिशन अभिषेक सुरू आणि अनघाची अरुंधती.२ होण्याची प्रक्रिया पूर्ण. नव र्याला टाकलं मात्र सासरच्यांसाठी इथेच राहणार.
कांचनला सुधरवायचा एकच मार्ग आहे. तिला मुलाचं आणि आता नातवाचंही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालतं , सुनांनी ते खपवूनच घेऊ नये तर मुकाट्याने सहन करत सासरच्यां साठी झटत राहावं. अप्पांनी सरळ मनी उर्सेकरणीला घरी घेऊन यावं. तसा आता कांचनचा आवाज बसला आहे त्यामुळे तिला फार आरडाओरडा करता येणार नाही.
केळकरांकडे ओढूनताणून अनीश ईशाचं जुळवणं आणि आशुतोष अरुंधतीमध्ये चिंगीला घुसवणं चालू आहे. नितीनला आज दोन दवणीय वाक्ये दिली होती.
चिंगीसुद्धा आता बोरिवलीत राहायला येणार. तिला घर शोधायला आशुतोषची ( म्हणजे नितीनची ) मदत लागली नाही. ती सध्या मैत्रिणीकडे राहतेय. अरुंधतीला कळलं असतं ती घर शोधतेय तर आपल्याकडेच बोलवलं असतं. दोघी कॉलेजला आणि तिथून म्युझिक स्कूलला एकत्रच गेल्या असत्या. आता आशुतोषला सकाळी सकाळी दोघींकडे जायला लागेल. कारण तो अरुंधतीकडे जातो हे कळल्यावर चिंगी काही त्याला सोडायची नाही.
यश -ईशाची पो रकट भांडणं दाखवून या लोकांना कंटाळा कसा येत नाही.
अविनाश लंडनला गेलाय कारण शंतनू मोघे सफरचंद नावाचं नाटक करतोय.
भरत...
भरत...
तिला घर शोधायला आशुतोषची ( म्हणजे नितीनची ) मदत लागली नाही...
हे मस्त.
आता मी इथले प्रतिसाद स्टार
आता मी इथले प्रतिसाद स्टार प्रवाहच्या फेसबुक पेजवर सुद्धा टाकणार आहे. तिथे भक्तिभावाने चान चान असं लिहिणारे लोक आहेत. बघू मला कधी ब्लॉक करतात
https://fb.watch/hwfEz6HdYM/
https://fb.watch/hwfHUB9OO4/
तिथे हे दोन अंश दाखवलेत. हे टीव्हीवर कधी दाखवलंय का?
रविवारी बहुदा दोन मोठे भाग
रविवारी बहुदा दोन मोठे भाग दाखवले. बारा ते चार वगैरे हेच दाखवत होते बहुतेक. मी थोडा भाग बघितला. सलग ईतका वेळ या लोकांना नाही सहन करू शकत.
हो . रविवारी महाएपिसोड होता.
हो . रविवारी महाएपिसोड होता. माझ्या फेसबुक कमेंटवर एका प्रेक्षकाने हे उत्तर दिलंय.
फेसबुकवरच्या व्हिडियो मध्ये अन्घा घरी यायच्या आधी पडद्यावर (स्क्रीनवर) "'काही दिवसांनंतर " असं लिहिलंय.
येस भरत..
येस भरत..
मलाही ते "काही दिवसांनंतर.." जरा odd च वाटले...
संपते आहे की काय मालिका...?
संपते आहे की काय मालिका...?
संपते आहे की काय मालिका...?
Happy >>>>इतक्यात कशी संपेल ती बंगाली /हिंदी च्या पावलावर पाऊल टाकून लग्न लावून देतील हारु च मग दत्तक मुलगी , तेलकट्याचे कोणीतरी सावत्र, मानलेले किंवा दत्तक घेतलेले भाऊ वहिनी येऊन बिझिनेस वर दावा ठोकतील वैग्रे वैग्र .........
अरे भरतराव, पर्णिका मस्त
अरे भरतराव, पर्णिका मस्त लिहीत आहात. मधल्या काळात मी रिटायर झाले. पण तिथेच परत कन्सल्टंट म्हणून लागले आहे. त्याचे सर्व पेपर वर्क हजार फॉर्मालिटीज मुख्य म्हणजे पी एफ पदरात पाडून घेणे व्हेंडर रजिस्ट्रेशन करवणे, नवे धंदे चालू करणे ह्यात बिज्जी आहे सध्या. आज सर्व वाचून काढले. एकदम हह पुवा लिहीत आहात. त्यात एक दोन डॉ. अपॉइन्ट मेंट पण आहेत. माझे बाफ ला अनेक उत्तम आशीर्वाद.
नव्या इनिंग साठी शुभेच्छा असा
नव्या इनिंग साठी शुभेच्छा असा!
नविन रोल साठी शुभेच्छा अमा.
नविन रोल साठी शुभेच्छा अमा. तुम्ही काहिहि मिस करतं नाही आहात. सिरियल सध्या लुप मध्ये फिरतेय. ऍंटि अरु टीम चार आक्रस्ताळेपणा आणि येता जाता अरुला बोलणं आणि अरु आणि प्रो अरु टीम चार समजुतदार हतबलपणा. तुम्ही आधी लिहिलेल्या काही पोस्ट्स कदाचित आत्ता देखील जशाच्या तशा लागु होतील इतकं तेच तेच दळण चाललंय. मी तर वैतागून तो मेगा एपिसोड पाहिलाच नाही. डायरेक्ट अनघा घरी आली तो बघितला पण कांचन आणि अनिरुद्ध चे तेच जुने तुणतुणे. हा ट्रॅक सुरू असेपर्यंत बघणारच नाहिये मी.
मालिकेतील लोकांना विनंती अभिला आधीच्या एपिसोडस मध्ये अरुंधती बद्दल आणि अनघाला डिच केलं तेव्हा दिलेले संवाद एकदा तुम्ही च परत बघा. काही च्या काही भरकटवल आहे ह्या पात्राला.
स्त्री ही स्त्रीची शत्रू असते
स्त्री ही स्त्रीची शत्रू असते हे ही मालिका सिद्ध करते आहे. कांची, इशा मधेच संजना अरुला इतकं बोलतात तरी ही लाळघोटी तिथेच राहते.
अनुष्का आशुरु च लग्न लावून देणार बहुतेक.
अंघा चे दादा येऊ शकत नसल्याने उगा आजारी पाडलं त्या पात्राला.
रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि
रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि देशमुखांची सून अन्घा यापुढे काय करणार हेच दोन महत्त्वाचे प्रश्न सध्या उरलेत. कांचनबाई मेरी पणती मैं नहीं दूंगी मोडमध्ये आहेत. आवाज आणखीनच बसलाय. या आवाजात त्यांची संवादफेक सुसह्य वाटतेय.
उद्या कॉलेजात स्पर्धा आहे.
एवढ्या दिवसांत आशुतोष अरुंधती यांनी एकमेकांशी बोला यला वेळ कसा मिळाला नाही असा प्रश्न अनीशला पडलाय. यांचं काही व्हायच्या आत तो इशासोबत आपलं फिक्स करायच्या तयारीत दिसतोय.
फेसबुकवर -> आशुतोष अरुंधती देवळात जातात तिथे आशुबाळ "माझ्या शेजारची बाई..." असलं देवाला सांगतोय.
अरुंधती पुजार्यांला वाकून नमस्कार करू लागताच तोही मध्ये घुसतो आणि पुजारी तिला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात तेव्हा ती चपापल्याचा अभिनय करायचा प्रयत्न करते. पुढे दोघं देवळाच्या पायर्यांवर बसतात. त्यापुढे बघायचा पेशन्स राहिला नाही.
माझ्या शेजारची बाई..." असलं
माझ्या शेजारची बाई..." असलं देवाला सांगतोय.<<<<
माझ्या शेजारची बाई..." असलं
माझ्या शेजारची बाई..." असलं देवाला सांगतोय>>>
हो सांगितलं असेल, सरळ अरुंधती म्हंटलं तर देव विचारायचा कोण अरुंधती? मग ह्याला म्हणावं लागलं असतं "माझ्या शेजारची बाई..." , त्यापेक्षा आधिच हा असं म्हणाला असेल.
काय बोलावे आता...!!!! आपली
काय बोलावे आता...!!!! आपली तर मतीच कुंठीत झाली यांच्या इल्लॉजिकल भरताडीने... !!!
अन्घा चे बाळ मोठे झालेले
अन्घा चे बाळ मोठे झालेले दाखवतात की काय? 'काही दिवसांनी' अशी पाटी दाखवून
https://www.esakal.com/manoranjan/marathi-serial-aai-kuthe-kay-karte-new...
आजचा हायलाइट म्हणजे
आजचा हायलाइट म्हणजे आशुतोषच्यि कपड्यांचा भयंकर रंग आणि चिंगी गाऊ लागताच तोंड उघडं ठेवून बावळट भाव आणून तिला बघत राहणं.
संगीतशाळेत विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक जास्त झालेत. विद्यार्थी हे त्यांना मिळालेले श्रोते आहेत आणि तिघेही ( तिसरा अनिश) त्यांना पिळून काढत आहेत.
अभिषेक "माझं चुकलं" हे दोन शब्द न बोलताच अनघाने माफ करावं अशी अपेक्षा ठेवून आहे.
कुठेतरी "मी ती चूक दुरुस्त करायला तयार आहे", अस़ही ऐकू आलं. 'ती' चूक नक्की कशी दुरुस्त करता येईल?
अनघाला अर्थमधला शबानाचा शेवटचा डायलॉग मारायला दिला. पण तो अगदी फ्लॅट गेला.
केळकरांकडे कोणी नवं आलं की त्यांना देशमुखांच्या पायावर घालायला आणायचं अशी पद्धत असावी. उद्या चिंगीला आणणार आहेत. आशुबाळाचे तेच भयंकर कपडे आहेत. कांचनचा आवाज चि़गीला बघून सुटलाय आणि ती चिंगीला आशुतोषशीच लग्न करून टाक असं सांगते.
हे ऐकून अरुंधतीचा चेहरा कसा होतो ते पहा.
तिने ( लग्रनाच्या) चेकवर सही तर केली आहे, पण चेकबुकचं perforation धड नसल्याने तिला तो फाडता येत नाहीये.
केळकरांकडे कोणी नवं आलं की
केळकरांकडे कोणी नवं आलं की त्यांना देशमुखांच्या पायावर घालायला आणायचं अशी पद्धत असावी.....
भरत..
आज बर्याच घटना दाखवल्या.
आज बर्याच घटना दाखवल्या.
ईशा अनिशची बळचं जवळीक.
अभि अंघाच भांडण
अनुष्काची देश्मुख वाड्यावर एंट्री
अरु नक्की किति दिवस पडीक राहणार आहे इथेच ? अप्पांच विस्मरण, मग अंघाची डिलिव्हरी , काही दिवस गेले मधे तरी ही ईथेच.
ईशा अनिशची बळचं जवळीक...
ईशा अनिशची बळचं जवळीक...
हो ना..अगदी बळच..
तिथे कुणीही नव्हते हे प्रॅक्टिस करत असताना..
असे कधी असते का?
इश्श अनिष चे लग्न झाले तर ईशा अरुंधती ची पुतण सून होईल आणि अनिष आशु चा सावत्र जावई!!
हो. ईशा अनिश फारच ओढून ताणून
हो. ईशा अनिश फारच ओढून ताणून करताहेत.
पाय मुरग ळल्यावरचा उपाय क्रँप्सवर चालला होता का?
ईशा कुठल्याही अँगलने क्युट वाटत नाही. किरकिरी लाडावलेली वाटते. कालची मारामारी तिला अनिशच्या प्रेमात ढकलण्यासाठी होती.
अनिशने तिचा नॅशनल पार्कमधला आउट बर्स्ट पाहिला होता आणि तेव्हा तिला काय काय सांगितलं होतं अशा वेळी तिच्याशी सूचक बोलणं चूक आहे.
त्यातल्या त्यात अन्घा ( आणि तिची आईही) ठीक ट्रॅकवर चालली आहे - तेही फक्त अभिषेकच्या बाबतीत. सासरा अरुंधतीला बोलल्यावर त्यालाही त्याच आवाजात उत्तर द्यायला हवं. असल्या माणसाला सासरा असला तरी कोणी का मान देईल?
अनिरुद्धचे पैसे बुडाल्याचा ट्रॅक बाजूला राहिला.
संजनाच्या मुलाच्या जन्माबाबतच्या आठवणी छान होत्या.
अप्पांचा डिमेन्शिया गेला वाटतं.
Pages