फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काढा काढा सर, भजनी मंडळ आहेच रेडी आमचं त्यावर प्रतिसाद द्यायला Happy

मुंबई
मुंबईचा समुद्र
मासे आणि आता पापलेट चा रोडवलेला आकार
कोळणी आणि त्यांच्याशी घासाघीस
मासा आणि खाद्यजीवन
कॉलनी मधले अन्य लोकं
ऑफिसमधले सहकारी
बेस्ट किंवा लोकलने जाताना होणाऱ्या गप्पा
खाडी आणि खारा वास
धडधड हुरहूर उत्कंठा सगळं काही यायला हवं तर मजा आहे

चार ओळीत किंवा दीड दोनशे फोटो टाकाल तर मजाय नाय

नाही रे बाबा! तुला काय वाटतं माहित नाही, पण तुझा विचार माझ्या डोक्यात नसतो सतत. Lol
तू निरर्थक धागे काढलेस तरी बारीक आयरोल शिवाय मला काहीही त्रास नाही. हवे तितके धागे काढ. प्रतिसाद आणि धागे मला वाटेल तेव्हा मी जंप करतो.
मी ही मुंबईत (म्हणजे डोंबिवली/ ठाण्यात/ पवईत... याला मुंबई नसेल म्हणायचं तर नका म्हणू बापडे! त्यानेही मला काही फरक पडत नाही) २५ एक वर्षे राहिलो आहे. मुंबई आवडतेच. पण म्हणून मुंबईत घाण आहे, अशक्य प्रदुषण आहे, अनागोंदी आहे, हल्लीतर सायनच्या पुढेही वाहने बेशिस्तितच धावतात हे नाकरण्यात काहीही अर्थ नाही. बबल मध्ये राहिलं तर मुंबई चांगली आहे. रोज काम करायचं असेल तर जीवाला फार तोशिष पडते. पण अगेन हे सगळे ओपिनिअन आहेत. एखाद्याचं काही ' मत' असेल तर त्याच्याशी कसा काय वाद घालू शकतो कोणी? तर असो. माझं मनोरंजन होतंय तेव्हा लिहित रहा.

धाग्याचा विषय "फटाकेमुक्त दिवाळी" असा आहे. विसरला असलात तर आठवण करून देतो.>>>
आता दिवाळीत खरे फटाके फोडायचे नाहीत, म्हणून इथे सगळेजण 'विचारांचे फटाके' फोडून 'फटाकेमुक्त दिवाळी' साजरी करणार आहेत!!!

मोरोबा धागा मुंबईवर नाही मुंबईच्या समुद्रावर काढणार आहे

तुर्तास हे एंजॉय करा
मुंबईच्या समुद्रावर आजवर लिहीण्यात आलेले माझे (एका मुंबईकराचे) लेख

१) ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. - https://www.maayboli.com/node/43411

२) ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२) - https://www.maayboli.com/node/43482

३) समुद्र समुद्र !!!! - https://www.maayboli.com/node/46466

४) ती, मी आणि मुंबईची खादाडी ! - https://www.maayboli.com/node/82547

पु लं च्या एका कथेत ते वजन कमी करावे म्हनून उपोषण करत असतात तर लोक त्यांना नाना प्रश्न विचारून भंडावून सोडतात. एक तरुण विचारतो की तुम्ही उपोषण का करत अहात तर पु.ल. त्राग्याने म्हणतात "माझे वजन बघ किती वाढलेय. उद्या माझे बरे वाईट झाले तर कुणी येणार आहे का?" त्यावर तो तरुण " हो! का नाही? मागच्या महिन्यात समोरच्या चाळीतली म्हातारी गेली तर आम्ही सारे गेलो होतो" . हे वाचले की मला ऋन्म्याचीच अठवण येते !

फटाक्यांबद्दल ज्यांना लिहायचेय त्यांनी कृपया मला न आवडलेल्या जाहिराती धाग्यावर जावे. तिथे चाललाय तो विषय.

मुंबई चे मोठेपण.
1) आता मुंबई ( एमएमआरडी) मध्ये खूप प्रचंड लोकसंख्या .
२) मुंबई लोकल मध्ये प्रचंड गर्दी असते.
पण working day मध्ये जे रोज चे प्रवासी असतात तेव्हा इतक्या प्रचंड गर्दीत पण सहकार्य केले जाते.
३) इतकी प्रचंड लोकसंख्या असून पण रोज रस्त्यावर झाडू मारला जातो.पूर्ण कचरा रोज च्या रोज उचलला जातो.
खूप कठीण काम आहे.
४) मुंबई ची रचना सुटसुटीत आहे कोणी व्यक्ती पत्ता दिला की तिथे पोचू शकतो.
५) प्रतेक घरात नियमित नळा नी पाणी येते.
६) अडचणी च्या वेळी मुंबई कर मदतीला तत्पर असतात.
२६/११ असू किंवा महापूर.
७) मुंबई ची एक वेगळीच झिंग आहे.
अजून खूप कारणे आहेतं

ऋन्मेऽऽष
सर तुम्ही त्यांच्या जाळ्यात फसत आहात. तुम्हाला ते मिद्दाम उचकावताहेत. उद्या धागा काढला की हेच म्हणणार, पहा आम्ही म्हणालो होतोच. तस्मात् दिवाळी पर्यंत "लेखणी बंद" पंधरवडा पाळा.

सुनियोजित area नुसार लोकसंख्या असणारी, सर्व बेसिक सुविधा असणारी.
आरोग्य व्यवस्था पासून , transport, पोलिस यंत्रणा.
सक्षम असणारी लहान किंवा मोठी शहर भारतात नाहीत.
अनेक देशात नाहीत.
पण तरी पण ..
मुंबई मध्ये बर्या पैकी सर्व सुविधा,नियोजन, व्यवस्था आहे.
त्या बाकी शहरात नाहीत.
Kem पासून टाटा पर्यंता आणि
आणि sion पासून gt पर्यंत अनेक मोठमोठे सरकारी दवाखाने फक्त मुंबई मध्येच आहेत.
आणि इतक्या गर्दीत पण सुरळीत चालणारे.
हे असे भारतात दुसऱ्या कोणत्याच शहरात बघायला मिळणार नाही

उगाच नई ब्रिटिशांनी मुंबईला देशाची राजधानी केली
इतक्या उकड्यात राहून पण त्यांनी मुंबईचा कायापालट केला

आणि मुंबईला इतिहास नाही हे म्हणणार्यांनी लक्षात घ्यावे की रामायणात उल्लेख आहे मुंबईचा

तस्मात् दिवाळी पर्यंत "लेखणी बंद" पंधरवडा पाळा.>>>
का मायबोली ओस पाडायची आहे का तुम्हाला?
सर तुम्हाला कसलं जाळ्यात पकडणार आम्ही
कार्तिवीर्य कसा पाण्याचा प्रवाह थांबवू शकत होता तसे तुमचे आहे
आम्ही पामर कसलं जाळं टाकणार डोंबल

ते उगाच बंगाल्याना खुश करायला कागदोपत्रीच

खरी राजधानी मुंबईच होती

नैतर मग पहिली रेल्वे कोलकात्यात नसती का आणली?

कोणतरी एकदा मुंबईला शांघाय करायला निघाले होते. तेव्हा मुंबई काय म्हणाली?
ऐका SSSS हो
"नेहमीच राया तुमची घा SSSS ई, नका लाऊ गठुडंं बांधायला.
तशी कशी येऊ मी शांघायला ओ तशी कशी येऊ मी शांघायला."
देवाचे आभार. मुंबई अजून जिथे आहे तिथेच आहे.

मुंबईला लोक दिवसभर लागा शोधात असतात.
सकाळी "त्यासाठी" जागा.
नंतर लोकल मध्ये जागा.
बसमध्ये खिडकी जवळची जागा.
हॉटेलमध्ये खाण्यासाठी जागा.
असा हा "जागा" माणूस रात्री झोपण्यासाठी जागा शोधत असतो. म्हणालेच आहे
"मुंबईला लांबी आहे, रुंदी आहे, पण "खोली" नाहीये."

विषयावर येऊन:
"दिवाळीत फटाके उडवू नका" म्हणण्याचा अधिकार कुणाला? असा वेगळा धागा काढावा.

मुंबई धागा मी विकेंडला काढतो.

ईथली अवांतर चर्चा थांबवा _/\_

@ टॉपिक

घरी प्रस्ताव मांडलाय. फटाके नको घेऊया.

घरून असे उत्तर आलेय की सोसायटीतली ईतर पोरांनी वाजवले आणि पोरांनी हट्ट केला तर घेऊया.

मी त्यावर म्हटले आपण फटाके न वाजवून ट्रेंड सेटर बनूया.

त्यावर मलाच घरून ऐकवण्यात आले की तू लहानपणी वाजवलेस तर आता पोरांना का अडवतोयस, रडवतोयस...
एक लक्ष्मीपूजनाचा दिवस तरी वाजवायचेच.

बघूया आता काय होतेय.
मला तर यंदा नकोच आहेत फटाके. कारण अजूनही बोनस नाही झालाय. पण पोरांच्या मावश्यांनी खर्च केला तर ते कारणही गेले.

आणि हो,
दोन्ही पोरांच्या शाळेत फटाके वाजवू नये वगैरे बिलकुल सांगितलेले नाहीये. त्यामुळे मुले शिक्षकांचे ऐकून स्वत:च समजतील हा मार्गही बाद झाला आहे !

संत गाडगे महाराज,संत एकनाथ ह्यांची भारुड
आणि असे अनेक ह्यांनी सडकून टीका हिंदू धर्म वर ,अंध श्रद्धा वर केली आहे.
पण त्यांची टीका हिंदू ना कधीच टोचली नाही.
त्यांनी स्वतः बदलायचा प्रयत्न केला .
आता जे फटाके बंद करा,विसर्जन बंद करा,garabha बंद करा ,गणपती ustav बंद करा असे सांगत अस्तात..
त्यांची समाजात पत नाही.
त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही.
त्यांच्या हेतू वर शंका आहे.
त्या मुळे विश्वास वाटेल असा व्यक्ती,ज्याच्या हेतू बद्दल शंका वाटणार नाही असा व्यक्ती नी ..जर फटाके दिवाळी ( हा शब्द underline करा) मध्ये वाजवू नका असे आव्हान केले तर लोक नक्कीच ऐकतील .
कारण तो particular कोणत्याच सणाचे नाव घेणार नाही.
फटाके वाजवल्या मुळे काय नुकसान होते ते सांगेल.

बँग ऑन हेमंत !
उपदेश करणार्‍याची समाजातली पत मॅटर्स !

उपदेश करणार्‍याची समाजातली पत मॅटर्स !>>>काही तरीच काय.
संत एकनाथांनी वाळवंटात तडफडणाऱ्या अस्पृश्य मुलाला जवळ घेऊन पाणी पाजले. तर लोक काय म्हणाले?
"ते देवाचे अवतार आहेत. त्यांना सगळे चालते. आपण मर्त्य माणसे. आपण सर्व नियम पाळायला पाहिजेत."
निळू फुले काय म्हणाले ते आठवा. "मास्तर..."

पत असली तरी मॉर्निग वॉक करताना संपविले जाते.
>>>
कारण तिथे धर्म येतो. म्हणून तर मला चीड आहे या जातीधर्माची.

जर तुम्ही एखाद्याला ताटात हवे तेवढेच घ्या आणि अन्नाची नासाडी करू नका असा सल्ला दिला तर तो तुमचे ऐकेल.
पण तेच देवाला दूध वाहून त्याची नासाडी करू नका असा सल्ला दिला तर तो तुमच्यावर चिडेल. कारण तिथे तो सल्ला त्याच्या देवधर्माच्या प्रथांशी निगडीत आहे. कोण कसा रिअ‍ॅक्ट होईल हे सांगता येत नाही. कोणी नाही झाले रिअ‍ॅक्ट तरी त्याला करायला लावतील. कारण हल्ली यावरच तर राजकारण चालतेय.

उपदेश करणार्‍याची समाजातली पत मॅटर्स !>>>
सर तर समर्थांच्या पण चुका काढतात
सो त्यांना समाजात तेवढी पत नसावी
त्याना म्हणजे समर्थांना, सरांना असण्याची दाट शक्यता आहे

ईथली अवांतर चर्चा थांबवा>>>
सर थेट आज्ञाच करतात
सर्व मायबोलीकर त्यांच्या हाताखाली कामाला असल्यासारखे Happy

Pages