फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<मानव तुमचा ट्रॅक जरा चुकत आहे.>>
अरेच्या हो की.
तुम्ही हागणदारीचे परफेक्ट उदाहरण दिले असताना मी उगाच अजून एक उदाहरण द्यायचा चोंबडेपणा केला आणि ट्रॅक चुकला.

सेलेब्रिटी स्वतः भरपूर फटाके वाजवतात
मोठमोठ्या आवाजात dj लावून रात्रभर दारू च्या पार्ट्या करतात.
नशेत वेगात गाड्या चालवून लोकांचे जीव घेतात
ते काय समाजाला आदर्श देणार
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात.

नेतेही तेच करतात
गांधीजीच्या विचारांचे पक्ष असतात आणि कार्यकर्त्यांना पार्टीत दारूच पाजतात.
त्यामुळे सेलेब्रेटी वा नेते यांची आवाहने हास्यास्पद आहेत.
हिंमत दाखवा आणि कायदा करा म्हणावे.

फटाक्यांवर पुर्ण बंदीच आणली तर काही कोण त्याच्याशिवाय मरत नाही. ईतके बेसिक कळत नाही का या राज्यकर्त्यांना? मग आवाहने करा, ईथेच वाजवा, तिथे वाजवू नका, मग पुन्हा विरळ वस्तीत वाजवा, मग ती विरळ की गर्दीची याचे निकष लावा, ते अमलात आणा.. कोणी सांगितलेय.

कोण आहे का ईथे मायबोलीवर तरी ज्याच्या आयुष्यातून फटाके हद्दपार झाले तर तो काही मोठ्या आनंदाला मुकणार आहे?

फटाके निर्मिती विक्री पूर्ण बंद .
कोणी विरोध करत नाही करणार पण नाही..
ज्यांचे रोजगार जातील त्यांना नुकसान भरपाई दिली तरी ते फायद्याचेच ठरेल.
पण त्याची सांगड धर्माशी घातली जाते.
मग विरोध होतो
फटाके बंद ही मोहीम यशस्वी झाली की .
विजेचा अपव्यय होतो हे कारण सांगून दिवाळी मधील रोषणाई वर बंदी.
असे एक एक करून सर्व बंद करणे आणि दिवाळी हा सण च नाहीसा करणे.
इतके मोठे कट कारस्थान असू शकते असे लोकांना वाटते.
विरोध मागे ही मानसिकता आहे

अंधश्रद्धा निर्मूलन ल पण ह्या मुळेच विरोध झाला.
पहिल्या अंधश्रद्धा बंद कारणे.
मग त्या आडून श्रद्धा वर हल्ला चढवून श्रधावर पण सरकारी नियंत्रण आणून त्या बंद करणे.
मग रीती रीवज ,समाज व्यवस्था ,कुटुंब व्यवस्था हे सर्व टार्गेट करून .
शेवटी बालवाडी पासून च ह्या सर्व बाबतीत उलटे शिकवणे.
आणि ह्याचा परिणाम हिंदू संस्कृती पूर्ण नष्ट करणे हिंदू धर्म पूर्ण संपवणे हा अंतिम हेतू साध्य करणे.
ही कारण आहेत अंध श्रद्धा निर्मूलन लं विरोध होण्या मागे

हेमंत, हो. लोकांना हा आपल्या धर्माविरुद्ध कट वाटतो. म्हणून जो तो आपल्या धर्माचे रक्षण करायच्या मागे लागला आहे. कोणी फटाक्यात आपला धर्म आणि संस्कृती शोधतेय तर कोणी ईतर प्रथा, आणि कर्मकांडात.
त्यामुळे आपणच येत्या पिढीला हे धर्म वगैरे शिकवू नये. कुठल्याही सणाची सांगड धर्म संस्क्रुतीशी घालून सांगू नये. जर हे सर्वांनाच जमले तर फटाके आणि प्रदूषणच काय, जगभरातल्या कैक समस्या अस्तित्वातच राहणार नाहीत.

पण हे फार अवघड आहे. कारण आपण अमुकतमुक धर्मात जन्म घेतलाय आणि तोच आपला धर्म, तीच आपली संस्कृती. तोच वारसा आपल्याला आपल्या मुलांना द्यायचा आहे हे आपल्या डोक्यात खोलवर रुजले आहे.

नाही चूक आता जे समाज सुधारक आहेत त्यांची आहे.
१), फटाके हे प्रदूषण करतात.
हे सत्य आहे ना..त्या मुळेच बंद झाले पाहिजेत ना.
मग दिवाळीत फटाके वाजवणे बंद करा.
अशी मागणी का?
२) अनवशक्या वीज वापरणे हा विजेचा अपव्यय आहे.
साधनं संपत्ती वर ताण येतो .नैसर्गिक साधन संपत्ती धोक्यात येते.
मग दिवाळीत रोषणाई मुळे विजेचा अपव्यय होतो .
असले डायलॉग का?
खूप उदाहरण आहेत.

फटाकेमुक्त दिवाळी असे शीर्षक असलेला जुना लेख असला तरी पुढे लेखकानेही हे शब्दशः नव्हे पण फटाक्यांचे प्रमाण कमी करणे हा उद्देश आहे असे स्पष्ट केले आहे.>>>>>>>>फटाक्याचे प्रमाण एकदम बंद करणे शक्य होणार नाही. कमी कमी करत जाणे हा देखील फटाकेमुक्तीकडे वाटचाल आहे. अंधश्रद्धांचे देखील तसेच आहे. त्या कमी होत जातात. एकदम निर्मूलन हे शक्य नाही. पण उद्दीष्ट निर्मूलनाचे ठेवल तर कुठे निवारण होण्याकडे वाटचाल होईल.

हे थांबणार नाही, कारण नवीन अंधश्रध्दा जन्म घेत असतात, जसे रेकी, प्राणिक हिलींग , टाळ्या थाळ्या वाजवणे इत्यादी इत्यादी.

त्या मुळे विश्वास वाटेल असा व्यक्ती,ज्याच्या हेतू बद्दल शंका वाटणार नाही असा व्यक्ती नी ..जर फटाके दिवाळी ( हा शब्द underline करा) मध्ये वाजवू नका असे आव्हान केले तर लोक नक्कीच ऐकतील .
कारण तो particular कोणत्याच सणाचे नाव घेणार नाही.
फटाके वाजवल्या मुळे काय नुकसान होते ते सांगेल.
>>> पटले

लाव रे तो व्हिडीओ >>>>११११२२१++++

बाकी मैदानात एकत्र येऊन फटाके वाजवावे, दाट लोकवस्तीत रुग्णालयाजवळ वगैरे नको, आवाजावर, वेळेवर बंधने असावीत, कमीत कमी प्रदुषण होईल असे पहावे याबद्दल पूर्ण सहमती
ज्यांना फटाके आवडत नाहीत त्यांनीही इतरांना त्यातून आनंद मिळू शकतो हे मान्य करून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला तर इच्छित परीणामाची शक्यता वाढेल. फटाके वाजवणार्या लोकांची हेटाळणी केल्यास लोक चेव येऊन फटाके वाजवण्याची शक्यता जास्त, जे गेल्या वर्षी दिल्लीत झाले.

त्या मुळे विश्वास वाटेल असा व्यक्ती,ज्याच्या हेतू बद्दल शंका वाटणार नाही असा व्यक्ती नी ..जर फटाके दिवाळी ( हा शब्द underline करा) मध्ये वाजवू नका असे आव्हान केले तर लोक नक्कीच ऐकतील .
कारण तो particular कोणत्याच सणाचे नाव घेणार नाही.
फटाके वाजवल्या मुळे काय नुकसान होते ते सांगेल. >> गांधीजी नरसीजींची प्रार्थना सांगून गेले आहेत ना.... आणि गांधीजींसारखी वादातीत,महात्मा, जीबद्दल विश्वास वाटेल, जिच्या हेतू बद्दल शंका वाटणार नाही अशी दुसरी व्यक्ती आजच्या जमान्यात कुठे सापडणार ना? Happy

वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड़ परायी जाणे रे
पर दुख्खे उपकार करे तोये मन अभिमान ना आणे रे

अजून काही वेगळे सांगायला हवे आहे का?

फटाक्यांना विधायक पर्याय काय? असा प्रश्न असतो .पुण्यात मागील वर्षी स्वप्नशिल्प सोसायटी मध्ये फटाके नको विमाने उडवा हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता. पर्यावरणास हानी पोचविणाऱ्या फटाक्यांपेक्षा बुद्धी आणि सर्जनशीलतेला चालना देणारी विमाने उडवा असा संदेश याद्वारे देण्यात आला. विमानाच्या प्रतिकृतींचे उड्डाण करून दाखवले आणि त्या प्रतिकृतींच्या कसरतीसुद्धा करून दाखवल्या.

बुध्दांकडे एक माऊली येऊन माझ्या मुलाला जिवंत करा अशी मागणी करते. ते तिला सांगतात ठीक आहे फक्त एवढे कर: ज्या घरात ज्यांचे कधीही कुणीही मेले नाही अशा घरातून मूठभर पीठ घेऊन ये तुझा मुलगा जिवंत होईल.

ही एक बोधकथा आहे हे उघड आहे, सत्यकथा असेल तरीही बोध स्पष्ट आहे.
परंतु मानव जातीचे कल्याण करणारा तो महान आत्मा जरी खरेच भूतलावर आज अवतरला आणि त्याने फटाके न फोडण्याचे आव्हान केले तरी आजचे त्यांच्या पेक्षा महान लोक त्यांना म्हणतील " आधी अशा घरातून ज्यांच्या कुणीही कधीही कसलेच प्रदूषण केले नाही त्यांच्या कडून मूठभर पीठ घेऊन या" मग आम्ही तुम्हाला आमच्या आधी अजून कुणाकुणाला असे आव्हान करायला हवे ते सांगु.

प्रत्येकाला आपल्या विचारांना अनुकूल अशा बोधकथा साहित्यात मिळतात. नसतील तर पाडता येतात. दगडावर डोक आपटून काही उपयोग नाही असेही म्हणता येते व प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे असेही म्हणता येते.

दिवाळीला फटाके उडवण्याच्या परंपरेला फार प्राचीन इतिहास आहे असा युक्तिवाद हे स्वयंघोषित संस्कृतीवादी करतात त्यात कितपत तथ्य आहे?

फार खोलवरचा प्राचीन काळ घेऊयाच नको. पन्नास वर्षापूर्वी खेडेगावात फार कुणी फटाके वै उडवत नव्हते याला मी स्वत: साक्षीदार आहे. शहरांतून दोन चार ठराविक मंडळी उडवत असतील बापडे ते मला नाही माहित. पण बहुतांश भारत खेड्यात आहे म्हणून आपली भारतीय संस्कृती जादाकरून ग्रामीण भागातच आहे. आणि तिथे ह्या दिवसांत काय चालते? तिथली जवळपास सर्व जनता शेतीवर गुजराण करते. ह्या दिवसांत पीके नुकतीच काढलेली असतात आणि खळ्यांवर मळणी चालू असते. मळणी जनावारांद्वारे केली जायची. ही जनावरे त्यामुळे खळ्याशेजारीच अडसरा करून बांधली जातात. या दिवसांत शेतकऱ्याकडे पहाटेपासून रात्रीपर्यंत कामाची नुसती लगबग सुरु असते. अशा परिस्थितीत सकाळी उठून ते गुरांची वैरण पाणी, धारा काढणे, खळ्यावरच्या कामाची जुंपण, धान्य जास्तानी लावणे हे बघतील का फटाके उडवायचा थिल्लरपणा करतील? फटाक्यांच्या आवाजामुळे गुरे बिथरतात, प्रसंगी वेसण खुंटीसहित उखडून पळून जाऊ शकतात. फटाक्यांचे आवाज हे निच्चीतच शेतकऱ्याना आनंददायी नाहीत. ते हे करतील काय? ही पन्नास वर्षापूर्वीची अनुभेलेली स्थिती. अजून फक्त शंभर दीडशे वर्षे मागे गेले तरी काय स्थिती असेल हे आपण ताडू शकतो. गरिबीने रंजलेगांजले लोक होते. दोन वेळचे खायची मारामार ते फटाके वै विकत घेऊन उडवणे करतील का? सत्तर ऐंसी वर्षापूर्वी खायला अन्न नव्हते म्हणून अमेरिकेतून तिथे डुकरांना खायला घालायचा मिलो गहू आयात करून नेहरूंनी या देशातली माणसे जगवली होती. आणि हे भामटे काय सांगतात फटाके उडवायची प्राचीन संस्कृती होती म्हणून.

हे सगळे पाहता काय लक्ष्यात येते? लिखापढी करणाऱ्या आणि शेती व कष्टाची कामे नसणाऱ्या, सकाळी बहुत करून कामधंदे नसणाऱ्या काही निरुद्योगी शहरी लोकांनी अलीकडच्या काळात हे फटाक्याचे प्रस्थ सुरु केले असणार हे ओघानेच आले. आणि आता हेच लोक फटाके ही भारतीयांची प्राचीन संस्कृती होती म्हणून धादांत खोटारडा डांगोरा पिटत आहेत.

अगदी खरंय ५० वर्षापूर्वी दिवाळीत गावी गेले की फक्त टिकल्यांचा थोडाफार आवाज ऐकायला मिळायचा. आठ साडेआठ पर्यंत गाव शांत झालेले असायचे. वीज असूनही आकाशकंदील तेलाच्या दिव्यानेच उजळायचे.

त्या मुळे विश्वास वाटेल असा व्यक्ती,ज्याच्या हेतू बद्दल शंका वाटणार नाही असा व्यक्ती नी ..जर फटाके दिवाळी ( हा शब्द underline करा) मध्ये वाजवू नका असे आव्हान केले तर लोक नक्कीच ऐकतील .
>> exactly
मागे प्रियांका चोप्राने आवाहन केलं की दिवाळीला कृपया फटाके वाजवू नका वगैरे. नंतर स्वतःच्या लग्नात भरपूर फटाके वाजवले. लोक अशांचं माप त्यांच्या पदरात घालणारच. अशा सेलिब्रिटींच्या दांभिकपणामुळे चांगल्या विचारांचासुद्धा नुकसानच होतं.

अल्पना, stubble burning वर बंदी आणण्यासाठी तो "परली दहन " नावाचा हिंदू सण घोषित करण्याची मागणी आनंद रंगनाथन ह्यांनी केली आहे. हिंदू सण आहे म्हटल्यावर सरकारपासून न्यायालयांपर्यन्त सगळे बंदी घालायला सरसावतील LOL

म्हणजे फटाक्यांवर निर्बंध हिंदूविरोधी आहेत असं हिंदुत्ववाद्यांचे इंटलेक्च्युअल आनंद रंगनाथनच म्हणताहेत. छान.

९९% हि लोक गुन्हेगार नसतात.
कायदे मोडणारे नसतात.
सर्व नियम पाळणारे असतात.

पण फटाके बंद करा ही सरसकट मागणी करण्याचा सरळ परिणाम हयच कायदे पाळणाऱ्या लोकांवर होतो

अशी मागणी चूक च .
देशाचा कणा हीच लोक आहेत..ही आहेत म्हणूनच देश आहे
त्यापेक्षा दहा नंतर रात्री फटाके वाजवणे हा गुन्हा आणि सरळ दोन वर्षासाठी jail मध्ये.
मोठ्या आवाजाचे ,बिल्डिंग मध्ये फटाके वाजवणारे दोषी सरळ दोन वर्ष आत.
मग कोणता ही असू, प्रसंग असू, कोणत्याही धर्माचा असू .
अगदी पंत प्रधान पण असू .
सर्वांना एकाच नियम.
मला नाही वाटत कोणी विरोध करेल

आम्ही लहानपणी फटाके पेटविलेत म्हणून आता आमच्या मुलांनी फटाके पेटवावे हा आग्रह पटत नाही.

आमच्या लहानपणी मोबाईल, व्हिडीओ गेम नव्हते. इतर खेळांच्या साधनांचीही टंचाईच होती. सुरुवातीला टीव्ही नव्हता मग चाळीत कॉमन मग घरी बिनरंगाचा असं करीत रंगीत टीवी बघायला मिळेपर्यंत दहावी आली आणि परीक्षेमुळे तोही कधी तासाच्यावर दिवसाला पाहता अला नाही. थेटरात सिनेमा पाहणं तोही आपल्याला हवा तो ही तर फारच मोठी अ‍ॅचिव्हमेंट होती.

आताची पोरं दिवसाला किती तरी तास टीवी, मोबाईल, लॅपटॉप त्यातही हवा तो जुना नवा कोणताही सिनेमा / सिरीज हव्या त्या क्षणी पाहू शकतात. प्रत्येक पोराकडे क्रिकेटचं किट, फुटबॉल, व्हॉलीबॉल असे नाना प्रकारचे चेंडू, इतर गेमिंग आणि स्पोर्ट अ‍ॅक्सेसरीज महागडे शूज , सायकली वगैरे असतंच असतं. सोशल मिडियावर अकाऊंट, चॅटींग आणि बहुतेकांना जी एफ देखील असते आणि पालकही चक्क अ‍ॅक्सेप्ट करतात. कितीही धक्का बसला तरी हेच वास्तव आहे.

आम्ही जी एफ ची मनातल्या मनात कल्पना जरी केली असती तरी आमच्या बापानी आमच्य जी खाली एफ (फटकवलं) असतं. तेव्हा आम्हाला वर्षाला शंभर दोनशे रुपयांचे फटाके उडवायचं आकर्षण असल्यास नवल नाही. आजच्या मुलांना इतकी आकर्षणं असतांना पुन्हा फटाके वाजवायचं आकर्षण आणि उत्साह खरंच आहे का? की बळेच आपण त्यांना भरीला पाडतोय?

काल रात्री मॅच जिंकल्या मुळे फटाके वाजले व रात्री एक दीड परेन्त फटाके वाजत होतेच. सकाळी साडेसहा सात पासून थोडे थोडे चालू आहेत. पण ओव्हर ऑल प्रमाण कमी आहे. पूर्ण चर्चेमध्ये एकतर फटाक्यांमुळे पक्षी व प्राणी ह्यांना त्रास होतो. फटाके बनवताना चाइल्ड लेबर वापरले जाते व प्रिव्हिलेज्ड क्लासने फटाके वाजवून झाले की उद्या त्याचा कचरा साफ करणे, त्याचे सेपरेशन करणे - कागद धातु प्लास्टिक हे करणारा एक वेगळा क्लास असतो. जो तुम्ही टावर मध्ये झोपले असताना कार्यरत असतो. हे मुद्दे आलेले नाहीत.

आज जबाबदारी पूर्वक फटाके वाजवा. जवळ एक पाण्याने भरलेली बादली ठेवा. मुलांना जरीचे फ्लोइम्ग कपडे घालून आणू नका खाली. व पायात चपला/ बूट नक्की घाला. गरम फुलबाजीवर पाय पडून भाजू शकते. व डोळ्यांना पण इजा होउ शकते. शुभ दीपावली.

आमच्या भागात पहाटे साडेतीन पासून फटाके वाजायला सुरू झले
पण असा प्रचंड असह्य वगैरे नव्हता
तुरळकच होते त्यामुळे खूपच बरे वाटत आहे

Pages