Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशुचॅंप यांच्या वतीने आता मीच
आशुचॅंप यांच्या वतीने आता मीच विचारतो,>> पण सर तुम्ही आशुचँप यांच्यावतीने का प्रश्न विचारत आहात? त्यांच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे का?
(No subject)
ऋ, मी हंपीला गेले होते तेव्हा
ऋ, मी हंपीला गेले होते तेव्हा तिथे जो वाहनचालक होता त्याचं नाव हनुमान होतं. लहान होता 20-22 चा.
आम्ही त्याला हनुमानजी बोलायचो.
हनुमान असतं की नाव.2-3 जणांचं
हनुमान असतं की नाव.2-3 जणांचं पाहिलं आहे.
एकाचं हणमंत होतं, मी इंग्लिश मध्ये हेमानंत वगैरे वाचायला लागल्या वर मैत्रिणींनी अक्कल काढून ते हणमंत आहे सांगितलं.
एक अवांतर प्रश्न - हनुमान हे
एक अवांतर प्रश्न - हनुमान हे नाव भारताच्या कुठल्या भागात ठेवले जाते का? आपल्याकडे हनुमंतराव, मारुती ऐकलेय. पण हनुमान माझ्या ऐकण्यात तरी आले नाही.>>>
आमच्या शाळेच्या (सन्मित्र मंडळ विद्यामंदिर, गोरेगाव पूर्व) मुख्याध्यापकांचे होते. हनुमान दादू कांबळे.
सोमवार- महादेव
सोमवार- महादेव
मंगळवार - सगळ्या देवींचे,गणपती
बुधवार- विठ्ठल-रुक्मिणी
गुरुवार - दत्त गुरु
शुक्रवार - सगळ्या देवींचा,मुख्यतः लक्ष्मीचा
शनिवार - मारुतीचा
रविवार - ग्रामदैवत,कुलदैवत
हे पश्चिम महाराष्ट्र भागात.
तमिळनाडू मधे -
शनिवार - तिरुपती बालाजी आणी विष्णू अवतारांचा म्हणजेच पेरुमाल यांचा.
रविवार - अंजनेयर /हनुमानाचा.
बाकी सोम ,मंगळ,शुक्र सेम आणी
गुरु साईबाबांचा .
राजस्थान मधे मारुतीला बालाजी भगवान म्हणतात आणी वार मंगळवार असतो तिकडे.
हनुमान गगन विहारी
हनुमान गगन विहारी
दोनदा शिवरात्र होती म्हणून
शिवरात्र होती म्हणून शंकराच्या देवळात गेलो होतो.देऊळ बंद होते. (वर्षे वेगवेगळी पण असे दोनदा झाले).त्यांची दुसर्या दिवशी शिवरात्र होती आणी अभिषेक,पूजा,अन्नदान सगळे दुसर्या दिवशी दिवसभर आणी रात्रभर चालू होते.कल्चरल शॉक होता हा आमच्यासाठी.सगळ्या भारतात आज आणी यांची दुसर्या दिवशी शिवरात्र.
हनुमान नाव असते.ज्याचे नंतर
हनुमान नाव असते.ज्याचे नंतर हणमा आणी शेवटी हणम्या होतं.
ईतके प्रश्ण असतांना ऋन्मेशने
ईतके प्रश्ण असतांना ऋन्मेशने नवीन धागा न उघडता जुन्याच धाग्यावर विचारणे, हा मायबोली क . शॉ. >>> हाहाहा, सहीच.
राजकीय पक्ष नेत्याने,
राजकीय पक्ष नेत्याने, दुसऱ्याच्या मालकीचं घर भाडेकरूने आणि दुसऱ्याची कंपनी कामगाराने किंवा गब्बर गटाने hijack करणे हा खरोखरच क. शॉ.
तिथे गेल्यावर त्याला चक्क
तिथे गेल्यावर त्याला चक्क बंगाली मिठाई देण्यात आली. सगळे स्वतः घेत होते आणि आल्या - गेल्याला देतपण होते.
>> माणूस गेल्यावर मिठाई वाटतात??
सगळच अवधड आहे, पण समजुन घ्या,
सगळच अवधड आहे, पण समजुन घ्या, आत्मसात करा!
नाहितर आहेच
xxx अजब तुझे सरकार......
लहरी राजा प्रजा आंधळी अजब तुझे सरकार......
आणि हे लागु होते मायबोलिलाही, २०१७ मधे माझी limbutimbu ही आयडी उडविल्या नन्तर आता ही मूळची आयडि उडली तर विशेष वाटणार नाही!
माझी limbutimbu ही आयडी उडविण्यात आली, फाल्तू कारणाने व फाल्तू लोकांच्या कम्प्लेंटवरून, तो माझ्या करता जबरदस्त कल्चरल shock , होता , त्यानम्तर मी मायबोलीवर हार्डली वर्षातून एखाद दोन वेळेस हजेरी लावतो , ती का लावतो तो वेगळा प्रश्न.
लिंबूटीबु अरे वा आलात काय
लिंबूटीबु अरे वा आलात काय
मी ट्रेक वरती नवीन सिरीज लिहीत आहे
ती वाचून घ्याल
तुम्ही, सोन्याबापू आणि अशोक जी यांचे प्रतिसाद मिस करतोय मी
लिंबूटिंबू,छान वाटले तुम्हाला
लिंबूटिंबू,छान वाटले तुम्हाला इथे परत पाहून.
आयडी उडला तरी २० वर्षांपूर्वी
आयडी उडला तरी २० वर्षांपूर्वीच डुप्लिकेट आयडी काढून ठेवण्याचा तुमचा दूरदर्शीपणा वाखणण्याजोगा आहे.
इतरांचे आयडी उडवण्याचा विडा
इतरांचे आयडी उडवण्याचा विडा घेतल्यावर आपलाच आयडी उडणे हा मोठाच शॉक असणार
लिंबू भाय कैसा है?
लिंबू भाय कैसा है?
हम गया नहीं, जिंदा है
हम गया नहीं, जिंदा है
श्री स्वामी समर्थ
उ. बो. भरत
उ. बो. भरत
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/81850
परदेशात पहिल्यादा आले तेव्हा
परदेशात पहिल्यादा आले तेव्हा रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांसाठी गाड्या थांबल्या तेव्हा भरून आलेलं! इतका आदर मिळण्याची अजिबात सवय नव्हती
गोव्यातून कोल्हापूरात: कल्चरल
गोव्यातून कोल्हापूरात: कल्चरल शॉक
https://youtu.be/Lv1r4qXT38U
परदेशात पहिल्यादा आले तेव्हा
परदेशात पहिल्यादा आले तेव्हा रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांसाठी गाड्या थांबल्या तेव्हा भरून आलेलं! इतका आदर मिळण्याची अजिबात सवय नव्हती Rofl >>>>> मेघना, अगदीच रीलेट झालेय हे. मी नुकतेच स्वित्झर्लंड वारी करून आलेय, आणि हे रस्त्यावर माझ्यासाठी गाड्या थांबलेल्या बघून मोठाच सुखद कल्चरल शॉक बसलाय
.
हेच चित्र आपल्याकडे कसं असतं असं क्षणभर इमॅजिन केलं आणि लगेचच imagination थांबवलं
बाकी स्वित्झर्लंड मराठीत टायपायला कितीही कठीण असला तरी it's worth for that. प्रचंड सुंदर आहे.
धाग्याची वाट लागलीच आहे तर
धाग्याची वाट लागलीच आहे तर मीही एक पींक टाकतो >> एक किस्सा सांगते, याने गाडी रुळावर येते का बघा.
इथे एका इथिओपिअन रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो. आपल्यासारखंच जेवण असतं असं ऐकून होते म्हणून फारच उत्सुकता होती. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर एका टेबलावर लोक चक्क आपल्यासारखाच हाताने भात खाताना दिसले. तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारून खात्री केली आणि मग मीही बिनधास्त हाताने कालवून भात मजेत फस्त केला. आमच्यानंतर तिथे आलेल्या एक दोन गोऱ्या लोकांना बहुधा याचा धक्का बसला असावा ☺️☺️
हेच चित्र आपल्याकडे कसं असतं
हेच चित्र आपल्याकडे कसं असतं असं क्षणभर इमॅजिन केलं~~~ इथे अस करायचं तर रात्री निघावं लागेल तेंव्हा सकाळी वेळेवर ऑफिस मध्ये जाता येईल
आणखी एक म्हणजे दीड दिवसाच्या
आणखी एक म्हणजे दीड दिवसाच्या गणपतीचं घरातलं विसर्जन झालं की मुंबईत सार्वजनिक गणपतींना जाण्याची पद्धत होती. आणि जे काय हलते डुलते भव्य का कायसे देखावे असतील ते पहिल्या दिवसापासून तयार असत. पुण्यात आल्यावर समजलं की देखावे बघायला जायचं तर शेवटच्या तीन चार दिवसात. सुरुवातीला गेलं तर कार्यकर्ते ... नाही स्वयंसेवक म्हणतात त्यांना पुण्यात... समजुन देखावे उभे करायच्या कामाला लावायचे. कारण गणपती आला (तो ही आदल्या दिवशी वगैरे आणत नाहीतच... यथावकाश सगळं!) की मग सावकाश काय ते देखावे हळूहळू आकार घेतात.
Submitted by अमितव on 15 June, 2022 - 02:28
गणेशोत्सव अपडेट:
काळाचौकीच्या गणपतीचे आज आगमन होत आहे. https://tinyurl.com/yuubu4t7
मी जिथे राहतो तेथील 'स्वप्नाक्षय मित्र मंडळ' चा मंडप बऱ्यापैकी बांधून तयार झाला आहे. २-३ दिवसांत देखाव्याचे काम सुरु होईल!!!
अमेरिकन लोक चिकन आणि वॉफल्स
अमेरिकन लोक चिकन आणि वॉफल्स एकत्र खातात हे माहिती होतं. पण ते त्यात स्ट्रॉबेरी आणि पिठीसाखर घालून खातात हे आज कळलं

महाबळेश्वरला जातो तेव्हा चिकन
महाबळेश्वरला जातो तेव्हा चिकन आणि स्ट्रॉबेरी एकत्र खाणे कॉमन आहे आमच्यासाठीही
मराठी लोकांच्या लग्नात .
मराठी लोकांच्या लग्नात .
विचित्र प्रकार सध्या सुरू आहेत.
लग्नं अगोदर फोटो शूट.
जेवणात नको ते पदार्थ.
लग्नात घागरा चोळी.
हे प्रकार खूप विचित्र वाटतात.
हा मोठा शॉक च आहे
Pages