आई अमेरीकेत आली कि आम्ही मायलेकी मिळून एकएक करत सगळ्या अमेरीकन रेसिपीजचा जीव घेतो. बाजरीचं पीठ घालून बनवलेल्या पॅनकेक्स पासून ते अगदी कांदा टोमॅटो बेसणाचे तिखट फ्रेंच टोस्ट पर्यंत काही म्हणजे काहीच सोडत नाही.. जवळपास सगळ्या वेस्टर्न पदार्थांना जमेल तितका देसी तडका मारतो. त्यात माझी आई ठरली आमिर खान.. बोले तो एक नंबर परिफेक्शनिस्ट ..सगळं कसं अगदी मोजून मापून लक्षपूर्वक करते त्यामुळे रेसिपी कधी फेल जातच नाही.. तर आज मी तीचीच एक सोप्पी नोफेल रेसिपी घेऊन येत आहे आणी तीही माझ्या सोप्प्या शब्दांत.. चला मग, पूर्वतयारीपासून सुरू करूयात
पूर्वतयारी आणि लागणारे साहित्य-
सर्वप्रथम, आदल्या रात्री कितीही मरणाची झोप आली असली तरीही आळस न करता ११ सेंटीमीटर उंची आणि ४.४ सेंटीमीटर त्रीज्या असलेली एक दंडगोलाकार वाटीभर मूग अर्धा लिटर पाण्यात आठ तास भिजत ठेवावे.
मग सकाळी उठताच कोणाकडून तरी मेथीची साडे अठ्ठावन्न पानं आणि कोथिंबीरीची सव्वा पंचवीस पानं पाव इंच देठासकट निवडून घ्यावी, साधारण १० मिलिमीटर लांबीच्या दोन लसणाच्या पाकळ्या सोलून घ्याव्यात, पंचवीस पूर्णांक चार मिलिमिटर लांबीचा आल्याचा तुकडा चिरून घ्यावा, वाटीत मोजून ९८ पांढरे तीळ घ्यावेत, त्रेसष्ठ पूर्णांक पाच मिलिमिटर लांबीची एक हिरवी मिरची घ्यावी, दोन पूर्णांक चौऱ्यांशी ग्रॅम हळद, तेवढाच बेकिंग सोडा आणि त्याच्या दुप्पट काळं मीठ घ्यावं.
pH लेवल ४.४ ते ४.८ असलेलं एकशे वीस ग्रॅम दही घ्यावं. ११५ ग्रॅम ज्वारीचे पीठ घ्यावे.
अशी सगळी साहित्य जमावाजमवीची हलकी कामं इतरांकडून करून घेतली की वॅाफल बनवणाऱ्याने मैदानात उतरावे.
साहित्य
वॅाफल ची कृती -
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात भिजलेले मूग, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि दही हे सगळं ०.११८ लिटर पाणी घालून वाटून घ्यावं.. वाटलेलं बॅटर एका पातेल्यात काढून चिरलेली मेथी, ज्वारीचे पीठ, मीठ हे सगळं ०.२३७ लिटर पाणी घालून साडे आठ मिनिट भिजत ठेवावे
तोपर्यंत वॅाफल मेकरच्या प्लेट्स ला एखाद्या ब्रशने चार चार थेंब तेल लावून त्यावर प्रत्येकी १२ तीळ भुरभुरावेत. त्यानंतर भिजत ठेवलेल्या बॅटरमधे बेकिंग सोडा घालून ३६० अंशात पाच वेळा चमचा फिरवत सगळं बॅटर एकजीव करून घ्यावं.
आता वॅाफल मेकर गरम करायला ठेवावा.. वॅाफल मेकरचं तापमान १९१ अंश सेल्सियसला पोहोचले की १०० चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेल्या प्रत्येक प्लेटवर ५५ ग्रॅम बॅटर ओतावं. मग एखाद्या चमच्याच्या मदतीने सर्वप्रथम बॅटर अग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य दिशेला पसरवून घ्यावे. एकदा का बॅटर चौरसाच्या चारही कोनांपर्यंत व्यवस्थित पोहोचलं कि तोच चमचा पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण दिशेला फिरवावा. आता या प्रकारे बॅटर पसरवून झालं की वॅाफल मेकरचं झाकण बंद करा. बरोब्बर ७२ सेकंदानंतर एकदा झाकण उघडून त्यात शिजलेला वॅाफल बाहेर काढून पलटा आणि झाकण ठेऊन पुन्हा ७२ सेकंद शिजवा.
वॅाफल शिजत असताना एका वाटीत १२२ ग्रॅम दही घ्या, अंगठा आणि तर्जनीच्यी चिमटीत २ ग्रॅम काळं मिठ, २.५ ग्रॅम जीरा पावडर, २.७५ ग्रॅम लाल मिरची पावडर घेत दह्यावर भुरभूरा. घरात लोणच्याची बरणी असेल तर चमच्याने बरणीतलं वरवरचं तेल घेऊन दह्यावर ओता. तोपर्यंत तुमचा वॅाफलही तयार झाला असेल. त्याला छानश्या एका प्लेटमधे घ्या, सोबत दह्याची वाटीही घ्या आणि प्रत्येक घास दह्यात बुडवत वॅाफलचा आस्वाद घ्या.
आहे की नाही सोप्पी वॅाफल नोफेल सेसिपि.. हे सगळं करूनही ज्याचे वॅाफल्स फसणार त्यांनी वॅाफल गेला खड्ड्यात म्हणत सरळ माझ्यासारखा अप्पे पॅन घ्या आणि पटापट खाली दिलेत तसे अप्पे बनवा.
मस्त! लिहिलयही खुसखुशीत.
मस्त! लिहिलयही खुसखुशीत.
मस्त
मस्त
य्यम्मी!!!
य्यम्मी!!!
हल्ली तुमच्या लेकींचे खाऊचे डब्बे आले नाहीत बरेच दिवस...
इनोवेटीव रेसीपी आहे .. पण मला
इनोवेटीव रेसीपी आहे .. पण मला तर ते आप्पे पटकन उचलून तोंडात टाकावेसे वाटताहेत
लिहीलंय बाकी माहितीपुर्ण. वजनमापाचे बारीक सारीक डीटेल दिल्याने माझ्यासारख्या नवख्याला आता वॉफल बनवणे फार सोपे झाले आहे. अन्यथा मी बनवलेल्या चहाची चवही रोज वेगळी निघते. यापुढे चहासाखरेचे दाणे मोजायचे तंत्र वापरेन.
स्वान्तसुखाय, सध्या शाळेला
स्वान्तसुखाय, सध्या शाळेला सुट्टी आहे म्हणून डबे बंद आहेत.. सोमवारपासून पुन्हा सुरूवात होईल
आप्पे आणि वाफल दोन्ही आवडले,
आप्पे आणि वॉफल दोन्ही आवडले, करून बघेन.
मस्त फोटो, आप्पे , वाफल, कृती
मस्त फोटो, आप्पे , वाफल, कृती, साहित्य आणि प्रमाण पण
मस्त दिसतायत.
मस्त दिसतायत.
पाककृती आणि लिखाण, एक नंबर!
पाककृती आणि लिखाण, एक नंबर!
नोफेल वाॅफल/ आप्पे पेक्षा
नोफेल वाॅफल/ आप्पे पेक्षा रेसिपी खुशखुशीत
छान दिसत आहेत. करुन बघतो.
छान दिसत आहेत. करुन बघतो.
सर्वांना थॅंक्यू!!
सर्वांना थॅंक्यू!!
अमितव, अस्मिता - मला हे वॅाफल्स जिरवायला चहा बरोबर दोन चार खारी खावी लागतात .. ज्यांना पौष्टिक आहार आवडतो त्यांना नक्की आवडेल.
एकएक करत सगळ्या अमेरीकन
एकएक करत सगळ्या अमेरीकन रेसिपीजचा जीव घेतो.>>>>>>>>>>>> हे वाक्य आवडलंय... ज्यात त्यात देसीपणा चालू असतोच आपला.
बाकी रेसिपी भारीये.
भारीच. गणिती खुसखुशीत रेसिपी
भारीच. गणिती खुसखुशीत रेसिपी.
रेसिपी छान आहे पण ते
रेसिपी छान आहे पण ते सेंटिमीटर, मिलीमीटर वगैरे बोअर झालं वाचायला.
छान रेसीपी किती पेशन्स आहे
छान रेसीपी किती पेशन्स आहे तुमच्याकडे. मी डोश्याच्या पिठाचे वॉफल्स बनवायचा प्रयत्न केला होता. पण पीठ चिकटले. मशीन करेक्ट गरम झाले नव्हते. वरील रेसीपी मधु मेह व उच्चरक्तदाब दोन्ही च्या रेस्ट्रिक्षन मधून ही मुक्त आहे त्याबद्दल धन्यवाद. मी पीठ बनवून धिरडी घालीन. तुपाबरोबर किंवा बटर बरोबर मस्त लागेल. बघा अॅडमिन फ्युजन मराठी किंवा मॉडर्न मराठी कॅटेगरी पाहिजे.
हळद घातली आहे व मग बेकिन्ग
हळद घातली आहे व मग बेकिन्ग सोडा घातले तर मिस्रण लाल होत नाही का? ढोक ळा बनवताना हा प्रश्न येतो.
innovative रेसिपी आहे.
innovative रेसिपी आहे..पुण्यात हॉटेल मध्ये मिळायला लागली तर सॉलिड खपेल
बाकी वॉफेल मेकर आणण्यापासून आमची तयारी आहे:(
मस्त! मला तर वॉफेल्सपेक्षा
मस्त! मला पण वॉफेल्सपेक्षा आप्पे जास्त टेस्टिंग वाटुन राह्यले.
आप्पे प्रेझें टेशन पण भारी
आप्पे प्रेझें टेशन पण भारी आहे.
पाककृती, लिखाण , सादरीकरण
पाककृती, लिखाण , सादरीकरण सगळंच चविष्ट, लज्जतदार....वै वै
पाककृती, लिखाण , सादरीकरण
पाककृती, लिखाण , सादरीकरण सगळंच चविष्ट, लज्जतदार....वै वै >> मंजू ला अनुमोदन
म्हाळसाचे सगळंच नेहमी मस्त
म्हाळसाचे सगळंच नेहमी मस्त असते.
वॅाफल ची व्हेरसेटलीटी दाखवून
वॅाफल ची व्हेरसेटलीटी दाखवून देणारी दमदार रेसिपी, झकास.
आणि 'नोफेल' आहे वरून म्हणजे 'विफल' नाही होणार प्रयत्न
मस्त.
मस्त.
छान , (वेफल नको) अप्पे करून
छान , (वेफल नको) अप्पे करून बघण्यात येतील
लै भारी म्हाळसे. पण मीही
लै भारी म्हाळसे. पण मीही लंपनच्या कॅटेगरीत. अप्पेच करीन म्हणते.
वॅाफल छान दिसताहेत.
वॅाफल छान दिसताहेत.
आज 100% प्रोटीन्सचे(डाळींचे) आप्पे केले होते. स्पर्धा लक्षातच राहिली नाही आणि नेहमीचे आप्पे काय इथे टाकायचे म्हणून फोटोही काढला नाही.
सर्वांना थॅंक्स
सर्वांना थॅंक्स
हळद घातली आहे व मग बेकिन्ग सोडा घातले तर मिस्रण लाल होत नाही का? >> अजिबात लाल रंग येत नाही .. बहुतेक सोडा आणि हळद फार कमी प्रमाणात वापरल्याने लाल रंग येत नसावा
बाय द वे, अप्पे फारच कमी वेळात आणि फार खरपूसही होतात. ह्याच बॅटरचे डोसे, पॅनकेकही छान लागतात. वर दिल्याप्रमाणे डिप म्हणून चटपटीत दही बनवून त्यासोबत खाल्लं तर हलकीशी दहीवड्यासारखी चव लागते. पूर्वी ज्वारी ऐवजी बाजरीचं पिठही वापरलेलं. तेही चांगलंच लागत होतं.
शोलिड दिसायलेत !!!
शोलिड दिसायलेत !!!
Pages