चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

काहीही सस्पेन्स नाहीय मोनिका डार्लिंग मध्ये... पहिल्या सिन पासूनच सगळे स्पष्ट दाखवले आहे... कोण खुनी ते...
अत्यंत ओव्हररेटेड चित्रपट... राधिका ला वाया घालवली आहे.. अजून जास्त स्क्रिन टाईम हवा होता...

चपड चपड यांना पॉप्युलर ओपिनिअयनच्या अगेन्स्ट जाण्याचा डिसऑर्डर आहे. कमेंट बकवास आहे. पिक्चर पाहिलेला नाही हे समजले.

आशुचॅम्प आणि वावे यांनादेखील साधारण वाटलंय.. फक्त तुम्हाला आणि एक आणखी आयडी कौतुक करतायत...
प्रवाहाविरुद्ध कसे झाले मग हे?
आणि नवीन धागा असावा त्या लायकीचा तर बिलकुल नाहीय.. तरी दोन कमेंट मी दान म्हणून दिले तुमच्या धाग्याला Wink

चपड चपड तुमचा च्रप्स आयडी उडाला. मग चर्प्स घेतला. मग च्रप्स अ‍ॅडमिनने परत केला या चर्चेला फाट्यावर मारले याचा राग आहे का ?
अ‍ॅडमिन कुणालाच आयडी परत करत नाहीत. अपवाद झक्कींचा. त्यानंतर थेट तुम्ही. रामायणात पुष्पक विमान आले ते नंतर थेट संत तुकारामासाठी आले. तुम्ही महान आहात.

झिम्मा, झिरो आउट स्टँडींग होते का पिक्चर ? वेगळे धागे काढलेले पिक्चर्स तुम्हाला विचारून काढायचे असतात हे तुम्ही मला कळवले नव्हते.

विषयांतर नको.. प्रतिसाद उडवण्यात येतील...
कोणी बनारस पाहिला का.. कसा आहे रिव्यू? आज बिग बॉस संपला कि ते बघण्याचा प्लॅन करतोय... जर हिंदी ऑडिओ असेल तर...

प्राइम व्हिडिओ ची मेम्बरशिप अमेरिकेत घेतली असेल तर निम्मे कन्टेन्ट भारतात बघताच येत नाही. बहोत नाइन्साफी हैं !
नेटफ्लिक्स बरे आहेत मग.

आज तुकड्या तुकड्यात संपवला मोनिका माय डार्लिंग.. जवळपास चार ते पाच तुकड्यात पाहिला. प्रत्येक तुकड्यात काहीतरी ट्विस्ट होते. पण ओवरऑल काही मजा आली नाही. अंधाधुंनचा दर्जा तर बिलकुल नाही. अभिनयात राजकुमार असताना शंका नव्हती. राधिका आपटे फनी वाटली. हुमा कुरेशी कथेच्या गरजेनुसार हॉट वाटली. बॅकग्राऊंड म्युजिकचे काही प्रयोग होते. काही जमले काही बोअर झाले. कथा पटकथा संवादही काही वाईट नव्हते. पण काहीतरी गंडलेय जे नेमके काय ते सांगता येत नाही पण ओवरऑल मजा आली नाही. मला अध्येमध्ये पिक्चर बघायचा असल्याने बायकोची वेबसिरीज तिला तोडून तोडून बघायला लावली. त्यामुळे पिक्चर पुर्ण झाल्यावर तिने मला आणि पिक्चरला दोघांना शिव्या घातल्या. कोणाला बघाच म्हणून सजेस्ट नाही करणार पण असेल नेटफ्लिक्स तर बघून घ्या. एकदा बघायला हरकत नाही.

ं विषयांतर नको.. प्रतिसाद उडवण्यात येतील... >>> मागच्या पानावरचे तुमचे स्वतःचे प्रतिसाद तसेच आहेत की. बरं, सबकुछ तुम्हारा. विषयांतर भी तुम्हारा, जज्ज भी तुम्हारा.

उदय चोप्रा हा आजच्या घडीला शाहरूख पेक्षा उत्तम अभिनेता आहे. त्याच्या धूम सिरीजने शाहरूखच्या कोणत्याही पिक्चरपेक्षा जास्त बिझनेस केला. यशराज बॅनरकडे त्याचा परफॉर्मन्स १०० टक्के गुंतवणुकीला ३०० टक्के रिटर्न्स असा आहे. त्याच्या धूम सिरीजवर धागे काढलेत का ?

मोनिका वरचा धागा पिक्चर रिलीज झाल्यावर , बघून झाल्यावर काढला आहे. जवळपास सर्वच क्रिटीक्सनी त्याचे कौतुक केले आहे.

टाईम्स ऑफ इंडीया
https://timesofindia.indiatimes.com/web-series/news/hindi/monica-o-my-da...

एनडीटीव्ही
https://www.ndtv.com/entertainment/monica-o-my-darling-review-wildly-ent...

CRITIC REVIEWS FOR MONICA, O MY DARLING : rottentomatoes
https://www.rottentomatoes.com/m/monica_o_my_darling

द हिंदू
https://www.thehindu.com/entertainment/movies/monica-o-my-darling-movie-...

जवळपास सगळीकडेच थोडं कौतुक थोडी टीका असे मिक्स्ड रिव्ह्यूज आहेत. पण इथल्या दोन चार नेहमीच्या आयडींप्रमाणे सूर नाही कुठेच. जग मोठं आहे म्हणायचं आपलं.

आत्ता नेफ्लि वर थोड्या वेळासाठी कार्तिक आर्यनचा धमाका दिसू लागला होता. नंतर इम्रान हाश्मीचा बॉडी. नवीनच्या लिस्टमधे नाहीत दिसत. जुने येऊन गेलेले आहेत का ?

इथली चर्चा वाचून ' मोनिका ओ माय डार्लिंग ' पाहिला . अंधाधून शी तुलना केल्याने बऱ्याच अपेक्षेने पाहिला . पण ती मजा आली नाही . संगीत काही काही ठिकाणी चांगले आहे .

Wakanda Forever पाहिला. ॲक्शन, कथा, bgm व अभिनय सर्व जुळून आले आहे. Tchella चे अनपेक्षित पणे जाणे व्यवस्थित दाखविले आहे. जुना ब्लॅक पँथर गेल्यामुळे wakanda च्या मर्यादा आणि त्यावर मात करून पुन्हा उभा राहण्याची इच्छा या गोष्टी चांगल्या जुळवल्या आहेत. पण कुठे तरी तो अभिनेता नसण्याची सल जाणवत राहते. नक्की पहावा. पैसा वसूल आहे हा सिनेमा

गोदावरी सिनेमा पाहिला. आर्ट सिनेमा आहे, त्यामुळे गर्दी नव्हतीच . कदाचित एखादा आठवडा राहील. नाशिक, जुना वाडा, जगण्याचं तत्त्वज्ञान, अंतर्मुख करणारे संवाद व काळजाला भिडणारं संगीत सगळंच आहे यात. सिनेमा पाहताना ढेलज मध्ये बसून दुपारी संथ गतीने जुनी कादंबरी वाचत असल्याची feeling येते. जून्या घराच्या खिडकीतून पाहताना एखादा दिवस वेगळाच जाणवतो. तो काळ कुठेतरी स्थब्द झाल्यासारखा भासतो, हा क्षण टीपण्याचे काम डायरेक्टर and cameraman खूप छान करतात.

मोनिका, ओ माय डार्लिन्ग ! - @नेटफ्लिक्स

मला विशेष आवडला नाही. लक्षात रहाण्यासारखा नाही. हुमा कुरैशी, राजकुमार राव, राधिका आपटे तिघेही या आधीपासून आवडतात. विजय केंकरे हा एक सुखद धक्का आहे, पण त्यांना फार संवाद नाहीत.

सगळ्यांची कामं चांगली झाली आहेत पण चित्रपट पकड घेत नाही. एका ॲन्गलने कॅमेरा क्लोजअप्स व गाण्यांच्या लाऊड ओळी असे काही नवीन तंत्रज्ञान वापरलं आहे ते जास्त रिपिटेटिव्ह वाटलं. रारा कॉन्फरन्स मधे लेदर जॅकेट घालून येतो. गरिबीतून मोठ्या कष्टाने वर आलाय असं सांगतात, पण तो कधीही काम करताना दिसत नाही. राधिका आपटेचा वावर छान आहे पण तिच्या भूमिकेला खोली व लांबी दोन्ही नाही. हुमा कुरैशी आपापल्या भूमिकेत फिट आहे, पण तिचं अचानक येणं आणि जाणं अबरप्ट वाटलं. तिचं येणं येणं न वाटता प्रकट होणं वाटतं , हे अनेकदा होतं! हे धक्कातंत्र असावे पण धक्का फार बसला नाही.

मुडद्यावर मुडदे पडत असतात पण पोलिस एकदम चिल असतात. What's with the Cobras ? इतकं सर्रासपणे घेता येतात का. टेक कंपनी आहे की गारूडी हॅन्ग आऊट. रहस्य शेवटपर्यंत टिकतं पण ते टिकवण्यासाठी जे उपद्व्याप कथेत दाखवलेत ते ओढूनताणून वाटले. एका फ्लो मधे आलंय असं वाटलं नाही. मी पाचपैकी अडीच स्टार देईन!

Pages