फॉल सुरू झाला , पानांचे रंग बदलायला लागले, गुलाबी थंडी पडायला लागली, बाजारात भोपळे दिसायला लागले, कॉफी शॉप्स मध्ये दालचिनी, जायफळाचे वास दरवळायला लागले की आम्हाला फॉल मुव्हीज बघण्याचे वेध लागतात. नोरा एफ्रानने आमचे आवडते फॉल मुव्हीज बनवलेले आहेत. तिने जसे फॉल मधले न्युयॉर्क दाखवलेले आहे त्याला तोड नाही. ही यादी सुरू होते ती You've got mail ने. हा पिक्चर फॉल मध्ये सुरू होऊन - हार्ट ब्रेक्स चा विंटर आणून - स्प्रिंग मध्ये नवीन पालवी बरोबर नवे प्रेम घेऊन येतो. पण तरीही त्यातले फॉल चे चित्रीकरण आणि प्रेमकथा
खूपच आवडती आहे. दुसरा चित्रपट आहे Sleepless in Seattle . यात सुद्धा आपली नायिका वेड्यासारखी आपण न पाहिलेल्या माणसाच्या प्रेमात पडते. प्रेमकथा सुंदर आहेच पण त्यातले न्युयॉर्क आणि सिअॅटल अगदीच प्रेक्षणीय आहेत. यातला थोडा मॅच्युअर म्हणता येईल असा चित्रपट म्हणजे When Harry met Sally. यात सुद्धा फॉल मधले न्युयॉर्क डोळ्यांत साठवत आपण एक हळूवार प्रेमकथा अनुभवतो.
विंटरची चाहूल लागल्यावर सगळीकडे दिव्यांच्या माळा लागायला लागतात. बिल्डींग्स मध्ये जागोजागी क्रिसमस ट्रीज सजतात. हिरव्या - लाल रंगाच्या रोषणाईत गोष्टी झळाळतात. अशाचवेळेस आम्हाला आठवण येते केव्हीन मॅकॅलिस्टरची. क्रिसमस निमित्त आमचे आवडते मुव्हीज आहेत ते म्हणजे Home Alone 1,2,3. पहिला Home Alone शिकागोच्या उपनगरातल्या मोठ्या घरात घडतो. आपल्याला त्या झोपाळू गावातले बर्फाने भरलेले रस्ते, शांत वस्त्या आकर्षित करतात. अशा शांततेत चोरांचा बंदोबस्त करणारा केव्हीन लहान असूनही सुपरमॅन वाटतो. त्यातले चर्च समोरचे मँजर, चर्चमधले कॉयर त्या विंटरची मजा वाढवते. दुसर्या भागात केव्हीन म्हणतो की क्रिसमसच्या वेळेस कसे बाहेर बर्फ पाहिजे - मोठे ट्री पाहिजे आणि यावेळेस तो शांत उपनगरात न राहता सगळ्यांत गजबजलेल्या शहरात - न्युयॉर्क मध्ये येतो. केव्हीन बरोबर आपण सुद्धा नटलेले न्युयॉर्क बघतो. खेळण्यांच्या दुकानात लहान मूल होतो. आणि परत एकदा चोरांना हरवताना टाळ्या वाजवतो. तिसर्या चित्रपटात केव्हीन नाही पण हा सुद्धा एक क्रिसमसच्या काळातला गिफ्ट मिळून गंमत होणारा चित्रपट आहे.
असे आमचे आवडते फॉल आणि विंटर चे चित्रपट आहेत. तुमचे असे कुठले आवडते चित्रपट आहेत का जे तुम्ही आवर्जून बघता? नक्की लिहा.
पोलर एक्स्प्रेस
पोलर एक्स्प्रेस
नट क्रॅकर बॅले नाहीतर अगदी बार्बी व्हर्जन पण चालते.
स्वान लेक
चार्ली एंड द चॉको ले ट फॅक्ट्री
पूर्वी होम अलोन १ आता नाही.
१०१ डालमेशिअन्स
Love Actually, While you were
Love Actually, While you were sleeping,
नोव्हेंबर डिसेंबर आमच्याकडेही
नोव्हेंबर डिसेंबर आमच्याकडेही नेटफ्लिक्सवर ख्रिसमस मूवी सुरू होतात. मला नाव तर एकाचेही सांगता येणार नाही. किंबहुना ते विचारतही नाही. लागलेला दिसला की जाऊन बसतो. आवडला तर पुर्ण नाही तर ऊठतो. बहुतांश आवडतातच. ते सुद्धा ईंग्लिश असून, सबटायटल्स वाचन झेलून बघतो हे विशेष.
तरी लिस्टसाठी बायको आणि तिच्या बहिणींना विचारावे लागेल. त्याच बघून एकमेकींना सजेस्ट करत राहतात.
Sleepless in Seattle करता १००
Sleepless in Seattle करता १०० मोदक. मेग रायन आणि छोटा जोशुआ दोघे धमाल आणतात.
माझे दहा आणे नाही तर शिणेमे -
1. Holiday
2. Leap Year
3. A California Christmas
4. Falling Inn love
5. Too Close for Christmas
6. Christmas In Love
7. Christmas at the Palace
8. The Noel Diary
9. Christmas under wraps
10. Christmas with a view - यातला हिरो सिद्धार्थ चांदेकरसारखा वाटतो मला.
मिष्ट गोड आहेत पण कधीतरी बघायला मजा येते. पहिले दोन तर मस्तच आहेत - म्हणजे गोडमीट्टच आहेत पण स्टारकास्ट तगडी आहे आणि त्याने खूप फरक पडला आहे.
अॅनिमेशममध्ये दोन खूप आवडीचे -
1. Frozen - निव्वळ विंटर
2. Coco - अप्रतिम फॉल
वेबसिरीज बघायची असेल तर - वर्जिन रिव्हर!
बॉलीवुडात काही अशा डिसेंबर/
बॉलीवुडात काही अशा डिसेंबर/ ख्रिसमस मुवी असतील तर सांगा. माझ्यासारख्याना बघायला.
ग्रिंच शिवाय ख्रिसमस नाहीच.
ग्रिंच शिवाय ख्रिसमस नाहीच.
Sweet November..
Sweet November..
The Holiday, Miracle on the
The Holiday, Miracle on the 34th street
द सिक्स्थ सेन्स..
द सिक्स्थ सेन्स.. फिलाडेल्फिया मधला फॉल. शामलनच्या बर्याच मुवीजमध्ये फॉल सीझन मधला एखादा दुसरा सीन असतो.
व्हेन हॅरी मेट सॅली .. न्यूयॉर्क मधला फॉल.
बॉलिवुडच्या मोहोबत्तेमध्ये तर पूर्ण सिनेमाभर फॉल चालू होता.
ख्रिसमस मुवीजमध्ये स्कार्लेट जोहान्सनवला (टॉय कार मधली चीप) होम अलोन.. खूप आवडता आहे
विंटर/ बर्फातले थ्रिलर/ मर्डर मिस्ट्री मुवीज असाही एक धागा काढला पाहिजे.
मस्त धागा.
मस्त धागा.
फॉल - मला स्पेसिफिक कोणता चित्रपट आत्ता आठवत नाही. आठवला तर लिहीतो.
विंटर - ग्राउंडहॉग डे - हा खरा विंटर संपण्याबद्दलचा पिक्चर आहे पण चालून जाईल. बाकी फार्गो, अ सिम्पल प्लॅन हे ही आहेत पण ते गंभीर टाइप आहेत.
Elf, Christmas with the
Elf, Christmas with the Kranks
डम्ब अॅण्ड डम्बर हा सुध्दा
डम्ब अॅण्ड डम्बर हा सुध्दा बहुतांश विंटर पिक्चरच आहे
जिम कॅरेचे स्वेटर्स, जेफ डॅनियल ची जीभ (स्नो) लिफ्टला चिकटणे वगैरे 
बॉलीवुडात काही अशा डिसेंबर/
बॉलीवुडात काही अशा डिसेंबर/ ख्रिसमस मुवी असतील तर सांगा. माझ्यासारख्याना बघायला >> "ऑक्टोबर"
वरूण धवन असलेला, लव्ह स्टोरी होती पण फॉल शी काही संबंध होता का ते लक्षात येत नाहीये
आपल्याकडे ऑक्टोबरला ऑक्टोबर
आपल्याकडे ऑक्टोबरला ऑक्टोबर हिट असते
मग नोव्हेंबरला पाऊसही येतो हल्ली..
आपल्याकडे ऑक्टोबरला ऑक्टोबर
आपल्याकडे ऑक्टोबरला ऑक्टोबर हिट असते
मग नोव्हेंबरला पाऊसही येतो हल्ली..
Serendipity - स्नो आहे,
Serendipity - स्नो आहे, म्हणून..