Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्रह्मास्त्र पाहिला. एकदम
ब्रह्मास्त्र पाहिला. एकदम मस्त वाटला. चांगला वेगवान ठेवलेला आहे चित्रपट. मी काय रणबीरचा फॅन नाही पण त्यानेही चांगला अभिनय केलेला आहे. तसे पिक्चर एक्दम फास्ट थ्रिलर आहे. उगीच फँटसी चित्रपटात लॉजिक शोधण्याची चूक नाही केली तर एकदम एंटरटेनिंग आहे.
लवकरच जाणार आहे बघायला.
लवकरच जाणार आहे बघायला.
ब्रह्मास्त्र पाहिला. नाही
ब्रह्मास्त्र पाहिला. नाही आवडला. व्हीएफएक्स छान आहे. मौनी रॉयचं कॅरेक्टर पण छान आहे. पण ओव्हरऑल पॅकेज नाही आवडलं.
मी कालच हा सिनेमा पाहिला.
मी कालच हा सिनेमा पाहिला. पहायला जाताना खूप स्केप्टिकल होते खरंतर. पण पिक्चर सुरू झाल्यावर त्यात गुंतून गेले. निदान मला तरी VFX आवडले. स्टोरी आवडली. प्रेझेंटेशन आवडले. खूप फ्रेम्स खूप सुंदर आहेत त्यामुळे बघायला नेत्रसुखद सिनेमा आहे. गाणी बरी आहेत असं म्हणेन. म्हणजे शब्द आणि चाली छान आहेत. पण आवाज चांगला हवा होता असं वाटलं. गाणी नसतीच तरी चाललं असतं असं वाटून गेलं. रणबीर मला फारसा आवडत नाही. पण यात त्याचा वावर प्लेझंट आहे. पुराणातल्या अस्त्रांवर आधारित स्टोरी बांधणं कल्पक वाटलं. मला तर व्हिलन्स पण भारी वाटले.
सरतेशेवटी इतकंच म्हणेन की हा पिक्चर बिग स्क्रीन साठी आहे. तो तिथेच पाहिला तर अमेझिंग वाटतो.
हा पिक्चर बिग स्क्रीन साठी
हा पिक्चर बिग स्क्रीन साठी आहे. तो तिथेच पाहिला तर अमेझिंग वाटतो. >> +७८६ आणि असले पिक्चर थ्रीडी च बघावेत. त्यामुळे ओटीटी वर वाट बघावी की थिएटरला जावे कन्फ्यूजन आहे.
मुलांना आवडेल असा आहे का?
मुलांना आवडेल असा आहे का?>>>
मुलांना आवडेल असा आहे का?>>> मुलांनाच जास्त आवडेल
नक्की न्या (एक 5-6 सेकंदाचा kiss scene आहे)
मी आज 2D पहिला, इफेक्ट मस्तच वाटले
एकंदर ठीक-ठाक आहे, नेत्रसुखद नक्कीच आहे, सिक्वेल ची उत्सुकता घेऊनच प्रेक्षक बाहेर पडतो
असले पिक्चर थ्रीडी च बघावेत.
असले पिक्चर थ्रीडी च बघावेत. त्यामुळे ओटीटी वर वाट बघावी की थिएटरला जावे कन्फ्यूजन आहे. >>> मला वाटतं थ्रीडी अजून चांगला वाटेल. मी तिकीटं महाग होती म्हणून थ्रीडी पाहिला नाही पण ओटीटी पेक्षा थिएटरलाच बघावा असं मी रेकमेंड करेन.
मुलांना आवडेल असा आहे का? >>> हो.
ब्रह्मास्त्र कमी प्रेमास्त्र
ब्रह्मास्त्र कमी प्रेमास्त्र जास्त आहे म्हणजे सुपरपॉवर रणबीरकडे पण त्याचं बटन आलियाकडे तेही तिला वाचवायलाच .त्यात पण लव्हस्टोरी ला काय बेसच नाही. डॉयलॉग एकदम बेकार रणबीर आलिया केमिस्ट्री एवढीही दिसत नाही उलट त्यांच्या लग्नाची कॅसेट दाखवली असती तर आकंठ प्रेमात बिमात दिसून आले असते सुरुवातीपासून रणबीरचं केरेक्टर गोधळलेलंच जास्त वाटतं.VFX मात्र हॉलिवूडच्या तोडीस तोड आहेत पण स्टोरी अजून चांगली लिहिली पाहिजे होती .सुरुवातीचं रावण दहनवालं गाणं 3D तच बघण्यासारखं आहे एकदम लार्जर दन लाईफ.ब्रह्मास्त्र बद्दल अजून सविस्तर सांगता आलं असतं तो भाग थोडक्यात निपटवलाय.पुढचा भाग जास्त बेटर असेल (देव ची लव्हस्टोरी) आता देव कोण ते विचारू नका स्पॉयलर आहे.बघायचा असेल तर 3D तच बघा टिव्ही वर VFX ची मजा येणार नाही.
बाकी शाहरुख च्या इन्ट्री ला थेटरात अजूनही शिट्ट्या पडतात.
बाकी शाहरुख च्या इन्ट्री ला
बाकी शाहरुख च्या इन्ट्री ला थेटरात अजूनही शिट्ट्या पडतात.
>>>
आता जायचे झाले तर सोबत शिट्टी घेऊनच जायला हवे
तोंडाने शिट्टी वाजवता येत
तोंडाने शिट्टी वाजवता येत नसेल तर भरपूर छोले मटार खाऊन जावे...
ब्रम्हास्त्र.
ब्रम्हास्त्र.
सिनेमाचा सगळ्यात प्रसिद्ध सेलिंग पॉईंट व्हिएफएक्स आहे, पण व्यक्तिष: मला त्यात सुद्धा काही ग्राऊंडब्रेकिंग आढळले नाही. उगाच झगमगीत रंगीबेरंगी लहरी पुन्हा पुन्हा पाहायच्या. काही विशेष वाटले नाही. मारामारीचे प्रसंग प्रचंड बोर झाले.
संवाद लेखन तद्दन बकवास आहे. इतके ऑकवर्ड आणि अनैसर्गिक संवाद बऱ्याच दिवसांनी सिनेमात पाहिले. रोशनी काय, बटन काय आणि काय. खासकरून शिवा-ईशा संवाद तर सपशेल गंडले आहेत. शिवा तीस वर्षाचा असतो असे दाखवलंय. पण चार दिवसांत हा आणि ईशा प्रेमाच्या आणाभाका काय घेतात, तूच माझं जीवन टाईप बाता काय मारतात, काही मोठे गुपित उघड केल्यासारखे "आय लव्ह यू" काय म्हणतात- १४ वर्षांचा पोरांनी लिहिल्यासारखे वाटतात संवाद.
पटकथेचे सुद्धा थोड्या फार प्रमाणात तसेच आहे. व्हिलनला त्याचे उद्दिष्ट साध्य करून मिळणार काय समजत नाही. शिवा-ईशा सोडून कोणत्याही पात्राला डेव्हलप करण्याची तसदी घेतली नाहीये. अमिताभ बच्चनच्या पत्राबद्दल तो गुरु आहे इतकेच काय ते समजते. मग गुरु असण्यासोबत बाकी जे काही पात्रवैशिष्ठे आहेत ती सिनेमात दिणार नाहीत, प्रेक्षकांनीच यापूर्वी आलेल्या भारी गुरु पात्रांवरून ते गुण अमिताभ मध्ये भरून घ्यावेत (ओबी वॅन,डम्बलडोअर, गॅनडॉल्फ इत्यादी.) शिवाचे दोन मित्र दाखवलेत सुरुवातीला, ते गल्ली भाषेत बा भाई करत असतात- त्यांची साधी नावं सुद्धा आपल्याला समजत नाहीत, आणि ते पुढे कुठे येत पण नाहीत. स्क्रिप्ट मध्ये बहुदा "शिवा कूल आहे दाखवण्यासाठी त्याच्यासोबत दोन हँडसम मित्र दाखवा" इतकेच लिहिलेले.
सिनेमातला एक मोठा गेस्ट स्टार सुद्धा फार एक्साईट करू शकला नाही.
केसरिया आणि देवा हि दोन्ही गाणी सिनेमात छान वाटतात. पहिलं गाणं "डान्सका भूत चढेया" भंपक वाटलं.
सरतशेवटी, खुद्द शिवा आणि ईशा हि प्रमुख पात्रे सुद्धा आजिबात चांगल्या रंगवली नाहीयेत. "ते एकमेकांवर किनई खूप खप प्लेम कलतात" हे पुरेसे मोटिव्हेशन नाहीये. खासकरून ते एकमेकांना काही दिवसांपेक्षा जास्त ओळखत नाहीत असे असताना.
सिनेमातली चांगली गोष्ट- रणबीर आलिया दोघेही सुप्रीम चिकने दिसतात. खासकरून आलिया. फार नेत्रसुखद आहे ती ह्या सिनेमात.
एकूण, सिनेमा फडतूस आहे असे माझे मत झाले. पण, अस्त्राव्हर्स हि कल्पना, व्हिएफएक्स चे बजेट संवाद पटकथा लेखनाकडे वळल्यास अतिशय जबरदस्त होऊ शकते असे वाटते. This has me intrigued.
बाकी शाहरुख च्या इन्ट्री ला
बाकी शाहरुख च्या इन्ट्री ला थेटरात अजूनही शिट्ट्या पडतात.>>> आता जायचे झाले तर सोबत शिट्टी घेऊनच जायला हवे >>>>>> आणि ती शिट्टी 'पाडावी' लागेल
“बाकी शाहरुख च्या इन्ट्री ला
“बाकी शाहरुख च्या इन्ट्री ला थेटरात अजूनही शिट्ट्या पडतात.” - ही असली हवेतली वाक्य सरंच बोलू जाणे. आमच्या थेट्रात न्हाय ब्वा काय शिट्ट्या पडल्या. सिनेमातल्या इतर अनेक ‘सिरियस’ सीन्स प्रमाणेच शाहरुख, नागार्जुन, अमिताभ, डिंपल वगैरेंच्या सीन्स ला मुलं (टीनेजर्स) भरपूर हसत होती.
कॉमींच्या पोस्टला अनुमोदन!!
कॉमींच्या पोस्टला अनुमोदन!!
सिनेमा पहायची इच्छा आहे.
सिनेमा पहायची इच्छा आहे. ओटीटी रिलीज ओक्टोहर मध्ये होईल. मग टेग्रावर ऊतरेल. तो पर्यंत थांबून रहायची तयारी आहे.
अरेरे थोडक्यात सगळया कन्सेप्ट
अरेरे थोडक्यात सगळया कन्सेप्ट थोड्या थोड्या घेऊन कॉपीमिश्रीत भेळ वाटतेय. हॅपॉ, स्टार वॉर्स, राहिलंच तर बाहुबली, पहील्या भागात याची लवस्टोरी, पुढीच्या भागात त्याच्या आईवडीलांची. विकीवर तर त्याची आई कोणे तेही दिसतंय . होरक्रक्स च्या जागी इथे अस्त्रे दिसताय आणि त्यातला तो स्वत: एक असणार जे त्याला माहित नव्हते.
चार पाच वर्षांपासून मोस्ट अवेटेड असणाऱ्या सिनेमाची ही कथा आहे, सिरीयसली ???? तरीही इथे चाट मसाला आणि लिंबू जास्ती पिळया असेल म्हणून थेटरात जाऊन बघायला हरकत नसावी.
हॅपॉ >> मला वाटलं मलाच हाक
हॅपॉ >> मला वाटलं मलाच हाक मारली.
आपला,
हॅरचंद पॉलव
“बाकी शाहरुख च्या इन्ट्री ला
“बाकी शाहरुख च्या इन्ट्री ला थेटरात अजूनही शिट्ट्या पडतात.” - ही असली हवेतली वाक्य सरंच बोलू जाणे.
>>>>
माझे नाही ते वाक्य
वर चेक करा कल्की यांच्या पोस्टमधील वाक्य आहे. मी ते कोट केले आहे
आणि त्यांनीही काही चुकीचे लिहिले नसावे. मी दोन दिवस फेसबूकवर एका पिक्चरच्या ग्रूपवर बरेच रिव्यू वाचत आहेत याचे. बहुतांश रिव्यू मध्ये शाहरूखचा कौतुकाने उल्लेख आहेच. त्याचा नक्कीच काहीतरी स्पेशल कॅमिओ आहे.
कटपुतली चित्रपट डिस्नेवर
कटपुतली चित्रपट डिस्नेवर पाहिला. साऊथ च्या चित्रपटाचा रिमेक आहे पण चांगला बनवला आहे. एकदा बघण्यासारखा आहे.
लहान मुलांनी पहाण्यासारखा मात्र निश्चितच नाही.
शाहरुख च्या इन्ट्री ला थेटरात
.
शिट्टीला दोरी लावून गळ्यात
बाकी शाहरुख च्या इन्ट्री ला थेटरात अजूनही शिट्ट्या पडतात
शिट्टीला दोरी लावून गळ्यात अडकवली की पडत नाही. ट्राफिक पोलिसवाले असेच करतात.
अरेरे थोडक्यात सगळया कन्सेप्ट
अरेरे थोडक्यात सगळया कन्सेप्ट थोड्या थोड्या घेऊन कॉपीमिश्रीत भेळ वाटतेय. हॅपॉ, स्टार वॉर्स>>>>>> अगदी अगदी मला तर हॅपॉ आणि अँवेंजर्स एन्ड गेमची फसलेलं मिश्रण वाटलं. VFX साठी मात्र 3Dतच बघावा. तेवढंच काय ते बघण्यासारखं आहे, अर्थात मला त्यातलं फारसं काही कळत नाही म्हणून मला आवडलं.
बॉलीवूडमध्ये या तोडीचे
बॉलीवूडमध्ये या तोडीचे वीएफएक्स कुठल्या चित्रपटात होते का?
आज ब्रह्मास्त्र सिनेमागृहात
आज ब्रह्मास्त्र सिनेमागृहात पाहिला. आवडला.
बॉलीवूडमध्ये या तोडीचे
बॉलीवूडमध्ये या तोडीचे वीएफएक्स कुठल्या चित्रपटात होते का? >>>
झपाटलेला २
अतिफालतू सिनेमा. विएफेक्स
अतिफालतू सिनेमा. विएफेक्स साठीही पाहू नये. मी इंटरवल मधून ऊठून चाललोय. फूकट दाखवत असेल कुणी तरी पाहू नये.
बॉलीवूडमध्ये या तोडीचे
बॉलीवूडमध्ये या तोडीचे वीएफएक्स कुठल्या चित्रपटात होते का?>>>>>>>>>>
नसतील हि !
पण लवस्टोरी मध्ये वी एफ एक्स चे काय काम ?
लव स्टोरी मुळे सगळा घोटाळा झाला असे वाटते .
'ब्रह्मास्त्र' बघून आलो आताच.
'ब्रह्मास्त्र' बघून आलो आताच.
अमिताभचे नाव 'रघू' आहे , मला फिसक्कन हसू आलं. त्याला रघूगुरू असं एकदोनवेळा म्हटलेलं, मला लघूगुरू सारखं ऐकू आलंय. ह्याने फक्त औपचारिकता म्हणून हजेरी नोंदवली आहे. तो वेगवेगळे जॅकेट घालून 'लँड्स एन्डची' जाहिरात असल्यागत मिरवताना, फक्त प्रीतिभोजासाठी लग्नाला तयार होऊन आलेल्या दूरच्या नातलगासारखा वाटतो. यांचे आश्रम हिमालयाच्या पायथ्याशी असून मागून मोकळे व 'सुरक्षिततेसाठी' समोरून कुलूपबंद आहे. हे गुप्त जागी असून गेटच्या बाजूस 'आश्रम' असे स्पष्ट लिहिलेय तरी व्हँप गँग याच्या शोधात आहे. त्यामुळे व्हिलन यायचे तेव्हा येतातच, हिरो मात्र कुलूपाशी झगडत बसतो.
मौनी रॉयच्या गळ्यावर कांजण्या आल्यासारखी चित्रं गोंदवलीत. ही आणि हिची फौज सतत स्नोबूट्स घालून हिंडतात व प्रार्थनाही करतात. हे सगळे मिळून 'नागीण, क्राईम पेट्रोल व देवों को देव महादेव' मधल्यासारखेच दिसतात. पण हिरोची गँग इतकी लेम आहे की हे ताकतवान वाटत राहतात. हिरोच्या टीममधल्या मुलींची नावं राणी व रवीना व मुलाचे नाव शेर आहे. नावंच नाहीत म्हटलं तरी चालेल. अकबराच्या गोष्टीत जसे तो 'हातही न लावता रेष लहान करून दाखव' म्हटल्यावर बिरबल दुसरी मोठी रेष काढतो. तसेच पण उलट म्हणजे बी ग्रेड व्हिलनटीमसाठी हिरोची सी ग्रेड टीम तयार केलीये.
रघूसरांच्या आश्रमात सगळे ज्येना हास्यक्लबात हात वर करून हसतात तसंच काहीतरी गेटटुगेदर करत अस्त्र अॅक्टिव्हिटी करतात. डिम्पल हेलिकॉप्टरच्या फेरीची ड्रायव्हर आहे. एअरलिफ्ट करायची कुठलीही अर्जन्सी नसताना व बाकी ज्येना कारने ये-जा करताना, ही मात्र इशाला हेलिकॉप्टरने सोडते-आणते. झालं तेवढंच !
आलियाचे एकदोन कपडे वगळता सगळे कपडे 'फॉरेव्हर ट्वेन्टीवन'चे वाटतात. डेनिम पँट्स आणि व्हाईट टँकमधे(फना-फना) कटरीना इतकं कुणीच एकाचवेळी सेक्सी आणि स्ट्रॉन्ग दिसत नाही हे मला लक्षात आलंय. आलियाला दुर्गापूजेच्या सीनमधे एक लाल साडी दिली आहे, त्यात ती फार सुंदर दिसलीये.
हे सगळे वँपला शोधत हिंडल्यामुळे तिला यांना फार शोधावे लागत नाही. हे लगेच सापडतात, अक्षरशः मागेच २० फुटावर असतात व 'उसको हमारे बारे में पता चल गया है' म्हणतात. त्यामुळे जेव्हा यांना ती दणके देते, मला यांच्याविषयी सहानुभूतीही न वाटता, 'मरा मूर्खांनो, कशाला तरफडलात मागेच' वाटले. नागर्जुनाचा रोल फार छोटा आहे व फार संवाद नाहीत. शाखाचे संवाद अत्यंत भंगार आहेत. व्हिलनशी पकडापकडी खेळताना त्याला 'तू घोडा आहेस... नाही, तू तर हत्ती आहेस, गेंडा आहेस' असं अत्यंत वैताग वाटावा असं बोलत राहतो. मगं मौनी रॉय त्याला जादूने बार्बेक्यू/ब्रॉईल करत करपवून टाकते. अर्थात आधी आणलेल्या वैतागामुळे आपल्याला वाईटही वाटत नाही. संवाद अतिशय टुकार आहेत. शिवाय दोन संवांदांच्यामधे जो शून्य काळ असतो तो गरजेपेक्षा जास्त वाटतो, त्यामुळे समोरची व्यक्ती दरथोड्यावेळाने क्लुलेस दिसत राहते.
जमेच्या बाजू म्हणजे रणबीर-आलिया अत्यंत सुंदर दिसलेत, VFX अगदीच वाईट नाहीत. मुलगा 'आमच्यापेक्षा लहान मुलांचा सिनेमा आहे' म्हणाला व मुलगी 'शार्क बॉय अँड लाव्हा गर्ल' सारखा म्हणाली. मला 'छोटा भीम ऑन स्टेरॉईड्स' वाटला. तसा सुरवातीचा अर्धातास सोडला तर एन्गेजिंग आहे.
मौनी हॉट आहे.. मौनी साठी
मौनी हॉट आहे.. मौनी साठी बघायला हवा...
सुरुवातीपासून रणबीरचं
सुरुवातीपासून रणबीरचं केरेक्टर गोधळलेलंच जास्त वाटतं>>>>>>
सगळ्या चित्रपटात त्याचे कॅरेक्टर असेच असते.
Pages