Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ऑटो प्ले आहे, युट्युब
ऑटो प्ले आहे, युट्युब प्रिमियम आहे. इच्छा तिथे मार्ग.
हमाल दे धमाल बघण्यासाठी
हमाल दे धमाल बघण्यासाठी युट्युब प्रीमियम घेतले - ऐकायला सुद्धा कसेतरी वाटतेय
(No subject)
तसा या चित्रपटाच्या नावावरून
तसा या चित्रपटाच्या नावावरून मी साशंक आहे.
आपण बाहेर जायला तयार होऊन बसलोय पण लोकांना तयार व्हायला बराच वेळ आहे अशा वेळेस एक भाग,
कुणाला घरी जेवायला बोलावले आहे आपण तयार झालोय आणि त्यांचा गाडी खराब झाली ओला करून येतोय लोकेशन शेअर कर असा मेसेज आला की दुसरा भाग, असं करून बघावेत असे चित्रपट.
कलाकृती, रसभंग असं वाचलं
कलाकृती, रसभंग असं वाचलं म्हणून लिहिलं.
बाकी 'हमाल दे धमाल' असं भयंकर यमक नावातच जुळवल्यावर....
मुंबईकर लेल्यांसाठी युट्यूब
मुंबईच्या लेल्यांसाठी युट्यूब ची वर्गणी काहीच वाटत नाही.
मुव्हींग आणि रिलोकेशन
मुव्हींग आणि रिलोकेशन सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीचे नाव शोभते हे.
"हा माल दे धमाल"
naane varuven- तमिळ प्राईमवर
naane varuven- तमिळ प्राईमवर पाहिला.
धनुष च्या मुलीला एक लहान मुलाचा आत्मा पकडतो..का? धनुषच्या भुतकाळाचा काही संबंध असतो का?त्यातून ते बाहेर पडतात का? कसे? हॉरर,सस्पेन्स थोडा वायोलंस..भितीदायक नाहीये ठिक आहे सिनेमा..
शेवट व्यवस्थित न सुचल्याने आता सिनेमा संपवायचय म्हणून गुंडाळल्यासारखा आहे.
“ हमाल दे धमाल बघण्यासाठी
“ हमाल दे धमाल बघण्यासाठी युट्युब प्रीमियम घेतले - ऐकायला सुद्धा कसेतरी वाटतेय” हे जबरी आहे.
हमाल दे धमाल बघण्यासाठी
हमाल दे धमाल बघण्यासाठी युट्युब प्रीमियम घेतले - ऐकायला सुद्धा कसेतरी वाटतेय >>
(No subject)
बाई दवे
आम्ही शाळेत असताना हमाल दे धमालची शूटींग पाहिलेली दादर स्टेशनला.
त्या काळात लक्ष्याला बघून आजच्या तारखेला शाहरूखला बघितल्यावर जितका आनंद होईल तितकाच झालेला.
आज कितीही हसले तरी त्या काळात हवा होती लक्ष्याची आणि त्याच्या पिक्चरची. त्याच काळातले महेश कोठारेचे पाच अक्षरी पिक्चर त्यानेच आपल्या खांद्यावर पेललेले आणि हिट केलेले.
आपण बाहेर जायला तयार होऊन
आपण बाहेर जायला तयार होऊन बसलोय पण लोकांना तयार व्हायला बराच वेळ आहे अशा वेळेस एक भाग,
कुणाला घरी जेवायला बोलावले आहे आपण तयार झालोय आणि त्यांचा गाडी खराब झाली ओला करून येतोय लोकेशन शेअर कर असा मेसेज आला की दुसरा भाग, असं करून बघावेत असे चित्रपट.>>>>>> बरोबर.. मी लेकीला भरवताना प्रत्येक वेळी अर्धा पाऊण तास लागतो त्यावेळी बघते थोडे थोडे करून असे सिनेमे.
भिरकिट लावलाय. सुरूवात तर
भिरकिट लावलाय. सुरूवात तर एकदम खुसखुशीत आहे.
जेवणं झाली कि निवांत बघू.. >>>>>> सुरुवात मलाही आवडलेली, पण नंतर २०-२५ मिनिटात बंद केला. सागर कारंडे च्या घरच्या सीननंतर ! काही विशेष अपिल नाही झाला.>>>>>>>>> +११११
तरीही त्या सैराट-परशामित्राच्या गाण्यापर्यंत बघून बंद केला..
हल्ली चित्रपट बघून होत नाहीत.
हल्ली चित्रपट बघून होत नाहीत. बघितला तर चांगला निघावा इतकीच इच्छा असते. रिव्ह्यूज काहीच्या काही असतात.
बहुतेक पेड असतात. त्यांच्या वाटेला जात नाही. स्वतः मरून स्वर्ग बघावा तसं झालंय
अगदीच फसवणूक झाली तरी पिसं काढण्यासाठी काही तरी हाती लागलं याचा आनंद असतो. काही काही सिनेमे तो ही देत नाहीत.
अर्धा चांगला आणि अर्ध्याबद्दल काहीच सांगता येत नाहीत असे... त्यांचं काय करावं ?
आज कितीही हसले तरी त्या काळात
आज कितीही हसले तरी त्या काळात हवा होती लक्ष्याची आणि त्याच्या पिक्चरची. त्याच काळातले महेश कोठारेचे पाच अक्षरी पिक्चर त्यानेच आपल्या खांद्यावर पेललेले आणि हिट केलेले.
>>>> अगदी सहमत.
त्यात तो सांगत होता की त्याला
त्यात तो सांगत होता की त्याला स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे असावं कदाचित >> आणि मराठीवर हिन्दी चा प्रभाव असल्याने कदाचित. (तो मूळ M.P. चा आहे हे इथेच वाचलेले.)
बाजीप्रभूंवरच्या कृष्णधवल चित्रपटाचं नाव काय? >>> माहित नाही किंवा आठवत नाही म्हणा. म्हणून baajiprabhu , pawankhind ladhai असं काही टाकून शोधलेलं. एक clip मिळाली. चित्रपट specifically त्यांचा नव्हता.
https://m.youtube.com/watch?v=Www-Hr9fNXg -- 4 min pasoon pudhe paha.
कठपुतली पाहिला.
कठपुतली पाहिला.
Ok ok आहे.
हृषिता भट किती वेगळी दिसतेय आता.
दमदार होउ शकला असता पण जरा विसविशित मांडणी वाटली. रकुल आणि अक्षय प्रकरण तर नंतर पॅच work करून ठिगळ लावल्यासारख वाटलं.
अक्षयकुमार आता एकसुरी अभिनय वाटतोय.
नवीन जॉईन झालेल्या ऑफिसरला इतकं हिडीस फिडीस कोण करतं? आणि नंतर एकदम डोक्यावर.
अश्याच type चा forensic पाहिला.
राधिका आपटे आणि विक्रांत मेस्सी.
ठीक ठाक नाय पाहिला तरी चालेल.
आरण्यक सीरिज जास्त चांगली होती.
सिमिलर स्टोरी लाईन वर
डाउनटन ऍबीचा सेकंड मूव्ही
डाउनटन ऍबीचा सेकंड मूव्ही प्राईमवर आला आहे.
तो France वाला का ??? अरे वा
तो France वाला का ??? अरे वा !
मराठी लोक हिंदीत काम करताना
मराठी लोक हिंदीत काम करताना हिंदी घासून पुसून घेतात. लतालाही दालचावल की बू घालवण्यासाठी उर्दू शिकावं लागलं.
मग या लोकांना मराठी शिकायला काय जातं?
अंकित मोहनचं मराठी कसं आहे?
बाजीप्रभूंच्या अतुलनीय
बाजीप्रभूंच्या अतुलनीय त्यागासाठी हे खास गाणे...व्यवस्थित माहिती असताना ऐकले तर दगडालाही पाझर फुटेल असे शब्द, काळजात खोल खोल शिरणारा लताबाईंचा आवाज... निःशब्द..
https://youtu.be/53BXEER85sI
हो. काव्य कुसुमाग्रजांचे
हो. काव्य कुसुमाग्रजांचे
<<<बाजीप्रभूंच्या अतुलनीय
<<<बाजीप्रभूंच्या अतुलनीय त्यागासाठी हे खास गाणे...व्यवस्थित माहिती असताना ऐकले तर दगडालाही पाझर फुटेल असे शब्द, काळजात खोल खोल शिरणारा लताबाईंचा आवाज... निःशब्द..>>>
_/\_
या अलीकडच्या ऐतिहासिक
या अलीकडच्या ऐतिहासिक सिनेमांमुळे इतिहास नको पण चित्रपट आवरा असं म्हणायची वेळ आली आहे.
मराठी चित्रपट निर्मात्यांनो
मराठी चित्रपट निर्मात्यांनो
इतिहासाचा " खून " करु नका .
मराठी ‘इतिहासपट’ मागे का पडे ?
सध्या मराठी सिनेविश्वात इतिहासपटांची लाट आलेली आहे. इतकी की बाजीप्रभू हा विषय केंद्रस्थानी असलेले दोन सिनेमे आले.
गेल्या काही वर्षात दिग्पाल लांजेकरचा शिवअष्टकाचा संकल्प, त्याचे आलेले चार सिनेमे, प्रसाद ओक चा हिरकणी, प्रवीण तरडेंचा हंबीरराव, कोल्ह्यांचा गरुडझेप, आणि हा कालपरवाचा ‘हर हर महादेव !’
मराठी सिनेमा आपल्या पराक्रमी पुरुषांचा इतिहास रुपेरी पडद्यावर मांडू लागला ही बाब खरोखर अभिनंदनास्पद आहे. एका चाकोरीच्या बाहेर येऊन हे मुलखावेगळे विषय अंगावर घेण्याची तयारी मराठी सिनेमा दाखवतो हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे, पण………..
या सगळ्या सिनेमांपैकी ‘हर हर महादेव’ बघून मराठी इतिहासपटांचा स्तर अतिशय सुमार, दर्जाहीन होतोय याची फार फार भयानक आणि दुःखद जाणीव झाली. मी हे फार वाईट वाटून लिहितोय, मराठी सिनेमाबद्दल हे लिहावं लागतंय याचं अपार दुःख आहे मनात माझ्या.
पण एक सच्चा मराठी सिनेरसिक म्हणून, आणि जबाबदार इतिहास अभ्यासक म्हणून या सिनेमाबद्दल ही माझी तक्रार समजा ही. मी वर उल्लेख केलेले या आधीचे सिनेमे फार दर्जेदार होते, त्यात खटकेलं असं काहीही नव्हत असं मी अजिबात म्हणणार नाही, पण या सगळ्यापैकी हर हर महादेव मध्ये जे दाखवलंय त्याबद्दल मात्र न राहवून व्यक्त होतोय.
शिवरायांवर सिनेमा काढावा वाटला याबद्दल हर हर महादेव यांच्या निर्माते, लेखक, दिग्दर्शक, यांचं अभिनंदन. पण आपण भावनेच्या भरात काय करतोय, काय दाखवतोय, लोकांवर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार आपण फार कमी केलाय असं दिसतय. मी माझ्या बऱ्याच इतिहास अभ्यासक मित्रांना घेऊन सिनेमा पाहिला, आम्हा सगळ्यांनाच खटकले ते असे -
१. बाजी हे अतिशय आत्ममग्न, आपला विचार करणारे, नंतरच्या काळात सुद्धा स्वराज्यावर शंका घेणारे, शिवाजी महाराजांवर शंका घेणारे दाखवलेत.
अफझलखानाशी लढायला जातांना तर बाजी महाराजांना विचारतात, तुमच्या भावाला खानाने मारलं, त्याचा बदला घ्यायला जाताय तुम्ही . तुमच्या वैयक्तिक खुन्नशीसाठी मावळ्यांचा जीव का टांगणीला लावता ?
अगदी सिनेमा शेवटला जातो तोपर्यंत स्वराज्याशी बाजींच्या निष्ठा जोडल्या आहेत की नाही हे समजत नाही.
२. साधारण कथानकाचा सूर असा आहे की आपल्या मुलाच्या सांगण्यावरून ते शिवाजी महाराजांकडे जातात, मुलाच्या अपमानाचा बदला घ्यायला वगैरे वगैरे. त्यांना खरच स्वराज्याचं मोल आहे म्हणून जातात की नाही हे उलगडतच नाही.
३. बाजींचा मुलगा बापासमोर आईवर हात उगारतो. कसं शक्यय त्या काळात !
४. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा हे वाक्य राजांच्या तोंडी असे. तेच असायला हवं ना ! इथे शिवरायांच्या तोंडी दोन वेळा वाक्य आहे,
‘माझी इच्छा, तीच श्रींची इच्छा !’
शिवराय असं कसं म्हणू शकतात ? भयंकर आहे हे फार !
हे वाक्य महाराजांच्या तोंडून का आणलय ?
५. जिजाऊ म्हणतात राजांना अफझलखान युद्धाच्या वेळी, “उद्या जिंकलात तर तुम्ही छत्रपती होण्यास लायक पात्र असाल असं मी समजेल.”
इतके हपापलेले होते का शिवाजी महाराज राजे होण्यासाठी ?
६. अखेरीस बाजीप्रभू आपल्या तोंडुन, घंटा, आणि काही शिवीदर्शक शब्द वापरतात, जे अजिबात योग्य नाहीतच.
७. महाराजांनी कोथळा काढला तरी खान मेला नव्हता, अफझलखान - त्याला मारलं संभाजी कावजी कोंढाळकर यांनी. इथे महाराज स्वतः त्याला पालखीजवळ जाऊन कोथळा काढून मारतात. अतिरंजित दृश्य केलंय ते.
८. शिवराय कोसळत्या पावसात मशाल पेटवतात, त्यानेच तोफेला बत्ती देतात, पाण्यात जाळ पेटवतात. ते शिवाजी महाराज होते, कुणी मांत्रिक नाहीत.
९. शेवटीं बाजीप्रभू एकटेच थेट चालून जातात शत्रुवर, त्यात ना कसली युद्धनीति ना कसला गनिमी कावा. खिंड अतिशय सपाट दाखवलीये, जमीनीत अजिबात खचखळगे नाहीत, रखरख नाही, काही नाही.
१०. शरद केळकरचे मराठी उच्चार हे अतिशय सुमार आहेत. कुण्या मराठी मातीतल्या मर्दाचे ते असं अजिबात वाटतं नाही. फुलाजी प्रभू हे अतिशय रंगेल दाखवलेत. त्यांचा आणि बाजींचा तसा परस्पर संबंध, जिव्हाळा यात आलेला नाहीच.
मा.राजसाहेब ठाकरे यांचा आवाज सहयाद्री म्हणून वापरला म्हणून काही भक्त येतील बघायला सिनेमा, ठाकरेंच्या आवाजाच्या निमित्ताचं भांडवल करता येईल, मार्केटिंग होईल, असा समज झाला असावा दिग्दर्शक देशपांडेंचा. राजसाहेबांचा आवाज आहे उत्तम, पण जे निवेदन राज यांच्या आवाजात रेकॉर्ड केलंय, त्याच्या लेखन दर्जाबद्दल एकुणच आनंदी आनंद झालाय. भरकटलय हो ते लेखन !
नको तिथे नको ते चमत्कार, पाण्यात जाळ लावणारी दृश्ये, हे सगळं थरारक वगैरे वाटेल, असा समज दिग्दर्शकांचा का असतो कुणास ठाऊक ?
मराठी इतिहासपट दिग्दर्शकांनो,
सिनेमा बघायला गेलेला प्रेक्षक हा आपण इतिहासगाथा बघणार आहोत अशी मनाची तयारी करुन जातो, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर केलेले जादूचे प्रयोग नसतात बघायचे. त्यापेक्षा
दिग्दर्शकाने स्वतः लेखक होण्याची हौस जरा बाजुला ठेवून सीन्स बरे शूट करावेत. लेखकाने संवाद कसे कसदार होतील याकडे लक्ष दिलं तर येतील ना बरे दिवस इतिहासपटांना !
त्यामुळे,
जरासा ब्रेक घ्या, अभ्यास वाढवा. चारपाच वर्ष नाही काढले इतिहासपट तर इतिहास कळायचा थांबणार नाहीये अगदीच.
लोकहो,
आपल्या आजूबाजूच्या तरुण पिढीला जपा, ती पिढी अशा चमत्कारपटांना इतिहास मानू लागली तर अवघड आहे !
- पार्थ बावस्कर ( इतिहास अभ्यासक, लेखक )
Mi_अनु, फ़ारएंड , अमा,
Mi_अनु, फ़ारएंड , अमा, अस्मिता धमाल प्रतिसाद.. मजा आली वाचुन
मागे टिळकांवरच्या चित्रपटावर
मागे टिळकांवरच्या चित्रपटावर टीका म्हणजे टिळकांवर टीका म्हणून कोणीतरी करवादलं होतं. आता तर काय.......
धन्यवाद वेडोबा
धन्यवाद वेडोबा
आशुचँप, उत्तम प्रतिसाद. थोडी
आशुचँप, उत्तम प्रतिसाद. थोडी भर घालून वेगळा धागा असावा असे मला वाटते.
ही ऐतिहासिक चित्रपटांची आलेली लाट राजकारणापासून दूर असणार्यालाही एका अजेण्ड्याचा भाग असावी अशी शंका यायला लावणारी आहे. सर्वसामान्य माणसाला ऐतिहासिक अचूकता वगैरेंशी घेणं देणं नसतं. त्याला एक चांगला चित्रपट हवा असतो. पण भालजींच्या जुन्या चित्रपटात ( त्यांच्यावरही अजेण्ड्याचे आरोप आहेत) त्या काळचे वाटावेत असे प्रसंग, संवाद दिसतात. आजच्या ऐतिहासिक चित्रपटातला अॅटीट्यूड, डायलॉगबाजी ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करताहेत असे वाटते. सूर्यकांत, चंद्रकांत आज बाळबोध वाटत असले तरी ते मिस्कील राजे उभे करत. राजांमधलं मनुष्यपण उभे करत. आजच्या सिनेमात चिमां काय सुभा काय ते इतर वेळी जो अॅटिट्यूड ठेवून वावरतात तोच भूमिकेत पण दिसतो. व्हीएक्सएफ वगैरेंबद्दल बोलायलाच नको.
सहजसुंदर न वाटणारे अशी थोडक्यात व्याख्या आहे.
आशु छान पोस्ट
आशु छान पोस्ट
रानभुली, वा काय लिहिलस!
Pages