स्वप्निल पंचेचाळीस वर्षांचा होणार यंदा?!
सोशल मीडियावर शोधायची गरजच नाही पडली!
इथे बरेच स्वप्निल फॅन्स आहेत. तुम्हाला पहिली लागण कशी झाली स्वप्निलची ते आठवतं का? म्हणजे प्रथम कुठला चित्रपट पाहिला असं नव्हे, प्रथम 'अरे, हे भारी प्रकरण आहे' असं कधी वाटलं?
मला प्रयत्न करूनही आठवत नाही, जणू ते कायमच माहीत होतं.
तुम्हाला आठवत असेल तर सांगा - वाचायला आवडेल.
त्याबरोबरच तुमच्या टॉप टेन फेव्हरिट स्वप्निल मोमेन्ट्सही लिहा. डायलॉग, एक्स्प्रेशन, अॅक्शन, काहीही.
या माझ्या (नॉट इन एनी पर्टिक्युलर ऑर्डर) :
१. मानिनि मधला 'मैत्रीणी' अशी गिरीजा ओकला मस्त हाक मारणारा स्वप्निल तिचा नवरा जाब विचारायला येतो तेव्हा त्याला खणखणीत सुनावतो. सिनेमा स्त्रीप्रधान असला तरी लक्षात राहतो तो स्वप्निलच. तिला हसवणारा, काळजी घेणारा आणि अगदी प्रामाणिकपणे स्वतःच्या प्रेमाची कबुली देणारा.
२. लाल इश्क मधल्या चांद मातला गाण्यात रोमँटिक दिसणारा स्वप्निल.
३. मोगरा फुलला सिनेमातला साधा भोळा आणि आईचं सगळं ऐकणारा मुलगा. स्वतःचं प्रेम मनातच ठेवून 'तू आहेस की माझ्याबरोबर' असं आईला म्हणणारा स्वप्निल अगदी बॉय नेक्स्ट डोअर वाटावा असा आहे.
४. मुंबई पुणे मुंबई मधला स्वप्निल. यातले त्याचे सगळेच सीन्स अफाट आहेत. त्यातल्या त्यात मूव्हीच्या शेवटी तिला 'तू केलास, याच नंबरवरून याच नंबरला फोन' असं जे खट्याळपणे म्हणतो त्यात त्याचे एक्स्प्रेशन्स आणि तो सगळाच सीन महान आहे.
५. रणांगण मधे सचिन आणि स्वप्नीलमधले सगळेच सीन्स. त्यातले 'विनाशकाले विपरीत बुद्धी' आणि 'देशमुखांच्या चेहर्यावर माज शोभतो , घाम नाही' हे डायलॉग्ज स्वप्निल अगदी सहज बोलून जातो. सगळ्याच सीन्स मधे खाऊन टाकलं आहे त्याने सचिनला.
६. दुनियादारी. यात शिरीनचं लग्न साईशी ठरलेलं कळतं तेव्हा त्याच्या चेहर्यावरचे भाव अफलातून आहेत. हार्टब्रेक अगदी पुरेपूर दाखवला आहे त्याने डोळ्यातूनच.
७. मुंबई पुणे मुंबई २ मधला पिक्चरच्या शेवटाकडचा मोनोलॉग जेव्हा तो मुक्ता बर्वेला जाब विचारतो. अप्रतिम संवादफेक आणि देहबोली आहे त्याची. त्या जागी दुसरा कोणी अॅक्टर शोभलाच नसता.
८. समांतर मधला शेवटचा सीन जिथे त्याला वाटतं की तो जिंकलाय पण अॅक्चुअली तो हारलेला असतो कारण तो जिवंतच नसतो. तेव्हा त्याच्या चेहर्यावरची संपूर्णपणे हारल्याची आणि अडकून पडल्याची एक्स्प्रेशन्स लाजवाब!
९. मितवा मधे 'साधं प्रेमात पडणं नाही अफोर्ड करू शकलो' हा डायलॉग. त्या आधी तो प्रार्थना बेहेरेशी अगदी हसूनखेळून बोलत असतो आणि क्षणात इमोशनल होऊन हे वाक्य म्हणतो.
१०. मुंबई पुणे मुंबई मधेच तो मुक्ता बर्वेची खिचाई करत असतो तो सीन. 'सारसबागेच्या गणपतीकडे तू त्यालाच मागितलं असणार' हे म्हणताना तो कमालीचा खोडकर दिसतो.
फालतू अॅक्टर साठी काढलेला
फालतू अॅक्टर साठी काढलेला धागा.. या सो काॅल्ड अभिनेत्याचा एकही सीन एकही डायलॉग कधीच लक्षात राहिला नाही.
एकाच दिवशी अमिताभ, अमरीश आणि
एकाच दिवशी अमिताभ, अमरीश आणि स्वप्नील... चंगळ आहे वाचकांची....
हा माझा आयडी नाही
हा माझा आयडी नाही
तुर्तास ईतकेच
या सो काॅल्ड अभिनेत्याचा एकही
या सो काॅल्ड अभिनेत्याचा एकही सीन एकही डायलॉग कधीच लक्षात राहिला नाही >> यातला एखादा तरी सीन बघून पहा आणि मग ठरवा
ऋन्मेऽऽषजी तुमचीच वाट पहात
ऋन्मेऽऽषजी तुमचीच वाट पहात होतो
शीर्शक वाचुन मला डु आय वाटला
शीर्शक वाचुन मला डु आय वाटला.
हा माझा आयडी नाही>>> चोरा
हा माझा आयडी नाही>>> चोरा च्या मनात..
हा माझा आयडी नाही
हा माझा आयडी नाही
तुर्तास ईतकेच Wink
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 7 October, 2022 - 00:02 >>>>> हो आधी तेच वाटले कि कदाचित डू आयडी आहे का ? पण ९ वर्ष ९ महिने ?????
फालतू अॅक्टर साठी काढलेला
फालतू अॅक्टर साठी काढलेला धागा.. या सो काॅल्ड अभिनेत्याचा एकही सीन एकही डायलॉग कधीच लक्षात राहिला नाही.
मलाही स्वप्निल जोशी अगदीच आवडतो असे नाही पण फालतू नाही आहे. नाहीतर इतकी वर्ष टिकलाच नसता. काही चित्रपटात चांगले रोल सुद्धा याने केले आहेत. याला आणि सचिन महागुरूं) यांना काही बाबतीत उगाचाच ट्रोल केले जाते.
कट्यार मध्ये शेवटच्या प्रसंगात महागुरूंनी फार चांगला अभिनय केला आहे तरी पण थेटरात त्यांना लोकं हसत होती. शेवटच्या सिन मध्ये शिष्याचे गाणे ऐकून झालेला बदल मुद्राअभिनयातून सचिन यांनी फार उत्तम दाखवला आहे. पण काही लोकांना त्यांना बघून हसल्याशिवाय चैन पडत नाही.
समांतर चा एकही सीन नाही टाकला
समांतर चा एकही सीन नाही टाकला तिथेच ओळखले ऋन्मेष नाही ते... ठिपकेश्वर सर- मनावर घ्या समांतर मधले एक दोन सिन टाकण्याचे...
कितने तेजस्वी लोग हैं यहां!
कितने तेजस्वी लोग हैं यहां!
वाह मानवजी! कडक सीन टाकला
वाह मानवजी! कडक सीन टाकला तुम्ही!
च्रप्सजी, टॉप टेन मधे
च्रप्सजी, टॉप टेन मधे समांतरचा एक सीन टाकला आहे. तुम्हाला कुठला सीन अपेक्षित होता कळलं नाही. तुम्ही पण तुमचा समांतर मधला आवडता सीन टाका ना.
मुंबई पुणे मुंबई हा क्लास
मुंबई पुणे मुंबई हा क्लास आहे !
मुक्ता बर्वे मुंबईची असल्याने तिला काहीही केलेले चालणार होते. स्वप्निलला पुणेकर ऊभा करायचे आव्हान होते.
ते त्याने ईतके जबरदस्त पेलले की पुणेकर म्हटले की मला स्वप्निलच आठवतो. म्हणजे कोणी पुणेकर असे असे असतात वा अमुकतमुक करतात असे म्हटले की मी स्वप्निल त्यात असा दाखवलेला म्हणून पडताळून पाहतो
सर मग या कधीतरी पुण्याला
सर मग या कधीतरी पुण्याला
पुणेकर इतके छपरी, छचोर आणि बालिश वेडसर नसतात हे कळेल
Hahahhaha
Hahahhaha
मला स्वप्नील चे चित्रपट पाहणे
मला स्वप्नील चे चित्रपट पाहणे शिक्षा वाटते.. अपवाद दोन-
1. चेकमेट
2. मोगरा फुलला ...
मी वर दिलेला सीन, तो
मी वर दिलेला सीन, तो पाहिल्यावर टिव्ही बंद केला परत कुठला चित्रपट पाहिला नाही त्याचा.
त्याचं नशीब चांगलं की हा प्रकार घडला तेव्हा समांतर बघून झालेले होते.
मी वर दिलेला सीन, तो
मी वर दिलेला सीन, तो पाहिल्यावर टिव्ही बंद केला परत कुठला चित्रपट पाहिला नाही त्याचा.
>>>
हे जर त्या सीनची खिल्ली उडवायला गंमतीने लिहिले असेल तर ठिक आहे. बहुधा तसेच असेल.
पण खरेच असे कोण वागत असेल तर हे दुर्दैवी आहे. कारण कमर्शिअल कलाकारांमध्ये शाहरूखपासून अमिताभपर्यंत कोणीही असा नाही ज्यांनी बंडल पिक्चर वा बंडल सीन दिले नाहीत. किंबहुना खोऱ्याने दिले आहेत. नेमके त्यातलाच सीन पाहून कोणी त्यांच्यावर काट मारली तर त्यांनी काय गमावले हे त्यांना आयुष्यभर समजणार नाही
नेमके त्यातलाच सीन पाहून कोणी
नेमके त्यातलाच सीन पाहून कोणी त्यांच्यावर काट मारली तर त्यांनी काय गमावले हे त्यांना आयुष्यभर समजणार नाही>>>
खरंय या बाहुल्याला बघून आपण किती मनस्ताप, चिडचिड करून घेतली असती हे आयुष्यभर कधीच समजणार नाही त्याना
खरे सुखी जीव
ओ ठिपका वाले सर,
ओ ठिपका वाले सर,
सुमार दर्जाच्या लोकांचे बेसुमार कौतुक करून, बाकीच्यांना वीट, तिटकारा निर्माण होईल इतपत बोलणारे आधीच एक जण आहेत इथं. अजून एक नई सोसवणार
असा विचार कर की शक्ति कपूर हा
असा विचार कर की शक्ति कपूर हा तुझ्या काही फार आवडीचा नाही. त्याचे मुख्य पात्र असलेले चित्रपट आले, तू बघितले. त्यात असे भंगार सीन्स असतील आणि मग तू त्याचे चित्रपट पाहणे सोडून दिले. (त्यात तुला त्याची कुठेतरी छोटी/मोठी भमिका भूमिका असलेले परंतु तुझ्या आवडीचे इतर जबरदस्त कलाकार असलेले चित्रपट पाहणे सोडणे गरजेचे नाही, तसे तू करणारही नाहीस हे साधे लॉजिक गृहीत धरतोय) तर काय गमावणार असशील तू आयुष्यात?
हां, आता कुणी असू शकते शक्ती कपूरचे प्रचंड फॅन त्यांना पडू शकतो आयुष्यात फरक, पहात राहू दे त्यांना. त्यांनी नाही बघतीला तर ते मुकतील त्या अंनदाला, तू नाही.
आणि पुढे खरेच शक्ती कपूरने असा एखादा जबरदस्त टर्न घेतला आयुष्यात आणि प्रचंड छान अभिनय करून चित्रपट काढलाय जो अजिबात चुकवण्या सारखा नाही असे तुझ्या सारखीच सिनेमाची आवड असलेल्या बऱ्याच जणांनी सांगितले तर तेव्हा तू तो "त्याचे पिक्चर बघणे सोडून दिले" ही प्रतिज्ञा मोडून पहाशिलच की. पण एकंदरीत आता पर्यंत पाहिलेल्या चित्रपटांवरून ती शक्यता फार कमी असल्याने तू त्याचे चित्रपट पहाणे सोडून देणे योग्यच असेल.
आणि आयुष्यात काय गमावले हीच मुळात अति वैयक्तिक बाब आहे. ते फक्त स्वतः पुरते लागू असते इतरांना तीच पट्टी लावून मोजमाप करणे चुकीचे आहे.
नशीब आपल्या प्रेक्षकांनी असा
नशीब आपल्या प्रेक्षकांनी असा विचार करून तेरा फ्लॉप सिनेमे दिलेल्या अमिताभ चा जंजीर नाकारला नाही- नाहीतर बच्चन युग सुरूच झाले नसते... आणि आपण आयुष्यात भरपूर काही गमावले असते...
आनंद आणि बॉम्बे टु गोवा हे
आनंद आणि बॉम्बे टु गोवा हे दोन्ही जंजीरच्या आधीचे आहेत.
पिक्चर फ्लॉप होणे वेगळे आणि
पिक्चर फ्लॉप होणे वेगळे आणि एखादा नट / नटी नावडणे वेगळे.
आणि नशीब आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवडी निवडी आहेत. नाहीतर जे आधी येतील तर सगळे सुपरस्टार्स, ते जाई पर्यंत मग इतरांना संधी नाही, शेवटी लोक किती चित्रपट पाहतात त्याला मर्यादा आहेत. ते गेले की मग पुढचे जे कोणी येईल ते सुपरस्टार्स असे चक्र सुरू राहिले असते.
मुक्ता बर्वे चिंचवड मध्ये
मुक्ता बर्वे चिंचवड मध्ये जन्म शिक्षण म्हणून आम्ही पिंचिकर स्वतःची उगीच पाठ थोपटून घेत होतो की.
ती मुंबईची आहे हे आज कळालं.
मुक्ता बर्वे छान अभिनेत्री
मुक्ता बर्वे छान अभिनेत्री आहे. पण पडद्यावर बरेच बोअरींग व्यक्तीरेखा साकारते. जेव्हा स्वप्निलशी तिची जोडी जमली आहे तेव्हा मात्र ती छान वाटली आहे... प्रभाssव
मुक्ता बर्वे चिंचवड मध्ये
मुक्ता बर्वे चिंचवड मध्ये जन्म शिक्षण म्हणून आम्ही पिंचिकर स्वतःची उगीच पाठ थोपटून घेत होतो की. >>> बिनधास्त थोपटून घ्या रे.
मुक्ता बर्वे तिथेच वाढलीना , त्यामुळे तिथलीच समजायची. मुळ ते बर्वे वसईचे बहुतेक, मुक्ताच्याच एका मुलाखतीत का लेखात तिने हे सांगितलं.
मानव, उद्या प्रवाह पिक्चर्स
मानव, उद्या प्रवाह पिक्चर्स वर मुंपुंमुं दाखवणार आहेत. आज स्टार प्रवाह वर त्याचा प्रोमो म्हणून तुम्ही वर दिलेला सीन दाखवताहेत.
म्हणजे तो सीन त्या चित्रपटाचा USP असावा.
कपाळावर हात!
आं?
आं?
Pages