मला दाट संशय आहे,
की या पदरी भसाभस पडलेल्या आयुष्याचं मी काहीही करणार नाही!
जगण्याची सगळी माती सुपिक असेलही कदाचित...
पण मी इथं काहीही पेरणार नाही!
अन् मग अर्थातच... काहीही उगवणारही नाही!
मला दाट संशय आहे!
मला दाट संशय आहे की या हातांचा जन्म...
स्वत:चीच पत्रं आणि चित्रं टराटरा फाडण्यासाठी झाला असावा!
यांचे ठसे उमटलेलं एकही काव्य ह्यात राहू देत नाहीत हेच.
आणि कितीही करूणेनं पकडलं तरी निखळून, निखळून, निसटून जातं यांतून सारं
जे खरंतर मला कधीच जायला नको असतं!
हे हात मला फितूर असावेत...
मला दाट संशय आहे!
मला दाट संशय आहे की या पावलांना कुठेही जायचंच नाहीये!
नुसती पायपीट व्हायची आहे! त्याच त्या प्रश्नांच्या भवतालच्या आडवाटांत.
हमरस्ता टाळून या पायवाटांत शिरतात त्याला हरकत नाही...
पण किती वाटा अखंड तुडवूनही पत्ता काही सापडत नाही.
आणि जिथून चालले त्याही मातीत यांचे ठसे गवसत नाहीत.
कुठून आले ते लपवतात अन् कुठे चालले तेही सांगत नाहीत!
हे पाय बहूदा माझे नसावेत....
मला दाट संशय आहे!
मला दाट संशय आहे की या नजरेला... कसलातरी विचित्र थांग असावा!
समोर उभारलेल्या सगळ्या चित्रात तिचा असा कुठलाच रंग नसतो.
आणि ती जे रंगवत जाते... तिन्ही त्रिकाळ... ते कधीही उभारले जात नाही!
एकतर तिला काही दिसतच नसावं....
किंवा तिला खरं काही बोलवत नसावं....
समोरच्याला तिच्यापार निव्वळ शुन्यच का म्हणून दिसावं?
ही नजर कदाचित नशेत असावी....
मला दाट संशय आहे!
मला दाट संशय आहेत की हे सारे सामिल असावेत...
मीच रचलेल्या माझ्याच विरुद्धच्या मलाच गाफिल ठेवण्याच्या एका महान कटात!
आणि मी निमुट उत्सुकतेनं यांना एक दिवस शरण जाणार आहे!
या भसाभस आयुष्याचं काहीही न करता...
त्याला सपशेल गुंगारा देऊन...
जगण्याच्या सगळ्या मातीला बेमालूम मातीत मिसळून...
मी माझ्यातून पळून जाणार आहे!
मला दाट संशय आहे!
कमाल सुरेख
कमाल
सुरेख
मस्त!
मस्त!
खुप छान...खरोखरचं कमाल !!
खुप छान...खरोखरचं कमाल !!
वा, काय लिहिले आहे, जबरी
वा, काय लिहिले आहे, जबरी
सुपर्ब!!
सुपर्ब!!
खूप छान शब्दरचना..!!
खूप छान शब्दरचना..!!
OMG, कायतरी गूढ कट पण right
OMG, कायतरी गूढ कट पण right under your nose!
पहिल्यांदा अस्वस्थ वाटले पण कट उघडकीस आला तर हायसं पण वाटले.
तू काय लिहितेस गं बाई!
धन्यवाद!
धन्यवाद!
सुरेख!
सुरेख!
सही..
सही..
Specially fourth stanza.. ❤️
शप्पथ काय लिहिलस
शप्पथ
काय लिहिलस
धन्यवाद!
धन्यवाद!
आई ग्ग!! अस्वस्थ हाच शब्द
आई ग्ग!! अस्वस्थ हाच शब्द बरोबर आहे.
मस्त लिहले आहे.
मस्त लिहले आहे.
आवडली!
आवडली!
सुरेख आहे
सुरेख आहे
धन्यवाद!
धन्यवाद!
छान तरी कसं म्हणू? आत खूप
छान तरी कसं म्हणू? आत खूप खोलवर काहीतरी सललं एवढं मात्र खरं
❤️ कविता (आणि तुझी चित्रेही
❤️ कविता (आणि तुझी चित्रेही फार मस्त असतात.)
मस्त!
मस्त!
छान
छान
छान
छान
धन्यवाद!
धन्यवाद!
>>>मला दाट संशय आहे,
>>>मला दाट संशय आहे,
की या पदरी भसाभस पडलेल्या आयुष्याचं मी काहीही करणार नाही!
जगण्याची सगळी माती सुपिक असेलही कदाचित...
पण मी इथं काहीही पेरणार नाही!
किती सुरेख वर्णन आहे. - घडीने घडी काळ आयुष्य नेतो । देहान्ती तुला कोण सोडू पाहतो ॥