फक्त भात तेवढा मोजून घेते. बाकीचे सगळेच पदार्थ अंदाजे.
बासमती तांदुळ- एक वाटी तांदळाला साधारण दोन, सव्वा दोन वाट्या पाणी,
तोंडली- उभी चिरुन, मावेत, कुकरला वाफवून,
काजू- मूठभर तरी हवेतच,
गरम मसाला- २,३ लवंगा, २,४ मिरीचे दाणे, १ दालचिनी, १,२ तमालपत्र,
फोडणीतः जिरं, मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्यांना उभी चीर देऊन, कढिपत्ता.
गोडा मसाला- १,२ टीस्पून,
मसालेभाताचा मसाला- साधारण पाव वाटी सुक्या खोबर्याचा कीस, १,२ टे स्पून जिरं, तेवढेच धणे आणि लाल सुक्या मिरच्या- चवीप्रमाणे- हे सगळं खमंग भाजून ह्याची पूड करावी.
वरुन घालायला- भरपूर ओलं खोबरं, कोथिंबीर, आणि सढळ हाताने साजून तूप.
बासमती तांदुळ धुवून निथळत ठेवावेत.
मोठ्या पातेल्यात जरा जास्त तेल घेऊन त्यावर फोडणीचे जिन्नस घालून, काजू, गरम मसालाही परतून घ्यावा. त्यावर वाफवून घेतलेली तोंडली टाकून झाकण घालून वाफ येऊ द्यावी.
त्यावर निथळून घेतलेले तांदुळ परतावेत. मोजून पाणी घालावं. भात शिजत असताना मसालेभाताकरता केलेला मसाला, गोडा मसाला, मीठ घालावं.
वाढताना साजूक तूप, कोथिंबीर, ओलं खोबरं घालून वाढावा.
ज्यांना तोंडली आवडत नसेल त्यांना बटाटे उभे चिरुन घालता येतील. तोंडली नसतील तर मी तसाही करते.
ह्याबरोबर टोमॅटोचं सार मस्त लागतं.
>> बरोबर ११ वर्षे झाली आज
>> बरोबर ११ वर्षे झाली आज धाग्याला.
२५ ऑक्टोबर २०११>> वॉव
आज बनवला या रेसिपीने..छान
आज बनवला या रेसिपीने..छान झाला आहे.साईड डिश असायला हवी होती वाटले.. काय बनवावे पुढच्या वेळी?
मृणाली, मसालेभाताबरोबर
मृणाली, मसालेभाताबरोबर टोमॅटोचं सार चांगलं लागतं तसंच काही कोशिंबीर टाईप हवं असल्यास खमंग काकडी वगैरे.
गरम कढी/ टोमॅटॉ सार , किंवा
गरम कढी/ टोमॅटॉ सार , किंवा अगदीच लग्न फील हवा असेल तर जिलेबी आणि आळूची पातळ भाजी!
ओके थँक्स सायो,आंबटगोड.
ओके थँक्स सायो,आंबटगोड.
मस्त मसाले भात ..
मस्त मसाले भात ..
Pages