स्वप्निल - टॉप टेन

Submitted by ठिपका on 6 October, 2022 - 20:11

स्वप्निल पंचेचाळीस वर्षांचा होणार यंदा?!
सोशल मीडियावर शोधायची गरजच नाही पडली!

इथे बरेच स्वप्निल फॅन्स आहेत. तुम्हाला पहिली लागण कशी झाली स्वप्निलची ते आठवतं का? म्हणजे प्रथम कुठला चित्रपट पाहिला असं नव्हे, प्रथम 'अरे, हे भारी प्रकरण आहे' असं कधी वाटलं?

मला प्रयत्न करूनही आठवत नाही, जणू ते कायमच माहीत होतं.

तुम्हाला आठवत असेल तर सांगा - वाचायला आवडेल.

त्याबरोबरच तुमच्या टॉप टेन फेव्हरिट स्वप्निल मोमेन्ट्सही लिहा. डायलॉग, एक्स्प्रेशन, अ‍ॅक्शन, काहीही.

या माझ्या (नॉट इन एनी पर्टिक्युलर ऑर्डर) :

१. मानिनि मधला 'मैत्रीणी' अशी गिरीजा ओकला मस्त हाक मारणारा स्वप्निल तिचा नवरा जाब विचारायला येतो तेव्हा त्याला खणखणीत सुनावतो. सिनेमा स्त्रीप्रधान असला तरी लक्षात राहतो तो स्वप्निलच. तिला हसवणारा, काळजी घेणारा आणि अगदी प्रामाणिकपणे स्वतःच्या प्रेमाची कबुली देणारा.

२. लाल इश्क मधल्या चांद मातला गाण्यात रोमँटिक दिसणारा स्वप्निल.

३. मोगरा फुलला सिनेमातला साधा भोळा आणि आईचं सगळं ऐकणारा मुलगा. स्वतःचं प्रेम मनातच ठेवून 'तू आहेस की माझ्याबरोबर' असं आईला म्हणणारा स्वप्निल अगदी बॉय नेक्स्ट डोअर वाटावा असा आहे.

४. मुंबई पुणे मुंबई मधला स्वप्निल. यातले त्याचे सगळेच सीन्स अफाट आहेत. त्यातल्या त्यात मूव्हीच्या शेवटी तिला 'तू केलास, याच नंबरवरून याच नंबरला फोन' असं जे खट्याळपणे म्हणतो त्यात त्याचे एक्स्प्रेशन्स आणि तो सगळाच सीन महान आहे.

५. रणांगण मधे सचिन आणि स्वप्नीलमधले सगळेच सीन्स. त्यातले 'विनाशकाले विपरीत बुद्धी' आणि 'देशमुखांच्या चेहर्‍यावर माज शोभतो , घाम नाही' हे डायलॉग्ज स्वप्निल अगदी सहज बोलून जातो. सगळ्याच सीन्स मधे खाऊन टाकलं आहे त्याने सचिनला.

६. दुनियादारी. यात शिरीनचं लग्न साईशी ठरलेलं कळतं तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरचे भाव अफलातून आहेत. हार्टब्रेक अगदी पुरेपूर दाखवला आहे त्याने डोळ्यातूनच.

७. मुंबई पुणे मुंबई २ मधला पिक्चरच्या शेवटाकडचा मोनोलॉग जेव्हा तो मुक्ता बर्वेला जाब विचारतो. अप्रतिम संवादफेक आणि देहबोली आहे त्याची. त्या जागी दुसरा कोणी अ‍ॅक्टर शोभलाच नसता.

८. समांतर मधला शेवटचा सीन जिथे त्याला वाटतं की तो जिंकलाय पण अ‍ॅक्चुअली तो हारलेला असतो कारण तो जिवंतच नसतो. तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरची संपूर्णपणे हारल्याची आणि अडकून पडल्याची एक्स्प्रेशन्स लाजवाब!

९. मितवा मधे 'साधं प्रेमात पडणं नाही अफोर्ड करू शकलो' हा डायलॉग. त्या आधी तो प्रार्थना बेहेरेशी अगदी हसूनखेळून बोलत असतो आणि क्षणात इमोशनल होऊन हे वाक्य म्हणतो.

१०. मुंबई पुणे मुंबई मधेच तो मुक्ता बर्वेची खिचाई करत असतो तो सीन. 'सारसबागेच्या गणपतीकडे तू त्यालाच मागितलं असणार' हे म्हणताना तो कमालीचा खोडकर दिसतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages