Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॅप्टन्सी टास्क मध्ये अपूर्वा
कॅप्टन्सी टास्क मध्ये अपूर्वा तेजु अति भांडत होत्या. तेजु हिडीस हिडीस म्हणत होती ते नाही आवडलं.
आता अपूर्वा व्हरसेस तेजु असं दिसू लागलं. अपूर्वा प्रसाद, अक्षय प्रसाद अशी विरोधात जोडी मागे पडली.
तेजु आता पुढे कसं जायचं हे बघायला लागली असावी, साम दाम दंड भेद. तसं असेल तर ती गेमर आहे. तिने अपूर्वाला दिलेला शब्द दुसऱ्यांदा मोडला. अपूर्वाने विश्वास ठेवला हे आश्चर्य वाटलं.
रणवीर सिंगने तेजुला सपोर्ट
रणवीर सिंगने तेजुला सपोर्ट केलाय, त्यांनी एकत्र काम केलं होतं का कुठे.>>>बिग बॉस हिंदी 15 च्या वेळी तेजस्वी प्रकाशला सपोर्ट केला होता त्याने...त्यावेळचा व्हिडिओ आहे तो...
तेजस्विनीला सोशल मीडियावर
तेजस्विनीला सोशल मीडियावर बराच सपोर्ट आहे...काल ती जे खेळली त्याची तुलना मेघाशी करत आहेत लोकं....पण मला पर्सनली तेजाचा खेळ अज्जिबात आवडला नाही...शब्द देऊन ते फिरवणार्या लोकांची मला प्रचंड चीड येते...अरे तुझ्यात जिगरा असेल तर डिल करूच नकोस ना...एक डिल करायची आणि मैदानात उतरल्यावर वेगळंच वागून माझी स्टॅटेजी होती असं म्हणणं अजिबातच पटलं नाही...त्यामानाने अपूर्वा आवडली...रोहितने तिला चार वेळा खुणावून सुद्धा तिने तेजस्विनीला टार्गेट केलं नाही...मेघाने कोणाला शब्द देऊन फिरवल्याचं मला तरी आठवत नाही...मस्त गेम खेळायची मेघा...समोरच्याला नडायची पण मस्त...तेजाची तुलनाच होऊ शकत नाही मेघाबरोबर ...
तेजा काल अजुनच मनातुन उतरली.
तेजा काल अजुनच मनातुन उतरली. रोहीत ला म्हणाली की मी अपुर्वा ला काढणार आहे. तुझं काय ? तेव्हा रोहीत ने सांगितले की मी माझ्यासाठी खेळणार. नंतर अपुर्वा कडे जाउन तिला वेगळच बोलली. ऱोहित ला काढु असं अपुर्वा ना डील दिलं ते पण घेतलं. आणि ऐन वेळी अपुर्वा ला दगा दिला.
आणी लोकांना हा स्मार्ट गेम पण वाटला. धन्य आहे.
काल धोंगडे तेजा बद्दल जे जे काही चहाड्या सांगत होती ते सगळ्या खर्याच असतील असं तेजा चा कालचा गेम बघुन वाटलं.
मेघा सारखी वगैरे अजिबात नाही तेजा. बाहरसे कुछ और आणी अंदरसे कुछ और च आहे.
रोहीत पण भंगार माणुस आहे. काल गेम थांबल्यावर पण विकास ला ढकलत होता. विकास ने नक्की काय केलं ते कळलं नाही पण जे केलं ते गेम मधे केलं. पण रोहीत नंतर पण धक्काबुक्की करत होता. जर धोंगडे ला २ वीक ची शिक्षा होते तर रोहीत ला पण झाली पाहिजे होती खरतर.
काही न करता हा माणुस किती आठवडे टिकलाय.
विकास ने नक्की काय केलं ते
विकास ने नक्की काय केलं ते कळलं नाही>>>त्याने जाणूनबुजून रोहितच्या तोंडावर लाथ मारली...अर्थात रोहितने त्याला टास्क संपल्यावर ढकलले ते पण योग्य नाही...पण काल विकाससुद्धा किती विचित्र वागत होता....अपूर्वाला पण किती व्यर्थ attitude दाखवत होता...
रोहीत पण भंगार माणुस आहे.>>>प्रसाद पेक्षा बरा वाटतो रोहित...प्रसाद गुड फाॅर नथिंग वाटतो मला...
काल अपूर्वाने ब्राउनी पॉईंट्स
काल अपूर्वाने ब्राउनी पॉईंट्स घालवले.टास्क झाल्यानंतर जर शांत राहिली असती तर तर सगळी सिंपथी मिळाली असती.पण गप्प बसेल ती अपूर्वा कसली.
फार बोलते,मी मी फार करते,बोलून सगळ घालवते.ममां सांगायला जातात तर ऐकूनही घेत नाही,मग माजोरडी वाटायला लागते.त्या विकासला पण किती तेच तेच बोलते,कंटाळा येतो.
तेजुची जोरदार शाळा ममां घेतीलच पण काल निदान तिच्या चिटिंगमुळे तो गेम जरा हलला ,मानेंना सिक्रेटरुममध्ये टाकून जे झाल नाही ते काल तेजुमुळे निदान झाल तरी,तेजुच्या अगेन्स्ट सगळ घर गेल ,नाहीतर तेच प्रसाद प्रसाद करण,त्या प्रसादचा न कळणारा गेम,टीम ए चेच उमेदवार येण,कंटाळा आला होता.
आता कँप्टन्सी टास्क कसा होणार माहीत नाही ,कारण रोहित तसाही जेलक्षध्येच असणार आहे.बिबॉस काय करणार त्याच त्यालाच ठाऊक.पण परत दुसरा टास्क आणून बहुमत ,एकमत वगैरे प्रकिर आणले तर तेजचा पत्ता नक्कीच कट होणार,म्हणजे परत सिंपथी तेजुकडेच
तेजुला विनर करायच हे आठव्या आठवड्यात ठरल बहुतेक बिबॉसच.
वाईल्ड कार्ड मला तर गेस्ट वाटत आहेत.
सोमिवर बातम्या आहेत की
सोमिवर बातम्या आहेत की घराबाहेर गेलेल्या सदस्यांपैकीच चारजण येणार आहेत.निखिलला तर सिरियल मिळाली आहे म्हणजे तो नसावा,यश आताच गेली आहे म्हणजे तीही नाही.उरले चारच ,मेघा,त्रिशुल, योगेश आणि ती रडी रुचिरा. हे घरात असताना फार काही उजेड पाडू शकले नव्हते तर आता येऊन काय फार टीआरपी वाढणार आहे?
मला वाटत त्यांनाच पाहुणे म्हणून आणतील, टीप्स देऊन पाठवतील.कोणाला काय सांगायच ते आणि मग चार दिवसांनी बाहेर आणतील.
बिग बॉस हिंदी 15 च्या वेळी
बिग बॉस हिंदी 15 च्या वेळी तेजस्वी प्रकाशला सपोर्ट केला होता त्याने...त्यावेळचा व्हिडिओ आहे तो... >>> हो का, मी व्हिडिओ बघितला नाही, एका यूट्यूबरने सांगितलेलं ऐकलं. काहीही करतात.
अपूर्वा काल आपल्याला आवडली असली तरी बऱ्याच लोकांनी डोक्यावर तेजु प्रसादला चढवायाचं ठरवलं आहे म्हणून तिला votes मिळत नाहीत. अक्षय अपूर्वा व्हिलन म्हणूनच प्रोजेक्ट झालेत. बाहेर आलेले पण पब्लिक प्रतिसाद बघून ह्या दोघांनाच नावं ठेवतायेत.
मला वाटत त्यांनाच पाहुणे म्हणून आणतील, टीप्स देऊन पाठवतील.कोणाला काय सांगायच ते आणि मग चार दिवसांनी बाहेर आणतील. >>> असं झालं तर अजून बोअर होणार, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.
फार बोलते,मी मी फार करते,बोलून सगळ घालवते.ममां सांगायला जातात तर ऐकूनही घेत नाही,मग माजोरडी वाटायला लागते.त्या विकासला पण किती तेच तेच बोलते,कंटाळा येतो. >>> अगदी अगदी. ती तोंडाने घालवते सर्वच.
तेजा कशीही वागली असली तरी
तेजा कशीही वागली असली तरी धोंगडेमुळे तिला सिंपथी मिळणार, धोंगडेला आता जळी स्थळी काष्टी पाषाणी तेजा दिसतेय. एकच विषय अगदी एक्स्ट्रा शॉटस मध्ये तेच तेच, अक्षयला सांगत होती अपूर्वाला वेळ दे, मग देशमुख अक्षयला म्हणाली नंतर आता हिला तेजा वाईट दिसते, एवढे दिवस तिच्याबरोबर तर होती. तिचं पटलं मला, भले तिला वाटत असेल की अक्षयने आपल्याला महत्व द्यावं अपूर्वापेक्षा पण ती म्हणाली ते खोटं नाही.
तेजा मेघा नक्कीच नाहीये पण धोंगडे सई होत चाललीय, हाहाहा.
चला अपूर्वाला वोटिंग झालंय चांगलं, हे बरं झालं. रोहित, अक्षय शेवटी आहेत.
>>रोहित, अक्षय शेवटी आहेत.
>>रोहित, अक्षय शेवटी आहेत.
रोहितला घालवा पण बिगबॉसने ज्याप्रकारे मानेंकडून अमृता देशमुखला नॉमिनेट केलेय ते बघता तिचा चान्स जास्त आहे बाहेर जायचा!!
रोहित पैसे कमी घेतोय, कंटेटही
रोहित पैसे कमी घेतोय, कंटेटही कमी देतोय. ख खो माहिती नाही, असाच दोन मिनिटांचा व्हिडिओ बघितलेला त्यात अक्षयला बरेच पैसे मिळतात असं दाखवलं. मी ही तुमच्या मताशी सहमत आहे की रोहित जायला हवा पण काय माहिती काय करतात.
मी केळकर आणि समुला थोडं वोटिंग करून आले.
एक न्युज अशी आहे की गेलेल्या
एक न्युज अशी आहे की गेलेल्या सदस्यांपैकीच कोणीतरी येऊन राहणार आणि हुकुमशाह टाईप ते जे सांगतील तेच घरातल्या सदस्यांना कराव लागणार.
मागच्यावेळी त्रुप्ती,आदिश आणि स्नेहा जसे आले होते तसे.
नो वाईल्ड कार्ड.
बघू आता कोणाला आणतात.
रुचिराला आणणार असतील तर रोहितला नाही काढणार कदाचित.
यावेळी आशखरच कोण जाईल कळत नाही,मलाही रोहित वाटत आहे पण देशमुखही जाऊ शकेल.
तसही यावेळी सोशल वोटिंग ट्रेंड्सप्रमाणे काहीही होत नाही।
तो अँक्ट वाला मंदार सांगतो की वूट वोटिंग ट्रेंड वेगळे असू शकतात.तिथे म्हणे प्रसादही खाली असू शकतो.
आता हा काय प्रकार आहे ,मग हे सोशल मिडिया आणि वूट वोटिंग ट्रेंड्स मध्ये कखय फरक आहे,आणि सोशल मिडियावर मघ हे ट्रेंड्स कोण देत,कारण पहिल्या तीनही सिझन्समध्ये सोशल मिडियावर जे वोटिंग यायच त्याचप्रमाणे एव्हिक्शन
झालेली आहेत.
आता या वेळी वूट वोटिंग ट्रेंड पहिल्यांदाच ऐकत आहे.
>>की गेलेल्या सदस्यांपैकीच
>>की गेलेल्या सदस्यांपैकीच कोणीतरी येऊन राहणार आणि हुकुमशाह टाईप
बाहेर गेलेल्यांपैकी एकात पण दम नाही हुकुमशहा होण्याचा..... हुकुमशहा एकच नंदकुमार चौगुले!! काय चीड आणलेली त्या माणसाने!!
यावेळी ट्रेंड्सप्रमाणे एव्हिक्शन होत नाहियेत हे मात्र खरे!!
किरण मानेंना सिक्रेट रुममध्ये टाकून काही उपयोग नाही झाला...... बिगबॉसचा हा ट्विस्टपण फुसका फटाका निघाला!!
सीझनचा नंबर जसाजसा वाढतोय तशीतशी त्यातली मजा कमी होतेय..... कारण सगळ्याचेच पॅटर्न बनलेयत आणि हळूहळू सगळे प्रेडिक्टेबल झालेय आणि ते बदलण्यात ना प्लेयर्सना इंटरेस्ट दिसतोय ना मेकर्सना!!
आता या वेळी वूट वोटिंग ट्रेंड
आता या वेळी वूट वोटिंग ट्रेंड पहिल्यांदाच ऐकत आहे. >>> हो ना. तो मंदार कायम प्रसादच्या बाजूने असतो, मी पूर्ण बघत नाही पण जाणवतं.
जुन्याना आणूच नका. एकाच्यात तरी दम आहे का हुकूमशाही करायचा.
तो योगेश तेजाला सेक्रेटरी करेल आपली.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=O51GsZOZlAs
रणविजयचा हा व्हीडीओ लोणारीसाठीच वाटतोय. पी आर टीमची कमाल असेल किंवा ओळखतही असेल.
तेजुचा हात फ्रॅक्चर झालाय पण ती give up करणार नाहीये. मागे एक बाहेर पडली तेव्हा परत येऊ शकली नव्हती. त्यामुळे योग्य निर्णय.
मला तेजुच्या इंज्युरीवर शंका
मला तेजुच्या इंज्युरीवर शंका घ्यायची नाही.तिला झालीही असेल ,पण तिनेच सांगितल की तिला पहिल्या राऊंडला झाली होती ,पण नंतरच्या दोन्ही राऊंड्स ती खेळली.यावरूनच स्नेहलता आणि तिच्यात वादही झाल,तिने बहुतेक चेष्टा केली होती.आधी हा वाद झाला आणि मग तेजुला आत बोलावल होत.
मला वाटत बिबॉसला याचा पराचा कावळा चावडीवर करायचा आहे ,पण ममांनी तो करू नये. कारण तेजू नंतरही घरात वावरत होती,अँवॉर्ड मध्ये सामील होती,रात्रीच्या त्या धोंगडेच्या फालतू वादात होती.
नवीन प्रोमोमध्ये सुध्दा वाईल्ड कार्डच स्वागत करताना टाळ्या वाजवत आहे.
मला मागच्या सिझनच्या दातार बाईंची आठवण झाली.हात स्लिंगमध्ये असूनही छान टास्क खेळत होत्या.
ऋतुजाची गोष्टच वेगळी होती,पडल्यावर ती अक्षरश: जीवाच्या आकांताने किंचाळत होतती आणि नंतर तिनेच स्वत:हून सांगतल की नाही खेळता येणार.
तेजूची इंज्युरी तितकी गेम सोडण्याइतकी गंभीर नसावी. पण टीआरपी साठी खटपट करणार्या बिबॉसला हाही मुद्दा कँच करायचा दिसत आहे.मयांनी स्पष्ट नकार द्यायला हवा ,यावरून स्नेहलताला बोलण्याची काहीही गरज नाही ,कारण तो विषय घरात संपलेला आहे.
बापरे !!!काय विचित्र पद्धतीची
बापरे !!!काय विचित्र पद्धतीची होस्टिंग आहे मांजरेकरची....फक्त मी म्हणेल तीच पूर्व दिशा नाही ,तर तुम्हीदेखील ती पूर्वच म्हणायची मग ती कोणतीही असो...काहीतरीच ...अरे कोणाचं काहीच ऐकूनच घ्यायचं नसतं तर त्या contestants ला समोर बसवताच कशाला? त्यापेक्षा सरळ मांजरेकरचा एकमुखी संवाद ठेवत जा....सर्वात बोगस आणि बकवास वाटली मला आजची चावडी...आणि तो प्रसाद तर इतका मख्ख आहे की मांजरेकरनी स्तुती केल्यावर आभारही न मानता कसा बघत बसला होता...अपूर्वा अक्षयला बॅकबिचिंग साठी इतकं झापलं पण कोणीच कोणाबद्दल काहीच बोललं नाही तर कटेंट कसा मिळेल...प्रसाद एरवी घरातही किती बोअर वाटतो...अपूर्वा अक्षय निदान मनोरंजन तरी करतात...त्यांचे extra शॉट्स खूपच मस्त असतात...विकास रोहित सोबत तुल्यबळ नाही म्हणून त्याने लाथ मारली म्हणे....म्हणजे तुल्यबळ नसलं की मारलं तर चालतं का??...आणि मला जास्त हसू तेव्हा येतं जेव्हा मांजरेकर मी जर असतो ना तर असं केलं असतं , तसं केलं असतं हे अशा थाटात सांगतो की जसं काही किती easy टास्क होता...तुम्ही उगाच 4-5 लोकं खेळता
आज तेजु प्रसाद कौतुक एपिसोड
आज तेजु प्रसाद कौतुक एपिसोड होता.
धोंगडेला बरोबर बोलले. अपूर्वा अक्षयला बोलायला हरकत नव्हती, पण अति वाटलं. आज म मां जास्त पब्लिक खुश कसे होतील या उद्देशाने आले होते. अनेक जणांच्या मते तेजु प्रसाद पहिले दोन आहेत आणि अक्षयला आता काढायला हवं कारण ते दोघे व्हिलन आहेत , हे सर्व डोक्यात ठेऊन होस्टिंग केलेलं आजचे.
मला अक्षय जाईल असं वाटतंय.
रोहित आणि अक्षयमध्ये फाईट
रोहित आणि अक्षयमध्ये फाईट असेल तर रोहित जायला हवा.खरतर तो आधीच जायला हवा होता.
सोमिवर कोणी म्हणत आहे की
सोमिवर कोणी म्हणत आहे की अक्षय बाहेर गेला,तर कोणी सँमच नाव घेत आहे.तो रोहित कुठेच नाही
अजूनपर्यंत कन्फर्म न्यूज कशी नाही आली,खरतर एव्हिक्शन कालच झालेल असत. गेल्य
आ वेळी सिक्रेटरुम होती,या वेळी काय?
ममांनि काल सांगितल की गेस्ट येणार आहेत घरात,मग चँनेल वाईल्ड कार्ड अस प्रमोशन करून का दिशाभुल करत?
काल मांजरेकर वेगळ्याच
काल मांजरेकर वेगळ्याच मूडमध्ये होते..... तेजस्विनी आणि रोहितला बोलणी बसेल असे वाटले होते तर त्यांचे कौतुक झाले!!
अपूर्वा जिगरीने खेळली असे वाटत असताना तिचे कौतुक सोडा पण नंतरच्या आणि इतर बडबडीमुळे तिला ऐकूनच घ्यावे लागले!!
प्रसादला का एव्हढे लाडाऊन ठेवलेय काही कळत नाही.... काय एव्हढे केले त्याने कौतुक करण्यासारखे?
धोंगडेला बोलले ते योग्यच होते पण ते पण फार ताणले
कुणाचे ऐकूनच घ्यायला तयार नव्हते काल मांजरेकर.... आणि चुकून एखाद्याने दिलेच जस्टीफिशन तर विषय फिरवून दुसरीकडेच नेत होते!!
किरण मानेंचे खाणे काय काढले राव त्यांनी?
बाकी ते ज्यूस प्यायला देणे वगैरे अगदीच अपेक्षित चालले होते.... काही म्हणजे काही out of box करत नाहीत हे लोक्स!!
मांजरेकर काल जाताजाता बोलून गेले की गेस्ट येणार आहेत त्यामुळे वाईल्ड कार्डची चर्चा पण आता फुसका बार झाली!!
किरण मानेंचे खाणे काय काढले
किरण मानेंचे खाणे काय काढले राव त्यांनी?>>>अगदीच किती चीप वाटलं ते...दिड तासाच्या भागात मोजून 10 मिनीट दाखवत होते मानेंना...त्यात नुसतं खाण्याचं फुटेज दाखवलं असेल तर लगेच जज करून त्यांच्या खाण्यावरून बोललेले अज्जिबातच आवडले नाही...
बाकी स्वरूप यांची पोस्ट वाचून
बाकी स्वरूप यांची पोस्ट वाचून आपल्यासारखाच विचार करणारे अजून काही लोक आहेत हे पाहून खूपच बरं वाटलं...कारण मी वर MM च्या होस्टिंग बद्दल लिहीलेली पोस्ट कधी नव्हे ते सोशल मीडियावर टाकली (कदाचित काल खूपच राग आल्यामुळे
... नाहीतर या बाबतीत मी कधीच सोशल मीडियाच्या वाटी जात नाही) तर लोकांनी इतक्या विरुद्ध टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या की मला कळेचना की सगळ्यांचे मत इतके वेगळे कसे...एकालाही मला जे वाटले ते वाटू नये...म्हणजे माझीच विचार करण्याची पद्धत चुकतेय का...पण स्वरूप यांची पोस्ट पाहून बरं वाटलं...
अजूनही एव्हिक्शन बद्दल.काहीच
अजूनही एव्हिक्शन बद्दल.काहीच न्यूज नाही.
एका प्रोमोमध्ये सायली संजीव आणि सुव्रत जोशी गोष्ट एका पैठणीचीच्या प्रमोशनसाठी आलेले दिसले.अपूर्वा आणि विकासला नागीन डान्स करायला सांगितल आहे.
केळ्या गेला, केळी वाटा वगैरे
केळ्या गेला, केळी वाटा वगैरे काल लोकं लिहीत होती. तो गेला असंच जास्त लोकं लिहीत होती.
त्याचंच नाव येतंय पुढे. काल त्याला ज्याप्रकारे बोलले आणि तो तर दहावर हवा होता बोलले म मां त्यावरुन वाटतंय मला. नंतर ते मुलामा चढवत होते ते वेगळं.
रोहीतला नंतर वोटस मिळत होते. केळकरला मिळत नव्हते. मी थोडे दिले होते. रोहीत, सॅम पेक्षा अक्षय नक्कीच उजवा होता, कंटेट देण्याबाबत.
बाकी स्वरूप यांची पोस्ट वाचून आपल्यासारखाच विचार करणारे अजून काही लोक आहेत हे पाहून खूपच बरं वाटलं...कारण मी वर MM च्या होस्टिंग बद्दल लिहीलेली पोस्ट कधी नव्हे ते सोशल मीडियावर टाकली >>> बरं केलं टाकली ते, लोकं एकांगी लिहितात तिथे. एकदा तेजु प्रसाद चांगले म्हणजे चांगलेच आणि अक्षय अपूर्वा वाईट म्हणजे वाईटच. पहिल्यातले वाईट, दुसऱ्यातले चांगलं काही बघायचंच नाहीये. त्यामुळेच मी लिहिते की इथे माबोवरच तटस्थ पणा जास्त बघायला मिळतो. आवडती लोकं वाईट वागली किंवा न आवडणारी चांगली वागली तरी लिहितात इथे.
तेजुला समजावले नाही तिच्या खेळाबाबत मग ती तशीच खेळणार, लोकांनी डील करायला जाऊ नये तिच्याशी.
बिग बॉस टीमने पण ठरवून टाकलं आहे आता तेजु प्रसाद पहिले दोन तिसरी धोंगडे किंवा अपूर्वा असेल.
त्यामुळेच मी लिहिते की इथे
त्यामुळेच मी लिहिते की इथे माबोवरच तटस्थ पणा जास्त बघायला मिळतो. आवडती लोकं वाईट वागली किंवा न आवडणारी चांगली वागली तरी लिहितात इथे.>>>exactly....नकळतपणे मायबोलीशी तुलना केली गेली..आणि वाटलं किती छान व्यक्त होऊ शकतो आपण इथे...लगेच कोणी जज करत नाही....कोणी आपल्या पोस्टला विरोध केला तरी त्यांच्या मताचाही आदर वाटावा अशा शब्दात व्यक्त होतात...तिथे तर मला कोणालाच प्रत्युत्तर द्यायची सुद्धा ईच्छा झाली नाही.
Thats the beauty of maayboli
Thats the beauty of maayboli

आणि बिग बॉसची पण गम्मत अशी आहे की सीझन पुढे सरकत जातो तशीतशी आपली पण मते बदलत जातात..... सुरुवातीला जे आवडतात ते शेवटपर्यंत आवडते राहतीलच असे नाही!!
सीझन संपता संपता आपल्याच सुरुवातीच्या पोस्टी जाऊन वाचायला अजुनच मजा येते
.तिथे तर मला कोणालाच
.तिथे तर मला कोणालाच प्रत्युत्तर द्यायची सुद्धा ईच्छा झाली नाही. >>> सेम झालेलं माझ्याबाबत पहिल्या दोन सीझनला, एक दोन जणांनी मात्र तुम्ही तटस्थ लिहिता असं लिहिलं ते वाचून बरं वाटलं. त्यामुळे मी सोडून दिलं, इथेच लिहिते.
Thats the beauty of maayboli Happy
आणि बिग बॉसची पण गम्मत अशी आहे की सीझन पुढे सरकत जातो तशीतशी आपली पण मते बदलत जातात..... सुरुवातीला जे आवडतात ते शेवटपर्यंत आवडते राहतीलच असे नाही!!
सीझन संपता संपता आपल्याच सुरुवातीच्या पोस्टी जाऊन वाचायला अजुनच मजा येते >>> अगदी अगदी .
आज नवरा झी सिनेमावर कार्तिकेय
आज नवरा झी सिनेमावर कार्तिकेय 2 बघतोय. त्यामुळे bb लावलं नाही, असंही रविवारी बोअर होतं बघायला.
समु गेली, मला आवडायची पण
समु गेली, मला आवडायची पण तिच्यात आणि अक्षयच्यात सध्यातरी मी अक्षयला चुज केलं असतं. वोटिंगमध्ये सर्वात शेवटी असलेल्या अक्षयला आधी का सेफ केलं, मग आपल्याला खूप वोटिंग आहे या भ्रमात तो राहील.
तिने फार सीझन बघितलेच नव्हते, माने मेघा धाडेचे कौतुक करत होते तेव्हा तिने कोण मेघा धाडे विचारलं होतं. नाव तरी माहिती असायला हवं होतंना इथे भाग घेताना. नंतर तिने मानेना विचारलं तिच्याबद्दल, कशी खेळायची काय.
आता हुकूमशहा टास्क असेल. राखी सावंत, मीरा जगन्नाथ, विशाल निकम, आरोह वेलणकर येत आहेत.
Pages