चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कंतारा बघावा की नको थिएटर ला
रिव्ह्यू खूप मिश्र आहेत.काही अगदी चांगले आणि काही अगदी भडक आहे बघू नका वगैरे
जरा ज्यांनी पाहिलाय त्यांनी पर्सनल मत लिहा ना

आवर्जून थिएटर मध्ये जाऊन पहावा एवढा खास नाही.
ओटीटी वर आला की बघा.
थिएटर मध्ये जायचंच आहे, कुठला पाहु असे वाटत असेल तर PS1, तो पाहिला असेल तर हा हरकत नाही.

मी PS1 पाहिला सकाळी 10:30 च्या शो ला, तर आम्ही फक्त सात आठ जण होतो थिएटर मध्ये. मला वाटले शो कॅन्सल करणार, पण पाच मिनीट करत करत 11 ला सुरू केला. इकडे तेलगू तमिळ मध्येही शो असल्याने हिंदीला कमी गर्दी असेल.

कांताराला सुद्धा २५-३० लोक होते फक्त.

PS1ची चर्चा वाचून तो ज्या पुस्तकावर आधारित आहे ते वाचायला घेतलं
पण फुल ऑन चांदोबा आहे स्टोरी म्हणजे
विजयकेतू मलयकेतू राजा राणी राजकन्या हेर गुप्तहेर वगैरे सगळा मालमसाला

सिनेमात पण हेच आहे का सगळं

हो.

ओके
पी एस चे चांगल्या वेळी शो आहेत का बघते
पेस्ट कंट्रोल करून बाहेर राहायाच्या वेळेत जायचं आहे
(टिपिकल ममव पणा)

दोबारा, ब्लॅकफोन हे पिक्चर prime घेतलेले असून परत सेपरेट पैसे भरून बघायला सांगतात, जाऊदे.

कांतारा प्रोमो फार अंगावर आला, बघू नाही शकणार.

कंतारा , ट्रेलर पाहून बघावासा वाटलं नाही. पण नसता पहिला तर खूप मोठ्या अनुभवाला मुकलॊ असतो. अस्सल मातीतला, मातीची कहाणी सांगणारा चित्रपट आहे. कथा, पटकथा, अभिनय, छायाचित्रण सर्वांग सुंदर आहे, कन्नड मधून बघितला असता तर संवादातलं सौन्दर्य अजून भावलं असतं , हिंदी मध्ये संवाद थोडे विचित्र 'ऐकू' येतात. हा एक मोठ्या पडद्यासाठीच बनलेला चित्रपट आहे. शेवटाकडे जातांना त्या पूर्ण प्रसंगात तुम्ही समरसून जाता , एक प्रेक्षक म्हणून केवळ बघे उरत नाही. जातीव्यवस्था, न्यायव्यवस्था, समाज, संसाधन आणि निसर्ग ह्या सर्वांच्या वर कंतारा!

ओके
सध्या कुटुंब प्रेफ्रन्स नुसार थँक गॉड बघण्याचे ठरते आहे(बिमल केसरी गुटखा मॉडेल आमच्याकडे लहानांना आवडतो)
कंतारा आणि सेलवम ott वर बघेन
किंवा कंतारा ऑफिस च्या कोणाबरोबर तरी

vendhu thanindhathu kaadu- तमिळ नवीन सिनेमा आज पाहिला प्राईमवर.
कामाच्या शोधात तमिळनाडूतल्या छोट्या गावातून मुंबईत आलेल्या आणि गुन्हेगारी जगात अडकलेल्या सुशिक्षित हिरोची गोष्ट..दोन गुंड टोळ्यांमधली भांडणं,क्राईम,थ्रीलर,वायोलंस सिनेमा..

काल दोबारा पाहिला. छान आहे. ईंटरेस्टींग आहे.
सोबत पोरगीही होती. त्यामुळे मध्ये मध्ये पॉज करत तिला काय किती कळलेय हे चेक करायला आणि डिस्कस करायला मजा येत होती.
दिवाळी सुट्ट्या सुरू झाल्याने रात्री बारा ते तीनचा शो पाहिला. सकाळी उठल्यावर आपल्या आईला समजवात होती तो पिक्चर.
जरूर बघा. मला तर तापसी पन्नूसाठी बघायचाच होता. ती नुसते स्त्रीप्रधान चित्रपटातच लीड रोलला नसते तर जे चित्रपट स्त्रीप्रधान नसतात तिथेही मुख्य भुमिकेत असते म्हणून तिचे विशेष कौतुक वाटते.

Selfie mummy google daddy -कन्नड सिनेमा प्राईमवर पाहिला.
वर्कींग कपलची दोन छोटी मुलं मोबाईल एडिक्ट होतात..मोबाईल ची सवय मोडण्यासाठी त्यांना मोबाईल डिएडिक्शन सेंटरची मदत घ्यावी लागते..तिथे मोबाईल गेम्स,सोशल मिडिया, लाईक्स अशा चक्रात अडकलेले पेशंट्स सुधारणेसाठी आलेले असतात..मोबाईलच्या अतिवापराचे अतिशोयक्ती दुष्परिणाम..हलकाफुलका ठिक वाटला सिनेमा.

Netflix वर बाँबर्डमेंट पहिला

दुसऱ्या महायुद्धात डेन्मार्क मधल्या एक गेस्तापो हेडक्वार्टरला उडवण्याच्या मिशन दरम्यान गफलतीने ब्रिटिश वैमानिक एक लहान मुलांची शाळा उडवतात
या सत्य घटनेवर आधारित सिनेमा
कुठंही मेलोड्रामा न होऊ देता कमालीचा संयत सिनेमा
लहान मुलांचे भावविश्व आणि ते उध्वस्त झाल्यावरचे चेहरे, भावव्याकुल पालक आणि देवाच्या शोधात असलेली एक नन
सगळेच अफलातून

कंतारा बघावा की नको थिएटर ला
रिव्ह्यू खूप मिश्र आहेत.काही अगदी चांगले आणि काही अगदी भडक आहे बघू नका वगैरे
जरा ज्यांनी पाहिलाय त्यांनी पर्सनल मत लिहा ना >>>>
मी पाहीला. आवडला. काहीतरी वेगळं होतं. मस्त. बघाच. थेटरमध्ये जाऊन बघाच.

काल दोबारा पाहिला.>>
मी "दोबारा" थिएटर जाऊन "दोबारा" बघितला. विषय माझ्या आवडीचा होता.
बॉक्स ऑफिस वर सणसणीत हापटला. इतर हिंदी सिनेमांप्रमाणे सेक्स अजिबात वापर केलेला नाही, गाणी नाहीत. आयटेम डान्स नाहीत मग कसा चालणार?

मानव मान गये. सही पकडे.
म्हणून मुद्दामहून स्त्री अस न लिहिता "स्त्री" अस लिहिले होते.
पण पन व जोक चांगलाच आहे. जोक आवडली.

केशवकूल Happy .
नुसतं स्त्री आवडला लिहिले तरी त्यात चूक नाही. आपण बोलताना " मला आवडला स्त्री" असेच म्हणु. पण त्यातुन होणारा पन दाखवणे हा उद्देश.

हो ना जसे की अनेकदा प्रतिसाद आवडला म्हणून अनेक जण लिहितात - "मानव यांचा प्रतिसाद आवडला." आता इतर प्रतिसाद काय जनावरांचे असतात का? पण एखाद्या विशिष्ट आयडीने "मानव" असा शब्द वापरला म्हणून हा विनोद घडतो. तसेच त्या चित्रपटाने "स्त्री" हे नाव निवडले म्हणून हा विनोद घडतोय.

यावरुन आठवलं - एका आयडीने मायबाप असा शब्द निवडला. आता त्याचा उल्लेख करताना आपण त्याला मायबाप असं संबोधायचं का दरवेळी? मायबोलीने काही ठराविक शब्द आयडी करिता निवडण्यास बंदी आणावी आणि त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने देखील काही नावे चित्रपटाला देण्यावर बंदी आणावी.

अर्थातच - मानव आणि स्त्री या शब्दांवर आक्षेप नाही.

ह्या वरून एक खरा खुरा किस्सा आठवला.
कॉलेजमध्ये आमच्या क्लास मधे प्राणनाथ नावाचा एक विद्यार्थी होता. स्त्री लेक्चररची त्याच्या बरोबर बोलताना काय हालत होत असावी!
आम्हाला मात्र खूप हसू फुटत असे.

डिंगडाँग!
कोsssण?
मी मानsssव
ते बेल वाजली तेव्हाच कळलं. अजून तरी कधी जनावरांनी आमच्या घराची बेल वाजवली नाही!

कांताराचे मिश्र रिव्ह्यूज वाचून उत्साह मावळला. आता ओटीटीवर पाहू.
हिरो प्राईम वर पाहिला. क्लिप्स आणि गाणी पाहून झालेली होती. अमरीश पुरींवरचा धागा वाचल्याने यू ट्यूबवरच्या पाशाच्या सीननंतर शोधून पूर्ण पाहिला. मला तरी आवडला. आम्ही फक्त मनोरंजन करतो, कृपया लॉजिक/ अभिनय शोधू नये अशी पाटी लावल्यासारखा आहे. पाशा सुरूवातीला चांगलाच टेरर आहे. नंतर नाही. जॅकी, मीनाक्षी छान दिसलेत.
( सिनेमाचा काळ पाहून आपणही अपेक्षांचे माप वेगळे लावतो. नकळत घडतं Happy )

कांतारात मला चांगलीच आवडलेली गोष्ट म्हणजे पुंजारली कोला उत्सवात नर्तक बनतो तो भाग. ती वेषभूषा, तो नाच, हावभाव, अभिनय. पहिला आणि शेवटला दोन्हीही.
भडक असुनही.

दोबारा पाहिला. Mirage ही पाहिलेला. घडणारी घटना हिंजवडी मध्ये 1996 मध्ये घडते. तेव्हाचं हिंजवडी म्हणजे दक्षिण मुंबई, दिल्ली टाइप अति उच्चभ्रू श्रीमंत लोकांची घरं दाखवली आहेत. पिक्चर मध्ये काही देसी बदल केलेत, पण देहबोली मात्रं कॉपी केली आहे . मला तापसी एवढी आवडत नाही. Mirage पाहिला असेल तर नाही बघितला तरी चालेल.

Pages