ऋन्मेषचे धागे - एक मायबोलीय समस्या??

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2022 - 06:28

ऋन्मेषचे धागे - एक मायबोलीय समस्या??

धागे काढणे ही कला आहे की रिकामटेकड्या लोकांचे धंदे आहेत हे माहीत नाही. पण मायबोलीवर काही मी एकटाच नाही जे धागे काढतो. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मायबोलीवर किमान दहा वा दहापेक्षा जास्त धागे काढले त्या सर्वांनी मिळून हे ठरवावे. मी कोण एकटा ठरवणारा..

पण एक सत्य हे सुद्धा आहे की कोणी धागे काढलेच नाही तर जगातले कुठलेच संकेतस्थळ चालणार नाही. त्यामुळे कोणी कमी काढा वा जास्त काढा, पण धागे काढणे ही जगण्याची गरज आहे. तरीही एण्ड ऑफ द डे, ऋन्मेष एकटाच फार धागे काढतो म्हणून बदनाम आहे.

आजही दर दुसर्‍या धाग्यातील तिसर्‍या प्रतिसादात मला हि टिका झेलावी लागते म्हणून आत्मपरीक्षण करायच्या हेतूने मी हा धागा काढला आहे. ईथे सर्वांची प्रामाणिक मते स्विकारली जातील.

खरे तर गेल्या काही काळात मी स्वतःच वेळोवेळी आत्मपरीक्षण करत माझ्या धागे काढण्यावर बरेपैकी अंकुश लावण्याचा प्रयत्न केला आहे. तरी होणारी टिका काही थांबली नाही.

अर्थात, काहींना ईतर चर्चेत मुद्दे सापडले नाही तर ही टिका करणे सोयीचे पडत असावे. जसे तो कमाल खानही शाहरूख खानवर टिका करतो म्हणून शाहरूख काही चित्रपटात काम करायचे थांबणार नाही. तो त्याच्या टिकेकडे दुर्लक्षच करतो. मी देखील अश्या आयडींना ओळखून त्यांच्याकडे दुर्लक्षच करतो.

पण जेव्हा कोणी जेन्युईन आयडी या टिकाकारांमध्ये आढळतो तेव्हा मन व्यथित होते, आणि स्वतःच्या हितासाठी म्हणून पुन्हा आत्मपरीक्षण करावेसे वाटते.

आजच पुन्हा नव्याने आत्मपरीक्षण केले ज्यात मला तरी प्रामाणिकपणे काही वावगे वाटले नाही. ते शेअर करावे असेही वाटले.

सँपल साईज म्हणून गेले दोनेक महिन्याचा काळ चेक केला.

आज १६ ऑक्टोबर आहे, तर गेल्या १६ ऑगस्टपासून आजवर, म्हणजेच गेल्या दोन महिन्यात मी किती आणि कोणते धागे काढले हे चेक केले.

१) लेकीची चित्रकला - तिने काढलेले स्केचेस - https://www.maayboli.com/node/82138

२) कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - ऋन्मेऽऽष - https://www.maayboli.com/node/82403

३) ब्रह्मास्त्र - एक प्रामाणिक परीक्षण - by SRK - https://www.maayboli.com/node/82466

४) लहान मुलांना फटके मारावेत का? - https://www.maayboli.com/node/82469

५) आमच्या घरातल्या भिंती बोलतात.. - https://www.maayboli.com/node/82514

-----------

दोन महिन्यात फक्त पाच धागे.

दोन पोरांच्या कौतुकात कलाविभागात काढलेले धागे. आशा करतो त्याने कोणी दुखावले नसेल वा ईरीटेट झाले नसेल.

एक चित्रपट परीक्षण. जो या दोन महिन्यातील बहुचर्चित चित्रपट होता.

एक मायबोली गणपती स्पर्धेकरता काढलेला धागा. जो नंबरातही आला. यावरही कोणाची तक्रार नसावी. जर गणपती आले नसते तर हा धागाही नसता.

आणि एक चर्चेचा धागा, याच विषयावर अजूनही एक धागा आला. हा चर्चेचा विषय गेल्या दोन महिन्यातील सर्वात हॉट टॉपिक म्हणून गाजला. हा विषय चर्चेत घ्यायचे श्रेय मला द्यायचे नसेल तर नका देऊ. पण टिका तरी करू नका ईतकी अपेक्षा मी नक्कीच करू शकतो.

असो.
तर सांगायचा मुद्दा हा की, दोन महिन्यात पाच धागे हा काही विक्रमी आकडा नाही. किंबहुना माझ्या ईमेजनुसार नीचांक म्हणावे असा आहे. दुसरे म्हणजे धाग्यांच्या विषयाबाबतही कोणाला काही आक्षेप नसावा. कोणाला काही त्रास झाला नसावा.

८२१३८ हा माझा वरच्या लिस्टमधील पहिला धागा. त्यानंतर माझे अजून चार धागे आले. पण ईतर मायबोलीकरांचे धागे मोजल्यास ८२५४२ हा आजचा लेटेस्ट धागा.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास माझे पुढचे ४ धागे येईस्तोवर मायबोलीवर एकूण ८२५४२-८२१३८ = ४०४ धागे आले.
यातले ४ माझे ४०० ईतरांचे.
थोडक्यात मायबोलीवर धागा काढायला सुप्रसिद्ध म्हणा वा कुप्रसिद्ध म्हणा असणार्‍या आयडीचे फक्त १ टक्के धागे येत आहेत.
सँपल साईज वाढवता आकडे बदलतीलही. पण ते काय येतील. सव्वा टक्के, दिड टक्के, दोन टक्के... यावरून हा ईतका गोंधळ?

हा आजचा धागा नाहक माझी धाग्यांची टक्केवारी वाढवणार आहे. एक वरून थेट सव्वा वर जाणार आहे.
पण नाईलाज आहे.
दर धाग्यात दर प्रतिसादात जर कोणाचे या विषयावरून धागा भरकटवणारे प्रतिसाद येत असतील तर त्यांना तिथे उत्तर न देता या धाग्यावर सोक्षमोक्ष लावता येईल. तसेच या निमित्ताने मलाही वेळोवेळी आत्मपरीक्षण करता येईल.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लैच त्रासदायक आहात तुम्ही. एखादा धागा ऊघडला नी तुमचा प्रतिसाद दिसला की सगळा मूड जातो. मी तरी आताच एक्टीव झालोय माबोवर. लोक तुम्हाला कसंकाय वर्षानूवर्षे झेलताय कळेना.
प्रत्येक धाग्यात माझीच लाल म्हणणे.
विषयाशी संबंध नसलेला काहीतरी पाचकळ प्रतिसाद लिहीणे.
मी कुणीतरी महान आहे. नी अमूक तारखेला माझ्या गाडीवर पक्षी हगला असे काहीतरी अनूभव शेअर करणे नी त्याचे धागे काढणे.
बरं हे वाचावच लागतं कारण प्रतिसादात कुणाचा प्रतिसाद आहे हे सरिवात खाली लिहीलेलं असतं. Sad

धागा काढण्याच्या आरोपावर सरांनी नवा धागा काढलाय Happy
याला म्हणतात कॉन्फिडन्स Happy

त्या निमित्ताने सरांची आणि भजनी मंडळाची सोय झाली
आता लाडिक पिपाण्या वाजतील, काही क्रुद्ध भोंगे आणि काही मध्यम सल्ले दुर्लक्ष करा सांगणारे Happy

सर तुम्ही अजिबात या दुष्ट लोकांकडे लक्ष देऊ नका, तुम्ही आहात म्हणून मायबोली आहे, तुम्ही चिडत नाही, आक्रस्ताळेपणा करत नाही, संयमाने उत्तर देता, अडमीन कडे तक्रार करत नाही हे या दुष्ट लोकांना बघवत नाही
त्यात वेगळ्या आयडीने येऊन शिव्या दिल्या तरी हे चावट लोकं लगेच ओळखतात

काय करावं माणसाने आशा वेळी Happy

आजही दर दुसर्‍या धाग्यातील तिसर्‍या प्रतिसादात मला हि टिका झेलावी लागते म्हणून आत्मपरीक्षण करायच्या हेतूने मी हा धागा काढला आहे

आत्मपरीक्षण आणि तुम्ही?

धागा काढण्याच्या आरोपावर सरांनी नवा धागा काढलाय Happy
याला म्हणतात कॉन्फिडन्स Happy >>>>>
मी काहीतरी स्पेशल आहे. सर्वांनी माझ्याबद्दलच बोलत रहावे, लिहीत रहावे. ह्यामुळे मला ओर्ग्याझम मिळतो.

लैच त्रासदायक आहात तुम्ही. एखादा धागा ऊघडला नी तुमचा प्रतिसाद दिसला की सगळा मूड जातो. मी तरी आताच एक्टीव झालोय माबोवर. लोक तुम्हाला कसंकाय वर्षानूवर्षे झेलताय कळेना.
प्रत्येक धाग्यात माझीच लाल म्हणणे.
विषयाशी संबंध नसलेला काहीतरी पाचकळ प्रतिसाद लिहीणे.
मी कुणीतरी महान आहे. नी अमूक तारखेला माझ्या गाडीवर पक्षी हगला असे काहीतरी अनूभव शेअर करणे नी त्याचे धागे काढणे.>>>>>> 10000+ ह्याच्या मुळे मी मायबोलीवर यायचे बंद केले. प्रत्येक ठिकाणी आपलीच लाल. तो क्रिकेट cha धागा आहे तिथे पण घाण करून ठेवली आहे. अशी माणसे मायबोलीवर का येतात ते देव जाणो

ऋन्मेऽऽष, तुम्हाला जेव्हा वाटेल जितके वाटेल तेवढे धागे काढा. तुम्ही मायबोली ची शान आहात. तुम्हाला प्रतिवाद करता येत नाही म्हणून तुमच्यावर असे आरोप करतात

ऋन्मेष जी, आपले विविध विषयावरील धागे व त्यावरील तुम्हासहीत इतरांचे प्रतिसाद वाचायला आवडतात. नवीन काहीतरी समजते. चांगली चर्चा घडून येते. उदा. मुलांना मारण्यावरचा धागा व भिंतीवर लिहिण्याचा धागा. जर धागाच नसता तर हि चर्चा कशी घडणार? त्यामुळे आपण लिहीत राहावे हि विनंती.

हो

ज्यांना धागे वाचवत नाहीत त्यांना न वाचण्याचा, धागे न उघडण्याचा पर्याय आहेच. मायबोलीवर इतर अनेक चांगले धागे असतात.

सर, तुम्ही टीकेकडे दुर्लक्ष करा. लोकांचे काय - कुछ तो लोग कहेंगे , लोगोंका काम है कहना ...अस्त्राव्हर्स मध्ये जाऊन इग्नोरास्त्र आणा आणि वापरा. (म्हणजे जेव्हा ह्यावर सिनेमा काढणार आहेत. त्यामध्ये तुम्ही हीरो व्हाल)
धागा धागा अखंड विणत राहा.
एक धागा सुखाचा शंभर धागे कुत्सित टीकेचे...

ज्यांना धागे वाचवत नाहीत त्यांना न वाचण्याचा, धागे न उघडण्याचा पर्याय आहेच. मायबोलीवर इतर अनेक चांगले धागे असतात. >>>>
मग ते प्रतिक्रीयात येऊन पचकतात.

दोन महिन्यात फक्त पाच धागे.
>>> ओह नो... फॉर्म गेला कि काय.. कमीत कमी महिना दहा धागे काढायचे मनावर घ्याच...

बाई दवे- मला भिंती बोलतात हा तुमचा धागा प्रचंड आवडला...

धाग्या वेताळ हे नाव उगीचच मिळाल्याचा कांगावा जुन्या सदस्यांसमोर करून उपयोग नाही नवीन सदस्यांनाही अवलोकनात जाऊन कधी कधी किती किती धागे काढले होते ते बघता येतच.

शंभर उंदीर खाल्ले तेव्हाची इमेज हाजला गेल्या गेल्या कशी बदलेल. तुझं म्हणणं आहे ना हाज ला गेलायस, अजून काही दिवस हाजी माणसा सारखे वाग, जरा धीर धर आणि मग बदलेल इमेज.

आणि मला विचारशील तर शंभर काय हजार उंदीर खा पण हाजी म्हणवून घेण्याचा अट्टाहास धरू नको.

सर तुमच्या धाग्यांवर निष्पक्ष चर्चा होतात कारण तुमचा ग्रुप नाही. यामुळे तुम्हीच जास्तीत जास्त धागे काढावे असं माझं मत आहे.
कधीकधी तुम्ही या विषयावर नवा धागा काढतो काढतो म्हणत राहता आणि धीर सुटून दुसराच कोणीतरी काढतो. असं नका करू सर.

हर्पेन Proud तुमच्याकडून मी नेहमी अश्याच प्रामाणिक प्रतिसादाची अपेक्षा ठेवतो.
बाकी हाजी म्हणवून घ्यायचा अट्टाहास नाहीये. पण निदान ऊठसूठ प्रत्येक धाग्यावर पाजी तरी म्हणू नका ईतकीच अपेक्षा आहे. अर्थात ते ही काही माझ्या मनाला लागलेय असे नाही. पण खरेच ईरीटेट होऊ लागलेय.

@ च्रप्स
बाई दवे- मला भिंती बोलतात हा तुमचा धागा प्रचंड आवडला...
>>>>
च्रप्स धन्यवाद Happy

काही धागे माझे मलाही आवडत नाहीत. जो माणूस शंभर धागे काढतो त्याचे काही धागे फसणारच. वा कुठेतरी तो वाहावत जाणारच. पण मुद्दामहून कोणी लोकांना आवडणार नाही असे धागे काढत नाही. तरी सध्या प्रयत्न करतोय असे कमीत कमी व्हावे.

याच कारणास्तव हल्ली स्वतः लगेच धागा न काढता लोकांना सुचवत आहे अमुक तमुक विषय चांगला आहे, यावर चर्चा होणे गरजेचे आहे, यावर धागा काढा रे... पण दुर्दैवाने लोकं धागा काढण्याआधी फार विचार करतात.

पण दुर्दैवाने लोकं धागा काढण्याआधी फार विचार करतात.>>>
अगदी खरंय सर, कसलाही विचार न करता धागा काढायची कला लुप्त होत चालली आहे
हा खरा चिंतेचा विषय आहे, यावर मायबोलीकरांना काय वाटतं यावर एक धागा यायला हवा Happy

आत्मपरीक्षण केले ते चांगले झाले कारण त्याने खरा बदल घडतो. खरं तर एका सीमित परिघातील आयुष्य मायबोलीवर व्यक्त करतोस उदा: मुले, काय जेवलो, खिडकीतून काय दिसले, क्वचित ऑफिसमधील बायका, सिनेमा इ इ. लोकांना बोलते करतोस. पण आयुष्य जसे जसे पुढे जाते तसे अनेक लहानसहान गोष्टींबद्दल अप्रूप उरत नाही. उदा: रूमाल कोणता घ्यायचा हा धागा काढायचा विषय माझ्यासहित बहुतेकांना वाटत नाही. (पण एखाद्या चांगल्या लेखकाच्या हाती या विषयाचे सोने होऊ शकते.)

कधी वाटते 'ग्रो अप' म्हणावे... तर कधी हेवा वाटतो कारण जर जीवनाचा परिघ वाढला तर तुझ्यासारखी चौकस दृष्टी बरेच चांगले धागे काढेल. उदा: हर्पेन भाऊं ऐवजी तू आयर्न मॅन केले असतेस तर सायकल कशी निवडावी, शूज कुठले घालावे, आयर्नमॅनसाठी फेसबुक मित्रांवर विश्वास ठेवावा का? असे बर्रेच चांगले माहितीप्रद/मनोरंजक धागे आले असते. असो. ज्यांना शिकायचे आहे त्यांना प्रत्येकात गुरू लाभतात. बघ काय ग्रोथ शक्य आहे किंवा हा प्रतिसाद इग्नोर कर.

साधारण ४२८ आठवड्यात ५०१ धागे म्हणजे आयुष्यातील फार मोठा काळ मायबोलीसाठी दिला आहेस. त्यातून जे काही साधायचे होते ते तुला मिळो या शुभेच्छा.

ज्यांना धागे वाचवत नाहीत त्यांना न वाचण्याचा, धागे न उघडण्याचा पर्याय आहेच. मायबोलीवर इतर अनेक चांगले धागे असतात.>>> हा बरोबर पण प्रत्येक धाग्यावर घाण. मी ढुंकूनही बघत नाही. पण प्रतिसाद पण....एका खाली एक.. माणसाने किती प्रतिसाद ओलांडावे? धागा high jack करून टाकतो

खरे तर गेल्या काही काळात मी स्वतःच वेळोवेळी आत्मपरीक्षण करत माझ्या धागे काढण्यावर बरेपैकी अंकुश लावण्याचा प्रयत्न केला आहे. तरी होणारी टिका काही थांबली नाही. >> बरोबर.

सी. प्रतिसाद नोटेड
पण हे ५०१ धाग्यांचा आकडा कुठून आला अचूक?
लेखनाची एकूण पाने मोजून की आणखी कुठून कळते हे?

ऋन्मेष दादा, मी आधी मायबोलीवर फक्त गोष्टी वाचायला यायचे चांगल्या गोष्टी वाचून संपल्यावर मायबोलीवर येणे बंद झाले होते पण मध्यंतरी तुझे धागे वाचनात आले नि मी हल्ली तुझे किंवा इतर माझ्या आवडीच्या आयडी चे धागे आलेत का तेच पहायला येते .. तू किती धागे काढावेस हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुझ्या काही धाग्यांमुळे दिवसभराचा स्ट्रेस नाहीसा होतो निखळ मनोरंजन होतं ते सुद्धा तेवढच खरं... तुझ्यासारख मनमोकळ जगणारी माणसं कमी असतात .... म्हणून इग्नोर कर अश्या टीकाकार लोकांना नी जस तू तुझ्या terms वर जगतोस तसच जगत रहा... तुझ्याकडून inspiration मिळते आयुष्य जगण्याची ....

नवीन धागा काढण्यासाठी कल्पकता, थोडेसे धाडस, थोडेसे वाचन लागते. आवडो किंवा न आवडो त्याच्या धाग्यांना तुलनेने भरभरुन प्रतिसांद मिळतात, आणि हे नाकारण्यात अर्थ नाही.

मला ऋन्मेषचे धागे आवडत नसतील तर मी वाचणार नाही, त्यावर प्रतिसाद देणार नाही - हा पर्याय आपल्या हातात असतांना धागा काढण्यासंदर्भात आक्षेप कशासाठी घ्यायला हवा? आपल्याही नकळत आपण ऋन्मेषच्या वैचारिक स्वातंत्र्याची गळचेपी तर करत नाही ना? Happy

एक, दोन, तीन करत मोजले रे!!!! (संख्या अगदी अचूक नसली तरी बॉलपार्क रेंज बरोबर आहे.)

इतर कुठल्या आयडीने येऊन माझ्या धाग्यांवर किडे केले असलेस तर माहिती नाही. पण ऋन्मेष आयडीने कधी माझ्या धाग्यावर किडे केले नाहीस. इस बात पे गिनती तो बनती है...

आपल्याही नकळत आपण ऋन्मेषच्या वैचारिक स्वातंत्र्याची गळचेपी तर करत नाही ना?
>>>
वर शुभरात्री म्हटले आणि आता आपली पोस्ट पाहिली..
यातला ऋन्मेष काढून तटस्थपणे पाहता मला हा ईंटरेस्टींग मुद्दा वाटत आहे.. सविस्तर उद्याच बोलता येईल यावर..

एक, दोन, तीन करत मोजले रे!!!!
>>>
ओह! धन्यवाद Happy

इतर कुठल्या आयडीने येऊन माझ्या धाग्यांवर किडे केले असलेस तर माहिती नाही.
>>>>
छे, मला माझ्या सर्व किड्यांचे, लिखाणाचे, आणि एकूण एक पोस्टचे श्रेय माझे मलाच हवे असते. त्यामुळे ईतर कुठला आयडी वापरा हे मी करत नाही. पण आता ईमेजच अशी आहे की अश्या वावड्या ऊठतातच Happy
बाकी तुमचे लेख नेहमीच छान वाटतात. आजवर कुठला वादग्रस्तही आढळला नाही..

बार्शीलोनी यांनी एक एक करत इतके धागे मोजले... एक लाईक तो बनता है... ऋन्मेष- अजून काय पुरावा हवा कि पीपल लाईक यु या लॉट... येऊ दे अजून .. धाग्यांचा सुळसुळाट झाला पाहिजे ... यत्र तत्र सर्वत्र ऋ

माझी तरी ऋन्मेष च्या धाग्यांबद्दल तक्रार नाही. त्याची लिहायची शैली चांगली आहे. काही गोष्टी नाही पटत. पण त्याच्या धाग्यांकडे दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य आहेच.
प्रतिसाद सुद्धा इग्नोर करता यावेत अशी काहीतरी सोय मायबोलीवर करता आली तर जे ऋन्मेषच्या धाग्यांबद्दल तक्रार करताहेत त्यांच्यासाठी चांगलं होईल असं वाटतंय. म्हणजे एखाद्या आयडीला ब्लॉक केलं की त्याचे धागे आणि प्रतिसाद सुद्धा दिसणार नाहीत अशी व्यवस्था झाली तर चांगलं होईल.
पण मायबोलीचे व्यवस्थापन करणारे स्वतःचा वेळ खर्च करून आम्हाला हे व्यासपीठ फुकट उपलब्ध करून देतात हीच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ही एक nice to have गोष्ट आहे. ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांना जे प्रॉब्लेम्स असतील ते त्यांनाच माहित. त्यामुळे अशी सोय सध्या नसल्याबद्दल मायबोलीबाबत अजिबात तक्रार नाही.

Pages