चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

प्राईमवर आहे.
आता ४७ मिनिटांपर्यंत पाहिला. पूर्ण पाहीन असं वाटतंय. मयताचा बॅनर एकच नंबर..
जाबर अण्णा परत या ! Proud

Ammu तेलुगू, प्राईमवर हिंदीत आहे.
नायिकेचे शेजारी राहणार्या पोलिस इन्स्पेक्टर बरोबर लग्न होते.. थोडे दिवस सगळं गोड गोड सुरू असते मग सुरू होते खरी गोष्ट, नायिकेचा छळ,मारहाण, अपमान.. एका लेवलपर्यंत नायिका सहन करते मग येतो कहाणीमे ट्विस्ट...डोमेस्टिक वायोलंस विषयावरचा सिनेमा.

भिरकावून दिलेले, भरकटलेले. संमिश्र रिव्ह्यूज आहेत. 47 मिनिटांपर्यंत तरी सुसह्य आहे. गिरीश कुलकर्णी यांची नेहमीची टीम आहे पण ते निर्माते दिग्दर्शक नाहीत. बघू पुढे काय होणार ते..
https://maharashtratimes.com/entertainment/movie-reviews/bhirkit/moviere...

अंजली_१२, कसं समजलं तुम्हाला नाहीये ते? तुम्ही हिरोच्या खर्‍या आईचं.. पिक्चर मधल्या नाही बायलॉजिकल आईचं, दिग्दर्शकाच्या कुत्र्याचं नाव घालून शोधलंत का? ते प्राईम आहे. भिरकीट शोधून उप्योग नाही.

तुम्ही हिरोच्या खर्‍या आईचं.. पिक्चर मधल्या नाही बायलॉजिकल आईचं, दिग्दर्शकाच्या कुत्र्याचं नाव घालून शोधलंत का? ते प्राईम आहे. भिरकीट शोधून उप्योग नाही. >>> Lol

तुम्ही हिरोच्या खर्‍या आईचं.. पिक्चर मधल्या नाही बायलॉजिकल आईचं, दिग्दर्शकाच्या कुत्र्याचं नाव घालून शोधलंत का? ते प्राईम आहे. भिरकीट शोधून उप्योग नाही. >>> हाहा, हे बरोबर आहे पण. हिरोच्या नावाने नाही सापडणार पण आईच्या नावाने सापडुन जाईल :))
bhirkit search केला तर mp3 music आलं

भिरकावून दिलेले, भरकटलेले. >> ओह्ह्ह! मला वाटलं होतं की भिरकिट म्हणजे भृकुटीचा अपभ्रंश असेल. श्रीपतीचा शिरपत होतो तसं काहीतरी. फारच अपेक्षा बुवा मला!!

Prime वर the outfit पहिला..संपूर्ण चित्रपट एका tailoring दुकानात घडतो....मोजकीच 6 पात्र आहेत... ट्विस्टस जबरदस्त आहेत..

शहाण्या माणसाने प्राईम वर पिक्चर शोधुच नये.एक भाषा निवडायची आणि बोट दुखेपर्यंत किंवा सगळं संपेपर्यंत स्क्रोल करायचं.यातही मराठी भाषा म्हणून जपानी पिक्चर वगैरे माफक गोंधळ होतातच Happy
नेटफ्लिक्स एआय इतकं जोरदार आहे की 'तुम्ही हा पिक्चर पाहिला, म्हणजे आता तुम्हाला हे हे इतके आवडायलाच हवे' म्हणून एक यादी टाकून देतां.कधीकधी हिरोच्या नावाने शोधलं की त्याच्या चेहऱ्याशी फक्त अमुक एक पोस्टरमध्ये साम्य असलेले चित्रपट पण येतात सर्च मध्ये.नेटफ्लिक्स सर्च नक्की काय काय कंडिशन वापरतो हे शोधायचंय मला.

भिरकिट म्हणजे भिरभिरणारे असाही एक अर्थ समजला. 15 ऑगस्ट ला झेंडा आणि कागदी भिंगरी मिळते तिला गावी भिरकीट म्हणायचे.
निवडणुकीत कुणाचे तरी विमान चिन्ह होते. त्यावरून इमान भिरकिटलं असं ऐकलंय. पुण्यात कि गावी ते आठवत नाही.
jabar.jpg
इंटरव्हल पर्यंत खूपच आवडला. खुसखुशीत विनोद केव्हा तरी बोचरे होतात. वळू आणि सैराटचा फर्स्ट हाफ यांचा भास होतो. मध्यंतरानंतर गंभीर होताना दिग्दर्शकाची तारांबळ उडते. निवडणुकीचं राजकारण रंगणार आणि त्यातून होणारे विनोद, भाष्य असं पुढ्यात येणार असं वाटत असताना अचानक सिनेमा संपतो. नाहीतर वळू, सैराट च्या जवळ जाणारा सिनेमा बनू शकला असता.
सागर कारंडे ने चहयेद्या बंद करून असे चित्रपट करावेत. गिरीश आणि उमेश कुलकर्णी दोन्ही भावांचा अभिनय उत्तम. त्यांना सर्वांच्याच नैसर्गिक अभिनयाची साथ मिळाली आहे.

हिरोच्या नावाने शोधलं की त्याच्या चेहऱ्याशी फक्त अमुक एक पोस्टरमध्ये साम्य असलेले चित्रपट >>> म्हणजे झीनत अमान नावाने शोधले तर परवीन बाबीचे पिक्चर्सही येतात का लिस्ट मधे? Happy

नेटफ्लिक्स एआय इतकं जोरदार आहे की 'तुम्ही हा पिक्चर पाहिला, म्हणजे आता तुम्हाला हे हे इतके आवडायलाच हवे' म्हणून एक यादी टाकून देतां.कधीकधी हिरोच्या नावाने शोधलं की त्याच्या चेहऱ्याशी फक्त अमुक एक पोस्टरमध्ये साम्य असलेले चित्रपट पण येतात सर्च मध्ये.नेटफ्लिक्स सर्च नक्की काय काय कंडिशन वापरतो हे शोधायचंय मला.>>>>>>>>
+111111111111111
या पोस्ट ला अजून लाखो लाईक्स Happy
मी तरी Netflix ला कंटेंट संपे पर्यंत वापरायचं ठरवलंय !
जबरदस्त युजर फ्रेंडली !

शहाण्या माणसाने प्राईम वर पिक्चर शोधुच नये.एक भाषा निवडायची आणि बोट दुखेपर्यंत किंवा सगळं संपेपर्यंत स्क्रोल करायचं.यातही मराठी भाषा म्हणून जपानी पिक्चर वगैरे माफक गोंधळ होतातच
>>>>
अगदी…अगदी

झीनत अमान शोधून पाहिली.परवीन बाबी आली नाही
वर 5 झीनत अमान रिझल्ट आणि मग खाली करीना, पूनम ढिल्लो वैजयंतीमाला चे पिक्चर आले.
वरुण धवन शोधल्यावर खाली बरेच संजय दत्त आणि कार्तिक आर्यन चे पिक्चर आले
गहिवरलेला मोड ऑन:
कोणत्या जन्मीचे हे ऋणानुबंध गं बाई!!एक शोधल्यावर दुसरा हाक देतोच.
मोड ऑफ!!

Lol

शहाण्या माणसाने प्राईम वर पिक्चर शोधुच नये.एक भाषा निवडायची आणि बोट दुखेपर्यंत किंवा सगळं संपेपर्यंत स्क्रोल करायचं.">>> आम्ही पण ह्येच करतो.. आएमडिबी आणि स्टोरीलाईन बघून बघायचा कि नाही ठरवतो

हेहे
अजून बरेच राहिलेत पिसं काढायच्या कोट्यात
त्यात सूर्यवंशम चा नंबर कधी यायचा काय माहित.

दोबारा बघितला. चांगलाय.
त्यातला शेवटला शेवट न करता शेवटून दुसरा शेवट हाच शेवटला शेवट केला असता आणि अंतराने तो स्वीकारला असता तर आनंदी नाही तरी चांगला शेवट झाला असता असे वाटले.

Pages