चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

काल लेकीने बघित ला. तिला आव ड ला. मोनिका माय डार्लिन्ग. कदाचित तरुणाईस अपील होत असेल. हे लोक कामानिमित्त रोजच बरे वाइट सिनेमे मालिका बघत असतात. फिल्म क्राफ्त चा अनुभव व प्रशिक्षण पण आहे. मी राधिका आपटेचे संवाद व हसणे ऐकले ते छान वाटले. उद्या परवात बघेन.

मोनिका न आवडणे हा एखाद्याचा चॉईस असू शकतो आणि एखाद्याचा आवडणे हा असू शकतो.>>>>
मला मोनिका आवडली पण सिनेमा नाही.

मोओमाडा पाहिला.
एकंदर चांगला वाटला, राधिका आपटे सोडून.
यांनी जो महत्वाचा भाग आहे तो फारच पटापट दाखवून घेतलाय शेवटी.
पट्ट्याने गळा आवळायच्या सीन ला लोळून लोळून हसलो.
आमच्या कडे जे 6 प्राणी चोरीला गेले त्यातल्या फक्त 4 चाच हिशोब लागतोय बाकी 2 कुठंत म्हणून बराच काथ्याकूट झाला.शेवटी मी 'तो बॅकअप स्टॉक आहे, कदाचित 2 मेले असतील आजारी पडून किंवा सेकंडहॅन्ड विकले असतील' म्हणून प्रश्न सोडवला Happy

स्पॉईलर अलर्ट
एक साप त्या अकाऊंट्सवाल्याला चावला. एक राजकुमार रावच्या समोर रात्रभर बसून होता. दोन त्या गौरवच्या गावाकडच्या घरात (तेही या सहातलेच असतील तर.) एकाचं विष वाईनमध्ये, एकाचं विष ज्याने वाईनमध्ये विष घातलं त्याला. संपले सहा नाग.(आपल्याला घाबरायचं कारण नाही!)

ओके ओके
स्पॉयलर
म्हणजे एक नाग इतकं कमी विष देतोय?पर हेड एक वापरावा लागला?क्या कर रहा है नाग, प्रोटीन शेक मारा कर साले!

जाऊ दे, मी स्पॉयलरसकट वाचतो. इतके एकसे एक भारी प्रतिसाद येत आहेत, ते सगळे मी पिक्चर बघेपर्यंत मागच्याच्या मागच्याच्या मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पानावर जातील, तेव्हा शोधत बसायला बोअर होईल.

शेवटी किमान ३ साप दिसले बहुतेक. दोनच असतील तर डोळे तपासून घ्यावे लागतील मला. नाहीतरी चष्मा हवाच होता. Happy
स्पॉयलर अलर्ट
शालूच्या घरी काय मिळालं? फोटो अल्बम मधे गौमो दिसला.

शेवटी किमान ३ साप दिसले बहुतेक. दोनच असतील तर डोळे तपासून घ्यावे लागतील मला. नाहीतरी चष्मा हवाच होता. Happy
स्पॉयलर अलर्ट
शालूच्या घरी काय मिळालं? फोटो अल्बम मधे गौमो दिसला.

डबल पोस्टी पडतात तसे चुकुन पडद्यावर ३ ऐवजी >>> Lol
मघाशी दुकानात पोस्ट पाहिली तेव्हां बोल्ड करायचं राहून गेलं म्हणून एडिट केली. तर दुसरी पोस्ट झाली. असं नाही व्हायला पाहीजे.

@आबा >> ओके. माझ्याकडून मी तिकडेच लिहीन. बरोबर आहे तुमचं. Happy

ठिकठाक वाटला मोनिका. धक्के वगैरे काहीच नव्हते. पण तरी एंगेजिंग आहे. म्युझिक आवडले. रारा राआ हुमा आवडले. राजकुमार ला अजून भरपूर कामं मिळोत. He deserves much better and more than this.

अंधाधुन ची सर नाही पण. कंपेअर न केलेलेच बरे.

टिपी होता मोनिका. फार काही डिसपॉइन्टिंग नाही फार मेमरेबल नाही. पण करमणूक झाली बर्‍यापैकी.
साप ४ की ६ का मोजताहेत लोक? त्या चोरलेल्या सापांचा आणि वापरलेल्या सापांचा काहीच संबंध नसूही शकतो ना Happy पुण्या- मुंबई-नाशकात कितीतरी नाग असतील !

तो 'सपेराचा' डायलॉग आठवतोय का कोणाला? पुसटसं आठवतंय मला एकदम हसू फुटलेलं. पण नक्की कुठे आठवेना. नागेश/ सपेरा असलं काही होतं बहुतेक.
मला त्या प्रकाशयोजनेचा ही त्रास होत होता. तसाच ऑफिस मधल्या फर्निचरचा ही. रेट्रो वगैरे ठीक आहे, पण जे होतं प्लीजिंग वाटत न्हवतं. टोन थोडा ब्राईट हवा होता, शार्पनेस अजुन हवा होता... आय डोंट नो. झोपाळलेलं धुरकट डल काही बघतोय वाटत होतं. ते न वाटता ही जुना काळ किती मस्त दिसतो ते सांगायला उदाहरणांची गरज पडू नये.

धमाल प्रतिसाद एकसे एक

त्या चोरलेल्या सापांचा आणि वापरलेल्या सापांचा काहीच संबंध नसूही शकतो ना>>>

मग त्या गारुड्याला आणायचं कशाला?

पुलं नी लिहिलं आहे, नाटकाच्या पहिल्या अंकात बंदूक टांगलेली असेल दिवाणखान्यात तर तिसऱ्या अंकापर्यंत ती वाजलीच पाहिजे
नैतर मग टांगायची कशाला Happy

हो हो. त्या चेकॉव्ह्स गनला जागलंच पाहिजे. बिबट्यांपासून सावधान दिसल्यावर बिबट्या दिसलाच पाहिजे.
सायकल चोरांपासून सावधान पाटी ट्रेनमध्ये लावायचा चान्स घालवला हे एक नमुद करतो.
बाकी सायकल आणि स्कूबा गिअर चोरीला गेल्यावर सायकल विना धावला ठीक आहे. पण स्कूबा कुठुन प्रसवला?
चेकॉव्हच्या बंदुकीचे स्मरण करुन मला ती अधिकारीची पोरगी भावाच्या किमान हुमा कुरेशीच्या खुनात सहभागी असेल वाटलेलं. त्या बंदुकीचा ही काही पुरेसा वापर झाला नाही.
बाकी सिक्युरिटी कॅमेरे प्रकार अस्तित्त्वात यायच्या आधीचा काळ आहे का हा? आणि त्या तोप इंन्वेंशनचं रोबॉटिक्स प्रॉडक्ट असं वर्षानुवर्षे फॅक्ट्रीच्या मध्यात धुळ खात पडून?
आणि वाईन मधला कॉर्क काढायला, बाटलीचं बुच फिरवल्यागत मशीन फिरेल का स्क्रू टाळक्यात जाऊन मेंदू बाहेर काढेल?
आणि त्या मशीनचे मुंडी पिरगळणे सोडून इतर अ‍ॅप्लिकेशन काही आहेत का इंडस्ट्रीत?

आईग्ग् फुटले Lol Lol ते मशिन त्याच कामासाठी बनवले होते बहुतेक. भयानक कंपनी आहे ती ,,,,शेवटी फक्त म्हातारा आणि पोरगीच उरले.

तुम्हा लोकांच्या सहनशक्तीची कमाल आहे.
कॉर्पोरेट कंपनीच्या इव्हेंटला आयटेम गर्लचा डान्स पाहून मी तिथेच हाय खाल्ली आणि बंद केला.

#स्पोयलर अलर्ट#

चेकॉव्हच्या बंदुकीचे स्मरण करुन मला ती अधिकारीची पोरगी भावाच्या किमान हुमा कुरेशीच्या खुनात सहभागी असेल वाटलेलं. >>>
मलाही वाटलेलं की जितकी जास्त इनोसंट तितकी जास्त डेंजरस असणार
पण हिला नुसतीच बेबी डॉल सारखी घेतलीय

त्याहून धमाल म्हणजे त्याला गच्चीतून फेकून देतात
तर जीवावर बेतलं असतानाही त्याला त्या कागदाची फिकीर
भावा तू जगलास तर तो कागद काही मॅटर करेल हे त्याच्या डोक्यात शिरत नाही का?

अमितव
वरची पोस्ट वाचून मला न्यूनगंड झालाय.

हो. Lol आणि कागदाची झेरॉक्स काढायची तर कोणी पन्नास पैसे जास्त देऊन कलर झेरॉक्स काढेल ना? की खरी तरी वाटेल.
आणि कणा कविता वाचुन दाखवली (ती का? ते काही मला फारसं झेपलं नाहीच.. ) तर सही!! करतो!!! करुन नाना फडणवीस सारखी मुत्त्सद्देगिरी दाखवंत रक्ताचं थारोळं करुन टाकायचं ना. फिंगर प्रिंट कळलेच नसते.
पण हो. त्याकाळी डीएनए अनॅलिसिस होता पण व्हिड्यु कॅमेरांचा मागमूस न्हवता ते विसरलोच! (आठवा: बाप कोण हे नायडू ताईंनी शोधलं.)
आणि बिल्डिंगवरुन हा भारी स्किलने उतरतो तर किमान तीस सेकंदांचा लहानपणाचा दोरीच्या उड्या मारायचा शॉट द्यायचा. की आमची खात्री पटली असती की हा काटक अ‍ॅथलिट आहे. बिल्डिंगवरुन जिवंत उतरेल. त्या सापाकडे हा का डोळे न मिचकवता बघतो कारण तो रात्रभर जागून अभ्यास करतो म्हणून! ते कसं आम्हाला बरोब्बर कळलं तशा दोरीच्या उड्या ही कळल्याच असत्या!

मुंडी पिरगळणारे मशीन Happy

आमच्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने मुंडी पिरगळली जाईल
पोलीस म्हणून आलेल्या बडबड्या बाईंनाही मॅनेज केलं जाईल

आजच संपर्क करा
पहिले ईसतेमाल करे फार विश्वास करे Happy

तुम्हाला कसं कळलं लिफ्टने आला तो? सापासारखा सरपटत कशावरुन आला नसेल? कशावरुन म्हणजे अर्थात पायपावरुन.

आणि चहा देताना मोनिका त्या घनाकृती साखरेच्या ठोकळ्याला जे काय करते ते उगाच आपल्याला फसवायला? नो नो नो नो नो! त्या अधिकारीला चहातुन औषध घ्यायला सांगितलं असेल नक्कीच. प्रिस्क्रिप्शनचा स्क्रिन शॉट आपला मिस झाला बघायचा.
औषधं जान्ववी तोयं = औषध चहातुन घ्या. Rx. खाली डॉक्टरची सही - फणींद्रनाथ.

Pages