प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ९ - अकेले है तो क्या गम है.

Submitted by संयोजक on 7 September, 2022 - 23:34

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ९ - अकेले है तो क्या गम है.

डोळ्यासमोर छान हिरवंगार शेत पसरलेलं आहे . आणि मध्येच एखादं (एखादच हं) नारळाचं झाड डौलात उभं आहे. काय म्हणत असेल बरं मग ते?
अकेले है तो क्या गम है ....

ओळखलंत ना मंडळी? आजचा विषय काय आहे ते.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
खेळायला नवीन मंडळींना साधारण कल्पना यावी म्हणून संयोजकांनी प्रकाशचित्र कोलाज स्वरूपात टाकले आहे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (www.maayboli.com/node/47635) पाहा.

Screenshot_20220908-090035_Gallery.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या घरातून दक्षिणायनात सूर्योदय दिसतो , पण गॅलरीला बर्ड नेट असल्याने ते avoid करून फोटो काढणे कठीण जाते , तरी प्रयत्न केलाय. फ्रेम मध्ये मुंबईचा राष्ट्रीय पक्षी आहेच.

20220908_213056.jpg

धन्यवाद अंजू. पण मला अमितव यांचा प्रतिसाद वाचून वाटलं की मी इथे तो फोटो पोस्ट करून चूक केली. फोटो डिलीट करून चूक दुरुस्त केली आहे.

हेमाताई उगवतीचा सुर्य आणि त्याची झाड असून न लपणारी प्रभा फार सुरेख. तो पक्षी त्या प्रकाशात वेगळाच भासतोय. क्लास फोटो.

rr छान होता फोटो .

सगळेच भारी.

अमित, छोट्या टेस्ट पॉइंट्सने वेढलेल्या एकट्या भोकसाच्या भावना चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूहून निराळ्या नसाव्यात.

rmd, कमळाचा फोटू फारच सुंदर!

अमित माझा फोटो ही ठाण्यातलाच आहे. तरी पण जय महाराष्ट्र. Proud
रुक्ष कागदपत्रांच्या छताला टेकतील अशा गठ्ठ्यां बरोबरच तिथे भिंतींवर टांगलेली निसर्गचित्रे त्या सरकारी कार्यालयाला एक वेगळाच आयाम देतात.

हेमाताई उगवतीचा सुर्य आणि त्याची झाड असून न लपणारी प्रभा फार सुरेख. तो पक्षी त्या प्रकाशात वेगळाच भासतोय. क्लास फोटो.>> थॅंक्यु अंजू

Pages