कथाशंभरी २- "रघ्वात्मजप्रतापकाव्यम :) "-अनन्त्_यात्री

Submitted by अनन्त्_यात्री on 8 September, 2022 - 08:46

अंगणात येवोनीया
रघू पाहे बंद घर
दारावर होता ज्याच्या
षण्मासीचा धूळ थर  

बोले रघू स्वत:शीच
"काल चंद्रप्रकाशात
पाहिले मी कोणीतरी
दारापाशी होते जात?"

नीट निरखून पाहे
दारावरची अक्षरे
"पुन्हा येईन मी रात्री
नको देऊस पहारे" 

रघू पडला कोड्यात
"कोण इथे येतो जातो?
धूळभर्‍या दारावर
कोण संदेश लिहीतो?"

रघू बेचैनीत म्हणे,
"कसे सुटावे हे कोडे?"
पुन्हा पुन्हा ध्यान त्याचे
जाई बंद दाराकडे
        
नाही शयनी, भोजनी
ध्यान लागेना कशात
एक वेगळाच बेत
मनी रघूच्या शिजत 

"cc tv च्या कक्षेत
बंद दार आणायचे
गूढ उकलेल मग
धूळाक्षर लेखकाचे"

cc tvचे फूटेज
पाहूनिया रघू म्हणे
"रात्री प्रताप हे केले
माझ्या वंशाच्या दिव्याने"

Group content visibility: 
Use group defaults

भारीच आहे. Lol

कवितेच्या स्वरुपात लिहिण्याची कल्पना आवडली.

Lol