ऋन्मेषचे धागे - एक मायबोलीय समस्या??

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2022 - 06:28

ऋन्मेषचे धागे - एक मायबोलीय समस्या??

धागे काढणे ही कला आहे की रिकामटेकड्या लोकांचे धंदे आहेत हे माहीत नाही. पण मायबोलीवर काही मी एकटाच नाही जे धागे काढतो. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मायबोलीवर किमान दहा वा दहापेक्षा जास्त धागे काढले त्या सर्वांनी मिळून हे ठरवावे. मी कोण एकटा ठरवणारा..

पण एक सत्य हे सुद्धा आहे की कोणी धागे काढलेच नाही तर जगातले कुठलेच संकेतस्थळ चालणार नाही. त्यामुळे कोणी कमी काढा वा जास्त काढा, पण धागे काढणे ही जगण्याची गरज आहे. तरीही एण्ड ऑफ द डे, ऋन्मेष एकटाच फार धागे काढतो म्हणून बदनाम आहे.

आजही दर दुसर्‍या धाग्यातील तिसर्‍या प्रतिसादात मला हि टिका झेलावी लागते म्हणून आत्मपरीक्षण करायच्या हेतूने मी हा धागा काढला आहे. ईथे सर्वांची प्रामाणिक मते स्विकारली जातील.

खरे तर गेल्या काही काळात मी स्वतःच वेळोवेळी आत्मपरीक्षण करत माझ्या धागे काढण्यावर बरेपैकी अंकुश लावण्याचा प्रयत्न केला आहे. तरी होणारी टिका काही थांबली नाही.

अर्थात, काहींना ईतर चर्चेत मुद्दे सापडले नाही तर ही टिका करणे सोयीचे पडत असावे. जसे तो कमाल खानही शाहरूख खानवर टिका करतो म्हणून शाहरूख काही चित्रपटात काम करायचे थांबणार नाही. तो त्याच्या टिकेकडे दुर्लक्षच करतो. मी देखील अश्या आयडींना ओळखून त्यांच्याकडे दुर्लक्षच करतो.

पण जेव्हा कोणी जेन्युईन आयडी या टिकाकारांमध्ये आढळतो तेव्हा मन व्यथित होते, आणि स्वतःच्या हितासाठी म्हणून पुन्हा आत्मपरीक्षण करावेसे वाटते.

आजच पुन्हा नव्याने आत्मपरीक्षण केले ज्यात मला तरी प्रामाणिकपणे काही वावगे वाटले नाही. ते शेअर करावे असेही वाटले.

सँपल साईज म्हणून गेले दोनेक महिन्याचा काळ चेक केला.

आज १६ ऑक्टोबर आहे, तर गेल्या १६ ऑगस्टपासून आजवर, म्हणजेच गेल्या दोन महिन्यात मी किती आणि कोणते धागे काढले हे चेक केले.

१) लेकीची चित्रकला - तिने काढलेले स्केचेस - https://www.maayboli.com/node/82138

२) कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - ऋन्मेऽऽष - https://www.maayboli.com/node/82403

३) ब्रह्मास्त्र - एक प्रामाणिक परीक्षण - by SRK - https://www.maayboli.com/node/82466

४) लहान मुलांना फटके मारावेत का? - https://www.maayboli.com/node/82469

५) आमच्या घरातल्या भिंती बोलतात.. - https://www.maayboli.com/node/82514

-----------

दोन महिन्यात फक्त पाच धागे.

दोन पोरांच्या कौतुकात कलाविभागात काढलेले धागे. आशा करतो त्याने कोणी दुखावले नसेल वा ईरीटेट झाले नसेल.

एक चित्रपट परीक्षण. जो या दोन महिन्यातील बहुचर्चित चित्रपट होता.

एक मायबोली गणपती स्पर्धेकरता काढलेला धागा. जो नंबरातही आला. यावरही कोणाची तक्रार नसावी. जर गणपती आले नसते तर हा धागाही नसता.

आणि एक चर्चेचा धागा, याच विषयावर अजूनही एक धागा आला. हा चर्चेचा विषय गेल्या दोन महिन्यातील सर्वात हॉट टॉपिक म्हणून गाजला. हा विषय चर्चेत घ्यायचे श्रेय मला द्यायचे नसेल तर नका देऊ. पण टिका तरी करू नका ईतकी अपेक्षा मी नक्कीच करू शकतो.

असो.
तर सांगायचा मुद्दा हा की, दोन महिन्यात पाच धागे हा काही विक्रमी आकडा नाही. किंबहुना माझ्या ईमेजनुसार नीचांक म्हणावे असा आहे. दुसरे म्हणजे धाग्यांच्या विषयाबाबतही कोणाला काही आक्षेप नसावा. कोणाला काही त्रास झाला नसावा.

८२१३८ हा माझा वरच्या लिस्टमधील पहिला धागा. त्यानंतर माझे अजून चार धागे आले. पण ईतर मायबोलीकरांचे धागे मोजल्यास ८२५४२ हा आजचा लेटेस्ट धागा.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास माझे पुढचे ४ धागे येईस्तोवर मायबोलीवर एकूण ८२५४२-८२१३८ = ४०४ धागे आले.
यातले ४ माझे ४०० ईतरांचे.
थोडक्यात मायबोलीवर धागा काढायला सुप्रसिद्ध म्हणा वा कुप्रसिद्ध म्हणा असणार्‍या आयडीचे फक्त १ टक्के धागे येत आहेत.
सँपल साईज वाढवता आकडे बदलतीलही. पण ते काय येतील. सव्वा टक्के, दिड टक्के, दोन टक्के... यावरून हा ईतका गोंधळ?

हा आजचा धागा नाहक माझी धाग्यांची टक्केवारी वाढवणार आहे. एक वरून थेट सव्वा वर जाणार आहे.
पण नाईलाज आहे.
दर धाग्यात दर प्रतिसादात जर कोणाचे या विषयावरून धागा भरकटवणारे प्रतिसाद येत असतील तर त्यांना तिथे उत्तर न देता या धाग्यावर सोक्षमोक्ष लावता येईल. तसेच या निमित्ताने मलाही वेळोवेळी आत्मपरीक्षण करता येईल.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाऊद इब्राहीम सरांनी जर फेसबुकवर "दाऊद इब्राहीमचे व्यवसाय - एक कायदा नि सुव्यवस्था समस्या ?" असा धागा सुरू केला तर मनात जे आलं ते जिवाचा कोट करून, न भिता लिहायला सुरूवात केली तरी दाऊदजींचे अनुयायी त्याला जेव्हां प्रतिवाद करतील तेव्हां त्याचे परिणाम लक्षात घेऊन मनुष्ययोनीतील जीव ज्याप्रमाणे बिचकतच वादविवाद करतील तसेच वाटतेय. ज्याला जिवापेक्षा सत्य जास्त प्रिय आहे त्याच्याबद्दल मृत्यूपश्चात दोन शब्द चांगले बोललेत अशी परंपराच नाही. कारण आयडी प्रत्येकाला प्यारा आहे.

<< चूक...नवीन आयडी बनवता येतो कि...>>
चूक. चार पाच वर्षांपूर्वी तुमचा आयडी नव्हता का उडवला काहीतरी गैरसमजुतीतून. मग तुम्ही स्पष्टीकरण देऊन परत मिळवला हा आयडी. म्हणजेच प्यारा असतो आपला आयडी.
गेला तर गेला नविन घेऊ हा आंबट द्राक्षेपणा झाला.

चार पाच वर्षांपूर्वी तुमचा आयडी नव्हता का उडवला काहीतरी गैरसमजुतीतून.
>>> प्रचंड अभ्यास आहे तुमचा... पण आयडी गेला तर काही फरक पडत नाही.. नवीन आयडी घेता येतोच.... मीदेखील घेतला असता... ऍडमिन ना चूक कळली आणि त्यांनी आयडी ऍक्टिव्ह केला तेंव्हा... म्हणून हाच आयडी...

ज्याला जिवापेक्षा सत्य जास्त प्रिय आहे त्याच्याबद्दल मृत्यूपश्चात दोन शब्द चांगले बोललेत अशी परंपराच नाही. >> १००%

Pages