कटोरीसाठी: दोन वाट्या मैदा, तीन चमचे कढत तेलाचे मोहन, चमचाभर मीठ
मैद्यात मीठ घालून चमच्याने मिसळून एक वाटी पेक्षा जास्त पाणी घालून घट्ट तिंबून घेतले.
सारणासाठी: मोड आलेले मूग व काबूली चणे प्रत्येकी एक वाटी
मोड आलेले मूग थोडेसे वाफवून घेतलेत. छोले किंचित मीठ व हळद घालून शिजवून घेतलेत.
पुदीना चटणीसाठी: तीन मूठ पुदीना , तेवढीच कोथिंबीर, चमचाभर डाळं, अर्धा चमचा चाट मसाला, एक छोटा आल्याचा तुकडा, किंचित साखर, थोडं मीठ, हिरव्या मिरच्या आणि दोन लिंबांचा रस. मिक्सरमधून घूरकाऊन.
चिंचेची चटणी : मी विकतची वापरली.
बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, उकडलेला बटाटा कुस्करून वर चाट मसाला टाकून, थोडी साखर, थोडे मीठ व थोडा चाट मसाला घालून फेटलेले वाटीभर दही, शेव.
कटोरी
१. तिंबलेल्या मैद्याचे छोटे गोळे करून साधारण पुरीपेक्षा पातळ लाटून घेतले.
नंंतर ती लाटी काट्याने छिद्रं पाडून, एका वाटीवर अंगानेटकी पांघरून घेतली व कडा आत दुमडून जास्तीचा भाग काढून टाकला.
छिद्रं पाडणं अंडरइस्टिमेट करू नका, नाहीतर तेलात टाकल्यावर फुगून अमिबासारख्या 'सेल्फ-शेप्ड' पुऱ्या होतील. शिवाय आपल्याकडे थालिपीठाला 'ऑल द वे' न जाणारे भोक असते, तशीही ऑर्नामेंटल भोकं/ छिद्रं नकोत.
२. अशा तीन सारख्या आकाराच्या वाट्या ठेऊन, एकावेळी एक याप्रमाणे तळून घ्या. व्यवस्थित तळल्या गेलेली कटोरी , पूर्ण पिकलेले फळ जसे झाडापासून वेगळे होते तशीच वाटीपासून विभक्त होते.
३. मी तळण टाळण्यासाठी दोन वेगळ्या कटोऱ्याही करून बघितल्या, यात पहिली , ब्रेड थोडी ओली करून लाटून मफिन पॅनवर उलटी टाकून भाजून घेतली व दुसरी- आहे त्या पारीलाच यासोबतच भाजले. या रूपाने साधारण व गरीब दिसतात. फोटो बघा. अगदी कित्येक महिन्यात तेलपाणी न मिळालेला भिकारीच जणू.
४. सगळ्या घटकांचे रुखवत मांडून घ्या.
तळलेल्या कटोऱ्यांमधे थोडे मूग , थोडे छोले (साधारण ५१% नाहीतर स्पर्धेच्या नियमात न बसल्याने हे सगळेच बाद होईल. बघा आता कसं जमतंय. असंही कडधान्याचे तळलेले चाट म्हणजे whole purpose has been defeated व मला जवळजवळ illegal पदार्थ केल्याची मजा आली. ), थोडा कांदा, बटाटा, टमाटा, दही , कोथिंबीर, शेव टाकून गट्टम करा. शक्यतो बटाटा तळाशी असू द्या, म्हणजे सॉलीड बेस होईल व वर कडधान्यं आणि मगं इतर पदार्थ.
१.
२.
३.
४.
५.
६ ब्रेडची व बेक केलेली
१.
२..
३.
७.
८.
९.
१०.
११.
वेळखाऊ आहे पण कठीण नाही.
वॉव! तोंडाला पाणी सुटलं.
वॉव! तोंडाला पाणी सुटलं. मस्त दिसतोय चटकमटक पदार्थ.
भारीच फोटो तर तोंपासू.
भारीच
फोटो तर तोंपासू.
वा भारीच कलात्मक पाकृ
वा भारीच कलात्मक पाकृ
वॅाव, कटोरी चाट एकदम जबरदस्त
वॅाव, कटोरी चाट एकदम जबरदस्त दिसतोय
वाह लय भारी, चमचमीत चाट.
वाह लय भारी, चमचमीत चाट.
आ...हा...!!! एकदम तोंपासू बेत
आ...हा...!!! एकदम तोंपासू बेत!
फारच कल्पक कृती आहे!
क्र. ११आणि १२ ह्या शेवटच्या फोटोंमध्ये दोनच डिश सर्व केलेल्या दिसत आहेत..."त्या दोघीं" साठीच का?....रघुसाठी नाही ????
रघूकडून करून घेतलं मगं त्याला
रघूकडून करून घेतलं मगं त्याला पुराच्या पाण्यात बोट सोडून , त्यात बसवून शेजारच्या बंद घराकडे बघायला सोडून आले.
मस्तंच दिसतेय कटोरी चाट..
मस्तंच दिसतेय कटोरी चाट.. आवडीचा पदार्थ. पण पुर्ण जात नाही त्यामुळे बायको सोबत असल्याशिवाय खात नाही
शेवटच्या दिवशी पाककृती
शेवटच्या दिवशी पाककृती पोस्टायची धावपळ अगदी सिंडरेलाच्या बाराच्या ठोक्यासारखीच झाली. त्यामुळे बायकोला/नवऱ्याला/मुलांना सोबत घ्या पण करा आणि खा
बॅन करा रे हिला कोणीतरी...
बॅन करा रे हिला कोणीतरी...
काॅम्प्लेक्स पे काॅम्प्लेक्स...
काॅम्प्लेक्स पे काॅम्प्लेक्स...
दिये जा रही है...
और जजसाब, खाने को नही मिलता, मिलता है तो सिर्फ फोटो..
मस्त रेसिपी अस्मिता .
मस्त रेसिपी अस्मिता .
झकास. नेहमी करत असशील तर अशा
झकास. नेहमी करत असशील तर अशा टोस्टाडा पॅनचा उपयोग होईल. (नाहीतर पडून राहील).
धववन्ती
धनवन्ती
सरळ विमान पकडायचं आणि माझ्याकडे यायचं , हजार डॉलरला दोन कटोऱ्या हाकानाका.
लोना,
टोस्टाडा पॅन मस्तय.यात मी पापड, ब्रेड व टॉर्टियाच्या काल्पनिक कृतीही केल्या.
तोंपासु फोटो आणि रेसिपी.
तोंपासु फोटो आणि रेसिपी.
भयंकर सुंदर दिसताहेत. नक्की
भयंकर सुंदर दिसताहेत. नक्की करुन बघणार. हीच गरिबांची राज कचोरी म्हणून खपेल ना?
आपल्याकडे थाल्पीठाला 'ऑल द वे' न जाणारे भोक असते तसेही ऑर्नामेंटल भोकं/ छिद्रं नकोत >> आमच्या पहिल्या थालिपिठाला आरपार भोक असतं. मग सगळं ऑर्नमेंटल,
ओह्ह.. आणि वाटी सकटच तेलात टाकायचं. आणि मग त्या उकळत्या तेलातून वाटी काढायची हे महान दिव्य आहे. त्यापेक्षा मफिन पॅनवर उलट्या करुन (नो! नो पीजी८ जोक्स) केलेल्या सोप्या पडतील. आता तर मला ते बेकिंग टार्ट शेल्स असतात त्यातही करेवेसे वाटताहेत. किती तो आळस!
भयंकर सुंदर दिसताहेत. नक्की
भयंकर सुंदर दिसताहेत. नक्की करुन बघणार. हीच गरिबांची राज कचोरी म्हणून खपेल ना?
आपल्याकडे थाल्पीठाला 'ऑल द वे' न जाणारे भोक असते तसेही ऑर्नामेंटल भोकं/ छिद्रं नकोत >> आमच्या पहिल्या थालिपिठाला आरपार भोक असतं. मग सगळं ऑर्नमेंटल,
ओह्ह.. आणि वाटी सकटच तेलात टाकायचं. आणि मग त्या उकळत्या तेलातून वाटी काढायची हे महान दिव्य आहे. त्यापेक्षा मफिन पॅनवर उलट्या करुन (नो! नो पीजी८ जोक्स) केलेल्या सोप्या पडतील. आता तर मला ते बेकिंग टार्ट शेल्स असतात त्यातही करेवेसे वाटताहेत. किती तो आळस!
आणि वरचे पॅनचे फोटो बघुन आता ते द्रोण आकाराचे टोस्टिटो असतात त्यात.
अस्मिता काय ऐकत नाही! मस्तच
अस्मिता काय ऐकत नाही! मस्तच पदार्थ, प्रेझेंटेशन आणि उरका!!
आणि वरचे पॅनचे फोटो बघुन आता ते द्रोण आकाराचे टोस्टिटो असतात त्यात. >> मलाही तेच आठवले. मी शोधाची आजी आहे ( आळसाची जननी असल्याने)
हीच गरिबांची राज कचोरी म्हणून
हीच गरिबांची राज कचोरी म्हणून खपेल ना?>>> माझ्यामते ही गरीबांची नाही, ममव आहे.
उकळत्या तेलातून वाटी काढायची हे महान दिव्य आहे. >>> मी काही अलिबाबातली मर्जिना नाही, तुम्ही चाळीस चोर नाही म्हणून झाऱ्या वापरावा. निथळून ठेवावी व दुसरी घ्यावी. तिसरी तळून होईपर्यंत , पहिली वाटी थंड होते. ती पेपर टॉवेलने पुसून लाटी लावून तळावी.
वंदना आणि अमित,
टोस्टिटो परफेक्ट आहेत , मी ट्राय केलेत फक्त कमी सारण मावते पण वेळ वाचतो व आपण अशा १५-२० खाऊ शकतो. तुम्ही आळशी नाही , बुद्धिमान आहात!!! कारण मगं मी ही आळशी होईन.
सर्वांना धन्यवाद.
वॉव! लगेच उचलून खावीशी वाटतेय
वॉव! लगेच उचलून खावीशी वाटतेय....
मस्त रेसीपी . आमच्या कडे
मस्त रेसीपी . आमच्या कडे बटाट्याची अशी टोकरी तळून घेतात. बटाटे किसून पाण्यात घालुन पिळून घ्यायचे व असेच वाटीत किंवा गाळण्यात भरुन अजुन आत एक छोटी वाटी घालायची व आलू टोकरी बनवायची. आता गरब्याला लोक्स आले की सर्व्ह करता येइल असा स्टार्टर आयटेम आहे.
मस्त आहे रेसिपी अस्मिता..इथे
मस्त आहे रेसिपी अस्मिता..इथे ready made canopy मिळतात..ते वापरून करून बघीन..
मस्त रेसिपी!
मस्त रेसिपी!
थँक्स सर्वांना.
थँक्स सर्वांना.
थँक्स सर्वांना.
थँक्स सर्वांना.
धावेल केया, करून बघ!
Mast मस्त!
Mast मस्त!
मस्त रेसिपी आणि फोटोज. करुन
मस्त रेसिपी आणि फोटोज. करुन बघणार.
वाह! तोंपासु!
वाह! तोंपासु!
अस्मिता त्या वाट्या वेगळ्या
अस्मिता त्या वाट्या वेगळ्या होतात ना तळल्या की?????? खूपच शिव्या बसतील घरी , नाही झाल्या तर अमा म्हणतात त्या बटाटा टोकर्यांनी घात केलाय एकदा.
हो होतात लंपन, लगेचच नाही
हो होतात लंपन , लगेचच नाही झाल्यातर थंड झाल्यावर होतात. बटाट्याच्या टोकऱ्या करणे फार कुटाणा वाटला मला, या पाण्यातून त्या पाण्यात करण्यात हे भांडे पडतात, पुन्हा गाळणी वरून वाटी दाबून तळा. ओलं असलं की तेल फडफड उडणार. ह्या त्यामानाने सोप्या आहेत. मी रुंद तोंडाच्या कड असलेल्या वाट्या वापरल्या. बटाट्याच्या कटोऱ्या छानच लागत असणार.मी फक्त व्हि़डिओ बघितलाय, खाल्ल्या नाहीत.
ओके आधी फक्त त्या टोकऱ्या
ओके आधी फक्त त्या टोकऱ्या करतो
Pages