मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खिडक्या अर्ध्या उघड्या>>> आज किंडलवर घेतलं आणि अंतर्बाह्य पण - रत्नाकर मतकरींचं.
होप सो दोन्ही चांगली असतील.

शब्दार्थ
वर्णित
वर्णित varṇita p S Extolled or eulogized. 2 Described, depicted, pourtrayed.
मोल्सवर्थ शब्दकोश

याचेच आकारांत करून स्त्रीलिंगी नाव वर्णिता असा अर्थ घेतल्यास छान अर्थ होईल.
मुला मुलींची नावे सुचवा मध्ये सुचवता येतील दोन्ही. Wink

जिन्यात सापडलेल्या मृतदेहाबद्दलची कथा यात आहे का? >>>नाही.

खिडक्या अर्ध्या उघड्या >>> एक नंबर आहे हे पुस्तक! माझं ऑटाफे. मी तीन वेळा वाचलंय.

खिडक्या किंवा इन्स्टॉलेशन्स या पुस्तकांमध्ये इंग्रजीमिश्रित मराठीचा बराच वापर आहे. बटरफ्लायमध्ये अगदी कमी आहे.

खिडक्या अर्ध्या उघड्या ......आज लायब्ररीतून हे पुस्तक आणलं.पण त्याला वाचायला वेळ आहे.

सद्या महाबळेश्वर सैल यांचे तांडव हे पुस्तक वाचतेय. गोव्याच्या भूमीत पोर्तुगीजांच्या वेळी जे धर्मांतर घडले त्यावर ही कादंबरी आहे.प्रथम हे पुस्तक घेणार नव्हते.पण मान्यवरांच्या अभिप्रायामुळे घेतले.प्रथम काही पाने वाचून कंटाळा आला.नंतर उत्सुकता वाढलीय. जसं आहे तसे लिहिलं असावं अशी सुरुवातीची पाने वाचून वाटतेय.

मधल्यामध्ये दिवाळी अंक बाजूला राहिले आहेत.अक्षर जवळपास होत आला.अजून बाकीचे वाचायचे आहेत.

एक नंबर आहे हे पुस्तक! माझं ऑटाफे. मी तीन वेळा वाचलंय.>>> ओह धन्यवाद ललिता.
मलाही छान वाटतंय. काल सुरू केलं वाचायला.

देवगंधर्व
(भास्करबुवा बखले चरित्र )
शैला दातार
राजहंस प्रकाशन, पहिली आवृत्ती १९९५,दुसरी१९९७

पाने ३१५ +२५संदर्भ सूची

लेखिका शैला दातार या बुवांची नातसून. त्यांनी श्री.ना.पेंडसे यांचेकडे बुवांचे चरित्र लिहिण्याचे मनोगत व्यक्त केले १९८०मध्ये. बुवांचा जन्म १८६९ आणि निधन १९२२. पेंडसेनी काही सूचना केल्या की चरित्र कसे असावे. पुढे पंधरा वर्षे माहिती,पुरावे,फोटो गोळा करत राहिल्या आणि हे चरित्र लिहून काढले तीनशे पानी. पीएचडीसाठी देणार होत्या पण पेंडसे म्हणाले की याने नावापुढे डॉ.पदवी नक्की लागेल आणि शोधनिबंधाचे बाड कुठल्यातरी कपाटात धूळ खात पडून राहील. प्रकाशन केल्यास वाचक आणि श्रोते वाचत राहतील.
माझा काही विषयांशी संबंध नसला ( संगीत,सिनेमा,नाटक इत्यादी) तरी त्यातील लोकांची चरित्रे वाचतो. आणि हे चरित्र पाहिले की संगीतप्रेमींना घबाडच मिळेल. एकूण लेखनाचा प्रयोग आणि कष्ट स्तुत्य आहे. राजहंस प्रकाशनाचेही आभार.
चांगले पुस्तक आणि आदर्श लेखनप्रपंच.

दुष्काळ आवडे सर्वांना.
अक्षर प्रकाशन,
पाने ३५०, आवृत्ती मराठी २००३,२००७.
पी.साईनाथ यांनी भारतातल्या आदिवासींच्या जीवनावर टाईम्स ऑफ इंडिया पेपरासाठी रिपोर्ट तयार केले त्यावर एक पुस्तक प्रकाशित केले होते १९९५ मध्ये - दुष्काळ आवडे सर्वांना. ते वाचत आहे. आदिवासींची सरकारकडून, स्थानिक, आणि सुस्थापितांकडून होणारी फसवणूक हा विषय.

शैला दाता र माझ्या सासुबाईंकडे पण संगीत विष् यक चर्चे साठी शिक्षणासाठी येत असत. छान असेल पुस्तक.

मोबाईलवर Kindle app साठी Excel चे फ्री डाऊनलोड इबूक. डाऊनलोड केल्यावर ते पुस्तक Kindle app मध्ये दिसू लागेल. Excel शिकण्यासाठी बरीच पुस्तके आहेत. हे एक तुमच्या मोबाईलवर कायम राहील झटपट Excelची अडचण शोधण्यासाठी. नवशिक्यांना उपयोगी. (३० नोव्हेंबरपर्यंत ? )
Excel Basics: A Layman’s Introduction in using Spreadsheets eBook : Ibnalkadi, Hicham and Mohamed: Amazon.in: Kindle Store
लिंक
https://www.amazon.in/Short-Introduction-Office-Excel-Non-Fiction-ebook/...

३९७०४/
इजिप्त एक सफरनामा
डॉ.विजय घैसास
स्नेहल प्रकाशन, पहिली आवृत्ती २००६
पाने १३५. रंगीत फोटो १२,दोन नकाशे.

चांगली माहिती. इजिप्तच्या इतिहासासह कुठे काय बघितले हे दिलं आहे.
__________________

शैला दातार यांचा देवगंधर्व या पुस्तकासंदर्भातला लेख, फार पुर्वी मटा त वाचल्याचं आठवतंय. खूप मेहनत घेतली त्यांनी.

Sharp Objects (Gillian Flynn)

अमेरिकेतल्या एका लहानशा गावात एका लहान मुलीचा मृत्यू झालेला असतो. आणि वर्षभराने आणखी एक मुलगी नाहीशी झालेली असते. शिकागोतल्या एका जेमतेम चालणार्‍या वृत्तपत्राच्या संपादकाला त्यात काहीतरी कनेक्शन असावं असं वाटतं. ती स्टोरी खणून काढली तर आपल्या पेपरला फायदा होईल असा त्याचा होरा असतो.
तिथे नोकरी करणारी एक पत्रकार मुलगी (कॅमील) मूळची त्याच गावची असते. तो तिलाच त्या कामगिरीवर पाठवतो.

तिने १५-१६ वर्षांपूर्वीच ते गाव सोडलेलं असतं. गावात तिची आई, सावत्र बाप आणि सावत्र बहीण राहत असतात. तिची गावाशी, घराशी फारशी अ‍ॅटॅचमेंट नसते. ती जरा नाखुषीनेच तिथे जाते.

पुढे त्या दुसर्‍या मुलीचाही मृत्यू झाल्याचं निष्पन्न होतं. दोघींच्या मृत्यूत काही ना काही कनेक्शन असणारच, याची खात्री पटते. स्थानिक पोलीस तपास करत असतात. एफ.बी.आय.ही येतात.
कॅमील शिकागो पेपरला काही ना काही पाठवायलाच हवं म्हणून आपल्या पद्धतीने 'स्टोर्‍या' शोधत असते. त्यातून एकेक गोष्टी उघड व्हायला लागतात.

त्या मुलींचा खून झालेला असतो. पोलीस आणि कॅमील आपापल्या पद्धतीने खुन्यापर्यंत पोचतात. त्यातला पोलीस तपास पुस्तकात येत नाही. कॅमीलचा शोध अगदी सविस्तर येतो.
तिच्या लहानपणीच्या आठवणी, तेव्हाच्या मैत्रिणी, गावातल्यांचे आपांपसांतले संबंध, हेवेदावे, दारू, ड्रग्ज, तरुणाईचा स्वैराचार हे संपता संपत नाही. अनेक ठिकाणी 'चला, आता पुढे सरका' म्हणावंसं वाटलं.
रहस्य उलगडण्यासाठी या सगळ्याचा लेखिकेने जाणूनबुजून वापर केला आहे. कारण- खुनी आणि खुनाचं कारण.
पण त्यामुळे मला काही काळाने कंटाळाही आला. पुस्तक पूर्ण करायला वेळ लागला.

गिलियन फ्लिन हे नाव 'गॉन गर्ल' सिनेमामुळे माहिती होतं. 'शार्प ऑब्जेक्ट्स' हे तिचं पहिलं पुस्तक. त्यामुळे मी फार अपेक्षा ठेवून वाचलं. तितकं मला आवडलं नाही.
तरी अगदी शेवटाकडे जरा अनपेक्षित ट्विस्ट येतो. तो आवडला.

काही पुस्तकांच्या कादंबरीत गोष्ट ढिसाळ असते परंतू फिल्म करणाऱ्यांना त्यात मसाला सापडतो अडीच तास गुंतवण्याचा.

City of Joy ( कोलकाता शहराविषयी)लिहिणारा लेखक डॉमिनिक लपीए यांचं ९१ वयाला वार्धक्याने निधन. त्या पुस्तकाचे उत्पन्न कोलकात्याच्या एका ट्रस्टच्या दिले आहे.

गाव
रिक्टर कॉनरड या लेखकाचे मूळ पुस्तक 'द टाऊन' याचा मराठी अनुवाद (१९६०)- जी.ए.कुलकर्णी. नवीन आवृत्ती २००८.
पाने ३५०
अमेरिकेतल्या एका गावातील एका मोठ्या कुटुंबाची कहाणी. पण १९६० मध्ये त्याचा अनुवाद मराठी वाचकांच्या माथी का मारलाय ते कळलं नाही. लेखक जी.ए.कुलकर्णी असले तरीसुद्धा पटत नाही. कथेत विशेष काही नाही.
>>>

SRD,
ही सिरिज आहे ३ पुस्तकांची. रिश्टरच्याच ३ पुस्तकांचा अनुवाद जी एं नी केलेला. रान, गांव व शिवार. तुम्ही एकदम मधले वाच्ल्याने असं झालं असेल..

गिलियन फ्लिन हे नाव 'गॉन गर्ल' सिनेमामुळे माहिती होतं. 'शार्प ऑब्जेक्ट्स' हे तिचं पहिलं पुस्तक. त्यामुळे मी फार अपेक्षा ठेवून वाचलं. तितकं मला आवडलं नाही. >> गॉन गर्ल चा ट्विस्ट नि एकंडर फ्लो परत जमेल असे वाटत् नाही.

या भाषांतराबदल नंतर दुर्गाबाईंच्या लेखनात कळलं की "त्या काळी जयवंत दळवींना काम मिळालेलं परदेशी प्रकाशकाचं. की अमुक पुस्तकं भाषांतरीत करून घ्या. पैसे चांगले मिळणार होते. मग दळवींनी ती वाटली निरनिराळ्या लेखकांना. जी.ए.,मी आणि दोन तीन लेखकांना काम मिळालं. मीही दोन भाषांतरीत केली." - दुर्गाबाई.

@हेम , बरोबर मला हे मधलंच एक दिसलं ते मी आणून वाचलं. तीन पुस्तकांच्या मालिकेतलं एक असलं तरी काहीही बोध झाला नाही किंवा पुढचा मागचा भाग {असला तरी} वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली नाही. पुस्तक घेताना विचार आला की जी.ए.नी या पुस्तकाचं भाषांतर केलं म्हणजे काही विशेष असणार. पण दुर्गाबाईंच्या उलगड्यानंतर आता तो गैरसमज दूर झाला.

दळवी युसिसमध्ये होते. United States information service.
त्यांनी युसिससाठी हे अनुवादाचे काम दिले.
शांता शेळके यांनी चौघीजणी हा अनुवादही याच अंतर्गत केला.

City of Joy.... हे फार थोर पुस्तक आहे.कुष्ठरोग्यांसाठी लापियरे यांनी केलेले काम वंदनीय आहे.

तसेच तामिळनाडूमध्ये अशा रुग्णांसाठी परदेशी मिशनरींनी /डॉक्टर्सनी केलेल्या कार्यासंबंधी एक पुस्तक वाचले होते.नाव आठवत नाही.पण फार कमाल आहे त्या माणसांची!भले कुठल्याही हेतूने ते इथे येऊ दे.पण सर्वस्वी अपरिचित ठिकाणी येऊन अशी सेवा करणे मोठे आहे.

लिताप्रिती, छान.

देवकी, तुला डॉ आयडा स्कडर म्हणायचंय का? मी वाचलंय ते पुस्तक. फार छान काम. नुसती रुग्णसेवाच नाही तर नवीन मुलींना नर्स ,डॉ बनवण्यासाठी पुन्हा मायदेशात जाऊन निधी गोळा करून तशी शिक्षणसंस्था उभारणे. रुग्णसेवा देऊन स्वतः शिकवायला जाणे कारण वेगळा शिक्षक परवडत नाही. आठवड्यातून फिरती रुग्णसेवा देणे. सुरवातीला तर गावच्या वेशीवर उभे राहणे पेशन्ट नि यावे म्हणून. डेंटिस्ट पासून सगळी कामं करणे. मदतनीस सिस्टर कोण तर स्वैपाक करणारी एकजण. मुळात त्याना इथं खेड्यात राहायचंच नव्हतं. सुट्टीच्या काळात आईला भेटायला म्हणून आल्या आणि एक रात्रीत तीन महिलांचे मृत्यू बघून निर्णय बदलला. आवडलेलं ते पुस्तक.

काही पुस्तकांच्या कादंबरीत गोष्ट ढिसाळ असते परंतू फिल्म करणाऱ्यांना त्यात मसाला सापडतो अडीच तास गुंतवण्याचा.

>>> नाही हो, गोष्ट ढिसाळ अजिबात नाहीये. मला तितकीशी आवडली नाही, इतकंच

देवकी, तुला डॉ आयडा स्कडर म्हणायचंय का?...... नाही. बहुतेक मिशनरी डॉक्टर म्हणून आलेल्या एका पुरुष डॉक्टर आणि त्याचे कुटुंब असे आहे.वेल्लोर चे हॉस्पिटल असावे.

डॉ आयडा स्कडर,आता मिळवले पाहिजे.

वेल्लोर चे हॉस्पिटल असावे. >> मी म्हणतेय त्यात पण वेल्लोर /वेल्लुरचेच हॉस्पिटल उभारले आहे. मूळ मिशनरी कुटुंब भारतात त्या तमिळनाडू तल्या खेड्यात येते. त्यांची मुलगी आयडा स्कडर . सुट्टीत आईला बरं नाही म्हणूम भेटायला येते. परत तिच्या मूळ आंनदी आयुष्यात - अमेरिकेत जाणार असते आणि एक रात्रीत तीन वेगवेगले स्त्री मृत्यू बघते. परपुरुषाने तपासायचे नाही म्हणून. स्त्री डॉ नाही म्हणून हाल होतायत इथल्या पेशनट्स चे म्हणून परत जाऊन डॉकटरकीचं शिक्षण घेऊन येते ....
तू म्हणतेस तसं भले कोणत्याही हेतूने येउदेत. त्यांचे वडील डॉक्तरकी आणि धर्मप्रसाराचे काम ही आवडीने करायचे. डॉ आयडा नी धर्मप्रसार नाही केला. फक्त रुग्णसेवा आणि शिक्षणप्रसार केला.

धर्मप्रसार नाही केला. फक्त रुग्णसेवा आणि शिक्षणप्रसार केला.

मागे लिहिलंय की रेव्हरंड टिळकांनी धर्म का बदलला याबद्दल लक्ष्मीबाई टिळकांनी काय म्हटलंय हे शोधण्यासाठी ते चरित्र वाचले. ( शालेय पुस्तकात धडे होते यातले पण पोहोच परीक्षेच्या गुण मिळवण्या पलिकडे तेव्हा नव्हती. आता वाचन झाले.)वैद्यकीय सेवा,औषधे,उपचार आणि लक्ष दिले जाते हे त्या काळात जनसामान्यांना पोहोचले. शिवाय साथीचे रोग येत होतेच. मग यातून लोकांना आपोआपच वेगळे विचार सुचू लागले.
अगदी स्पष्ट काहीच झाले नाही तरी आमच्या समाजाची धारणा आणि उपेक्षा खूपच कारणीभूत होती हे लक्ष्मीबाई टिळक सहज सांगून जातात.

मोठे लेखक हे समाजाला सहज शिकवून जातात. प्रेमचंद हे त्यापैकी एक. रशियन लेखकही.

डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी
- डॉ. विकास, आणि विनीता गोगटे.(नाशिक)
मेहता प्रकाशन, प्रथमावृत्ती २००४.
पाने ३८०.
बहुतेक सर्व आजारांवर थोडक्यात एक दीड पानभर { कोट्या करत}माहिती आणि सोपे उपचार आणि 'शेवटी थोडी गंमत' म्हणजे विनोदी चुटका. सर्वच चुटके हसवतात आणि पुस्तक हलके होते , संभाव्य रुग्ण चिरायु होण्याची खात्री. याच पुस्तकाबरोबर आणलेल्या 'मोहिनी' दिवाळी अंकातील विनोदी व्यंगचित्रेही फिकी पडली.
( इथे वैद्यकीय लेख लिहिणारे डॉ.कुमार यांनी फार मनावर घेऊ नये, त्यांचे लेखन सुरूच ठेवावे.)

Srd
छान परिचय.
नाही घेत मनावर ! Happy

बिझनेस लेजंड्स,
( Business Legends by Gita Piramal ,Penguin publication या पुस्तकाचा अनुवाद) - अशोक जैन.
मेहता पब्लिशिंग
आवृत्ती २००२,२००६.
पाने ४७५

चार उद्योगपती
घनश्यामदास बिर्ला,
वालचंद हिराचंद दोशी,
कस्तुरभाई लालभाई,
जहांगीर रतन दादाभॉय टाटा.

उद्बोधक चरीत्रे आणि त्यांच्या काळातील व्यक्ती,नेते तसेच घटनांवर माहिती एकाच ठिकाणी मिळते. विसाव्या शतकातील राजकीय आणि औद्योगिक घडामोडी म्हणूनही पाहता येईल.

Pages