काय झाले रे?

Submitted by मुग्धमानसी on 25 November, 2022 - 11:51

काय झाले रे? कुणाचा घात झाला?
मी इथे होते... उगा आवाज झाला!

काय झाले रे? कुणी रडले इथे का?
का उशाला हुंदक्यांचा वास आला?

काय झाले रे? असा नि:स्तब्ध का तू?
कोण येथे ओकले अन् पूर आला?

काय झाले रे? मला काही कळेना...
मीच हसले की... मला तो भास झाला?

काय झाले रे? मला का भेव वाटे?
मी इथे आहे अशी की.. भास झाला?

काय झाले रे? कसे गुलजार होते...
मी जराशी बोलले अन् र्‍हास झाला?

काय झाले रे? मला तू सांग ना रे...
सांग की राणीस का हा रोग झाला?

काय होते, काय नाही, काय असते...
कोणत्या जगण्यात रुततो कोण भाला!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली कविता.

शेवटच्या कडव्यात रचना बदलली त्याने वाचताना थोड अडखलल्यासारख झालं