चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बापरे
माझं डोकं ते शेवट वालं वाक्य वाचून हँग झालं.

प्लॅनेट मराठी ओटीटीवर दोन सिनेमे पाहिले. एक म्हणजे सहेला रे.

मृकु सुबोध भावे व सुमीत राघव न. मृकु चे अगदी टिपिकल आई कुठे काय करते व्यक्तिरेखा आहे. जराशी जास्त सुंदर व खूपच श्रीमंत थेंक्स टु हेला रे सुभा - पक्षी उच्च शिक्षीत पती. पण तिच्या कडे लक्ष देत नाही असा तिने मनात ग्र ह करुन घेतला आहे. मग कॉलेज रियुनि यन चा अगदीच टिपिकल सीन आहे. पुणेरी बाय्का पण बीअर घेतात टाइप जोक्स आहेत. फारच कलकलाट करणार्‍या बायका. व २५ - २६ वर्शे तिच्यावर मनातूनच प्रेम करणा रा कॉलेज मित्र म्हणजे सुमीत राघवन सेकंड हेला किंवा सहेला ह्यांच्यात काय चॉइस!! पण ती एक दिवस सुमीत बरोबर कारने शेत दाखवायला जाते व ते परत येतात. सुहिता थत्ते असह्य अशी पुणेरी सासू आहे. व मृकुचे वडील डिमेंटेड. ते ही सुभाने उदार पणे आपल्याच घरी ठेवुन घेतले आहेत. घरी नोकर चाकर ड्रायव्हर पण हिला पतीचा सह वास व प्रेम नाही त्यामुळे ती सुकत चालली आहे.

मग अमेरिकेतुन आलेला व तरीही हिच्याच साठी प्रेमाचा दिवा घेउन असलेला मित्र परत भेटतो त्याच्या बरोबर ती ट्रेकला जाते ( जुन्या काळाप्रमाणे) व्हेरी क्लिशेड. सर्व क्लीशे समोर ठेवुनच कथा लिहिली आहे. तिथे तो आपले मन एकदाचे व्यक्त करतो तर तिला काही माहि तीच नसते. मग तिला अपवित्र वाटू लागते. व ती घरी जायचा हट्ट करते. नेक्स्ट डे मित्राचे मत परिवर्तन झाले आहे व तो तिच्याक्डे पुरण पोळी तूप जेवायला आलेला आहे. ह्याची बरंका अमेरिकेत एक लिंडा नावाची बायको व क्रिश नावाचा मुलगा आहे. सो क्युट.

तो आलेला पाहोन तिला आस्चर्याचा धक्का बसतो. व ते सुबोध बघतो. मग व त्यांना एकांत मिळाल्यावर् तो तिला बर्थडे विश करून गिफ्ट देतो व जवळ घेतो म्हणजे ती मागणी करते तशी.

नेक्स्ट डे एकदम ती अ‍ॅसर्टिव झालेली आहे व नवर्‍यावर हक्क गाजवत आहे. घरी पूजा करून ते लोक्स पुण्याला जाउन काही एक काम करुन येतात. व ती तिचा बिझने स चालू करते. बिर्याणीमे इलायची टाइप . एक वर्शाने ती मित्राला गोधडी पाठ्वते. व तिचे संयत नात्याचे ते पाघरूण घेउन मित्र एकदम खुस होतो. किती कमी अपेक्षा जीवना कडून.

मृकु क्लोजप मध्ये अगदी वयस्कर दिसते. बाकी साड्या वगैरे जबरदस्त. पुण्यातील वयस्कर जोडप्यांचे जीवन कसे असेल त्याची कप्लना
येते. मजा म्हणून बघू शकता.

ट्रेकिन्ग च्या तिथे मुलांचा एक गृप येतो तो ह्यांना काका काकू म्हणतो तर ह्यांना फारच स्ट्रेंज वाट्ते. तरी बरे तिचा त्याच दिवशी वादि असतो.
मृकुचे नख रे बघायला आव्ड्त असतील तर बघा. सुभा वयस्कर दिसतो. सुरा ग्रीन कार्ड धारी मराठी मॅन मुर्ती मंत व्हॉट्सॅप अंकल.
पण सुभाचे घर छान आहे. सुहिता बाई डोक्यात जाते.

दुसरा ह्याच चॅनेल वर पाँडिचेरी सिनेमा आहे. मी एकेकाळी इथे फार हिंड्ले आहे कामानिमित्त त्यामुळे जरा नॉस्टॅलजिआ होता पण हे वेगळेच दिसते. सई ताम्हण कर इथे इल्लीगल होम स्टे चालवते तिला एक मुलगा आहे. वैभव तत्ववादी ती प्रॉपर्टी गिळंकृ त करायला पाठिवलेला आहे.
पण ओव्हर टाईं म त्या मुलाचे व त्याचे जमते अगदी हे माझे वडील टाइप. सईची आई नीना कुल् कर्णी भोचक पुणेरी काकू. फार अ‍ॅक्टिन्ग कोणीच केलेले नाहे. कथा संथ पणे पुढे जाते. पण शहराचे चित्रण व कलर पॅलेट छान आहे. सई विविध कपडे घालून आहे. पण काही ही अ‍ॅक्टिन्ग करत नाही एक दोन ठिकाणी रडायचे प्रसंग आहेत तिथे तिची लिमि टेशन दिस तात. तुलने साठी रंगदे बसंती मधील वहिदा रहमान व सैफ ची बहीण ह्या माधवन चे सामान रिसीव्ह करतात तो सीन नक्की बघा. लुका छुपी गाण्यातच आहे.

वैत पण नुसताच उंडारतो. अचानक त्याची एक्स वाइफ येते. त्यामुळे धुस फुस चालू आहे.
आता मुल हवे व नको यावरुन त्यांचा डिवोर्स होतो पण त्यासाठी आवश्यक त्या चाचण्या ती बायको करुन च घेत नाही. हे विचित्र आहे.
अ‍ॅलिमनी भक्कम घेते. सता राहत आहे ते घर छान आहे. मला वाटले वैत काही स्पाय किं वा टेर रिस्ट आहे कि काय असे वाटले पण तसे काही नाही. उगीचच मस्कलां दाखवायला स्लीवलेस शर्ट घालतो .

शेवटी सर्व इशू आपापल्या मार्गान संथ पणे रिझॉल्व्ह होतात. शेवटचे सीन्स व पिकनीक छान आहे. नीना व सई संवाद पण छान पण दोघीही काहीच इमोशन्स स्वतःचे काही इनपुट देत आहेत असे वाट्त नाही. संथ गती आहे. मी पिक्चर लावोन गेम खेळत अस्ते त्याने चालून जाते.
आता एक वर्श वर्गणी भरली आहे त्यामुळे इथ ले सर्व बघून घेणार.

अमा मी पण केवळ पाँडिचेरी आणि सहेला रे वर फारच इथे तिथे वाचलं म्हणून १ वर्षाचं सबस्क्रिप्शन घेतलं. सुमित राघवन ला बघून पैसे वसूल झाले म्हणेन Wink
बाकीचं काहि कंटेंट आवडलं नाहीये प्लॅनेट मराठीचं. रानबाजार बघू का नको संभ्रमात आहे.

रानबाजार बघू का नको संभ्रमात आहे.
>>>> अजिबात बघू नका... उगीचच लै शिव्या घुसाडल्या म्हणजे आपण लै काहीतरी भारी केलं अस नसतं हे त्या दिग्दर्शकाला सांगा कुणीतरी.. आणी तोच मेन लीड आहे... आनंदीआनंद नुसता

आता एक वर्श वर्गणी भरली >> माझं काहीच बघून होत नाही. सगळीकडचे पैसे वाया.
खूप पर्याय असले की काही सुचत नाही असं झालंय.
आता तर सिनेमाचं नाव नाही आवडलं हिरो नाही आवडला, भाषा नाही आवडली असे फिल्टर लावून मग उरलेल्यातलं पहावं लागतं Lol

आता एक वर्श वर्गणी भरली आहे त्यामुळे इथ ले सर्व बघून घेणार. >>> अमा Happy

मृकुचाही "बिझिनेस" का लगेच? म्हणजे माझ्या नवर्‍याची बायको व इतर अनेक मराठी सिरीज मधे महिला उद्योगपती होतात, घरगुती पद्धतीने कोट्यावधी रुपयांची उलाढाल करतात, त्यांना कसलीकसली पारितोषिके मिळतात आणि मग एक भारावलेले स्पीच होते. तसला बिझिनेस की खरा?

मृकु बरोबर शेत बघायला जायचे म्हणजे ताप. बारा मावळ सोडून इतरत्र फिरायला हवे. नाहीतर जाईल तेथे "या पिक्चर मधे मी यांचा रोल केला होता" वगैरे ऐकावे लागेल. किंवा एखादा गड वगैरे चढताना अचानक ती तलवार काढल्यासारखी अ‍ॅक्शन करेल. गोनीदा किंवा बमों बरोबर फिरल्यासारखे होईल, फक्त पिक्चर्सच्या संदर्भाने.

हस्तलिखित P&L स्टेटमेण्ट Happy जेथे एकाच वर्षी एकाच डीलर कडून त्यांना नफा व तोटा दोन्ही झाले होते.

मीही मागच्या महिन्यात घेतले प्लॅनेट मराठी.
पॉन्डेचेरी बघितला व आपण सबस्क्राईब केलंय हेच विसरून गेले मग इथे वाचून 'अरे एक महिना वाया गेला की आपला' झालं. (पडोसन मधे सुनील दत्त 'अरे माझे गृहस्थाश्रमाचे सहा महिने वाया गेले' म्हणतो तसे)

आठवल्यावर तातडीने तो 'सहेला रे ' बघितला. मृकु , सुभा व सुरा फार शुद्धजीवी आहेत. मृकुने तर 'कोणताही रोल असला तरी बेहत्तर, मी जन्माला मृकु म्हणून आले तर मरेपर्यंत मृकु म्हणूनच वावरणारे' अशी प्रतिज्ञा केली आहे. अतिशय पुणेरी , सतत स प कॉलेज व काहीबाही पर्यायी उल्लेख व त्यांच्या रियुनियन मधल्या 'तुझी ती शेपटेवाली माझी ती बॉबवाली' अशा लेम कविता. त्यांचे वय चाळीशीचे दाखवलेय व वावर एकसष्टीचा वाटला. हिरवागार सह्याद्री बघायला मिळाला. ते छान वाटले. मृकु सोशिक-सोशिक खेळते पण घरात भरपूर नोकर व आर्थिक सुबत्ता . शिवाय साडीवर वा चेहऱ्यावर एकही सुरकुती नसल्याने, फक्त पन्नाशी ओलांडली आहे तरी चाळीशीची दाखवली आहे म्हणून मला तिला दुःखी समजता नाही आले.

'कोणताही रोल असला तरी बेहत्तर, मी जन्माला मृकु म्हणून आले तर मरेपर्यंत मृकु म्हणूनच वावरणारे' अशी प्रतिज्ञा केली आहे. >>> Lol

त्यांचे वय चाळीशीचे दाखवलेय व वावर एकसष्टीचा वाटला.>>
फक्त पन्नाशी ओलांडली आहे तरी चाळीशीची दाखवली आहे >>> हे "यावरून मृकुचे वय ओळखा" असे क्विझ होईल Happy

'कोणताही रोल असला तरी बेहत्तर, मी जन्माला मृकु म्हणून आले तर मरेपर्यंत मृकु म्हणूनच वावरणारे' अशी प्रतिज्ञा केली आहे. >>> Lol असंच
मी माधुरीबद्दल म्हणते Happy
अमांचे रिव्ह्यू भारी असतात !

मै, माधुरी व मृकु बहिणी आहेत खरंच . 'मजा मा' बघू नका किंवा 'सहेला रे' बघू नका, सारखंच न मिसल्यासारखं आहे Lol
क्वीझ नको पण मृकु आवर. Lol
मला हातचं राखून काम करणाऱ्यांचा वैताग येतो, काम क्रिएटिव्ह असेल तर पितळ लगेच उघडे पडते. सोकु हवी होती येथे !

मला रानबाजार करता प्लॅनेट मराठी घ्यायचे आहे. ते "बोल्ड" वगैरे आहे म्हणून उगाचच चर्चा झाली पण त्यातले राजकारण चांगले दाखवले आहे असे ऐकले. नाहीतर मराठीत "बोल्ड" वगैरेच्या वल्गना खूप ऐकल्या आहेत Happy अशाने एक दिवस ते खरोखरच काहीतरी बोल्ड दाखवतील आणि कोणी इंटरेस्टेड नसेल Happy

* हा संवाद मूळचा कोठे आहे ते ओळखणार्‍यांना आगाऊ रिस्पेट
** आगाऊ म्हणजे इथे इन अ‍ॅडव्हान्स.

फारएंड - काहीही बोल्ड नाहीय... ट्रेलर मध्ये दाखवले तेच दोन सिन आहेत... तेदेखील स्टोरी ची नीड म्हणून...
सत्य कथा आहे.. नक्की बघा...

सत्य कथा आहे.. नक्की बघा... >> हो बघायची आहे. बोल्ड आहे म्हणून बघणार नव्हतो असे नाही. उलटीच शक्यता जास्त होती Happy पण बोल्ड चा दावा केलेले मराठी सीन्स इतके हास्यास्पद बघितले आहेत, त्यामुळे ते लिहीले.

अमांचा रिव्हू वाचुन त्यांच्याबद्दल काळजी वाटू लागली. Lol अहो किती तो पेशंस! दोन्ही रिव्हू वाचुन करमणूक झाली Lol
बाकी सगळ्या जन्तेने प्लॅनेट मराठी का बरं अचानक घेतलं? किंवा घ्यावसं वाटलं?
अस्मिता >> Lol

कांतारा बघितला नुकताच. खूप मस्त मुव्ही. अनुभव आहे हा चित्रपट थिएटरमध्ये पाहणे, विशेषतः तुम्हाला निसर्ग, घनदाट जंगल, तिथले वास्तव्य हे सगळे आकर्षित करत असेल तर कांतारा नक्की पहा. मध्ये थोडासा कंटाळवाणा वाटतो पण एकुणात खूप मस्त. शेवटचा ड्रामा केवळ थरारक. मध्ये अनेकवार थिएटर मध्ये व्हूआSSSSS च्या आरोळ्या प्रेक्षकांतून ऐकू येतात Lol

सिनेमॅटोग्राफी टू गुड!!! थिएटर मधून बाहेर पडल्यानंतर एखाद्या जंगल रिसॉर्टचा किंवा नाईट सफारीचा अनुभव घेऊन आल्यासारखे वाटते.

वेगळा विषय. जबरदस्त सादरीकरण.

बाकी सगळ्या जन्तेने प्लॅनेट मराठी का बरं अचानक घेतलं? किंवा घ्यावसं वाटलं? >>> अरे मधे भारतात होतो तर सगळीकडे प्रचंड मोठे होर्डिंग्ज आणि प्राजक्ता माळी आणि आणखी कोणाकोणाचे सपोजेडली बोल्ड फोटो. आजूबाजूला मराठीतील थोर थोर कलाकार राजकीय पोज मधे. सुरूवातीला बोल्ड म्हणून खूप जाहिरात झाली. पण नंतर अनेकांकडून ऐकले की एक राजकीय सिरीज म्हणून चांगली आहे.

तर प्लॅनेट मराठी त्याकरता. आता मृकु २१ व्या शतकातील रोल करत आहे तर ते वेगळे Happy

२१ व्या शतकातील, पण तरीही "क्लिशे" रोल लिहीण्याची करामत कोणी केली आहे त्याबद्दलही उत्सुकता आहे Happy

धन्य वाद सर्वांचेच. मृकुनेच कथा लिहिली आहे मग इतकी हे असं मग ते तसं अशी का लिहिली असावी. त्यात तो मित्र सुद्धा अगदी काणे. त्याकाळातही पुण्यात इराणी नाय्जेरिअन, सर्व धर्म व जातीचे विद्यार्थी होतेच होते. डे जि पोस्टात गेले की हे विद्यार्थी नेहमी दिसायचे. मग हा प्रेमिक अगदी शोधुन साजुक तुपातला का घेतला असावा?

पाँडिचेरी मध्ये सर्व कथा वस्तु जागेवर आहे पण अ‍ॅक्टिन्ग अगदी फ्लॅट आहे ताकदीचे कलाकार असते तर काही काही सीन्स उच्च करता आले असते. सई रोज साडी नेसुन फ्रेंच मध्ये गाइड गिरी करत फिरते. अन्न सर्व्ह करते हे ते दाखिवले आहे उगीच इंडिअन एक्सॉटिका

रिव्ह्यू भारी आहेत अमा! स.ता. साडी नेसून सायकलवर फिरते तोच ना पॉन्डिचेरी? हे काय लेडी सितारिष्टसारखं लेडी सायकलिष्ट ऑब्सेशन आहे की काय स.कुं. चं?

Pages