पाककृती स्पर्धा २- कडधान्याची कटोरी चाट -अस्मिता.

Submitted by अस्मिता. on 9 September, 2022 - 11:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कटोरीसाठी: दोन वाट्या मैदा, तीन चमचे कढत तेलाचे मोहन, चमचाभर मीठ
मैद्यात मीठ घालून चमच्याने मिसळून एक वाटी पेक्षा जास्त पाणी घालून घट्ट तिंबून घेतले.
सारणासाठी: मोड आलेले मूग व काबूली चणे प्रत्येकी एक वाटी
मोड आलेले मूग थोडेसे वाफवून घेतलेत. छोले किंचित मीठ व हळद घालून शिजवून घेतलेत.
पुदीना चटणीसाठी: तीन मूठ पुदीना , तेवढीच कोथिंबीर, चमचाभर डाळं, अर्धा चमचा चाट मसाला, एक छोटा आल्याचा तुकडा, किंचित साखर, थोडं मीठ, हिरव्या मिरच्या आणि दोन लिंबांचा रस. मिक्सरमधून घूरकाऊन.
चिंचेची चटणी : मी विकतची वापरली.

बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, उकडलेला बटाटा कुस्करून वर चाट मसाला टाकून, थोडी साखर, थोडे मीठ व थोडा चाट मसाला घालून फेटलेले वाटीभर दही, शेव.

क्रमवार पाककृती: 

कटोरी
१. तिंबलेल्या मैद्याचे छोटे गोळे करून साधारण पुरीपेक्षा पातळ लाटून घेतले.
नंंतर ती लाटी काट्याने छिद्रं पाडून, एका वाटीवर अंगानेटकी पांघरून घेतली व कडा आत दुमडून जास्तीचा भाग काढून टाकला.
छिद्रं पाडणं अंडरइस्टिमेट करू नका, नाहीतर तेलात टाकल्यावर फुगून अमिबासारख्या 'सेल्फ-शेप्ड' पुऱ्या होतील. शिवाय आपल्याकडे थालिपीठाला 'ऑल द वे' न जाणारे भोक असते, तशीही ऑर्नामेंटल भोकं/ छिद्रं नकोत.

२. अशा तीन सारख्या आकाराच्या वाट्या ठेऊन, एकावेळी एक याप्रमाणे तळून घ्या. व्यवस्थित तळल्या गेलेली कटोरी , पूर्ण पिकलेले फळ जसे झाडापासून वेगळे होते तशीच वाटीपासून विभक्त होते.

३. मी तळण टाळण्यासाठी दोन वेगळ्या कटोऱ्याही करून बघितल्या, यात पहिली , ब्रेड थोडी ओली करून लाटून मफिन पॅनवर उलटी टाकून भाजून घेतली व दुसरी- आहे त्या पारीलाच यासोबतच भाजले. या रूपाने साधारण व गरीब दिसतात. फोटो बघा. अगदी कित्येक महिन्यात तेलपाणी न मिळालेला भिकारीच जणू. Proud

४. सगळ्या घटकांचे रुखवत मांडून घ्या.

तळलेल्या कटोऱ्यांमधे थोडे मूग , थोडे छोले (साधारण ५१% नाहीतर स्पर्धेच्या नियमात न बसल्याने हे सगळेच बाद होईल. बघा आता कसं जमतंय. असंही कडधान्याचे तळलेले चाट म्हणजे whole purpose has been defeated व मला जवळजवळ illegal पदार्थ केल्याची मजा आली. Proud ), थोडा कांदा, बटाटा, टमाटा, दही , कोथिंबीर, शेव टाकून गट्टम करा. शक्यतो बटाटा तळाशी असू द्या, म्हणजे सॉलीड बेस होईल व वर कडधान्यं आणि मगं इतर पदार्थ.

१.
Screenshot_20220909_100355.jpg

२.
Screenshot_20220909_100425.jpg
३.

Screenshot_20220909_100443.jpg
४.
Screenshot_20220909_100503 (1).jpg

५.Screenshot_20220909_101239.jpgScreenshot_20220909_101324.jpg
६ ब्रेडची व बेक केलेली
१. Screenshot_20220909_103224.jpg

२..Screenshot_20220909_103006.jpg

३.Screenshot_20220909_102950.jpg
७.Screenshot_20220909_101311.jpg

८.Screenshot_20220909_101434.jpg

९.Screenshot_20220909_101524.jpg

१०.Screenshot_20220909_101536.jpg

११.Screenshot_20220909_101549.jpg

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक किंवा दोन बस्स, यात साधारण दहा कटोऱ्या झाल्या.
अधिक टिपा: 

वेळखाऊ आहे पण कठीण नाही.

माहितीचा स्रोत: 
हेबर किचन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं काय खतरनाक डिशेस करतेस गं बाई. मी इतके तळीव पदार्थ कधी केले नाहीत, पण असले तोंपासू दिसताहेत, तर करणारच. आणि तुला कळवणारच.

छान पदार्थ. लेखनातही फोडणी छान उतरलीय. सगळे स्टेप बाय स्टेप फोटो काढून अपलोड करण्यासाठी वेगळे २५ गुण.

मस्त दिसत आहे. Happy
पाकृ लिहिताना मध्ये मध्ये पंचेस पण जोरदार.
हे आयतं मिळालं तर सुख एकदम.
वाटी लावून तळलेले बघून वाटलं,नंतर वाट्या घासणाऱ्याचे हाल. Lol

झकास, कटोरीचा खटाटोप आहे पण.

मी फक्त काबुली चणे वापरणार, मूग+दही म्हणजे गोड चव डॉमिनंट होईल असे वाटतेय म्हणून.

सगळे स्टेप बाय स्टेप फोटो काढून अपलोड करण्यासाठी वेगळे २५ गुण.>>> Happy
नंतर वाट्या घासणाऱ्याचे हाल>>>> मीच घासल्या Lol
कटोरीचा खटाटोप आहे पण.>>>खरं आहे.
मी नुसतीच वाटीत घेऊन खाल्ली, तरी छान लागली, सारणाची भेळही छान लागते. एका व्हिडिओत 'डिकन्स्ट्रक्टेड चाटही' बघितले. या सारणाचे लेयर करुन त्यात पापडी बुडवून खायची. मला तळण अजिबात आवडत नाही, त्यामुळे शक्यतो टाळते. उरलेल्या तेलाला वापरायलाही नाही आवडत, फेकायलाही नाही झेपत, फेकणेही सोपे नाही (तरीही फेकलंय काहीवेळा). वर्षातून तीनचार वेळाच ठीकंय! आमच्याकडे बाहेर भारतीय पदार्थांचे चांगले पर्याय नाहीतच म्हणून मुलांसाठी अधुनमधून करते.

धन्यवाद सर्वांना! Happy

छानच दिसतय, आयत
चिन्चेची चटणि "दीप"ची वापरलीस का? नाहितर माबोवर फाउल धरला जाइल.

धन्यवाद संयोजक Happy
प्रशस्तिपत्र आवडले , सुरेख आहे.

धन्यवाद अतुल, साधनाताई, वर्णिता.

ज्यांनी या कृतीला मत दिलेय त्यांचे व प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचेच मनापासून आभार. मला तुम्ही खूप आवडता Happy

Pages

Back to top