"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.
ह्या त्यातल्याच काही समजुती !
***
शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.
माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.
***
नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?
***
मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.
एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "
***
" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.
***
सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की
लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.
***
ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .
आमच्या खानदानात कुणी
आमच्या खानदानात कुणी विमानप्रवास केलेला नव्हता. त्या वेळी विमान चहा नाश्त्यासाठी हवेत थांबतं. वेळ झाला कि पायलट सर्वांना आवाज देतो असं वर्गातली मुलं छातीठोकपणे सांगायची. विमानतळाचं वर्णन पण ऐकलं होतं. बोगदेच बोगदे असतात. आपण चुकीच्या बोगद्यात गेलो तर चुकीच्या विमानात शिरतो मग आपल्याला ते नेईल तिथे जावंच लागतं. त्या वेळी अचूक बोगद्यात कसं जायचं यावर एकमत झालं नव्हतं.
भारी समजुती होत्या एकेक..
भारी समजुती होत्या एकेक..
मानव, नाही, काल्पनिक गोष्ट होती ती बहुतेक. किशोर दिवाळी अंकात वाचली असावी.
>> विमानात शिरले तरी मला
>> विमानात शिरले तरी मला कळलेच नव्हते
+१ सीटवर बसल्यावर मी विचार करू लागलो कि विमान नक्की कुठे सुरु झाले होते
वाघिनींची गोष्ट मीही वाचलेली,
वाघिनींची गोष्ट मीही वाचलेली, पाठ्यपुस्तकात की अन्यत्र कोठे हे आठवत नाहिये. तेव्हाही वाघ, वाघिण हेच डोक्यात होते. असे कित्येक शब्द होते ज्यांचे अर्थ माहित नव्हते, कोणाला विचारले नाही, कोणी सांगितले नाहीत. हिन्दीच्या पुस्तकात महादेवी वर्मांचा एक धडा होता ज्यात त्यांनी ‘गिलहरी रंग के…’ असा काहितरी उल्लेख केला होता. गिलहरी म्हाणजे नक्की काय हे तेव्हा माहित नव्हते.
पाठ्यपुस्तकात "त्यांचे सोने
पाठ्यपुस्तकात "त्यांचे सोने झाले" हा धडा होता, फायरमन चमनलाल यांच्यावर. त्यात रेल्वे डब्यांना वाघीण शब्द होता.
"त्यांचे सोने झाले" हा धडा
"त्यांचे सोने झाले" हा धडा आठवतोय. पण त्या वाक्प्रचाराचा अर्थ कळाला नव्हता तेंव्हा त्या वयात.
अजून एक "चणीया" नावाच्या मुलावर धडा होता कुणाला आठवतोय का? बहुतेक आदिवासी मुलगा होता हा. त्यात एक ओळ होती "त्याच्या झोपडीत डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही इतका अंधार होता" अशी ओळ होती. कळायचे नाही कि दिसण्यासाठी डोळ्यात बोट तसेही का घालेल कोणी?
(No subject)
@ अतुल,
हा घ्या चणिया..
शिरोडकर नावाचे एक जण
शिरोडकर नावाचे एक जण बालभारतीच्या पहिली ते दहावी कविता संकलित करायचे. त्यांचाच ब्लॉग आहे का ?
वाह निरु सर काय मस्त शोधून
वाह निरु सर काय मस्त शोधून काढलेत अगदी! कमाल _/\_ अजून ती चित्रे नी धडे आठवतात. बालभारतीने स्कॅन करून अपलोड केलीयेत बहुतेक. छान आठवण शेअर केलीत. खूप खूप धन्यवाद
लहान असताना धाकटा काका शाळेत
लहान असताना धाकटा काका शाळेत सोडायला यायचा. काकाच मित्रपण सोबत असायचे. त्या वेळी हे लोक गाण्यात आजा हा शब्द नेहमी वापरत.
आ जा , आ जा , तुझको पुकारे मेरा प्यार हो, आजा आजा मै हू प्यार तेरा... ही गाणी गाऊन झाली कि काकाला मोठ्याने रफी असे स्वतःशीच उच्चारायची सवय होती. मुलांंची नावे अपभ्रंश करून घेणे कंपल्सरी होते. विजयचं विजा किंवा ईज्या, प्रसाद चा पश्या तसंच अजयचं आजा असायचं. गाण्यात आजाला एव्हढं का स्थान हे कळायचं नाही तेव्हां. आजा मात्र फुगायचा.
(किस्सा खरा आहे. अमानवीय, सांस्कृतिक धक्का धाग्याप्रमाणे रचलेला नाही).
हे अगदी अगदी माझ्या वर्गात
हे अगदी अगदी माझ्या वर्गात लहानपणी भिकाजी नावाचा मुलगा होता. त्याला बोलवताना सगळे भिक्या म्हणत. "ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जिना" गाण्यात भिक्या चे नाव आले आहे असे वाटायचे. (मला वाटतंय मी हे "चुकीची ऐकू आलेली गाणी" धाग्यावर याआधी लिहिले आहे)
पूर्णपणे मराठी वातावरण असलेला काळ होता. खेडेगावात आणि छोट्या शहरांत तर होताच होता. आम्हाला हिंदी विषय पाचवीला असल्याने त्या आधी हिंदी गाण्यांतील शब्दांबाबत आणि अर्थाबाबत आनंदी आनंद होता. 'तेरे बिना मेक्या' वगैरे काहीही कळत नव्हते. "क्या जीना" मध्ये मराठी जिन्याचा उल्लेख आहे असे वाटायचे. "याद आ रही है" गाणे दरवाज्याशी संबंधित आहे (या दार हि) अशी समजूत होती.
गावात तेंव्हा मुलीं/स्त्रियांसाठी पंजाबी ड्रेसचा अद्याप शिरकाव झालेला नव्हता. मुली परकर पोलके आणि स्त्रिया साडी नेसंत. त्यामुळे कधी शहरात गेल्यावर पंजाबी ड्रेस घातलेल्या मुली या सगळ्या पंजाबी मुली आहेत असे वाटे.
"तेरे बिना भी क्या जिना " व
"तेरे बिना भी क्या जिना " व "या दारही है!" हे दोन "तर तो कोणते गाणे म्हणेल" ला फिट्ट आहेत !
अजून एक समज
अजून एक समज
आपण पृथ्वीच्या आत राहतो, म्हणजे पृथ्वी जर गोल चेंडू सारखी असेल तर मध्यभागी सपाट जागेवर आपण राहतो , खालती खड्डे खोदले कि.. खूप आतमध्ये पातळ किंवा नरक . वरती आकाश म्हणजे चेंडूचा वरचा भाग. आणि थोडे आकाश आणि ढग झाले कि वरती स्वर्ग .
अजूनही माझ्या डोळ्यासमोर तो पृथ्वीचा गोल येतो ..
आणि जेव्हा शाळेत पहिल्यांदा
आणि जेव्हा शाळेत पहिल्यांदा पायथॉगोरिअन theorm शिकवलेला तेव्हा सरांचं डोकं खाल्लेल पण हे असाच sine का ? कुणी सांगितलं ?? सर बिचारे पायथॅगोरिअन सांगून सांगून दमले ...
आणि हिमालय म्हणजे हिमाच आलय म्हणजे हिमाचे घर ऐकून, म्हणजे हिमालय फक्त बर्फ पासून बनलाय का?.. कीतीही खोदलं तरी बर्फाचं असेल का ? दगड , माती काहीच नाही का? .... बहुतेक भूगोलाच्या बाईंचं पण डोकं खाल्लंय
आमच्या शाळेमध्ये थोडे लांब
आमच्या शाळेमध्ये थोडे लांब केस असले तर रिबीनीने वेण्या वर बांधणे कंपलसरी होते. किंवा केस मोकळे सोडले तर चालत नसे . एकदा मला सहाच काही कारणावरून एक बाई ओरडल्या "काय हिरोईन आहेस काय ?" अशा तर्हेच काहीस . मी मोठी होते तरी जे भोकाड पसरलं तशीच रडत वर्गात, मग\ नेहेमीच्या बाईंनी विचारलं काय झाल ... मग नि रडताच सांगितलं "मला हिरोईन म्हणाल्या " परत यमुना गंगा चालूच...
मग बाईंनी माझी समजूत काढली, शांत केलं etc. etc.
मला गंमत ह्याची वाटते कि तेव्हा "हिरोईन " म्हणजे मी शिवी सारखं पकडलं आणि अजून हसू येतं आठवलं की .. किती चमे होतो तेव्हा :):)
हिरो हिरॉइन घरून कपडे घेऊन
हिरो हिरॉइन घरून कपडे घेऊन येतात.
झीनत अमान खूप गरीब आहे.
मक्या अमक्या आरशात आपण उलटे
मक्या अमक्या आरशात आपण उलटे दिसतो. मला वाटे म्हणजे वर पाय-खाली डोके - असे असेल.,>>>>
यावरून आठवले... भुताचे पाय उलटे असतात म्हणजे मला वाटायचे की डाव्या पायाला उजवे पाऊल आणि उजव्याला डावे. तर माझी मैत्रीण म्हणायची की.. छे छे उलटे म्हणजे तळवे वर ...<<<< आम्हाला वाटायचे भुताचे पाय उलटे म्हणजे १८० डिग्रीत फिरवलेले म्हणजे बोटं आणि पॉल केसांच्या साईड ला
हा एक प्रचंड क्यूट धागा होईल
हा एक प्रचंड क्यूट धागा होईल असं पोटेन्शियल आहे. पण सध्या खूप अंडररेटेड आहे. शीर्षक 'लहानपणीच्या निरागस समजुती' अशासदृश काहीतरी केल्यास जास्त लोक वाचतील काय?<<< हरचंद पालव तुमचे खूप धन्यवाद !!!
तुम्ही सुचवल्याप्रमाणे नाव बदललं तर सगळ्यांनी ऐक्य मजेशीर आणि रम्य आठवणी, भाबड्या समजुती शेअर केल्या . खूपच मजा आली वाचायला
>> नवरा-नवरी
>> नवरा-नवरी
>> लहानपणी कोणत्याही लग्नात गेलो कि मुंडावळ्या बांधलेले नवरा-नवरी दिसायचे... जाडजूड व चेहरा पूर्ण झाकला जाई अशा तगड्या मुंडावळ्या...
>> ...
>> Submitted by अतुल. on 30 November, 2022 - 23:15
एक दुरुस्ती:
या माझ्या प्रतिसादात 'मुंडावळ्या' ऐवजी 'बाशिंग' हा शब्द हवा आहे. चुकून 'मुंडावळ्या' लिहून गेलो. पूर्वी कागद आणि पातळ मेसकाठी वापरून मोठे बाशिंग बनवत असंत. तो संदर्भ आहे इथे.
बैलाला लावतात ते काय मग ?
बैलाला लावतात ते काय मग ?
>> हिमालय फक्त बर्फ पासून
>> हिमालय फक्त बर्फ पासून बनलाय
+१ हो अगदी असाच माझासुद्धा समज होता.
आपल्याला भूत दिसलं तर डाव्या
आपल्याला भूत दिसलं तर डाव्या पायातली चप्पल उजव्या पायात घालणे आणि vice versa करायचं.
मग भूत आपलयाला काही करत नाही.
हे कुठून आलेलं देव जाणे.
भूतांचे पाय उलटे म्हणजे टाच पुढे आणि बोटे मागे हेच डोक्यात होते.
>> बैलाला लावतात ते काय मग ?
>> बैलाला लावतात ते काय मग ?
हो. त्यालाही बाशिंग च शब्द आहे.
हिमालय फक्त बर्फ पासून बनलाय
हिमालय फक्त बर्फ पासून बनलाय >> +१
हो. त्यालाही बाशिंग च शब्द
हो. त्यालाही बाशिंग च शब्द आहे. >> अरेच्चा ! म्हणजे नवरदेव आणि बैल यात काहीच फरक करत नव्हते पूर्वीचे लोक.
बाशिंग अजूनही असते कि हो
बाशिंग अजूनही असते कि हो लग्नात, नवरा नवरी दोघांनाही. असे का?
लग्न झाल्याचे लक्षातच नाही.
लग्न झाल्याचे लक्षातच नाही. त्यामुळे क्षमस्व !
हो हिमालय फक्त बर्फाचा बनलाय
हो हिमालय फक्त बर्फाचा बनलाय असं मलापण वाटायचं
आठवीनंतरच्या समजुती निरागस
आठवीनंतरच्या समजुती निरागस मधे मोडतील का ?
अनुप तेल आलं होतं. अनुपम खेरच्या टकलाचे जोक्स पण प्रचलित होते.
त्या वेळी एका मुलाने सांगितले होते कि टकल्यांची टिंगल करू नये. त्यांच्याकडे "ती" पावर जास्त असते.
लहानपणी मराठीत समूहवाचक नावे
लहानपणी मराठीत समूहवाचक नावे जेव्हा शिकवली होती (पक्ष्यांचा थवा, हरणांचा कळप वगैरे), त्यातले काही शब्द फारच नवीन होते. त्यात एक शिकवलं होतं, की किल्ल्यांचा जुडगा. मला अनेक वर्षं असं वाटायचं की एखाद्या भागात खूप किल्ले असले की ते जिथे जोडले जातात त्याला म्हणायचं जुडगा. एकदा राजगड किल्ल्यावर गेलो असताना आजूबाजूला तोरणा, रायगड वगैरे बघून म्हटलो देखील होतो की इथे किल्ल्यांचा जुडगा तयार झाला आहे.
Pages