Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मोओमाडा पाहिला. नाही आवडला.
मोओमाडा पाहिला. नाही आवडला.
खाली लिहिलेले काहींना स्पोईलर वाटु शकेल, मला वाटत नाहीये. तरी वॉर्निंग देऊन ठेवते.
*********************
पहिले दोन खुन भावनेच्या भरात झाले असे म्हणता येईलही. पण नंतरचे उगीचच काहीही वाटले. धक्कातन्त्र म्हणुन वाट्टेल ते. पोलिस तर दोघेही खोटे वाटले आणि रा आ च्या शेवटच्या दृश्याने खात्रीच पटली. राराला ते पत्र जिथे मिळते तिथे ते का व कोणी ठेवले हा प्रश्न अनुत्तरीत. त्याने ठेवले नाही कारण मग त्याने ते शोधले नसते. मग कोण?
रच्याकने, नागाचे किंवा सापाचे विष गिळले तर आपली पचनसंस्था ते पचवायचे चांसेस जास्त आहेत. काही त्रास झालाच तर तो अन्नपचनाला जितका वेळ लागेल तितक्या वेळानंतर होइल कारण विष पचुन ते रक्तात शोषले गेलेच तर त्रास व्हायला सुरवात होईल. चित्रपटात दाखवलाय तसा तात्काळ मृत्यु येणार नाही. पण जाऊदे. सिनेमॅटिक लिबर्टी.
संगीत मात्र आवडले. माफी नही गाणे चित्रपट सम्पल्यावरही माझ्या लक्षात राहिले.. नवल नवल.. नाहीतर हल्लिची गाणी बघताना कळतच नाहीत, नंतर आठवायचा प्रश्न नाहीच.
ते पत्र गौरव मोरे ने ठेवलेले
साधना- ते पत्र गौरव मोरे ने ठेवलेले असते.. एकाच गावचे असतात ते ...
पांचट चित्रपट.. अंधाधुंद शी तुलना करणे हा गुन्हा आहे...
रच्याकने, नागाचे किंवा सापाचे
रच्याकने, नागाचे किंवा सापाचे विष गिळले तर आपली पचनसंस्था ते पचवायचे चांसेस जास्त आहेत.
>>>>
बरोबर, पॉइझन आणि व्हेंनम मध्ये हाच फरक आहे
स्पॉइलर अॅलर्ट
स्पॉइलर अॅलर्ट
१. तिथे ते का व कोणी ठेवले हा प्रश्न अनुत्तरीत. त्याने ठेवले नाही कारण मग त्याने ते शोधले नसते. मग कोण? >>> ते घर कुणाचे आहे याची पाटी येउन जाते. ती मिस झाली का ?
२. पोलीस तपासात एका गारूड्याला पकडलेले असते. पण तो त्याच्याकडचे सात आठ नाग चोरी झाल्याचे सांगतो.
ते पत्र गौरव मोरे ने ठेवलेले
उत्तर मिळाले.
मोनिका हा अंधाधुनच्या मेकर्स
मोनिका हा अंधाधुनच्या मेकर्स कडून बनवला आहे. आपोआप अंधाधुनचे नाव येणारच. राईटर, प्रोड्युसर एकच आहेत. शिवाय अंधाधुनच्या दिग्दर्शकाने मदत केली आहे.
स्पॉईलर अॅलर्ट द्या.
स्पॉईलर अॅलर्ट द्या. ज्यांना बघायचाय त्यांच्यासाठी.
स्पॉईलर अॅलर्ट
मोनिकाचा मर्डर कुणी केला याचा अंदाज येऊ नये यासाठी प्रेक्षकाला देवप्रकाशच्या खून्याचे क्ल्यूज दिले गेले आहेत. देवप्रकाशचा खूनी पहिल्यापासून माहितीच असतो. पण मोनिकाचा खून का झाला आणि तिच्या खून्याचा खून का झाला याचा अंदाज हा चित्रपट येऊ देत नाही. तसेच गौरव मोरेच्या घरी शोध घ्यायची आयडिया कुणाच्या घरात मिळते आणि ऑफीसमधे सही नसलेले खूनाच्या कॉण्ट्रॅक्टचे पेपर्स मिळणे हा भाग खूप पटापट येऊन जातो.
https://dmtalkies.com/monica-o-my-darling-ending-explained-2022-indian-n...
मोनिकाचा खून का झाला आणि
मोनिकाचा खून का झाला आणि तिच्या खून्याचा खून का झाला याचा अंदाज हा चित्रपट येऊ देत नाही.
>>>गुड जोक... कोणालाही कळेल ...
गुड जोक... कोणालाही कळेल . >>
गुड जोक... कोणालाही कळेल . >>> हाच जोक छान आहे. तुम्हाला कळलं होतं का ? नव्हतं कळलं.
स्पॉयलर : पहिल्यांदाच खूनी दाखवलाय हे तुमचं कालपासूनचं गाणं होत. जर हेडफोन लावलेले नसतील तर राधिका आपटे काय सांगते ते ऐकूच येत नाही. बिनासह्यांचे कॉण्ट्रॅक्टचे सेम हॅडराईटिंगचे लेटरहेडबुक त्याला कुठे सापडते ते मस्त आहे.
मी तुमच्याशी वन टू वन वाद घालणार. वेळ जातो छान.
स्पॉयलर अॅलर्ट : त्या दुसर्
स्पॉयलर अॅलर्ट : त्या दुसर्या धाग्यावर म्हणूनच मी बकवास कमेण्ट इतकंच लिहीलं होतं. कारण तुम्ही म्हणता तो खूनी वेगळा आणि मोनिकाचा (शीर्षक ) खूनी वेगळा आहे हे तिथे लिहीण्याची माझी तयारी नव्हती. जाणूनबुजून तसा हलकटपणा केला असेल तर त्या ट्रॅपमधे अडकायचं नव्हतं.
https://www.maayboli.com/node/82660
अस्मिता, पर्रफेक्ट !
अस्मिता, पर्रफेक्ट !
मोनिका हा अंधाधुनच्या मेकर्स
मोनिका हा अंधाधुनच्या मेकर्स कडून बनवला आहे. आपोआप अंधाधुनचे नाव येणारच.
>>> काय पण लॉजिक... म्हणजे रमेश सिप्पी ने शोले बनवला म्हणून सिमला मिरची बघताना शोले शी तुलना करणार का?
काय पण लॉजिक... म्हणजे रमेश
काय पण लॉजिक... म्हणजे रमेश सिप्पी ने शोले बनवला म्हणून सिमला मिरची बघताना शोले शी तुलना करणार का? >> हलकटपणा दाखवला म्हणून आता हातघाईवर आला का चपड चपड ? शान च्या वेळी शोलेशीच तुलना झाली होती. शोले नंतर लगेच शान आला होता. पहिल्या पोराची तुलना दुसर्या पोराशी होते. बाराव्या नाही. तुम्ही लॉजिकबद्दल बोलता हे फारच गंमतीशीर वाटतंय. त्य
तुलना केली रून्मेषने. त्याने पळवत असा पिक्चर पाहिला म्हटला म्हणून त्याची पुढची पोस्टच वाचली नाही. तुमची दया येऊन अंधाधुन कुठून आला याचं उत्तर दिलं होतं. तुम्ही इथे पण हलकटपणा करू लागले. या गप्पा रून्मेषशी मारा. त्याला विचारा. अजून काय खुसपट ?
धमाका पाहून झाला. आवडला.
धमाका पाहून झाला. आवडला. अजून नेटका झाला असता.
पण आहे त्यातच करमणूक करून घ्यायची. आता लवकर नाही काही पाहणे होणार.
मी अस ऐकल आहे कि मोनीका
मी अस ऐकल आहे कि मोनीका मध्ये कवि कुसुमाग्रज ह्यांच्या कवितेच्या ओळी वापरल्या आहेत.
कुणाला काही कल्पना आहे का ?
हो, 'कणा' कवितेच्या ओळी आहेत.
हो, 'कणा' कवितेच्या ओळी आहेत.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा
नायकाच्या बेताच्या आर्थिक पार्श्वभूमीची त्याच्या मनातली अढी/दहशत दाखवण्यासाठी, पुन्हा पुन्हा ह्या ओळी घोकतानाची आठवण दाखवलेली आहे. तो स्वतःला संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणाही देत असतो. कोपिंग मेकॅनिझम सारखं काहीतरी.
थॅन्क्स ऋ
(No subject)
केशवकुल
केशवकुल
मोनिका बघितला नसल्याने कल्पना नाही.
पण श्रीराम / श्रीधर राघवन / वासन बाला कंपनी च्या चित्रपटात बरेच मराठी संदर्भ येतात.
उदा: बदलापूर सिनेमात वरुण धवन खून करून परत येत असताना पाऊस पडू लागतो आणि मागे देवळात बसून एक स्त्री येरे घाना गाणं गात असते.
मोनिका अगदीच अंडरव्हेलमिंग.
मोनिका अगदीच अंडरव्हेलमिंग. त्यात काही gaps वाटल्या त्या लिहायचे ही आता श्रम वाटताहेत. राधिका चा ट्विस्ट फक्त मी एकस्पेक्ट न्हवता केला, अर्थात तो ही फार भारी न्हवताच मुद्दाम केलेला होता. बाकी फार कुठे धक्का ही बसला नाही. सापाकडे हा टक लावून बघू शकतो कारण ह्याने रात्री जागून अभ्यास केलेला असतो! वर फोबिया पण असतो. मुंबई का पुण्यापासून अंगोला १० मिनिटात... त्यात काही स्मार्ट xxx प्यारडी वगैरे असेल तर काही झेपली नाही. मरो. एकदा बघा आणि विसरून जा कॅटेगरी.
हो कणा मधल्या ओळी आहेत. पण
हो कणा मधल्या ओळी आहेत. पण मला मोडून पडला फणा ... असं करतील याची जवळ जवळ खात्री होती. पण नाही केलं.
अक, अस्मिता
अक, अस्मिता
थॅॅन्क़स
मोनिका चा लेखक मराठी आहे.
मोडून पडला फणा
मोडून पडला फणा
अंगोला हा देश आहे ना? गावपण आहे महाराष्ट्रात?
पिक्चर आवडू शकतो किंवा नावडू
पिक्चर आवडू शकतो किंवा नावडू शकतो. पण मायबोलीवर जर कुणी एखादा पिक्चर आवडला असे लिहीले कि चिडून जाऊन "काय समजतं का पिक्चर मधलं ?" या थाटाचे रिव्ह्यूज येतात ते मजेशीर असतात. तसेच आपल्याला आवडलेला इतरांना नाही आवडला म्हणून अरण्यरूदन करणारे धागे काढणे ही पण मजा असते. यातून राडे सुरू झालेत. ज्यांनी सुरू केलेत तेच आता त्याबद्दल बोलतात ही आणखीन एक गंमत. जर तुमच्या बाजूला दोन चार सैनिक असतील आणि विरूद्ध बाजूला पण तीन चार सैनिक असतील तर मग लढाईला सुरूवात होते. ज्यांच्या बाजूला एक पण सैनिक नाही ते गुपचूप बसतात. बरेच जण तर इथे लिहीतच नाहीत. दोन चार आयड्यांनी सिनेमा कसा आहे यावर लिहीणे न लिहीणे याची दहशतच बसवलेली आहे.
लढाई होत नसेल तर आपल्याच एखाद्या क्लोद्वारे हलकट प्रतिसाद दिले की कुणीतरी चिडून येतं. त्याची मजा घेणारे मग हलकटपणा थोडा वेळ अजून चालू ठेवतात. काही जण आपला सात्विक संताप टोमणे मारून व्यक्त करतात. हा प्रघात गेली पाच सहा वर्षे सुखैनैव चालू आहे.
मोनिका न आवडणे हा एखाद्याचा चॉईस असू शकतो आणि एखाद्याचा आवडणे हा असू शकतो.
काही जण पिक्चर तर पूर्ण
काही जण पिक्चर तर पूर्ण पाहतात. पूर्ण पाहिला याचा अर्थ शेवटपर्यंत खिळवून ठेवले. पण तिथून मायबोलीपर्यंत येईपर्यंत त्यांना कुठल्यातरी झाडाखाली झपाटते. बघू कुणी काय लिहीलंय ? याची तपासणी करून मग " या गाढवाने असं लिहीलंय ? आता बघतोच" या छापाची मतं काही आयडी व्यक्त करतात. यांचं नेहमीचं आहे.
अंधाधुन मधे पण धक्के अनावश्यकच आहेत. पण त्या रोलर कोस्टर राईडच्या फ्लो मधे चालून जातं ते. असा पिक्चर बर्याच वर्षांनी आला होता. शेवटी कार मधे काय होतं, त्याला दिसू लागतं का आणि काठीचा ट्विस्ट याची पिसं काढणं अशक्य नाही. कदाचित कुणी "गाढवाने" आवडला म्हणून लिहीलं असतं तर मायबोलीवर त्या सिनेमाचं नशीब वेगळं असतं.
अंधाधुन आणि मोनिका ला बाहेर त्याच क्रिटीक्स कडून सेम स्टार मिळालेत. अंधाधुन मधे जास्त धक्के होते हे निश्चित. पण लूप होल्स त्यात सुद्धा खूप होते.
मोडून पडला फणा
मोडून पडला फणा
>>>लोल अमित... खरेच असे करायला हवे होते... तो एक धक्का बसला असता
अंधाधुन मधे सुरूवातीला ससा,
अंधाधुन मधे सुरूवातीला ससा, एक बंदूक आणि बुलेट दाखवलं आहे. नंतर त्याचा उपयोग करून घेतला आहे. तो सिक्वेन्स हास्यास्पद आहे.
पण त्या पिक्चरचा वेग इतका होता आणि इतक्या घडामोडी घडल्या होत्या कि जवळपास अशक्यकोटीतली ती शक्यता सर्वांनी मान्य करून टाकली होती.
पण समजा मी चिडकू (आयडी नाही) प्रतिसादक आहे आणि माझ्या डोक्यात एखादा आयडी गेलेला आहे. त्याने जर माझ्या आधी लिहीलं असतं तर मी त्या आयडीचं नाव न घेता त्याने ज्या प्रसंगाचं कौतुक केलंय त्याचं जबरदस्त माप काढलं असतं. त्या रात्री मला शांत झोप लागली असती.
या धाग्याचं असं झालंय.
आम्ही सगळे फिल्म इन्स्टीट्यूट मधून बाहेर पडलोय, तुम्ही काय शिकवता हा अॅटीट्यूड खरंच मस्त मनोरंजक आहे. म्हणूनच मला मायबोली खूप खूप आवडते.
आज ध्यानीमनी पाहिला ... विषय
आज ध्यानीमनी पाहिला ... विषय चांगला आहे... अश्विनी भावे ने खूप लाऊड अभिनय केला आहे मात्र... महेश ने ठेहराव दिला आहे... कलायमॅक्स मध्ये क्लोझर जमला आहे... हिंदी रिमेक झाला पाहिजे...
गोष्ट एका पैठणीची पाहिला.
गोष्ट एका पैठणीची पाहिला. सायली चे काम छान झालेय. तिच्या नवर्याचे काम केलेल्याचे पण.
जरा अ तिशयोक्ती वाटत राहते अध्नं मधनं पण १ टाईम वॉच आहे आणि अशी ही माणसं जगात असू शकतात असा विश्वास निर्माण होतो.
गिरिजा ओक क्लासीच वाटत राहते, तमासगिर अजिबातच वाटत नाही.
हा चित्रपट भारतात २ डीसेंबर ला रीलिज होतोय, सिंगापुरात काल प्रिमियर होते! प्रोड्युसर मधले १ सिंगापुर चे!
अजून एक जोराची पोस्ट आलीय.
अजून एक जोराची पोस्ट आलीय. कंट्रोल होईना
आणखी एका क्याटेगरी असते बरं का. पिक्चर तर पूर्ण बघायचा. पण प्रतिसाद देताना इथे वाचून पाहिला वेळ वाया गेला असं लिहायचं. एकाच बॉल मधे सात आठ आउट ही क्याटेगरी एकदम भारी. यांचा वेळ वाया जातो म्हणजे बहुतेक जो बायडेन किंवा ऋषी सुनकने यांचा वेळ मागितलेला असतो, पण हे थोर पुरूष / महिला मायबोली वाचून पिक्चर बघतात नंतर त्यांना पश्चात्ताप होतो. जर या वेळेचा सदुपयोग केला असता तर जो बायडेनकडून भारतात तीन लाख डॉलर्स इन्वेस्ट करावे का याची सल्ला फी दहा टक्के मिळाली असती.
अशा सर्व थोरांना हात पाय आणि वीस बोटं जोडून सगळीकडून नमस्कार !
झालं.....
कंट्रोल होईना....हसू
कंट्रोल होईना....हसू
Pages