Submitted by मंजूताई on 11 September, 2022 - 23:34
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. गौरीच्या लग्नात शिल्पाला पाहिलं अन् तिला धक्काच बसला. तिला चुकवत गौरीला आशीर्वाद देऊन घाईघाईने ती बाहेर पडली. घरी आली. पलंगावर निपचीत पडून राहिली. आयुष्यात हा प्रसंग कधी येईल ही कल्पनाच तिने कधी केली नव्हती. रमेशने काय झाले विचारताच त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. रडता रडता शिल्पा भेटल्याचं सांगितले. रमेश तिची समजूत घालत म्हणाला की आपण वरदाशी बोललो ना काही एक न लपवता व आपण सगळे मिळून तिचा शोध घेऊ असं प्रॉमिस केलं होतं ना .... होतं ना ? डोळे पूस ,लवकर छान तयार हो वरदा कॉलेजमधून येईलच एवढ्यात आपण शिल्पाला भेटायला जाऊ....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कळली नाही मंजूताई
कळली नाही मंजूताई
वरदाची खरी आई ती नसून शिल्पा
वरदाची खरी आई ती नसून शिल्पा होती.. असेच ना
ऋन्मेष, धन्यवाद! कळतेय की
ऋन्मेष, धन्यवाद! कळतेय की नाही असं वाटत होतं म्हणून टाकू की नको टाकू विचार करत होते. प्रतिसाद संपादित करतो का
सही आहे मंजुताई. दोनदा
सही आहे मंजुताई. दोनदा वाचायला लागली, मग आशय लक्षात आला. जबरदस्त जमलीय.
छान लिहिली आहे.
छान लिहिली आहे.
मलाही कळली नाही.
मलाही कळली नाही.
नाही कळली
नाही कळली
आधी नाही कळाली मग ऋन्मेषचा
आधी नाही कळाली मग ऋन्मेषचा प्रतिसाद वाचून कळाली ! मस्त!
कळवून घेतली,पण मग गौरी कोण
कळवून घेतली,पण मग गौरी कोण आहे?
मंजूताई, चांगला प्रयत्न.माझ्यासारख्याना कळण्यात अडचण आली असेल तर आबुदो.
दोघींच्या कॉमन ओळखीतली मुलगी!
दोघींच्या कॉमन ओळखीतली मुलगी!
अच्छा! आता कसं बरं वाटले.कथा
अच्छा! आता कसं बरं वाटले.कथा आता समजली.धन्यवाद मंजुताई!
इथल्या एका कोतबो धाग्यावरून
इथल्या एका कोतबो धाग्यावरून सुचली ही कथा!