"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.
ह्या त्यातल्याच काही समजुती !
***
शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.
माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.
***
नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?
***
मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.
एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "
***
" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.
***
सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की
लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.
***
ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .
कसोटी क्रिकेट मध्ये 'भारताने
कसोटी क्रिकेट मध्ये 'भारताने रबर जिंकले' अशा बातम्या यायच्या त्यावेळी आम्ही चर्चा करत असू.
'ते सोन्याचं खोडरबर असतय बे ! जिंकलेल्या टीम ला मिळतय बे !'
( सोलापुरी टोन मध्ये वाचावे)
क्रिकेटमध्ये 'बळी' या शब्दाचा
क्रिकेटमध्ये 'बळी' या शब्दाचा अर्थ सुद्धा नीट कळत नसे, असे अजूनही कोणास आठवते का? कारण ठार मारण्याला सुध्दा 'बळी देणे' हाच शब्द असायचा. (अर्थात हे खूप लहानपणी म्हणजे चौथी पाचवीत असताना असेल)
अरे वा! द्वितियेचा जोक वाचुन
अरे वा! द्वितियेचा जोक वाचुन मजा आली.
@पान पराग त्याच उत्तर आत्ता
@पान पराग त्याच उत्तर आत्ता मिळालं तरी चालेल मला. की पान पराग मध्ये तंबाखू असतें का नसते Happy
Submitted by मी बिल्वा. on 17 December, 2023 - 18:21
>>>>>>
दोन्ही प्रकारचे मिळतात, साधे आणि तंबाखुयुक्त. दोन्ही पुड्यांचा रंग वेगळा असतो, तंबाखु नसलेली पुडी निळ्या रंगाची.
(मायबोलीवर वेळ लागेल पण उत्तर मात्र मिळतं. )
यहां अमके अमके मना आहे. हे
यहां अमके अमके मना आहे. हे वाक्य मला होकारार्थी वाटे. मना है - हे नकारार्थी कसे असेल.
"मना नही है " असे हवे ना!
Pages