ऋन्मेषचे धागे - एक मायबोलीय समस्या??

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2022 - 06:28

ऋन्मेषचे धागे - एक मायबोलीय समस्या??

धागे काढणे ही कला आहे की रिकामटेकड्या लोकांचे धंदे आहेत हे माहीत नाही. पण मायबोलीवर काही मी एकटाच नाही जे धागे काढतो. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मायबोलीवर किमान दहा वा दहापेक्षा जास्त धागे काढले त्या सर्वांनी मिळून हे ठरवावे. मी कोण एकटा ठरवणारा..

पण एक सत्य हे सुद्धा आहे की कोणी धागे काढलेच नाही तर जगातले कुठलेच संकेतस्थळ चालणार नाही. त्यामुळे कोणी कमी काढा वा जास्त काढा, पण धागे काढणे ही जगण्याची गरज आहे. तरीही एण्ड ऑफ द डे, ऋन्मेष एकटाच फार धागे काढतो म्हणून बदनाम आहे.

आजही दर दुसर्‍या धाग्यातील तिसर्‍या प्रतिसादात मला हि टिका झेलावी लागते म्हणून आत्मपरीक्षण करायच्या हेतूने मी हा धागा काढला आहे. ईथे सर्वांची प्रामाणिक मते स्विकारली जातील.

खरे तर गेल्या काही काळात मी स्वतःच वेळोवेळी आत्मपरीक्षण करत माझ्या धागे काढण्यावर बरेपैकी अंकुश लावण्याचा प्रयत्न केला आहे. तरी होणारी टिका काही थांबली नाही.

अर्थात, काहींना ईतर चर्चेत मुद्दे सापडले नाही तर ही टिका करणे सोयीचे पडत असावे. जसे तो कमाल खानही शाहरूख खानवर टिका करतो म्हणून शाहरूख काही चित्रपटात काम करायचे थांबणार नाही. तो त्याच्या टिकेकडे दुर्लक्षच करतो. मी देखील अश्या आयडींना ओळखून त्यांच्याकडे दुर्लक्षच करतो.

पण जेव्हा कोणी जेन्युईन आयडी या टिकाकारांमध्ये आढळतो तेव्हा मन व्यथित होते, आणि स्वतःच्या हितासाठी म्हणून पुन्हा आत्मपरीक्षण करावेसे वाटते.

आजच पुन्हा नव्याने आत्मपरीक्षण केले ज्यात मला तरी प्रामाणिकपणे काही वावगे वाटले नाही. ते शेअर करावे असेही वाटले.

सँपल साईज म्हणून गेले दोनेक महिन्याचा काळ चेक केला.

आज १६ ऑक्टोबर आहे, तर गेल्या १६ ऑगस्टपासून आजवर, म्हणजेच गेल्या दोन महिन्यात मी किती आणि कोणते धागे काढले हे चेक केले.

१) लेकीची चित्रकला - तिने काढलेले स्केचेस - https://www.maayboli.com/node/82138

२) कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - ऋन्मेऽऽष - https://www.maayboli.com/node/82403

३) ब्रह्मास्त्र - एक प्रामाणिक परीक्षण - by SRK - https://www.maayboli.com/node/82466

४) लहान मुलांना फटके मारावेत का? - https://www.maayboli.com/node/82469

५) आमच्या घरातल्या भिंती बोलतात.. - https://www.maayboli.com/node/82514

-----------

दोन महिन्यात फक्त पाच धागे.

दोन पोरांच्या कौतुकात कलाविभागात काढलेले धागे. आशा करतो त्याने कोणी दुखावले नसेल वा ईरीटेट झाले नसेल.

एक चित्रपट परीक्षण. जो या दोन महिन्यातील बहुचर्चित चित्रपट होता.

एक मायबोली गणपती स्पर्धेकरता काढलेला धागा. जो नंबरातही आला. यावरही कोणाची तक्रार नसावी. जर गणपती आले नसते तर हा धागाही नसता.

आणि एक चर्चेचा धागा, याच विषयावर अजूनही एक धागा आला. हा चर्चेचा विषय गेल्या दोन महिन्यातील सर्वात हॉट टॉपिक म्हणून गाजला. हा विषय चर्चेत घ्यायचे श्रेय मला द्यायचे नसेल तर नका देऊ. पण टिका तरी करू नका ईतकी अपेक्षा मी नक्कीच करू शकतो.

असो.
तर सांगायचा मुद्दा हा की, दोन महिन्यात पाच धागे हा काही विक्रमी आकडा नाही. किंबहुना माझ्या ईमेजनुसार नीचांक म्हणावे असा आहे. दुसरे म्हणजे धाग्यांच्या विषयाबाबतही कोणाला काही आक्षेप नसावा. कोणाला काही त्रास झाला नसावा.

८२१३८ हा माझा वरच्या लिस्टमधील पहिला धागा. त्यानंतर माझे अजून चार धागे आले. पण ईतर मायबोलीकरांचे धागे मोजल्यास ८२५४२ हा आजचा लेटेस्ट धागा.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास माझे पुढचे ४ धागे येईस्तोवर मायबोलीवर एकूण ८२५४२-८२१३८ = ४०४ धागे आले.
यातले ४ माझे ४०० ईतरांचे.
थोडक्यात मायबोलीवर धागा काढायला सुप्रसिद्ध म्हणा वा कुप्रसिद्ध म्हणा असणार्‍या आयडीचे फक्त १ टक्के धागे येत आहेत.
सँपल साईज वाढवता आकडे बदलतीलही. पण ते काय येतील. सव्वा टक्के, दिड टक्के, दोन टक्के... यावरून हा ईतका गोंधळ?

हा आजचा धागा नाहक माझी धाग्यांची टक्केवारी वाढवणार आहे. एक वरून थेट सव्वा वर जाणार आहे.
पण नाईलाज आहे.
दर धाग्यात दर प्रतिसादात जर कोणाचे या विषयावरून धागा भरकटवणारे प्रतिसाद येत असतील तर त्यांना तिथे उत्तर न देता या धाग्यावर सोक्षमोक्ष लावता येईल. तसेच या निमित्ताने मलाही वेळोवेळी आत्मपरीक्षण करता येईल.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by Barcelona on 16 October, 2022 - 23:01

प्रतिसाद आवडला.

अवांतर:
कुठलीही टिकाटिप्पणी किंवा दोषारोप अंगाला लाऊन न घेण्याच्या गुणाबद्दल ऋन्मेषचे कौतुक वाटते.
जरा काही बोलले की रुसुन फुगून बसणारे आणि डूख धरुन तो राग इतर कुठल्यातरी धाग्यांवर काढणारे अनेक आयडी आजवर मायबोलीवर पाहिले आहेत..... अगदी संतुलित म्हणून नावाजलेल्या भल्याभल्यांचा तोल सुटलेला अनेकवेळा बघितलेला आहे त्या पार्श्वभूमीवर ऋन्मेषचा हा गुण विशेष उठुन दिसतो.
बाकी क्रिकेट आणि इतर धाग्यांवरचे मतभेद आहे तसेच राहतील; आपलाच मुद्दा पुढे रेटत राहण्याचा आणि त्याच्या पुष्ट्यर्थ कुठलेही गैरलागू संदर्भ देत राहण्यावरचा आक्षेप आहे तसाच राहील पण यासगळ्यात कडवटपणा आणू न देणे खुप कमी लोकांना जमते त्यातला एक ऋन्मेष आहे असे मला वाटते Happy

स्वरुप +१

ऋ बद्दल / लिखणाबद्दल आक्षेप असणाऱ्याना ती १९२ संख्या का बरं दिसत नसावी असे राहून राहून वाटते. कुछ तो बात है म्हणून तर एवढी तगड़ी फॅन फॉलोविंग असते ना एखाद्याची.

सर आपण रागावणार नाही अस गृहीत धरून हा प्रतिसाद देतो आहे.
माझ्या नोटबुक मधून
---a book called Characters written by a Greek named Theophrastus 2,300 years ago
If you know someone who takes photos of his meals and posts them online, you might see him in the person Theophrastus calls the Garrulous Man, who “begins with a eulogy of his wife, relates the dream he had the night before, tells dish by dish what he had for supper,” and concludes that “we are by no means the men we were” in times past

garrulous
adjective
excessively talkative, especially on trivial matters.
"a garrulous cab driver"

पण माझ्या अंदाजाने ऋन्मेष हा आयडी प्रत्यक्षात excessively talkative तर नसावाच, उलट अगदी कमी बोलणारा, shy अशा व्यक्तिमत्त्वाचा आयडी असावा.

ऋन्मेऽऽष ने धागे काढावेत काय ? हो
वाचकांनी भले बुरे बोलावे काय ? हो
ऋन्मेऽऽष चे धागे न वाचण्याचा पर्याय आहे काय? हो.
ऋन्मेऽऽष चे प्रतिसाद न वाचण्याचा पर्याय आहे काय ? नाही
ऋन्मेऽऽष चे धागे मस्त टाईमपास असतात. लगे रहो ऋन्मेऽऽष भाई Happy Happy शिवाय ऋन्मेऽऽष ला वेडवाकडं बोललं तरी तो आपल्याला तसं काही बोलत नाही. (म्हणजे मला तरी अजून काही बोलला नाही). त्यामुळे ऋन्मेऽऽष चे धागे म्हणजे एक पंचींग बॅग आहे असे समजून मजा घ्यावी. मात्र ऋन्मेऽऽष ने सिरियसली काढलेल्या धाग्यांना सिरि यसली घेऊ नये. Happy
इति ऋन्मेऽऽष पुराणं समाप्त !

तुमच्या धाग्यांबद्दल किंवा प्रतिसादांबद्दल चिडचिड मला कधीच समजली नाही. जास्तीत जास्त mild annoyance असू शकतील तुमचे धागे, त्यापलीकडे काही नाही.

काहीतरी जुने लफडे असणार असा अंदाज आहे ज्यामुळे सगळे तुम्हाला धरून धोपटतात. Happy

धन्यवाद सर्वांचे.

@ स्वरूप, हो. कडवटपणा ना माझ्या मनात येतो ना समोरच्याच्या मनात फार येऊ देतो. तरी एखाद्याच्या आलाच तर मग त्याच्याशी वाद घालणे सोडतो.
कडवटपणा मनात ठेवल्यास आपल्यालाच स्ट्रेस येतो. तो येऊ देत नाही म्हणून तर रोज आनंदाने मायबोलीवर लॉगिन करावेसे वाटते.

@ केशवकूल.
अहो काय लिहिलेय ते ईंग्लिशमध्ये. काय ती आलंकारीक भाषा. डिक्शनरी घेऊन बसलो तरी समजणे अवघड.

@ हिरा
उलट अगदी कमी बोलणारा, shy अशा व्यक्तिमत्त्वाचा आयडी असावा.
>>>
हो, हे मी स्वत:ही बरेचदा म्हटलेय तसे. माझ्या ठराविक क्लोज सर्कलच्या बाहेर मी असाच आहे.

सर
चूक झाली. आता पुन्हा नाही करणार हा गुन्हा.

ईट्स ओके. मी गूगल करतो

Theophrastus नावाच्या ग्रीक व्यक्तीने 2,300 वर्षांपूर्वी लिहिलेले चरित्र नावाचे पुस्तक
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखत असाल जो त्याच्या जेवणाचे फोटो काढतो आणि ते ऑनलाइन पोस्ट करतो, तर तुम्ही त्याला थिओफ्रास्टस ज्या व्यक्तीला गारुलस मॅन म्हणतो त्या व्यक्तीमध्ये पाहू शकता, जो “आपल्या पत्नीच्या स्तुतीने सुरुवात करतो, त्याला आदल्या रात्री पाहिलेल्या स्वप्नाबद्दल सांगतो, डिश सांगतो. रात्रीच्या जेवणासाठी त्याच्याकडे जे काही होते ते ते बनवतो," आणि निष्कर्ष काढतो की भूतकाळातील "आम्ही जे पुरुष होतो ते काही नाही"

---

आता मला हे मराठी समजवा Happy

Runmesh,

(मला फोनवर हे नांव अचूक लिहिता येत नाही, क्षमस्व)

मागे एकदा कोठेतरी वेबमास्टर म्हणाले होते की धागे काढले जाण्याबाबत बाऊ करू नका.

त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की धागे हवे तेवढे काढू शकता! त्या धाग्यांवर काय व कसे प्रतिसाद येतील हे बघत बसणे हे त्यांचे काम नाही, पण सदस्य धागे काढू शकतात.

तुमचे बहुतांशी धागे हे सदस्यांना या संकेतस्थळावर बोलके करणारे असतात. त्यातील विषय असे असतात ज्यावर जवळपास प्रत्येकाचे काही ना काही मत असू शकते. ती मते अनेक सदस्य व्यक्तही करत राहतात.

आज भाजी कोणती आहे, आज व्हेज आहे की नॉन व्हेज, असे प्रश्न ज्यांना पडत असतील त्यांना एक नक्की माहीत असते की आज इंद्रायणी भात आहेच! तुमचे धागे हे काम करतात.

तुमचे धागे हे काम करतात असे सकृतदर्शनी वाटत असतानाच हळूहळू लक्षात येते की सामूहिक मानसिकता प्रागतिकतेच्या दिशेने ढकलण्याचे कामही तुमचे धागे करतात. याचे कारण, विविध क्षेत्रातील तज्ञ, निव्वळ प्रतिसादशैलीतील सम्राट, काही बिचारे सरळमार्गी असे अनेकजण येऊन तुमच्या धाग्यांवर जे काही लिहितात त्यामुळे वाचक, प्रतिसाददाते व कदाचित काही प्रमाणात तुम्हीही वैचारिकदृष्ट्या आधीहून अधिक समृद्ध होत राहतात. विषय अगदी साधेसेच असतात व बहुतेकांना असेच विषय हवेही असतात, पण त्यावर येणारी मतप्रदर्शने ही अनेकदा मौलिक असू शकतात.

विविध लोकांना बोलके करत एखाद्या विषयाबाबत मुळात एक समाज घटक म्हणून भूमिका काय असावी हे पुढे आणण्यासाठी तुमचे धागे नकळतपणे कार्यरत राहतात

बाकी शाहरुख वगैरे व तत्सम विषय जाऊदेत, होणारी टिंगलटवाळीही जाऊदेत, पण एखादे यंत्र कंटाळवाणे वाटू नये यासाठी होत असणाऱ्या अनेकविध प्रयत्नांमध्ये कदाचित तुमच्याही नकळत तुमचे धागे उपयुक्त ठरत असतात एवढे नोंदवतो

आणि हो, होणारी टिंगलटवाळी तुम्ही ज्या दिलखुलासपणे स्वीकारता व कोणालाही न दुखावता अभिप्राय देता ते स्तुत्य आहे

नाहीतर, दुसऱ्याला जास्तीतजास्त दुखावता कसे येईल यासाठी प्रयत्नरत असणारे अनेक आय डी येथे सुखेनैव गाजत असतातच

तुमचा / चे इतर कुठला / ले आय डी सुद्धा असल्यास मला कल्पना नाही

माझा हा एकमेव आय डी आहे

स्माईल

-'बेफिकीर'!

आत्मपरीक्षण करायचेच असेल तर "आपलाच मुद्दा पुढे रेटत राहण्याचा आणि त्याच्या पुष्ट्यर्थ कुठलेही गैरलागू संदर्भ देत राहण्यावरचा आक्षेप आहे तसाच राहील" ह्यावर कर. (वरती केशवकूल आयडी सोबतच तुझा जो सुख संवाद आहे तो बघितला कि लोकांना तुझे काय खटकत असेल हे समजणे खरतर फारसे अवघड नाही)

बाकी किती धागे काढायचे न काढायचे , कशावर काढायचे हा तुझा प्रश्न आहे फक्त धागा काढण्या आधी समर्थ काय सांगून गेले आहेत ते एकदा आठवलेस तर ... (आता समर्थांनीही असे बोलायला नको होतो हे तू आधीही एकदा बोलून झालेले आहेच तेंव्हा ....)

काय करावं माणसाने आशा वेळी Happy
अशा वेळी माणसाने शांतपणे डोळे मिटायचे हात डोक्यामागे ताणुन "दुनिया गई तेल लेने" म्हणत पुढचा धागा जोमाने टायपाय ला सुरुवात करावी.
उठा ले रे बाबा!!!!!!

बेफिकीर धन्यवाद.. खूप छान प्रतिसाद.. आपण प्रतिसाद दिलात हेच खूप भारी वाटले Happy

@ असामी, समर्थांचे काय घेऊन बसलात, पुराणात नजर टाकली तर देवांचेही चुकलेले बघायला मिळेल.
नो वन ईज पर्रफेक्ट !
तरीही तुम्हाला वाटत असेल की जगी कोणी असा पर्रफेक्ट असेल तर मग मी तरी का माझा मुद्दा रेटू नये Happy

आणि हो, केशवकूल आणि माझा असाच नेहमी टीपी चालतो. त्यात वादविवाद किंवा सुखसंवाद शोधू नका Happy

धागे काढायचे असतील तर काढू दे. प्रतिसाद दिलेच नाहीत की काम झाले. खरे तर adverse प्रतिसादांमुळे प्रतिसाद संख्या वाढते. अशी शक्यता आहे की हे adverse प्रतिसादवाले आयडी परस्परांचे मित्रच असतील. उगीच गंमत बघत असतील.
हा आयडी कुणालाही शेलकी विशेषणे प्रदान करीत नसताना त्याला tounge in cheek अशी ( मोठमोठ्या संत तत्ववेत्त्यांच्या वचनांआडून) मूर्ख, वाचाळ अशी विशेषणे बहाल केली जातात. मग त्याचे fan following वाढेल नाही तर काय होईल!

तरीही तुम्हाला वाटत असेल की जगी कोणी असा पर्रफेक्ट असेल तर मग मी तरी का माझा मुद्दा रेटू नये >> ह्यासाठी तुला कारण लागते का पण ? Wink

आत्मपरीक्षण करण्याच्या बाफावर तुझी उत्तरे वाचून गम्मत वाटतेय. चालू दे तुझे !

स्टॅटिस्टिकली धागे जास्त आलेले नाहीत हे ह्या धाग्यावरुन समजले. तरी जवळ जवळ सगळ्या चर्चांच्या धाग्यात अनेकोनेक वेळा तू 'यावर धागा काढतो' लिहिले आहेस. पूर्वानुभव बघता ते आज ना उद्या खरं होईल याची खात्री अजुनही वाटते. ते तसं लिहिलं नसशील आणि कुठला फिल्टर लाऊन सिद्ध केलेस तर ते ही मान्य करू. पण माझे तरी तसे परसेप्शन आहे.
वरच्या हर्पेनच्या प्रतिसादात त्याने लिहिले आहे ते परत लिहित नाही. पण परसेप्शन बदलण्यास वेळ लागेल. आधी दुधाने ... आणि ...एका दुधाने नाही तर चार-प्रकारच्या दुधांनी एकाच वेळी इतकेवेळा तोंड भाजले आहे की बेनिफिट ऑफ डाऊट द्यायची सुतराम शक्यता नाही. आता ताक आईसकोल्ड दिलेस तरी कोण विश्वास ठेवणार?
पूर्वी अनेकदा तुझ्याशी इरेला पेटून वाद घातला आहे. मग तुझ्यात बदल झालेला दिसल्यावर तुझ्या भजनी-मंडळाचा सदस्य अशी टीका झाली तरी हिरीरीने तुझे समर्थनही केलेले आहे. आज परत अनेक धाग्यांत (अगेन स्टॅटीस्टिकली मी बरोबर असेनच का माहित नाही, परसेप्शनने तरी नक्की तसे आहे) गोफ विणायची चाहुल लागू लागली म्हणून तसे लिहिलेले. इरिटेट झालो तर परत तसंच म्हणेन. त्यावरुन तू धागे काढावेस का न काढावेस तुझा प्रश्न. ही ना माझी जागा आहे ना तुझी. खाजगी जागेचा मालक आणि तू बघुन घ्यालच. इतके वर्षांत इतकी अक्कल आलेली आहे. पण म्हणून धाग्यानी त्रास झाला तर गप्प बसणार नाही. समस्या वाटली तर तसंच लिहीन.
शेवटी, तुझ्या धाग्यांमुळे कोणी मायबोली सोडून गेले म्हटलं तर 'गेले त्यांची झाली माती' असच म्हणेन. कोणी कुणामुळे जात नसतो. त्यांना असंही जायचंच होतं विव्हळायला तू कारण मिळालास. इतकंच. गेलेले कितीही भारी असले तरी आज जे आहेत ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे इतकं मला तरी समजतं. वेमांनाही तेच वाटत असावे असे मला वाटते. गेलेल्यांच्या आठवणी असल्या, तरी त्या वरच्याच समर्थांनी, 'सांगे वडिलांची किर्ती तो एक मूर्ख' सांगितलेच आहे.
थोडक्यात तू काय करावंस न करावंस यात काहीही समस्या नाही. तुझे फालतू (माझ्यामते) धागे कमी झाले आहेत. पण सतत धागा काढतो वाचलं की कमी झालेले असले तरी जास्त वाटतात. याचा अर्थ तू तसं न लिहावसं का? तर ते मी कोण सांगणारा. जो जे वांछिल तो ते लाहो.

@ अमितव
तरी जवळ जवळ सगळ्या चर्चांच्या धाग्यात अनेकोनेक वेळा तू 'यावर धागा काढतो' लिहिले आहेस.
>>>>

हो कारण मला सिरीअसली वाटते की त्या त्या विषयांवर स्वतंत्र चर्चा होण्याचे पोटेंशिअल आहे.
ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास त्या फटाक्यांच्या धाग्यात आपल्यालाच म्हटलेले की हल्लीची मुले ईन्स्टारील्सच्या आहारी जात आहेत ही मला एक समस्या वाटत आहे. आणि यावर धागा यायला हवा.
ते मी विनोदाने लिहिले नव्हते तर मला खरेच ही समस्या वाटते आणि यावर धागा यायला हवा असेही खरेच वाटते. पण सगळेच धागे मीच काढत राहिलो तर लोकं त्या महत्वाच्या विषयावर कमी आणि मी किती धागे काढतोय यावरच चर्चा करत राहतात. म्हणून मग कधीतरी विषय सुचवून बाजूला होतो. जेणेकरून कोणीतरी तो विषय उचलून धरेल, कोणीतरी दुसरा त्यावर धागा काढेल..

एक हल्लीचे उदाहरण देतो. त्या चित्रपटाच्या धाग्यावर मध्यंतरी तुम्हीच "वाय" चित्रपटाबद्दल लिहिल्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर तिथे चर्चेच्या शंभरेक पोस्टी पडल्या. नवीन धागा हवा असे सगळे म्हणत होते पण कोणी काढत नव्हते. अखेरीस वेबमास्तरांनी वेगळा धागा काढा म्हणून सांगितले. तेव्हा मैत्रेयी यांनी तिथल्या काही पोस्ट कॉपीपेस्ट करून वेगळा धागा काढला. तिथे मग आणखी शंभर पोस्ट पडल्या.

यावरून काय लक्षात येते तर एखाद्या विषयावर चर्चा सर्वांनाच करायची आहे. पण पुढाकार घेऊन धागा काढणे जरी तितकेच रिकामटेकडे माणसाचे उद्योग वाटत असले तरी तो काढायला सहजी कोणी पुढाकार घेत नाही.

@ असामी,
आत्मपरीक्षण करण्याच्या बाफावर तुझी उत्तरे वाचून गम्मत वाटतेय.
>>>>

आत्मपरीक्षण केवळ धागे काढण्यावर आहे.
तुम्ही वेगळे मुद्दे घेत आहात.
जसे की मला वाद घालायची आणि माझे तेच खरे करायची आवड आहे. तर हो, तो आरोप मान्य आहे. आत्मपरीक्षण करूनही मान्य आहे. आणि ती माझी आवड असल्याने मी बदलणार नाही हे देखील कबूल करतो. तरी वाद घालताना समोरच्याला थांबावेसे वाटले तर मी थांबतो. समोरच्यालाही या खेळात सहभागी व्हावेसे वाटल्यास त्यासोबत टाईमपास करतो Happy
किंबहुना काही आयडी वैयक्तिक टिका करून मलाच ईरीटेट करतात. मग मीच त्यांना उत्तरे देणे बंद करतो. मग माझे तेच खरे नाही झाले तरी चालते मला Happy

@ च्रप्स
अरे पण पर्सेप्शन का बदलावे म्हणतो मी...
>>>>

मला वाटते हे मुद्दामहून असे होत नसावे. आपले एखाद्या मायबोलीकराबद्दलचे मत आपल्याही नकळत कालांतराने बदलत राहते.
म्हणजे आधी कोणी स्तुती करणारे नंतर टिका करू लागतात, तर आधी कोणी निंदा करणारे नंतर कौतुक करून लागतात.
हल्ली तर एखाद्याचा पॉलिटीकल व्यू जरी कळला तरी लोकांची त्या माणसाबद्दलची मते बदलतात.

त्यामुळे ईथे एक तत्व नेहमी पाळावे. कोणाच्या स्तुतीने हुरळून जाऊ नये तर कोणाच्या निंदेने व्यथित होऊ नये.

लोकं जे आपल्याबद्दल बोलतात ते त्यांचे त्यावेळचे आपल्याबद्दलचे मत असते. ते देखील त्यांना जेवढे आपण ईथे कळतो तेवढ्याच माहितीवर आधारलेले असते. आपण नेमके कसे आहोत हे सत्य या जगात केवळ आणि केवळ आपल्यालाच ठाऊक असते.

<< स्टॅटिस्टिकली धागे जास्त आलेले नाहीत हे ह्या धाग्यावरुन समजले. >>
दिलेले स्टॅटिस्टिक्स चूक आहे. सदस्यनाव, कालावधी आणि काढलेले धागे अशी तुलना करून बघा. मग कळेल की भारंभार धागे कुणी काढले आहेत.

ऋन्मेऽऽष (८ वर्ष ३ महिने) ५२२ धागे
च्रप्स (९ वर्ष ४ महिने) २० धागे
कुमार१ (१५ वर्ष १ महिना) १६९ धागे
जाई. (११ वर्ष २ महिने) ३८ धागे
स्वाती_आंबोळे (१६ वर्ष १ महिना) ६९ धागे
मनीमोहोर (९ वर्ष) ९८ धागे
हर्पेन (१६ वर्ष ५ महिने) ९३ धागे
प्रकाश घाटपांडे (१४ वर्ष ७ महिने) ४८ धागे
Barcelona (११ वर्ष ३ महिने) ४४ धागे
फारएण्ड (१७ वर्ष ५ महिने) ७९ धागे
....

ऋन्मेऽऽष (८ वर्ष ३ महिने) ५२२ धागे
>>>

हे वर्ष निहाय सांगता येईल का? त्यावरून माझे धागे कमी होत गेलेत की वाढलेत हे समजेल. आणि कितीने हे समजेल

अन्यथा मी मायबोलीवर भरमसाठ धागे काढले आहेत हे जगाला ठाऊक आहे.

पण त्यातही नुसते चर्चेचे धागेच आहेत असे नाही. तर काही लेख/कथाही लिहिल्या आहेत. त्यामुळे वर्षनिहाय यादीत त्याचीही वर्गवारी होणे गरजेचे आहे.

Pages