तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

तसे मी बर्‍याच वर्षांपूर्वी IMFL ( Indian made foreign liquor) कंपनीत काम केले आहे.
इतर सगळ्या कचऱ्यात कृष्णा सरांचा फार उपयुक्त प्रतिसाद मिसू शकतो. कृष्णा सर अजून माहिती वाचायला आवडेल. अजून विस्तृत लिहावे.

पूर्वी कधीतरी वाचले होते की दारूमध्ये aldehydes जेवढे जास्त, तेवढा होणारा त्रास जास्त - डोकेदुखी, मळमळ वगैरे वगैरे. आणि जेवढे जास्त वर्ष दारू साठवून ठेवली जाईल तेवढे हे aldehydes आणि इतर कचरा compounds कमी कमी होत जातात. केमिकल प्रोसेस असते over the time. तसा दारूचं composition ethanol+ पाणी+flavouring agents+ साखर एवढंच असतं, प्रत्येक ब्रँडमध्ये त्यांची सिग्नेचर रेसिपी (actually chemical formula) असते. आपल्या देशी, हातभट्टीमध्ये aging वगैरे काही नसतं.. म्हणून त्यांचा त्रास सर्वाधिक. हातभट्टी वर खूप पूर्वी वाचलेलं, पत्री डब्यात मसाला ( सडू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टी, पाणी साखर) भरून ते कुजवतात. जमिनीत खड्डे करून हे डबे बुजवून ठेवले जातात, मसाला तयार होईस्तोवर अधून मधून त्यांना ढवळुन घेतात, मग शिट्टी वाजते. म्हणजे सगळं काही कुजून सोडून त्यातून वाफ निघू लागते तेव्हा काहीतरी आवाज येतो. असे आवाज आलेले डबे काढून त्यांचं ऊर्ध्वपतन करून पहिल्या धारेची गावठी तयार...
अधिक माहितीसाठी: https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK531662/

अजून माहिती वाचायला आवडेल. अजून विस्तृत लिहावे.>>

झंपू दामलू ह्यांनी सुचविले म्हणून लिहण्याचा प्रयत्न करीत आहे.

मी साधारण २५ एक वर्षांपुर्वी जेथे कार्यरत होतो तिथे व्हिस्की, ब्राण्डी, रम, जीन, आणि देशी मद्य आणि माद्यार्क बनवित आणि पॅक करत.
दारूपैकी कोणत्याही मद्यात सामन्यतः ४२.८ % इथॅनॉल ( C2H5OH) हे अल्कोहोल असते. काही मद्यात( जीन) त्याचे प्रमाण थोडे कमी असते.
आपण मद्याची बाटलीचे लेबल नीट पाहिल्यास त्यावर २५ UP (७५ % प्रूफ) किंवा ३५ UP (६५% प्रूफ) असे लिहलेले असते. UP म्हणजे अंडर प्रूफ सामन्यतः अल्कोहोल हे प्रूफ लिटर मध्ये मोजले जाते. उदा. १००% इथॅनॉल ( १७५% प्रूफ) असलेले १ लिटर अल्कोहोल १.७५ प्रूफ लिटर असे मोजले जाते. त्यानुसार त्यावरील कर आकरणी आपल्याकडे केली जाते.
२५ UP मद्यात ४२.८ % इथॅनॉलचे प्रमाण असत. जे सामन्यतः व्हिस्की, ब्रॅण्डी, रम, व्होडका इत्यादी मध्ये असते. काही जीन्स २५ UP तर काही ३५ UP असतात. ३५ UP म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण कमी.

वरील माहिती नंतर आता मुख्यतः व्हिस्की, ब्रॅण्डी, रम, जीन, व्होडका, स्कॉच, वाईन ह्या विदेशी आणि देशी दारू, हात भट्टी हे विविध प्रकार काय?

विदेशी दारूमध्ये जो कार्बोहायड्रेटचा सोर्स अल्कोहोल बनविण्यासाठी वापरला जातो त्यानुसार प्रकार ठरतो. तृणधान्ये मुख्यत्वे वापरतात.
फरमेंटेशन साठी तृणधान्ये स्वच्छ धुवून भिजवतात. त्यात सकॅरोमायसिस सेर्विसी ह्या नावाची बुरशी कल्चर (यीस्ट) वापरले जाते. जे कर्बोहायड्रेटचे अल्डीहाईड आणि किटो शुगर मध्ये रुपांतर ( ग्लुकोज, फ्रक्टोज) करून पुढे इथेनॉल, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ह्याची निर्मिती होते. हेच अल्कोहोल शुद्धीकरण करून ( डिस्टीलेशन) रेक्टीक्टी स्पीरीट ( अल्कोहोल शुद्धता ९८ ते ९८.५ %) अधिक शुद्धता अब्सोल्युट अल्कोहोल (पुर्वी ह्याला सायलेण्ट स्पीरीट म्हणत शुद्धता ९९.९ %) उच्च दर्जाच्या मद्यासाठी बेस म्हणून अब्सोल्युट अल्कोहोल असते. आपण भारतात जे मद्य बनवतो ते मुख्यतः उसाचे अल्कोहोल पासून बनवितो त्यात अल्कोहोलच्या क्वालीटी नुसार आणि इतर अ‍ॅडेड अल्कोहोल सोर्स व इसेन्स (फ्लेवर्स) ह्यांच्या ब्लेंडींगने बनते रंगासाठी कॅरामेल (बर्न्ट शुगर) वापरली जाते. बर्‍याचदा व्हिस्कीवर ब्लेंडेड विथ स्कॉच लिहलेले असते त्यात बेस इथेनॉल + विदेशी स्कॉच कॉन्सन्ट्रेट जे विशिष्ट प्रमाणात डीएम वॉटर, इसेन्स आणि कॅरामल वापरून ४२.८ % अल्कोहोल असे ब्लेण्डेग केले जाते. रम मध्ये मुख्यतः उसाच्या साखरेचे अल्कोहोल पाणी आणि कॅरामल असते.

देशी मद्यात रेक्टीफाईड स्पीरीट (शुद्धता ९८%) फ्लेवर (संत्रा, मोसंबी इत्यादी) आणि डीएम वॉटर असते हे लवकर चढते कारण ह्यातील जी दिड ते दोन टक्के अशुद्धता मुख्यतः अल्डेहाईडस असतात ते मेंदूवर त्वरीत कार्य सुरु करतात.

मी जिथे काम करीत होते तेंव्हा हे विदेशी कॉन्सन्ट्रेस हॉलंड जिथे आमची एक भगिनी कंपनी होती तिकडून येत असे. हे कॉन्सनट्रेट ओक वूड ड्रमस् मध्ये साठवून विशिष्ट तापमानाला ठेवले जात. जितके जास्त दिवस साठविलेले तितकी त्याची किंमत अधिक असे.

बेस अल्कोहोल हे आमच्या कंपनीच्या साखर कारखान्यातील डिस्टीलरी मधून ब्लेण्डीग पॅकिंग प्लॅनच्या प्रती नुसार (रेक्टीफाईड/ अब्सोल्युट) घेतले जाई.
फार दिवस काम नाही केले त्यामुळे अल्कोहोलची प्रतवारी ओळखण्याचे ज्ञान द्यायला सुरुवात झाली (स्मेलिंग/ सिपींग द्वारे) आणि आम्ही काढता पाय घेतला नेमका त्यावेळी. Wink

बरेच काही कालानुरुप बदलले असेल आता (जसे हॉलंडचे नेदरलॅण्ड झाले) परंतु हे मी जेंव्हा काम करीत होतो तेंव्हाचे आहे.

छान माहिती.
मी जे फ्लेवर फॉर्म्युला मॅनेजमेंट बघते त्यात एक गृप ह्या अल्कोहोलि क वासांच्या फ्लेवर्स चा आहे. जिन रम व्हिस्की ब्रांडी, हर प्रकार च्या लिकुअर्स, कोन्याक.

ह्याच्या उलट हलाल
सर्टिफाय करुन मागताना फॉर्मुलातच नव्हे तर प्लांट मध्ये पण कुठे इथॅनोल नाही ना हे तपासून बघतात. ऑडिट द्वारे.

छान माहिती मिळाली. हे सर्व गूगल वर नसते.

सविस्तर माहिती दिल्या बद्धल धन्यवाद..

अशुद्ध घटक किती शिल्लक आहेत हाच मूळ फरक आहे.
असा निष्कर्ष काढायला काही हरकत नाही
फ्लेवर हा काही जास्त महत्वाचा घटक नाही.
व्होडका रंगहीन असतो म्हणून तो जास्त शुध्द असतो असे मानणारे पण आहेत.

ह्या मध्ये अजून एक प्रश्न आहे. खराब दर्जा च्या वस्तू सडवून .
म्हणजे काळा गूळ,किंवा खराब बटाटे, तांदुळ

पण जेव्हा उर्धपतन ही क्रिया होते तेव्हा फक्त शुध्द इथोनोल च प्रॉडक्ट म्हणून निर्माण होत असेल ना?

फ्लेवर हा काही जास्त महत्वाचा घटक नाही.>> तो मैं क्या करुं जॉब छोड दुं

फ्लेवरचा काही भाग केमिकलचा एकत्रित वास मास्क पण करतात.

आश्र्विनी मॅडम

दारू मध्ये फ्लेवर असेल तर वेगळे पण येईल आणि किंमत जास्त वसूल करता येईल.
हा निर्णय तुमचा थोडी आहे.
तुम्ही तिथे नोकरी करत आहात.

. मानवी शरीरास काय योग्य आणि काय अयोग्य असा हेतू आहे दारू वर चर्चा करताना.
फ्लेवर आणि इथोनाल ह्यांची रासायनिक अभिक्रिया होवून काही अती घातक रसायन तर तयार होत नाही ना...
ह्याची चाचपणी चालू आहे

देशी दारू आणि बाकी ब्रँडेड दारू ह्या मध्ये काय फरक आहे.
हा प्रश्न ठराविक हेतू नी विचारला आहे.
काही लोक असे मानतात लाख रुपयाची ७५० ml मिळणारी दारू चांगली असते.
खरे तर असा काही फरक असतो की नसतो .
हे जाणून घ्यायचे होते
कृष्णा ह्यांनी मस्त माहिती दिली.त्या संधर्भात.

दारू पिण्याचे वय आता कमी होत आहे.
काहीच अक्कल नसणारे पंधरा सोळा वर्षांचे मुल आणि मुली दारू पीत आहेत .सिगारेट ,गांजा ,drugs .
पण वापरत आहेत

. अधोगती ह्यालाच म्हणतात
शारीरिक व्यायाम, विविध कसरती. , ज्ञान मिळवणे ...
हे फक्त वयाच्या पंचविशी पर्यंत च ठीक असते.
भारतीय संस्कृती मध्ये पण विविध आश्रम आहेत.
दारू वाईट की चांगली हा वेगळा प्रश्न आहे ..पण ..
कोवळ्या वयात नशा करणारी आज ची पिढी चुकी च्या मार्गाने जात आहे.
निरोगी चाळीस वर्ष चे पण आयुष्य त्यांच्या नशिबात नाही......

वाईट वाटते..

वरच्या पोस्ट थोड्या कॉम्प्लिकेतड वाटल्या

मला काही बेसिक प्रश्न आहेत

भरपूर लिंबू पिळला रम मध्ये तर सायट्रिक आणि रम चे कॉम्बि चांगले का ?

कारण टेस्ट तर भन्नाट येते

चॅम्प, ते बियर-टकीला कॉकटेल बरेच पूर्वी याच धाग्यात टाकले होते. त्याचेच नवीन व्हर्जन. किंवा जुगाडू व्हर्जन केले होते मध्ये. पण तुम्ही बियर टकीला करून बघणार होतात त्याचे काय झाले?

पुढच्या पोस्टीत जुगाडू व्हर्जन देते.

जामखुश २.० *
काम संपून तीन दिवस झाले होते. आवराआवरी उरकत आलेली होती. कामासाठी दिलेल्या फ्लॅटवर सगळ्या टीमने एकत्र असायची शेवटची संध्याकाळ होती. माहौल मजेचा आणि थोडा सेंटी होता.
आमच्याकडे बरीच फळे आणलेली होती. बियर आणि व्होडका दोन्ही सेवेसी हजर होत्या. कुणाकडून तरी मिक्सर मागून आणता येण्यासारखे होते. एवढ्यावर माझे डोके चालू लागले.
मोठे अर्धे कलिंगड, तीन मोसंबी, दोन सफरचंदे तुकडे करून, बिया काढून मिक्सरला वाटून आणि मग चोथा गाळून चांगला दाट ज्यूस काढला. °तुमच्याकडे ज्युसर असेल तर उत्तमच. तसे करा. पण साखर वगैरे मुळीच घालू नका.
तीन भाग ज्यूस, तीन भाग बियर (ट्युबोर्ग) आणि एक भाग व्होडका या प्रमाणात` पातेलंभर मिश्रण केले. बारीक चिरलेले सफरचंदाचे तुकडे (सांग्रीयामध्ये असतात तसे किंवा साधारण मनुकांच्या आकाराचे) आणि बारीक तोडलेली पुदिन्याची पाने त्यात घातली. ढवळले आणि फ्रीजमध्ये ठेवले.
अर्ध्या तासाने ग्लास भरले आणि मग चांगभले!!

*जामखुश नावाची अजून एक रेसिपी मी 8 नंबरच्या पानावर शेअर केलेली आहे म्हणून हे २.०
°ज्यूस फ्रेश हवा आणि तो काढताना कमीतकमी पाणी घातलेले बरे. कलिंगड, मोसंबी, सफरचंद हे मी वापरले. अननस, संत्री व तत्सम पाणथळ फळे चालतील.

`ग्लासच्या प्रमाणात करायचे असेल तर बर्फाचे दोन खडे, ते बुडतील इतका ज्यूस, 150 मिली बियर, 45 मिली(एक शॉट ग्लास इतकी) व्होडका असे प्रमाण घ्या. फ्रिजात ठेवू नका. लगेच प्या.

उन्हाळ्यात मजा येते. फक्त स्पीड कमी ठेवा. आपला टॉलरन्स ओळखून काय ते करा.

FB_IMG_1668604214296.jpg

नाही केलं, म्हणजे धाडस च नई झालं
बियर मुळात शिल्लक राहत नाही हा एक मुद्दा

आणि इतका ज्यूस काढल्यानंतर ची आवराआवर करण्याचा कंटाळा हा दुसरा मुद्दा Happy

त्यापेक्षा ते लॉंग आयलंड परवडेल करायला
मोजून मापून फक्त लिकर घ्यायच्या
नंतर काही आवरा, ओटा पुसा, सालं नीट ओला कचऱ्यात टाका असलं काही नको करायला

तुम्ही हाटेलात जाऊन बिना शक्कर फ्रेश ज्यूस विकत आणा की. आमच्याकडे फळं संपवायची होती म्हणून काढत बसलो आम्ही. Happy

मूळ हेतू च गायब होईल इतके पण कॉकटेल नको.
मटण चिकन बनवताना काही लोक इतके मसाले टाकतात चिकन खातोय की बटाटा,की पनीर ते पण कळत नाही.
दारू मध्ये इतके सर्व मिक्स करून पिण्याची काही गरज नाही.
ह्याचा पुढचा प्रकार म्हणून दारू लं गरम मसाला,आले , लसूण ची फोडणी पण देतील.

दारू मध्ये इतके सर्व मिक्स करून पिण्याची काही गरज नाही. +७८६ म्हणून फक्त थंडगार सुमधुर बीअर. सिधी बात नो बकवास.

मॅंगो टेंडर कोकोनट वॅाडका कॅाकटेल -
३ बर्फाचे क्यूब्ज, त्यावर अर्धा चमचा रूहअब्जा, पाव कप मॅंगो ज्यूस, पाव कप चेंडर कोकोनट वॅाटर, काळं मीठ दोन चिमटी आणी चवीनुसार वॅाडका
1B581951-AE83-450F-BC0D-E3C9C6899532.jpeg

अरे वाह, टेम्पटिंग आहे
आणि सगळं साहित्य सोप्प मिळवायला सोप्पं आहे
फक्त चेंडर कोकोनट वॉटर कळलं नाही

टेम्पटिंग आहे +६८७ आमचे सर आता काय प्रामाणिक प्रतिसाद देतात याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Pages

Back to top