Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छे!! आजची चक्कर फुकट गेली...
छे!! आजची चक्कर फुकट गेली....
आणखी फिल्मी प्रकार. अरुंधतीला
आणखी एक फिल्मी प्रकार. अरुंधतीला आशुबाळा साठी आवडलेला शर्टच त्या चिंगीला आवडला आणि अरुंधतीने तिला देऊनही टाकला.
चिंगी अगदी आगाऊ आहे.
चिंगी अगदी आगाऊ आहे.
आणि आशुतोष काय अगदी इतका नाइव्ह आहे का..? त्या चिंगी ची इंटेशन्स लक्षात न येण्याइतका?
काही..!!
म्हणे..तू इतकी मोठी कशी काय झाली !
आजी-अभि-अन्या चा जळफळाट पाहण्या सारखा होता.
अनघा का जाते पण अभि च्या मनाविरुद्ध...?
चिंगी अगदी आगाऊ आहे. >>>> ती
चिंगी अगदी आगाऊ आहे. >>>> ती तर 'नवा गडी नवे राज्य' मध्ये आहे ना ???
चिंगी म्हणजे स्वरांगी मराठे
चिंगी म्हणजे स्वरांगी मराठे असं वाचलं. ही आभाळमाया मध्ये होती ना? छोटी मुलगी
ह्यांच्या कडे वयाचा फारच घोळ
ह्यांच्या कडे वयाचा फारच घोळ आहे एकुणच. 'चिंगी लहानपणी आशुतोष चे खेळताना कुणाशी भांडण झाले तर त्याच्या वतिने मांडायची' असा नितिन ने उल्लेख केला म्हणजे चिंगी ह्या पात्रांचे वय कमितकमी ४० तरी हवे. पण चिंगी म्हणून जी आणली आहे ती वयाने ३० च्या आसपास होती आणि वागत २०/२२ वर्षांच्या मुलीसारखी होती (तिची आणि अनिष ची केमेस्ट्री बघता तो तिचा शिक्षक आणि ती त्यांची विद्यार्थिनी वाटत होते). हे लोक ही तिला लग्न झाले की नाही वगैरे चवकश्या करत होते. आशुतोष आणि नितिन ची वय लक्षात घेता त्यांच्या लहानपणी च्या मित्र मैत्रिणींची लग्न कधीच व्हायला हवीत.
बाकी चिंगी चा आणि अरुंधतिचा दुकानातला प्रसंग फारच कृत्रिम आणि ओढून ताणून आणलेला वाटला.
चिंगी प्रकरण लेखिकेने लवकर आटपावे नाही तर अनिरुद्ध आणि अभिची ओव्हर ऍक्टिंग सहन करायला लागेल. काल तर दोघांमध्ये कंपिटिशन होती जशी काही.
प्रेमाचा नवीन त्रिकोण हा
प्रेमाचा नवीन त्रिकोण हा ट्रॅक संपला की प्लीज कोणीतरी इकडे लिहा प्लीज, मग पुन्हा बघायला सुरू करेन. इतका कंटाळवाणा ट्रॅक होणार आहे तो.
रच्याकने, चिंगी आमंत्रित पाहुणी होती का स्वतःहून आलेली ? पहिल्या केसमधे निदान नितिनला तरी आश्चर्य वाटू नये. दुसर्या केसमधे वाढदिवस कुठे आहे हे तिला कसं कळलं ?
वर्षाला काही बोलावलं नव्हतं :ड
बहुतेक तिला व्हॉट्स अॅप
बहुतेक तिला व्हॉट्स अॅप फॉर्वर्ड मिळालं असावं. आजकाल शाळा कॉलेजेसच्या बॅचचे व्हॉट्स अॅप ग्रुप असतात. आधी ग्रुप मग रियुनियन. त्यासाठी बॅचमेट्सची शोधाशोध चालते. आशुबाळाच्या वाढदिवसाचं व्हॉट्स अॅप ग्रुप वर असेल (आणि आशुला माहीत नसणार कारण तो स्वतःहून कुठे कोणाकडे जातो, अरुंधतीशिवाय?) तिथून त्या चिंगीला कोणीतरी फॉर्वर्ड केलं असेल. (संवाद पटक था लेखकांनी एवढा विचार केला असेल असं वाटत नाही. ) चिंगुटलीला दुसरा प्रश्न तुला कसं कळलं हा असायला हवा.
चिंगुटली खूपच लहान दिसतेय. वर कोणीतरी म्हटलं तशी अनीशसाठीच बरी आहे.
वर्षा हाउस एल्फसारखी आहे. ती कामं करते पण दिसत नाही.
जुन्या स्टोरीजमध्ये राजा प्रधानाला राज्याचा काय हालहवाल असं विचारतो, तसं आशुबाळ नितीनला आज माझ्या काय् मीटिंग्ज आहेत इ. विचारतो. त्याला स्वतःला ते बघता येत नाही आणि सेक्रेटरी परवडत नाही किंवा त्या/तिला कसं हँडल करायचं माहीत नाही. गरजही नाही. मिटिंगला नितीनच त्याला घेऊन जाणार.
अरुंधतीचा दिवस ३६ तासांचा असेल तर नितीनचा ४८ तासांचा असायला हवा. नाहीतर इतकी कामं एका माणसाला शक्य नाहीत.
काल कांचन पुन्हा एकदा अरुंधतीला राबवून घ्यायचं आहे असं म्हणाली तरी या बाईला काही फरक पडत नाही.
सध्या संजना मस्त फॉर्मात आहे. अनिरुद्धनंतर अभिषेकला चिमटे काढले.
काल कांचन पुन्हा एकदा
काल कांचन पुन्हा एकदा अरुंधतीला राबवून घ्यायचं आहे असं म्हणाली तरी या बाईला काही फरक पडत नाही. >>>>>> अगदी अगदी.
साधारण महीनाभर अरु पुन्हा त्यागमूर्ती बनण्याचा प्लॉट चालेल असं दिसतयं. त्या काळात बाकीचे सुट्ट्या घेतील. अरु नसताना बाकीच्यांनी किल्ला लढवला होता.
चिंगी अनिशपेक्षा लहान दिसते ह्या वाक्याला मम.
आता यशसाठी कोणीतरी आणावी लागणार. नाहीतर यश-चिंगी हे समीकरणही चालू शकेल.
भरत
भरत
मस्त!
जुन्या स्टोरीजमध्ये राजा प्रधानाला राज्याचा काय हालहवाल असं विचारतो..... हे मस्त!! खरेच तसेच आहे.
काल तर तो नितीन ला म्हणाला.." हं सांग बरं आता काय काम आहे ते..!!"......
आता आणखी एक गाणारं पात्र.
आता आणखी एक गाणारं पात्र. आणखी टाइमपास.
स्वरांगी मराठेचं वय ३० वर्षे आहे असं गुगलबाबा सांगतोय. ओंकार गोवर्धनचं ३६. म्हणजे चिंगीच आशुतोषला जास्त शोभून दिसेल.
पण तिने गाणं खरंच खूप छान
पण तिने गाणं खरंच खूप छान म्हटलं..
अमेझिंग !
हो. राम मराठेंची नात आहे ती.
हो. राम मराठेंची नात आहे ती. फक्त मौजाचं मोजा केलं आणि ज जिराफातला.
आता आणखी भयंकर प्रकार. कॉलेजात गाण्याची स्पर्धा आणि जज आशुतोष. हे कळल्यापासून मला सुद्धा या मालिकेपासून ब्रेक घ्यावासा वाटतोय. काम करताना एका बाजूला टीव्ही चालू ठेवणंही कठीण आहे.
अनुश्का उर्फ चिंगी आल्यामुळे अप्पांच्या डिमेन्शियाला ब्रेक दिलाय. किंवा अरुंधतीच्या सुटीच्या काळातले एपिसोड भरायला तो प्रकार केलेला. हळूहळू लेखक दिग्दर्शकच अप्पांचा डिमेन्शिया विसरतील.
अनिरुद्धच्या पार्टनरने अपेक्षेप्रमाणे त्याला बुडवायला सुरुवात केली.
स्वरांगी मराठेचं वय ३० वर्षे
स्वरांगी मराठेचं वय ३० वर्षे आहे असं गुगलबाबा सांगतोय. ओंकार गोवर्धनचं ३६. म्हणजे चिंगीच आशुतोषला जास्त शोभून दिसेल. >>>>मधुराणी चे वय बहुदा सिरीयल मध्ये ४० + आहे आणि रियल लाईफ मध्ये सुद्धा ४०+ च आहे
लग्नाला २५ वर्षै झाल्यावर
लग्नाला २५ वर्षै झाल्यावर घटस्फोट झाला. त्यालाही एक दोन वर्षे झाली असतील. ती ४५+ असायला हवी.
>मधुराणी चे वय बहुदा सिरीयल
>मधुराणी चे वय बहुदा सिरीयल मध्ये ४०>>
मोठा मुलगा डॉक्टर आहे आणि इंटर्नशिप वगैरे संपवून हॉस्पिटलमध्ये कामाला लागला आहे. म्हणजे त्याचे किमान वय २५ असेल. म्हणजे काय तिला मुलगा १५ व्या वर्षी झाला?
अरूचा ४५ वा वादि केलेला
अरूचा ४५ वा वादि केलेला दाखवलं होतं मागे
छ्या !!!! बहुदा म्हणूनच तेलकट
छ्या !!!! बहुदा म्हणूनच तेलकट आणि हारु जोडी विजोड वाटते। व तिच्या नजरेत तेलकट हा तिचा अजून एक मुलगा वाटतो।
@अमा. ...तुम्ही पुन्हा
@अमा. ...तुम्ही पुन्हा एपिसोड glimpsum लिहायला चालू करा. त्यांच्या वीना मालिका रटाळ वाटते. अशाने टीआरपी रद्द होईल.
चिंगी प्रकरणी प्रेक्षकांचा
चिंगी प्रकरणी प्रेक्षकांचा संयम संपला आहे हे बहुधा लेखक+दिग्दर्शक टिम पर्यंत पोहोचल आहे कारण कालच्या एपिसोड शेवटी उद्याच्या भागाची जी झलक दाखवली (जी प्रत्यक्षात ३ दिवसांनंतर दिसते) त्यात फायनली आशुतोष अरु ला माझं तुझ्यावर प्रेम असल्याने मी इतकी वर्षे तुझ्या साठी थांबलो होतो असं काही तरी म्हणताना दाखवलं.
बाकी चिंगी कायम इतकी हायपर असते की खेळाडू घेतात ते ड्रग्स ती घेत असावी का ह्या बद्दल संशोधनाला स्कोप आहे.
अरु, यश, गौरी, आशुतोष, अनिश आणि आता चिंगी इतकी गाणारी पात्र कथेत असताना त्यांच्या साठी एखादा संगीत दिग्दर्शक टीम मध्ये का नाही हा एक प्रश्न आहे. त्यामुळे अतिशय बेसिक अशा चुका होतात. परवा अरु चार आवाज 'जिथे सागरा धरणी मिळते ' म्हणताना चित्रकलेला जाणवला यश/अनिश च्या हातात साथी साठी वाद्य देउन हे सहज लपवता आला असत. फ्युजन म्हणून जे काही चिंगी ने म्हंटले ते दोन स्वतंत्र गाणी म्हंटल्यासारखे वाटले. बाॅंबे टु गोवा चित्रपटात अमिताभ आणि अरुणा इराणी च्या पाठोपाठ च्या फर्माइशी पुर्या करताना उषा उत्थुप जे गायली आहे ते ह्या पेक्षा जास्त एकसंध होते दोन वेगळी गाणी गाण्याचा प्रयत्न असुन.
हो. सुरुवातीची तान शास्त्रीय
हो. सुरुवातीची तान शास्त्रीय किंवा सेमी क्लासिकलची आणि मग कोळीगीत.
अरुंधतीला सर्दी झालीय. यशची केसांची स्टाइल बदललीय किंवा कपाळ लपवायचंय.
मी जसं तुझ्यासाठी थांबलो होतो, तसं ती माझ्यासाठी थांबली नव्हती असं आशुतोषने अरुंधतीला सांगितल्यावर तिने काहीतरी विचित्र चेहरा केलाय. बेसनाच्या लाडवात लिंबाच्या लोणच्याची फोड लागल्यासारखा.
भरत ..
भरत ..
काय उपमा!!
हे असे काहीतरी रँडम पॉईंट वर शॉट फ्रीझ करतात. म्हणूनही तिचा चेहेरा असा वाटत असावा .... पूर्ण शॉट घेऊन थांबावे ना....!!
बेसनाच्या लाडवात लिंबाच्या
बेसनाच्या लाडवात लिंबाच्या लोणच्याची फोड लागल्यासारखा.>>>>
अभ्याच बाहेर लफड असल्याचा
अभ्याच बाहेर लफड असल्याचा प्रोमो आला एकदाचा म्हणजे प्रेक्षकाना कल्पना होतीच फक्त लेखिकेला कळायच बाकी होत...अरु आता परत अभ्याच मुस्काड फोडणार का? ते एक तिला फार आवडत वर कॉम्प्लिमेटरी भलमोठ्ठ लेक्चर.
कोणीतरी अपडेट लिहा ना इकडे.
कोणीतरी अपडेट लिहा ना इकडे. बघायला वेळ नाही होते.
काल अन्घाच्या आईने
काल अन्घाच्या आईने देशमुखांच्या घरी वडे करून खायला घातले. हे काम अरुंधतीचे त्यामुळे अप्पा गोंधळले की ही कोण बाई. अनिरुद्धने तेवढ्यावरून आमच्या घरातल्या बायका बाहेर उंडारतात असं संजनाला सुनावलं. संजनाने त्याला तू घरातच बसला आहेस ना? मग कर घरकाम असं म्हणून त्याचे दात त्याच्याच घशात घातले. संजना अनिरुद्धचं प्रि डायव्होर्स कौन्सेलिंग होतं.
अन्घाने आमचं काही ठीक नाही असं आईला सांगून पाहिलं. आईने तिला उडवून लावलं. आपल्या लग्नाला किती काळ झाला हे अन्घाला नक्की माहीत नाही. दीडदोन वर्षे म्हणे.
कॉलेजातली गाण्याची स्पर्धा म्हणजे आशुबाळासाठी स्वयंवर असावं. अरुंधती आणि चिंगी यांत जी जिंकेल तिच्या पदरात हे दान पडणार. त्यांच्यात कोणाला कसं निवडायचं याचं बाळाला टेन्शन आलंय. अरुंधतीला काय त्याने तिला निवडलं किंवा चिंगीला, बाळाला वात्सल्याने सांभाळायचंच आहे. हे सगळं गाण्याच्या रूपकातून सांगितलं.
गाण्याच्या स्पर्धेत इशासुद्धा उतरणार आहे. आणि तिच्यापेक्षा मला जास्त मार्क दे असं अनीश चाचूला सांगतो.
गायनाची स्पर्धा आहे की द्वंद्वयुद्ध? इशा वि. अनिश.. चिंगी वि. अरुंधती.
आशुतोषला फोन येतो आणि कोणीतरी आपली जमीन देऊन तिथे म्युझिक स्कूल सुरू करा म्हणून सांगतो हे एवढं मोठं डील आशुबाळ नितीन् शिवाय अर्ध्या मिनिटात फोनवर फायनल करतो.
. (चिंगीची सोय झाली. दोन बायकांना दोन वेगवेगळी म्युझिक स्कूल )
लग्नाचा विषय काढा असं नितीनने आशुबाळाच्या आणि यशने अरुंधतीच्या डोक्यात ओतलं. मला तुझ्याशी बोलायचंय असं सांगून हे दोघे कुठेतरी कॅफे मध्ये भेटणार आहेत. अरुंधतीच्या घरी पेस्ट कंट्रोल चालू असावं.
अरुंधती कॅफेमध्ये गेली की तिथे देशमुखांकडचं कोणीतरी असलंच पाहिजे असा मालिकेचा नियम असल्याने तिथे अभिषेक एका तरुणीसोबत असतो. आशु-अरुचं पहले आप पहले आप संपायच्या आधीच हे अभि प्रकरण अरुंधतीला दिसतं आणि नकट्याच्या लग्नातल्या सतराशे विघ्नांतलं आणखी एक समोर येतं.
चिंगी - आशुतोष- वरमाई सुलेखा यांना खूपच ऑब्व्हियस डायलॉग दिले आहेत. चिंगीचा आशुशी बालविवाह झाल्यासारखाच आहे. फक्त गौना व्हायचा वाकी आहे. तो आशुबाळ वयात येत नसल्याने होत नसावा.
हे लोक शाळे त असतानाच बिछडले होते. तेव्हा आशु हिला नूडल्स करून घालायचा. त्याची चव तिच्या नेमकी लक्षात आहे. आशु अरुंधती यांच्या बातम्या चिंगी वाचायची , पाहायची. तरी त्याच्या वाढदिवसापर्यंत त्याला भेटायला आली नाही.
का ? असले प्रश्न विचारायचे नाहीत.
यश अधूनमधून गौरीवरून उसासे सोडतो.
स्वयंवर... Lol
स्वयंवर... Lol
भरत...
भरत...
बेस्ट!
आपल्या लग्नाला किती काळ झाला हे अन्घाला नक्की माहीत नाही. दीडदोन वर्षे म्हणे.
अरुंधती कॅफेमध्ये गेली की तिथे देशमुखांकडचं कोणीतरी असलंच पाहिजे असा मालिकेचा नियम असल्याने..
आणि वरमाई सुलेखा !!
सगळेच मस्त!
भारी लिहिलंयत भरत
भारी लिहिलंयत भरत
संजना आंटीच्या एका नाकपुडीत
संजना आंटीच्या एका नाकपुडीत मोती आहे, दुसऱ्या नाकपुडीत काय आहे?
भरत मला आधी वाटले अमा परत आल्या या धाग्यावर.
Pages