चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हे काय लेडी सितारिष्टसारखं लेडी सायकलिष्ट ऑब्सेशन आहे की काय स.कुं. चं? >>> Lol

प्रिया बापट नसल्याने सकुंचा आहे असे वाटलेच नाही Happy

माझ्या माहितीप्रमाणे पॉंडीचेरी चित्रपटाचे चित्रीकरण टिपीकल/रेग्यूलर कॅमेरा सेटअपऐवजी केवळ आयफोनद्वारे केले होते. अर्थातच मी चित्रपट बघितला नसल्याने चित्रीकरणात काही फरक जाणवतो का माहित नाही.

माझी माधुरी दीक्षीत अत्यंत आवडती अभिनेत्री असली (कारण बालपणापासून तिला बघतच मोठा झालोय) तरी अलिकडच्या चित्रपटांत ती माधुरी दीक्षीतच असते, माधुरीपणा सोडतच नाही (कित्येकदा लाऊडही वाटते (पण तरीही आवडते)). मला वाटते 'मजामा' च्या यशाबद्दल ती स्वतःच साशंक असावी, त्यामुळे 'द फेम गेम' एवढे प्रमोशन करतांना दिसली नाही.

बघितलेल्यांनी आयफोन व्हर्जन सुद्धा ओळखून सांगावा, ४ की ५.
-------
इथे स्मार्टफोन्वर शूट केला म्हटले आहे.
तेव्हा कोणता स्मार्टफोन, कोणते व्हर्जन ओळखण्याचा स्कोप आहे.

पण त्यातले राजकारण चांगले दाखवले आहे असे ऐकले. >>>> फारएण्ड , सिरिज पाहीली तर इथे अपडेट करा नक्की, तुम्हाला आवडली का सिरिज ते Happy

सहेला रे बाबत
"मैभी ये अत्याचार सहेला है रे" म्हणणारे बरेच माबोकर सापडले की. मागच्या कुठल्यातरी पानावर लिहिलंय बघा मी.
प्लॅनेट मराठीची जाहिरात जोरदार होती आणि मराठी चित्रपट हक्क घेतील / आहेत आणि वेबसेरिज देखील बनवतील खूप अशी हवा होती त्यात म्हणून घेतले.
365 भारतीय रुपये फक्त वर्षासाठी.
प्लॅनेट मराठीवर कंटेंट फार कमी.
रानबाजार बघायचं आहे.
अभिजित पानसे म्हणजे रेगे चा डायरेक्टर असेल तर अपेक्षा आहे थोडीतरी चांगली असेल.

365 वरून आठवले, Hotstar आले तेव्हा मी घेतलेले.365 रू होते.
आता चांगलेच वाढलेत त्याचे रेट. पण त्यावर कंटेंट भरपूर आहे.

"मैभी ये अत्याचार सहेला है रे" म्हणणारे बरेच माबोकर सापडले की >>> हाहाहा.

आता चांगलेच वाढलेत त्याचे रेट. पण त्यावर कंटेंट भरपूर आहे. >>> काय चांगला कंटेट आहे ते ही सांग रे. मागच्यावर्षी नवऱ्याला वर्षभर फ्री मिळालेले एअरटेल मुळे. यावेळी बाराशे भरले (टाइम्स तर्फे). सहा महीने त्या स्कीम मध्ये hotstar, सोनी लिव आणि डिस्कव्हरी आहे पण डिस्कव्हरी तीन महिनेच आहे. मी नकोच सांगत होते, काही बघणे होत नाही.

अंजू घरी जाउन उघडून इथे यादी टाकते. पण रान बाजार बघायला सुरू करू शकता. मी पुन्हा येइन नावाचा पण एक सिनेमा आहे. भाउ तोरसेकर हिरो असतील म्हणून अजून उघडून बघितला नाही.

मैभी ये अत्याचार सहेला है रे" >> Lol झकासराव
सहेलाचा अर्थ काय - सहेली म्हणजे मैत्रीण , सहेला म्हणजे मित्र का ?!

दिवाळीच्या मुहुर्तावर "हर हर महादेव " पाहिला .
या वर्शी केलेली पन्हाळा आणि पावन्खिडीची सहल, मनात अगदी ताजी होती .त्यात शरद केळकर आणि महाराजांच्या भुमिकेत चिमा नाही , ट्रेलर बघून कथा थोडी वेगळी वाटली . म्हटलं बघूया तरी काय आहे ते .

चित्रपट , पावनखिंड पेक्षा सादरीकरणार्त थोडा उजवा वाटला.चकचकीत . बाष्कळ विनोद होते पण थोडे कमी .
सुभा महाराजांच्या भुमिकेत आवडला . त्याचे डोळे मध्येच छान मिश्कील वाटतात . चिमासारखे विझलेले नाही .
सुरुवातीला काही वेळ तो थोडा अवघडलेला वाटतो , मग आपल्यालाच सवय होते. मृकु च्या ऐवजी निशिगंधा वाड आणि सईबाईच्या भुमिकेत आपली गौराक्का यांना फारसे काम नाहीये . पण आपापल्या जागी दोघी ठीक .

शरद केळकर आवडला . त्याचे उच्चार आणि संवादफेक सदोष आहे , पण ठीक आहे .
सिद्दी जौहरच्या भुमिकेत मिलिंंद शिन्दे उत्तम ,बराचसा संयत अभिनय . खूनशी सिद्दी चांगला वठवलाय .
बाकी सहकलारामध्ये , अमृता खान्विलकर , राणादा , अज्या ई मंडळी आहेत .

या वर्शी आम्ही पन्हाळ्याची सहल केली होती . गडावर एक उत्तम गाईड भेटला . माणूस एक्दम शिवभक्त , अभ्यासू आणि जाणकार . ज्या वाटेने महाराज आणि मावळे निसटले , त्या ठिकाणी आम्ही अर्धा -पाउण तास थांबलेलो . त्या गाईड नी पूर्ण कथा ईतकी डोळ्यासमोर उभी केली की अंगावर काटा आला . सर्व घटना , त्याचे परिणाम , पुढे काय झाले - ते अर्धा - पाउण तास प्रभावीपणे बोलत होते .
सांगायचा मुद्दा हा की त्यांची कथा , चित्रपटातल्या पन्हाळ्यावरून वेढ्यातून सुटका , शिवा काशिद आणि सिद्दी जौहर ची भेट , मावळे आणि महाराज यांचे विशाळगडावर पोचणे या पेक्षा जास्त परिणामकारक आणि थरारक होती . पन्हाळ्यावरून निसटणे आणि विशाळगडावर पोचणे हा भाग चित्रपटात अक्षरशः उरकलाय . उरकलाय म्हणजे भाषणबाजीमध्ये घालवलाय . चित्रपटाला राज ठाकरेंच निवेदन आहे . चित्रपटातील टाळ्या घेणारे पल्लेदार संवाद , लांबलचक भाषणे ही " कोणीतरी " लिहून दिल्यासारखी आहेत .

ईथली घोडखिंड , पावनखिंडमध्ये दाखवलेल्या खिंडीपेक्शा अरूंद आहे . व्हीएफएक्स चांगले आहेत. ३०० मावळे वि. १५ हजार सैनिक हा सीन बर्यापैकी परिणामकारक आहे . पण .....
परत तेच .... हवेत उडणारे सैनिक , हवेतल्या मारामार्या , नाट्यमय लढाया ई. ई.
बाजी प्रभू म्हटल्यावर दोन्ही हाताने दांडपट्टा चालवत त्वेषाने लढणारे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येत . ईथे दान्ड्पट्ट्याचा वापर मोजून २-३ मिनिटे .

माझ्या लेकाला ऐतिहासिक चित्रपट आवडतात . यावेळी मात्र त्याने मध्येच १० मिनिटाची power nap घेतली.
त्याबंदल न त्याला खंत ना मला . मध्ये मध्ये चित्रपट खरच कंटाळवाणा होतो .

चित्रपट संपल्यावर कुठलाही प्रभाव रहात नाही . फर्जंद मध्ये निदान गाणी तरी तोंडावर होती , ईथे ते ही नाही .
पन्हाळ्या वरची धान्याचे कोठारे , बुरुज , काही जागा पाहून मात्र आम्ही खूष झालो कारण त्या ओळखीच्या होत्या .
घरी परताना , मी आणि लेकाने परत एक्दा पन्हाळ्याला जायचा आणि त्या गाईड सोबत फिरायचा मनसुबा मात्र नक्की केला .
रात्री तुनळीवर शोधून black and white चित्रपटातले त्वेषाने लढणारे आणि तोफेचे आवाज ऐकुन प्राण सोडणारे बाजी प्रभू आणि most handsome actor who played Maharaj ever म्हणून सुर्यकांत दाखवले Happy

निगेटीवच रिव्हुज वाचतेय या चित्रपटाचे.

शरद केळकर आवडला . त्याचे उच्चार आणि संवादफेक सदोष आहे>>>> काल बस बाई बस एपिमधे ही टिम आली होती. त्यात तो सांगत होता की त्याला स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे असावं कदाचित.

चित्रपटातले त्वेषाने लढणारे आणि तोफेचे आवाज ऐकुन प्राण सोडणारे बाजी प्रभू>>>
ते जास्त परिणामकारक होते कारण बाजींची भूमिका करणारे स्वतः उत्तम दांडपट्टा चालवत आणि त्याचे प्रशिक्षणही देत होते असे वाचलेलं
बहुतेक याच धाग्यावर आधी कधीतरी

हाय शुभ प्रभात

प्लॅनेट मराठी वरचे बघणेबल शिणुमे:

आम्ही जातो आमुच्या गावा देहाची तिजोरीवाला
भालू
बालगंधर्व
आराम हराम है. आपण ह्यांना पाहिलेत का. बाधा ,अस्तित्व( तब्बु वाला) देवराई, गाभ्रीचा पाउस एक कोप च्या, दगडी चॉल, दहावी फ,
देउळ हमाल दे धमाल, बायोस्कोप सुबरान, कळत नकळत अजून बरेच आहेत. पैसा वसूल करलियो.

भालू भालूसाठी बघायचा असेल तर ठीक, अन्यथा बाकी सगळं बघू नये असंच आहे.

स्वस्ति, बाजीप्रभूंवरच्या कृष्णधवल चित्रपटाचं नाव काय?

अच्छा, तर प्लॅनेट मराठीमुळे 'हमाल दे धमाल' युट्यूबवर दिसत नाही. खूप आधी त्यावर दोन-तीनदा बघितला होता, अलीकडे कित्येकदा शोधला पण सापडायला नाही. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या नेहमीच्या पठडीत नसलेल्या काही चित्रपटांपैकी एक आहे.

ब्रह्मास्त्र बद्दल चर्चा झाली आहे का इथे? किती टुकार.. चेन्ज म्हणुन आईला घेउन गेलो होतो बरोबर..
आई म्हणाली काय लहान मुलन्सारख दाखवतात..
३डी मुळे ठिणग्या अन्गावर आल्यसारख्या वाटत होत्या तेवढच काय ते फील
बाकी इतका खालचा दर्जा सगळ्याच बाबतित.. सन्वाद, अभिनय.. लेखन.. कथा.. सगळ फसलय

<<<लक्ष्मीकांत बेर्डेंच्या नेहमीच्या पठडीत नसलेल्या काही चित्रपटांपैकी एक आहे.>>>
बघायला हवा मग. युट्युबवर नसेल तर अजून कुठे सापडतो का बघतो.

हमाल दे धमाल चे दहीहंडीचे गाणे प्रचंडच्याही प्रचंड लोकप्रिय होते आमच्याकडे. बाकी चित्रपट माझ्या तितक्या आवडीचा नाही. बराचसा विसरलो आता. तरी कधी बघायला हवा पुन्हा.

https://youtu.be/FMWVgojXbMo असले किडे करायचे असले की मला हाक देत जा. हा घ्या "हमाल दे धमाल" पार्ट १ आणि नंतर पार्ट २ ते पार्ट ५ शेजारी दिसतील.

Prime वर the outfit पहिला..संपूर्ण चित्रपट एका tailoring दुकानात घडतो....मोजकीच 6 पात्र आहेत... ट्विस्टस जबरदस्त आहेत..

Submitted by सतीश ८७ on 26 October, 2022 - 06:38
>>>> हा रेन्टवर आहे का प्राईमवर? मला 119/- ला दिसतोय.

धन्स सी.

एखादा चांगला चित्रपट प्राईमवर आहे म्हटले की आजकाल तसेच होत आहे. रेंट वर किंवा त्यासाठी अमुक दुसरे सबस्क्रिप्शन घ्या. असे मी दोन सबस्क्रिप्शन्स घेतले, त्यांची नावे सुद्धा आठवत नाहीयत आता.

https://youtu.be/FMWVgojXbMo असले किडे करायचे असले की मला हाक देत जा. हा घ्या "हमाल दे धमाल" पार्ट १ आणि नंतर पार्ट २ ते पार्ट ५ शेजारी दिसतील >>> होय, सीमंतिनी! पार्ट 1 ते 5 दिसत आहेत. पण कोणतीही कलाकृती सलग बघण्यात मजा असते. नाहीतर प्रत्येक भाग संपला की पुढचा लावा, त्याच त्या जाहिराती बघा, कंटाळा येतो.

हमाल दे धमाल चे दहीहंडीचे गाणे प्रचंडच्याही प्रचंड लोकप्रिय होते आमच्याकडे. बाकी चित्रपट माझ्या तितक्या आवडीचा नाही. बराचसा विसरलो आता. तरी कधी बघायला हवा पुन्हा. >>> गोविंदा रे गोपाळा
https://youtu.be/5Rmd7FU7fNM

टिपिकल लक्ष्या चित्रपट आहे तो... काही खास नाहीय... नेहमीच्या पठडीतलाच आहे....

लक्ष्याचा वेगळा चित्रपट म्हणजे एक होता विदूषक...

Pages